मेथ्याची कोशिंबीर

Submitted by स्वप्नाली on 4 May, 2014 - 19:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मेथ्याची कोशिंबीर

साहित्य:
१/२ वाटी मेथ्या भिजवून, मोड आणून (१ वाटी होतात मोड आल्यावर)
१ चमचा मध
१ चमचा लिंबू रस
१/४ चमचा मीरे पा.
मीठ
१ काकडी बारीक चीरून
१ गाजर बारीक चीरून
कोथिंबीर
१-२ चमचे शेंगदाणे कूट
२ चमचे तेल
जीरे, मोहरी फोडणी साठी

क्रमवार पाककृती: 

कृती
एका लहान कढाई मध्ये तेल टाकून जीरे मोहरी ची फोडणी करावी. त्यात मोड आलेल्या मेथ्या टाकून भराभर २-३ मिनिट परतावे. झकन ठेवून २ मिन. वाफ येऊ द्यावी. गॅस बंद करावा. एका बोल मधे मेथ्या काढून घ्याव्या. त्यात मीठ, मध, मीरे पा. , लिंबू रस, कूट, काकडी, गाजर टाकून चांगले मिक्स करावे. वरुन कोथिंबीर टाकावी.
मध आणि लिंबमुळे कडू लागत नाही. मेथ्या खूप औषधी आहेत, तेव्हा अश्या पद्धतीने खाल्ल्या जातात.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

वेगवेगळ्या सलाड च्या वस्तू घालून सुद्धा छान लागेल. (लेटस्, बारीक चिरलेला कोबी)

माहितीचा स्रोत: 
माझे प्रयूग, वेब
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users