'आजोबा' - परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - चित्र क्रमांक १

Submitted by माध्यम_प्रायोजक on 29 April, 2014 - 03:03

'ही आपल्यासमोर आहेत ही माणसं कोण?', 'नक्की चाल्लंय काय त्यांचं?', 'आणि हा कुत्रा का घाबरालाय म्हणतो मी एवढा? आता खाणार आहे का मी त्याला इथे अडगळीत?'...

आजोबाला नक्कीच असे प्रश्न अनेकदा पडले असतील. पण आता हे प्रश्न विचारणार कोणाला आणि उत्तरं देणार तरी कोण?

पण तुमचं-आमचं तसं नाही. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही नक्की उत्तरं देऊ शकता. Proud

'आजोबा' हा चित्रपट प्रदर्शित होतोय ९ मे रोजी. त्या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत एक स्पर्धा.

परस्परसंबंध ओळखा स्पर्धा.

ही स्पर्धा अगदी सोप्पी बरं का!

खाली एक चित्र दिलं आहे. या एका चित्रात पाच चित्रं आहेत. काही माणसांची, काही वस्तूंची, काही ठिकाणांची.

ajoba1-koda.jpg

या चित्रांचा संबंध मायबोलीवरच्या एका धाग्याशी आहे.

तुम्हांला मायबोलीवर असलेला हा धागा ओळखायचा आहे.

हां, पण फक्त हा धागा ओळखून काम भागणार नाही. तुम्हांला या चित्रांचा तुम्ही ओळखलेल्या धाग्याशी संबंध कसा, हे सांगायचं आहेच, शिवाय त्या धाग्याच्या आशयाशी या चित्रांचा असलेला संबंधही सांगायचा आहे.

आता आम्ही एवढी मेहनत घेतली, बक्षिसाचं काय?, असं तुम्ही विचारण्याआधीच सांगून टाकतो.

या कोड्याचं अचूक उत्तर देणार्‍या पहिल्या स्पर्धकाला मिळेल ६ मे रोजी मुंबईत होणार्‍या किंवा ९ मे रोजी पुण्यात होणार्‍या 'आजोबा'च्या शुभारंभाच्या खेळाचं एक तिकीट. या खेळाला चित्रपटातील (आजोबा वगळता) सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित असतील.

या कोड्याचं बरोब्बर उत्तर देण्याची अंतिम मुदत आहे ३० एप्रिल, रात्री बारा वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार).

महत्त्वाची सूचना -

उत्तर याच बाफवर लिहायचं असलं, तरी स्पष्टीकरणासह संपूर्ण उत्तर दिलं असलं, तरच बक्षीस मिळेल.

तसंच, शुभारंभाच्या खेळाची तिकिटं चित्रपटनिर्मात्यांकडून देण्यात येतात. अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमात बदल झाल्यास तसं विजेत्यांना कळवण्यात येईल.

IMG-20140426-WA0004.jpg

तर मग लावा तुमचं डोकं कामाला, आणि बघा 'आजोबा'ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हांला सापडतायेत का...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किस्सा कुर्सी का - संजय गांधी नॅशनल पार्क >>> हे कनेक्शन कसे आहे रे? मला नाही कळाले.>>>> हा चित्रपटाची कथा इंदिरा गांधी आणि संजय गांधीवर आधारीत होती.

माप्रा, अजुन एखादा क्लु. Happy (माबोच्या कुठल्या विभागातील धागा इ. इ. Proud )

स्वगतः माप्रा, प्रतिसादात नेहमी "मार्ग", "वाट" असं लिहितात. तोच एखादा क्लु असावा का? Happy

माप्रांनी दिलेल्या 'मार्गाच्या क्लू मुळे हे नर्मदेहर, परिक्रमा, कैलास सरोवर यात्रा या धाग्यांपैकी आहे की काय अशी शंका येऊन त्यांना भेट देऊन आले. पण ....

शबाना आयडीच्या धाग्यांचाही इथे काही संबंध दिसला नाही. Happy

सॅटेलाईट पृथ्वीभोवती भ्रमण करतो, खुर्ची भोवती सगळं राजकारण फिरतं.... असे दोन संबंध असू शकतात.

मामी,
नाही. Happy

तुम्ही पाऊलवाट पकडली तरी चालेल, पण इथे संबंध फक्त 'आजोबा'शीच आहे. आजोबा आणि मायबोली. Happy

एक क्लू - या चित्रांशी संबंधित असलेला प्रत्येक शब्द त्या धाग्यात आहे. आणि प्रत्येक शब्दाचा संबंध 'आजोबा'शी आहे.

http://www.maayboli.com/node/28271

१> नासा सॅटेलाईट >> जुन्नरचं एक वैज्ञानीक महत्व म्हणजे खोडदला असलेली महाकाय रेडिओ दुर्बीण

२ - ३> माळशेज घाट - संजय गांधी पार्क असा ट्रेक केला जातो

५ > कळसुबाई शिखर >>> कारण समोरच एका बाजुला डौलाने उभ्या असलेल्या अन नेहमी आपल्याला आव्हान देणार्‍या अलंग-मदन-कुलंग अन कळसुबाई रांगा पाहुन डोळ्याचे पारणे फिटते

पण आजोबाने माळशेज घाट - संजय गांधी नॅशनल पार्क असा ट्रेक केला होता <<< माध्यम प्रायोजक, हे वाचल्याबरोबर वाघाजोबा म्हणून योरॉक्स डोळ्यासमोर आला. Lol

यो, Light 1

http://vishesh.maayboli.com/node/1415
हा धागा का माप्रा?

त्या मुलाखतीतल्या आजोबाबद्दलच्या कथनाशी मिळतेजुळते दुवे वर दिले आहेत.

मायक्रोचिप ट्रैकिंग, जुन्नर, माळशेज घाट, संजय गांधी नैशनल पार्क हे दुवे जुळत आहेत.

मायक्रोचिप ट्रैकिंग, जुन्नर, माळशेज घाट, संजय गांधी नैशनल पार्क हे दुवे जुळत आहेत. >> हो.
V.S. Naipaul: the Lover of Animals , डॉ विद्यांसारखेच

yess Gypsi

vishes tab was not there in my earlier post. typing on tablet is such nightmare Sad
I only remembered the thread no 1415 And forget to type VISHESH.
that's why link was wrong

now I have edited it

enjoy !!

Pages