येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.
या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल
याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.
-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.
१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.
२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड
अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार
४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.
१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार
१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.
भयानक खोटं बोलली आहे ही
भयानक खोटं बोलली आहे ही व्यक्ती.
------ खोट कोण बोलत नाही ? राहुल गान्धी यानी मुलाखती मधे अशोक चव्हाणा आदर्ष प्रकरणात अशोक चव्हाणा वर जरुर कारवाई करु असे आश्वासन (?) दिले होते का सान्गितले होते, तेथे अर्णव ने अजुन खोदुन खुलासा करवुन घेतला, कोट्यावधीनी जनतेने मुलाखत पाहिली आहे.
काय झाले पुढे ? काही आठवड्यात राहुलजी स्वत: अशोक चव्हाणाना सोबत घेऊन 'एकाच' मन्चावर आले होते, पुढे चव्हाण निवडणुकीला उभे राहिले, जनतेच्या मेहेरबानी मुळे निवडुनही आले.
याचा अर्थ खोटे बोललेले चालते असा नका घेऊ... प्रश्न आहे - खोटे कोण बोलत नाही ?
उदय, ते खोटं वेगळं. आत्ता
उदय, ते खोटं वेगळं. आत्ता हमतीतुमरीवर आलेले नेते उद्या गळ्यात गळे घालतात हे परिचयाचं आहे. उमा भारती मोदींना "ये विकासपुरूष नहीं, विनाशपुरूष है" असं म्हटल्याचा व्हिडिओ बघितला आहे, आता बाई मोदींच्या सरकारात जलसंपदा मंत्री आहेत.

स्मृतीतै मोदींनी राजीनामा द्यावा म्हणून आमरण उपोषणाला बसणार होत्या (बसल्या की नाहीत माहीत नाही) पण आज निवडणूक हरून, डिग्रीचे घोळ करूनही मोदींच्या सरकारात मनुष्यबळ विकास मंत्री आहेत.
असल्या कोलांटीउड्यांची सवय झाली आता.
पण मोदी थेट जनतेबद्दल खोटं बोलतात.
गुजरातमध्ये दहा वर्षांत फक्त एका शेतकर्याने आत्महत्या केली असं भाषणात सांगत होते सगळीकडे. पण वास्तवात गुजरातमध्ये दहा वर्षांत ५०००+ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.बिहारचा आकडासुद्धा ह्यापेक्षा कमी आहे.
हे भयानक वाटतं.
पण वास्तवात गुजरातमध्ये दहा
पण वास्तवात गुजरातमध्ये दहा वर्षांत ५०००+ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.बिहारचा आकडासुद्धा ह्यापेक्षा कमी आहे.
----- हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. अशी बातमी किवा त्याचा स्त्रोत काय आहे ? कृपया लिन्क मिळेल का?
हो नक्कीच उदय. National Crime
हो नक्कीच उदय. National Crime records bureau चा डाटा आहे.
२०१२ - http://ncrb.nic.in/CD-ADSI-2012/table-2.11.pdf
२०११ - http://ncrb.nic.in/CD-ADSI2011/table-2.11.pdf
२०१० - http://ncrb.gov.in/ADSI2010/table-2.11.pdf
शेतकर्यांच्या आत्महत्येच्या आकड्यांसाठी सगळ्यांमध्ये पान ९ बघा.
हे Economic Times मधील आर्टिकल -
http://articles.economictimes.indiatimes.com/2014-03-27/news/48630403_1_...
पहिल्यांदा ह्या गोष्टी समोर आल्या तेव्हापासून मीसुद्धा धक्क्यातच आहे. प्रसारमाध्यमांनी नाही दाखवलं हे आपल्याला
Economic Times मधील आर्टिकल
Economic Times मधील आर्टिकल
प्रसारमाध्यमांनी नाही दाखवलं हे आपल्याला>>> एकॉनॉमिक टाईम्स हे देखील प्रसारमाध्यमच आहे!!!
तेवढं माहीत आहे नंदिनी पण
तेवढं माहीत आहे नंदिनी
पण कुठल्या टीव्ही चॅनेलवर बघितलंय ? प्राइम टाइमला तर सोडाच, इतर वेळी तरी? सगळेच लोक इकॉनॉमिक टाइम्स वाचत नाहीत.
एरवी पाणचट बातम्यांमध्ये आणखी मसाला टाकून तासभर घोळवत बसणारे चॅनेल्स एवढ्या मोठ्ठ्या गोष्टीवर गप्प का बसले ??
शेतकर्यांच्या बाबतीत बोललेल्या खोट्याला तर कधीच माफी मिळू शकणार नाही इतकं ग्रॉस आहे ते. (अर्थात मोदी काही माझ्याकडे माफीनामा घ्यायला येणार नाहीत हे माहितीये)
इश्य! प्रसारमाध्यम म्हणजे काय
इश्य!
प्रसारमाध्यम म्हणजे काय ते शिकवलं ते समजलं नाही का तुम्हाला?
मठ्ठ कुठले!
अश्या गोष्टीवर अर्णब सारखे
अश्या गोष्टीवर अर्णब सारखे पाळीव डिबेट करताना दिसणार नाही नेशन वाँट्स टू क्नो मधे हे खोटे येत नाही
ये पैसा बोलता है
आय्ला, ये मोदि भोत पोचेला
आय्ला, ये मोदि भोत पोचेला भीडु है, २०१० से मिडियाको खिसेमे डालके घुम रेला है....
आत्महत्यान्चे प्रमाण
आत्महत्यान्चे प्रमाण धक्कादायक आहे... महाराष्ट्रातले आकडे पण अत्यन्त निराशाजनक
आहे.
मँनेज कसे होते कसे करतात या
मँनेज कसे होते कसे करतात
या साठी महेशबाबू चा बिझनेसमँन नावाचा चित्रपट बघा 2012 चा आहे पण अचूक आहे
मिर्ची ,अत्यंत योग्य प्रतिसाद
मिर्ची ,अत्यंत योग्य प्रतिसाद आहेत तुमचे .मिडीया प्रोबीजेपी होत चाललाय.
मिर्ची, मिर्ची तू कुणाची
मिर्ची, मिर्ची तू कुणाची चालवतेयस खुर्ची?
कोण आहेस बाई तू?
मिर्ची, गुजरातमधल्या
मिर्ची,
गुजरातमधल्या आत्महत्यांच्या आकडेवारीबद्दल धन्यवाद! पंतप्रधान कार्यालयास याविषयी प्रश्न केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या या आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे झाल्या आहेत का तेही शोधलं पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.
अत्यानंदाने तर नक्कीच केल्या
अत्यानंदाने तर नक्कीच केल्या नसतील ना आत्महत्या, एका शेतक-याने जीव द्यायचे काय कारण असेल?
पण महाराष्ट्रापेक्षा कमीच..
<<कोण आहेस बाई तू?>> साती, एक
<<कोण आहेस बाई तू?>> साती, एक पक्की माबोकरीण
आणि मोदीलाटेत संमोहित न झालेली एक नागरिक.
उदयन, सध्या अर्णब "डोण्ट एवर एवर एवर एवर एवर अँग्री अर्णब" म्हणतो
<<आय्ला, ये मोदि भोत पोचेला भीडु है, २०१० से मिडियाको खिसेमे डालके घुम रेला है....>>
हॅ, मोदींची काय ऐपत मिडियाला खिशात घालायची? मोदी आणि गांधी दोन्ही बाहुले आहेत, त्यांना नाचवणारा सूत्रधार वेगळा आहे!
"कर लो मिडिया मुठ्ठी में" :डोमा:....४००० कोटी देऊन उघडपणे नेटवर्क १८ विकत घेतलंय. पडद्यामागचा तर नुसता अंदाजही नाही करता येणार.
<<मिडीया प्रोबीजेपी होत चाललाय>>
फार सौम्य शब्द वापरलात तुम्ही दौलतराव.
मिडियाच्या बातम्या लपवण्याच्या लाजिरवाण्या कृत्याचं एक अगदी ताजं उदाहरण पाहिलंय. ८-१० दिवसांपूर्वी.
८० वर्षांच्या शेतकरी जोडप्याला खांबाला बांधून ठेवल्याची बातमी CNN-IBN वर वाचली होती. अतिशय करूण फोटो होता तो.जमीन बळकावण्याचा प्रकार होता. आदित्य बिर्ला ग्रुपचं नाव आलं होतं त्यात. मिडिया मुठीत आल्या-आल्या ती बातमी वेबपेजवरून उडवली गेली. This page is deleted येत होतं. आणि दुसर्या दिवशी तर तेसुद्धा नाही. थेट होमपेजवर रिडायरेक्ट करत होतं. लिन्क टाकते शोधून.
"Mr Kejriwal alleged at the Varanasi rally that over 5,000 farmers have committed suicide in Gujarat over crop failure in the last 10 years.
The Modi government said, "This is a blatant lie. During his visit to Gujarat, Kejriwal had claimed that 800 farmers had committed suicide in the last 10 years and now at the Varanasi rally, the figure has gone to over 5,000. This shows the blatant falsehood... The fact is only one farmer has committed suicide due to crop failure in the last 10 years."
http://www.ndtv.com/elections/article/election-2014/narendra-modi-govern...
आता हेच मोदी सरकार केंद्रात आलंय. आनंदीआनंद.
<<शेतकऱ्यांच्या या आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे झाल्या आहेत का तेही शोधलं पाहिजे.>>
गापै, रिपोर्ट बनवताना सगळे confounding factors काढून टाकल्यावरच दोन राज्यांमध्ये तुलना केली जाऊ शकते ना. बिहारला वेगळा नियम आणि गुजरातला वेगळा असं कसं होईल?
<<पण महाराष्ट्रापेक्षा कमीच..>> हम्म्म. म्हणून तर इथल्या शेतकर्यांनी मत दिलं विकासपुरूषाला. १० वर्षांत १ आत्महत्या कोणालाही भुरळ घालेल.
महाराष्ट्रापेक्षा
महाराष्ट्रापेक्षा कमीच>>>विनिता महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी तर गुजरातची सहा कोटी ,त्यामुळे दर लाख शेतकर्यामागे आत्महत्येचा आकडा जवळपास सारखा येतो .त्यामुळे गुजरात फारच चांगले महाराष्ट्र वाईट असे काही नाही. महाराष्ट्रातल्या संस्था एनजीओ शेतकरी संघटना या सजग असल्याने आत्महत्येची नोंद होते. गुजरातमध्ये क्रॉनी कॅपिटलीझमचा ट्रेँड मोदींनी सुरु केल्याने प्रत्येकजण स्वार्थ बघतो, तिथे शेतकर्यांचे कुणी ऐकत नाही.
खाजगीकरण उदारीकरण यांची कास धरल्याने लोकांच्या हातात पैसा येतोय परंतु सरकारचे उत्पनाचे स्त्रोत गुजरातेत घटले आहेत.
मोदीलाटेत संमोहित न झालेली एक
मोदीलाटेत संमोहित न झालेली एक नागरिक. >> पुलंनी एका प्रस्तावनेत म्हटल्यासारखंच आहे. संमोहित होणे चुकत नाही, फक्त प्रत्येकाचे संमोहक वेगळे असतात.
गुजरातमध्ये दहा वर्षांत ५०००+
गुजरातमध्ये दहा वर्षांत ५०००+ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.बिहारचा आकडासुद्धा ह्यापेक्षा कमी आहे.
हे भयानक वाटतं. >>
अहो मिर्ची इकॉनॉमिक टाईम्स मधून जो ५८७२ आकडा मिळतो, तो केजरीवालचा आरोप आहे. तुम्ही ते आर्टीकल वाचा, त्याला कुठलाही पुरावा दिलेला नाही. केजरीवालच्या कुठल्याही आरोपाला कुठलाही पुरावा देण्याची बोध नसते.
तुम्ही जे आकडेवारी दिली आहे पिडिएफ मध्ये त्या दरवर्षी ५००+ आहेत पण ती ३ वर्षांची आकडेवारी आहे. १० ची पण द्या.
बाकी हे नंतर वाचले.तुमच्या पोस्ट मध्ये "Mr Kejriwal alleged at the Varanasi rally that over 5,000 farmers have committed suicide in Gujarat over crop failure in the last 10 years"
केजरीवाल बरळतो. त्याला ह्या देशातले कुठलेही कायदे (अगदी बेलचा) पण मान्य नाहीत. ह्या माणसाबद्दल पूर्वी आदर होता, आता नाही. फार सिरियसली तुम्हीही घेऊ नका. शाजिया इल्मी होईल.
एकंदरीत आप वाले लोक बरळतात असा अनुभव आहे. (त्यांनीच भारतीय जनतेला दिलेला).
मला आधी वाटले तुम्ही ते करताय ते कौतुकास्पद आहे. पण नंतर आता सगळं आप भरोसे दिसलं.
, त्यांना नाचवणारा सूत्रधार
, त्यांना नाचवणारा सूत्रधार वेगळा आहे! >>> हो. अगदी ! श्रीमान केजरीवालांनी त्यांचे नाव अंबानी आहे असे घोषीत केले आहे. तेच राहूल आणि मोदींना नाचवतात हे तुमचे म्हणणे सुर्यप्रकाशाएवढेच सत्य असेल कारण ते केजरीवालांनी ऑलरेडी म्हणले आहे. तर ते खोटे असूच कसे शकते?
अहो मिर्चीबाईंची आधीच शाजिया
अहो मिर्चीबाईंची आधीच शाजिया इल्मी त्यात अंजली दमानिया अशी गत ऑलरेडी झालेली आहे. वरच्या पोस्ट वाचल्यावर प्रत्यय येतो. मस्त करमणूक करतात त्या. चालुद्या. मज्जाच्चे.
केदारभौ, शांत शांत. हा घ्या
केदारभौ, शांत शांत.
हा घ्या डाटा १९९७ पासूनचा. एवढा पुरेल ना?
http://ncrb.nic.in/adsi/data/ADSI1997/table-23.pdf १९९७-पान ५
http://ncrb.nic.in/adsi/data/ADSI1998/table-23.pdf १९९८-पान ५
http://ncrb.nic.in/adsi/data/ADSI1999/table-23.pdf १९९९-पान ५
http://ncrb.nic.in/adsi/data/ADSI2000/table-23.pdf २०००-पान ५
http://ncrb.nic.in/adsi/data/ADSI2001/ATABLE%202-11.htm २००१-वेबपेज आहे. Self-employed-farming/agriculture मध्ये पहा.
http://ncrb.nic.in/adsi/data/ADSI2002/atable%202.11.pdf २००२-वेबपेज आहे. Self-employed-farming/agriculture मध्ये पहा.
http://ncrb.nic.in/adsi/data/ADSI2003/atable%202.11.pdf २००३-पान ९
http://ncrb.nic.in/adsi/data/ADSI2004/atable%202.11.pdf २००४-पान ९
http://ncrb.nic.in/adsi/data/ADSI2005/atable%202.11.pdf २००५-पान ९
http://ncrb.nic.in/adsi/data/ADSI2006/Table-2.11.pdf २००६-पान ९
http://ncrb.nic.in/adsi/data/ADSI2007/Table-2.11.pdf २००७-पान ९
http://ncrb.nic.in/ADSI2008/table-2.11.pdf २००८-पान ९
२००९ चा डाटा सापडला नाही.
२०१२ - http://ncrb.nic.in/CD-ADSI-2012/table-2.11.pdf
२०११ - http://ncrb.nic.in/CD-ADSI2011/table-2.11.pdf
२०१० - http://ncrb.gov.in/ADSI2010/table-2.11.pdf
"मित्रोंss, मेरे गुजरात मेंssss, दस साल में sss सिर्फ १ किसान ने आत्महत्या की है" वाल्या मोदींच्या भाषणाची लिन्क हवी आहे का?
बाकी केजरीवालांबद्दल तुम्ही जो काही आक्रस्ताळेपणा दाखवलाय दोन्ही पोस्टींमध्ये त्याबद्दल एकच वाक्य लिहावंसं वाटतं.
“The further a society drifts from truth the more it will hate those who speak it.”
― George Orwell
विचारवंतांच्या तिरकस पण फुसक्या वाक्यांना मी उत्तर देणार नाही (हे वाक्य एलतिगो मधल्या दत्ताभाऊंच्या टोनमध्ये वाचावे!)
मिर्ची - धन्यवाद... साधारण दर
मिर्ची - धन्यवाद... साधारण दर वर्षी ५०० हुन अधिक. दहा वर्षात ५००० आहेतच
केदारभौ, शांत शांत. >>. मी
केदारभौ, शांत शांत. >>. मी नेहमी शांत असतो. मला आकडेवारी आवडते हे तुम्हाला माहिती असेलच.
आकडेवारी बद्दल धन्यवाद ! मोदींनी खोटे बोलणे अपेक्षित नाही. जे खोटे ते खोटेच !
आता केजरी ... पूर्ण अवातंर
केजरीवालांबद्दल तुम्ही जो काही आक्रस्ताळेपणा दाखवलाय दोन्ही पोस्टींमध्ये त्याबद्दल एकच वाक्य लिहावंसं वाटतं >>.
हा हा हा. तो आक्रस्ताळेपणा नाही. त्यांच्याबद्दल मला जाम आदर होता. पण ही लॉस्ट इट ! दिल्लीत भाजपा पेक्षाही त्यांना जास्त सिट मिळाल्या तेंव्हा मी न्युयॉर्क मध्ये होतो अन टीम ला जेवण दिले होते. एक कोणीतरी माणूस काहीतरी करतोय, ज्यामुळे देशाचे चांगले होईल वगैरे वगैरे भावना होती तेंव्हा !!
तर तो आदर परत भरून यायला वेळ लागेल, कदाचित, कदाचित येणारही नाही. त्याचे कारण तुमचे अॅटोक्रॅटिक, वेडसर नेते अरविंद केजरीवाल कारणीभूत आहेत.
तुम्ही फक्त त्या लाटेत असल्यामुळे ते अॅटोक्रॅटिक, लहरी वगैरे आहेत हे तुम्हाला मान्य होणार नाही. त्यांचे अजेंडा देखील पहिल्या काही दिवसात बदलले.
१ आधी राहूल.
२ मग अंबानी
३ आणि पर्यायाने मोदी / भाजपा.
असो. ही इज जस्ट अनादर नौटंकी टू मी नाऊ. (पूर्वी कुणीतरी हाच शब्द त्यांच्याबद्दल उच्चारला, तर मला वाईट वाटले होते बरं का मिर्ची, पण ही डिजर्व्ह इट. )
हे आपलं तुम्ही मी आक्रस्ताळेपणा करतोय असे लिहिता म्हणून लिहिले. तसे जस्टिफाय करायची गरज नव्हती, कारण तुमच्या दुसर्या आयडीने तुम्ही माझ्या पोस्ट वाचल्या असतीलच.
हो. इतका आक्रस्ताळेपणा निव्वळ
हो. इतका आक्रस्ताळेपणा निव्वळ आपचे लोक करताना पाहिले आहेत. त्यांचा नक्की काय प्रॉब्लेम आहे तेच कळत नाही. विरोधाला विरोध करायचा, तुम्ही काय करून दाखवा म्हट्ले की धरण्यावर बसायचे.
शेतकर्यांच्या आत्महत्या हा फार मोठा गहन आणी वेगळा विषय आहे. त्यासाठी नुसते "शेतकरी" असे व्यवसाय असलेल्या व्यक्तींच्या आकड्यांची माहिती देऊन भागत नाही. त्या शेतकर्याने शेतीमधून उत्पन्न मिळत नसल्याने कर्जबाजारी होऊन शासकीय, सामाजिक आणी मानसिक दबावाखाली आत्महत्या केली आहे का? ते पहावे लागते. विदर्भामध्ये असा सोशिओ इकॉनॉमिक स्टडी कित्येक एनजीओनी केलेला आहे. असा एखादा अभ्यास गुजरातेमध्ये झालेला आहे का? अस्ल्यास, त्याबद्दल वाचायला मिळेल का?
एक शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा त्याचा आकडा दिसतो, पण त्यामागे किमान पन्नास शेतकरी असे असतात ज्यांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येऊन गेलेले असतात, जेव्हा धोरणं ट्।अरवायची आस्तात तेव्हा नुसती शेतकर्याने आत्महत्या करू नये म्हणून पॅकेज देऊन चालत नाही, त्याऐवजी शेतकर्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येऊ नयेत म्हणून त्याने कर्जबाजारी होऊ नयेत म्हणून धोरणे ठरवावी लागतात. तश्या योजना राबवाव्या लागतात. नुसतं आरडाओरडा करून विकास होत नाही. कामं करावी लागतात, मग लोक दुसृयांदा निवडून देतात. नाहीतर घरी बसवतात.
<> बरं मग? मुद्द्यांवर
<> बरं मग? मुद्द्यांवर बोलूया? मोदीभक्त आणि AAPtard....संस्कार सांगायला शब्द पुरेसे बोलके आहेत!
नमोभक्तांना गृहपाठ. सगळ्या वर्षांच्या आकड्यांची बेरीज करायची.
(आणि ती ५७८२ ऐवजी ५७८१ जरी भरली तर लग्गेच एखाद्या चॅनेलला सांगायचं. दिवसभर ही ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवली जाईल ह्याची पूर्ण हमी देण्यात येत आहे! "केजरीवाल ने आत्महत्या की संख्या पूरे १ नंबर से अधिक बताई" :हाहा:)
साती, तुमच्या धाग्यावर सगळं लिहितेय. काही हरकत असेल तर प्लीजच सांगा.
<<जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.>>
हेडरमध्ये लिहिलेलं हे लक्षात आहे. पण आपण ज्या जोरावर निवडून दिलंय ते मॉडेल नक्की आहे तरी काय हे कळल्याशिवाय पहारा कसा करणार?
मोदींच्या तोंडातून बाहेर पडणारं शेतकर्यांविषयीचं कुठलंही आश्वासन ऐकताना वरची आकडेवारी लक्षात ठेवणं गरजेचं वाटतं.
धन्यवाद केदार आणि नंदिनी. I
धन्यवाद केदार आणि नंदिनी.
I rest my case
-- - - -- -- -- - -- - - -- -- -- - -- - - -- -- -- - -- - - -- -- -- -
अवांतरः मिर्चीताईंच्या पोस्ट आणि त्यांची शैली पाहून एक विस्मयाकारक परममित्र यांची आठवण झाली. तर ते असोच. मस्त करमणूक होते आहे.
) एनजीओज वर विश्वास कधीपासून
:))
एनजीओज वर विश्वास कधीपासून ठेवू लागलेत हे लोक?
गुजराथेत शेतकर्यांच्या
गुजराथेत शेतकर्यांच्या आत्महत्यांची नोंद अपघाती मृत्यू अशी करून घेतली जात असल्यचा संशय व्यक्त करणार्या या बातम्या.
१ http://archive.indianexpress.com/news/national-data-says-farmer-suicides...
२ http://www.ndtv.com/article/india/a-year-after-death-gujarat-court-certi...
ही बातमी नाही. पण आकडेवारी दिलेली आहे.
http://www.truthofgujarat.com/farmer-suicides-gujarat-facts-figures-vs-g...
मिर्ची| 12 June, 2014 -
मिर्ची| 12 June, 2014 - 00:32नवीन
केदारभौ, शांत शांत.
हा घ्या डाटा १९९७ पासूनचा. एवढा पुरेल ना?>>>>
दरवर्षी पाचशे शेतकरी गुजरातेत आत्महत्या करतात. भयानकच आहे सगळं.
मोदी हे माइल्ड कम्युनिझम राबवत आहेत. सगळी सत्ता एक हाती. सध्या त्यांनी मंत्रीगट बरखास्त करुन सर्व निर्णय स्वतःकडे ठेवले आहेत. थोडक्यात एक प्रकारची कम्युनीस्ट लष्करी राजवटच ते राबवत आहेत.
Pages