'आजोबा' - परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - चित्र क्रमांक १

Submitted by माध्यम_प्रायोजक on 29 April, 2014 - 03:03

'ही आपल्यासमोर आहेत ही माणसं कोण?', 'नक्की चाल्लंय काय त्यांचं?', 'आणि हा कुत्रा का घाबरालाय म्हणतो मी एवढा? आता खाणार आहे का मी त्याला इथे अडगळीत?'...

आजोबाला नक्कीच असे प्रश्न अनेकदा पडले असतील. पण आता हे प्रश्न विचारणार कोणाला आणि उत्तरं देणार तरी कोण?

पण तुमचं-आमचं तसं नाही. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही नक्की उत्तरं देऊ शकता. Proud

'आजोबा' हा चित्रपट प्रदर्शित होतोय ९ मे रोजी. त्या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत एक स्पर्धा.

परस्परसंबंध ओळखा स्पर्धा.

ही स्पर्धा अगदी सोप्पी बरं का!

खाली एक चित्र दिलं आहे. या एका चित्रात पाच चित्रं आहेत. काही माणसांची, काही वस्तूंची, काही ठिकाणांची.

ajoba1-koda.jpg

या चित्रांचा संबंध मायबोलीवरच्या एका धाग्याशी आहे.

तुम्हांला मायबोलीवर असलेला हा धागा ओळखायचा आहे.

हां, पण फक्त हा धागा ओळखून काम भागणार नाही. तुम्हांला या चित्रांचा तुम्ही ओळखलेल्या धाग्याशी संबंध कसा, हे सांगायचं आहेच, शिवाय त्या धाग्याच्या आशयाशी या चित्रांचा असलेला संबंधही सांगायचा आहे.

आता आम्ही एवढी मेहनत घेतली, बक्षिसाचं काय?, असं तुम्ही विचारण्याआधीच सांगून टाकतो.

या कोड्याचं अचूक उत्तर देणार्‍या पहिल्या स्पर्धकाला मिळेल ६ मे रोजी मुंबईत होणार्‍या किंवा ९ मे रोजी पुण्यात होणार्‍या 'आजोबा'च्या शुभारंभाच्या खेळाचं एक तिकीट. या खेळाला चित्रपटातील (आजोबा वगळता) सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित असतील.

या कोड्याचं बरोब्बर उत्तर देण्याची अंतिम मुदत आहे ३० एप्रिल, रात्री बारा वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार).

महत्त्वाची सूचना -

उत्तर याच बाफवर लिहायचं असलं, तरी स्पष्टीकरणासह संपूर्ण उत्तर दिलं असलं, तरच बक्षीस मिळेल.

तसंच, शुभारंभाच्या खेळाची तिकिटं चित्रपटनिर्मात्यांकडून देण्यात येतात. अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमात बदल झाल्यास तसं विजेत्यांना कळवण्यात येईल.

IMG-20140426-WA0004.jpg

तर मग लावा तुमचं डोकं कामाला, आणि बघा 'आजोबा'ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हांला सापडतायेत का...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Jaee Lol

MaPra, R u sure this game is easy? :ao:
No one replied or may be even tried yet.
I would love to play but mala gamech samajali nahiye :ao:

@ Others : please play guyz!

Sorry for English, I am helpless.

Ekhad eg asat tar bar zaal asat <<< उदा. साठी ८०५१ हा धागा बघा.

रिया,

हा खेळ खरंच सोपा आहे. यापूर्वी मायबोलीवर अशी अनेक कोडी लोकांनी सोडवली आहेत. सर्च करून बघा, म्हणजे अंदाज येईल. Happy

आता वरच्या कोड्याबद्दल. या एका चित्रात अजून पाच चित्रं आहेत. या पाचही चित्रांतून काही संकेत मिळतात. हे संकेत म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, ठिकाणाचं नाव असू शकतील. किंवा आकडे असतील. या सार्‍यांचा संबंध मायबोलीवरच्या एका धाग्याशी आहे. हा धागा कुठला, हे तुम्ही शोधायचं आहे.

मुरबाड वरुन माळशेज मार्गे जुन्नरला जाताना चित्र क्र. ५. मधिल 'नानाचा अंगठा' दिसतो. मायबोलीवर 'जुन्नरच्या गप्पा' असा बाफ आहे.

मुरबाड वरुल माळशेज मार्गे जुन्नरला जाताना चित्र क्र. ५. मधिल 'नानाचा अंगठा' दिसतो. मायबोलीवर 'जुन्नरच्या गप्पा' असा बाफ आहे.>>>>> एका फोटोत कळसुबाई शिखर आहे ना?
एक फोटो नोबेल पारीतोषिक विजेते VS Naipaul यांचा आहे.

नासा सॅटेलाईट
VS Naipaul
माळशेज घाट
कळसुबाई शिखर
किस्सा कुर्सी का ( ???)

नासा सॅटेलाईट >>> जुन्नरचं एक वैज्ञानीक महत्व म्हणजे खोडदला असलेली महाकाय रेडिओ दुर्बीण! तपासा २३३७

किस्सा कुर्सी का ( ???)>>>>>संजय गांधी ? संजय गांधी नॅशनल पार्क, मुंबई ??

उदयन,

उत्तर द्या. माप्रांनाच प्रश्न विचारू नका. Proud

जिप्सी,

उत्तर द्या. माप्रांनाच प्रश्न विचारू नका. Proud

उत्तर देउ नका........................फक्त "हो" किंवा "नाही" असे लिहा Wink

उत्तर देउ नका........................फक्त "हो" किंवा "नाही" असे लिहा >>>>>माझ्याही प्रश्नासाठी सेम पिंच Proud

काहितरी जमिन / डोंगर / माती याच्याशी रिलेटेड. (VS Naipaul यांचे लेखन बरेचसे प्रवास / नद्या / रस्ते या संदर्भात आहे)

या चित्रांचा संबंध मायबोलीवरच्या एका धाग्याशी आहे.>>>>>"आजोबा" हाच धागा का?
http://www.maayboli.com/node/43377

नासा सॅटेलाईट - जीपीआरएस ( एका वन्यजीव अभ्यासिकेनं त्याच्या गळ्यात जीपीएस ट्रान्समिटर असलेली एक कॉलर अडकवली)

VS Naipaul - ?

माळशेज घाट - माळशेजच्या घाटात आजोबाला सोडण्यात आलं.

कळसुबाई शिखर - सह्याद्रीच्या रांगा ओलांडत आजोबा निघाला (आजोबाचा भन्नाट ट्रेक.)

किस्सा कुर्सी का - आजोबा निघाला मुंबईच्या (संजय गांधी नॅशनल पार्क) दिशेनं. त्याच्या घराकडे.

Pages