वर्षाविहार २०१४: संयोजक हवेत आणि नवीन कल्पना कळवा

Submitted by Admin-team on 29 May, 2014 - 02:03

यंदाचा (२०१४) वर्षाविहार हा आपला १२वा ववि आहे.. गेली ११ वर्ष उत्साहात साजर्‍या झालेल्या या उपक्रमात नवीन कल्पना पाहिजेत. या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक..

तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा. आपण साधारण्पणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही वर्षासहल आयोजीत करतो.

संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्‍या नावडणार्‍या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नम्र विनंति-
ववि चे ठिकाण ठाण्या पासुन किमान दोन तासांच्या अंतरावर असावे, गाडी मध्ये पुरेसा धुमाकुळ घालता आला पाहिजे, काय?

नवीन कल्पना छान आहेत सगळ्यांच्या ...

पण सगळ्यात आधी हे मनाशी पक्क करा की " हो मी या वर्षी ववि संयोजन करणार आहे ... माझ्या मायबोली करता , माझ्या मायबोलीच्या मित्रांकरता ... "

आणि बिनधास्त झोकुन द्या ... तुमच्यावर टिका होइल , सगळ नीट होइल की नाही , लोक काय म्हणतील ...याची पर्वा करायची नाही ...कारण अस म्हणणारे फक्त बोलू शकतात ..करु काहीही शकत नाहीत .... त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ...

बाकी कोणत्याही प्रकारची मदत , माहीती हवी असल्यास कधीही मला संपर्क करा.

बिनधास्त काम करा , माझा नवीन लोकांना पूर्ण पाठिंबा आहे ...

अस काही नाहीये हिम्या ... येतील नवीन लोक्स ... त्यांच्या मनात थोडी धागधुग असणारच ना ...

आपण कामाने निवृत्त झालो तरी मनाने वविकरच राहणार ...

भिडे, एकदम समर्पक पोस्ट.

हिम्या,घ्या की मग मागे. नाही कोण म्हणतय? Happy

नविन लोक्स,पुढाकार घ्या. आम्ही जुनी मंडळी नक्की मदत करू.

मला आवडले असते संयोजक होणे. पण मी येथे मितान ताई शिवाय कोणालाही ओळखत नाही आणि मलाही कोणी ओळखत नाही.

पिंकी ट्रस्ट मी त्याने काहीही फरक पडत नाही Happy
तुमच्याकडे वेळ असेल तर खरच भाग घ्या Happy
माझी परिक्षा चालूये आणि ऑफिसचं शेड्युलही विचित्र आहे त्यामुळे मी सध्या यात नाही पडतेय.
पण मला शक्य असेल ती सगळी मदत करायला मी तयार आहे

तिथल्या म्हशी अजून तश्याच आहेत की नाही ते बघावे लागेल आधी.<<< कशाला?? Proud

जाई, सगुणाबागेमधला ववि भन्नाट झाला होता.

गाडी मध्ये पुरेसा धुमाकुळ घालता आला पाहिजे >>> तर ववि ठिकाण २ तासांवर कशाला पाहिजे ? Wink जो काय घालायचाय तो गाडी थांबवून घालू Proud

आय अ‍ॅम इन Happy

नमस्कार लोक्स,
नवीन संयोजकांचे स्वागत आणि अर्थात शुभेच्छा .
मुंबै- संयोजकानी या आठवड्यात कोणाकडे तरी जमुन साधारण वविची रुपरेषा ठरवा.
तारिख साधारण जुलैचा शेवटचा आठवडा असणार हे धरुन चला ( २७ जलै २०१४ चा रविवार)
मुग्धा,कडे जमल्यास जुन्या संयोजकांपैकी काहिजण नक्की वेळ देउ शकतील.
चला मुंबैकरापैकी कोण कोण येत्या शनिवारी जमु अथवा भेटु शकतील.

नंदीनी मी असल्याशिवाय सहसा मुंबैची गाडी निघत नाही.आणि म्हशी मागच्या महिन्यापर्यंत होत्या.

घारुअण्णा, माफ करा, पणपुढचे दोन्ही शनिवार मुंबईत नसल्याने शक्य नाही. जुलै मधे वेळ देऊ शकेन.
तस मुग्धा बरोबर संपर्कात आहे. Happy

रीया...
माझी परिक्षा चालूये...>>>... बरेचजण तुझं हे वाक्य वाचून 'कान टवकारून' आणि 'डोळे विस्फारून' बसलेत. लवकरात-लवकर 'परिक्षे'चा 'योग्य तो खुलासा' कर... Wink
Proud

Pages