मेथ्याची कोशिंबीर
साहित्य:
१/२ वाटी मेथ्या भिजवून, मोड आणून (१ वाटी होतात मोड आल्यावर)
१ चमचा मध
१ चमचा लिंबू रस
१/४ चमचा मीरे पा.
मीठ
१ काकडी बारीक चीरून
१ गाजर बारीक चीरून
कोथिंबीर
१-२ चमचे शेंगदाणे कूट
२ चमचे तेल
जीरे, मोहरी फोडणी साठी
कृती
एका लहान कढाई मध्ये तेल टाकून जीरे मोहरी ची फोडणी करावी. त्यात मोड आलेल्या मेथ्या टाकून भराभर २-३ मिनिट परतावे. झकन ठेवून २ मिन. वाफ येऊ द्यावी. गॅस बंद करावा. एका बोल मधे मेथ्या काढून घ्याव्या. त्यात मीठ, मध, मीरे पा. , लिंबू रस, कूट, काकडी, गाजर टाकून चांगले मिक्स करावे. वरुन कोथिंबीर टाकावी.
मध आणि लिंबमुळे कडू लागत नाही. मेथ्या खूप औषधी आहेत, तेव्हा अश्या पद्धतीने खाल्ल्या जातात.
वेगवेगळ्या सलाड च्या वस्तू घालून सुद्धा छान लागेल. (लेटस्, बारीक चिरलेला कोबी)
छान रेसिपी!
छान रेसिपी!
मस्त..
मस्त..
छान प्रकार. मेथीला लांब मोड
छान प्रकार. मेथीला लांब मोड आले असतील तर शिजवायची पण गरज नाही.
छान माहीती. उद्याच करेल.
छान माहीती. उद्याच करेल.