सायकल राईड - ३

Submitted by केदार on 23 April, 2014 - 02:53
ठिकाण/पत्ता: 
बोपदेव घाट किंवा लोनावळा

अखिल मायबोली विना पेट्रोल / डिझेल वाहन प्रसारक मंडळ घेऊन येत आहे तिसरी राईड.

तर ठरवा कुठे जायचे ते.

पर्याय १. बोपदेव घाट
पर्याय २. लोनावळ्या जवळपास

साधारण ५० + किमी जाऊन येऊन करू. लोनावळ्याकडे जायला मला आणि अमितला आवडेल, पण ती राईड मग १००+ होईल. वाटल्यास अलिकडूनही वापस येता येईल.

ज्यांनी मला विचारले त्यांना रविवारच जमणार आहे. त्यामूळे रविवारी ठरवत आहे.

माहितीचा स्रोत: 
बसका राव? थोडीफार माहिती आम्हालाही आहे. :)
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 26, 2014 - 20:00 to रविवार, April 27, 2014 - 02:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सातीतै, वेल डन. आता आकडा २०-३० असा दिसला पाहिजे..

>>> बर तुम्ही पुणे मुम्बई जुन्या हायवेला कु ठे मिलणार? देहु बायपास पाशी का?
किती वाजता पोहोचाल तिथे?

वाकड पूलापाशी सकाळी ६:०० वाजता भेटायचे ठरले आहे.

आज १४ किमी >> अभिनंदन.

बर तुम्ही पुणे मुम्बई जुन्या हायवेला कु ठे मिलणार? देहु बायपास पाशी का? >>> हो तिकडून मग टोल नाक्याकडे. ६ ला सगळे पुलापाशी आले तर ६:३० तिथे असू.

ह्या रस्त्याची खासियत म्हणजे (म्हणजे पूल ते देहू रोड ) सगळ्या धर्माचे देव आहेत. एक चर्च, एक मशिद, आणि एक मंदीर, एकमेकांना अगदी जवळ आहेत.

पुढे मग सगळा प्रति रस्ता, प्रति पंढरपूर, प्रति शिर्डी ब्ला ब्ला रस्ता लागतो.

कोथरुड किंवा वारजे भागात सायकल सर्विसींग कुठे होईल,
७ व्या गेअरमध्ये अडकत आहे ( स्पेशली ३/७ वर)

गरवारे कॉलेज समोर एक सायकल दुकान आहे तिथे होईल.
दशभुजा सम्रोरच्या पौड रोडवर लगेच डाव्या साईबाबा सायकल मार्ट आहे तिथे होईल.
FC रोडवर पोलिस ठाण्यापाशीच किंवा आजूबाजूला एक दुकान आहे, त्याचे नाव विसरलो, तिथेही होईल.

लै भारी केदार दि.
केदर जो. "list of Items to carry" टाक अस वाटत मला. सगळ्यानी टाकण्यापेक्षा तूच एक आटोपशीर लीस्ट टाक.Atleast one First Aid kit is must since we r traveling on Highway.

केदार दिक्षित जरूर. अहो तुम्ही ११ वर्षे मायबोलीवर दिसता, रोमात होता की काय? तुमचा नं विपूत टाका मह्णजे अ‍ॅड करता येईल.

अमित अरे यादी वगैरे खूप होईल. मग त्यात सॅक आली, तिचे वजन / मग कॅमेर ब्ला ब्ला पण मी अत्यावश्यक गोष्टी लिहितो. सुदैवाने आपण जिथे जात आहोत तिथे दर चार/ पाच किमीला दवाखाना आहे, त्यामुळे फर्स्ट एडची गरज फारशी लागणार नाही.

१. पाणी (निदान ७५० ML/ १ लिटर) = पाण्यात प्रोटीन पावडर असेल तर भारी, पण नुसते पाणी आवश्यकच. = वाटेत दुकानं आहेत त्यामुले पाणी सहज विकत मिळेल. तसे लिंबू पाणी / लिंबू सोडा / निरा ह्यांचीही दुकाने साडेआठ- ९ नंतर उघडी असतील.
२. हेल्मेट आवश्यक आहे कारण आपण हायवेवर जात आहोत. हेल्मेट नसेल तर टोपी हवीच. (उनामुळे)
३. हाय प्रोटीन बार असतील तर चांगले कारण ज्यांना लांबपल्याची सवय नसते, त्यांना मग एनर्जी मिळेल. (केळंही कॅरी करू शकता).
४. पैसे
५. सन ग्लासेस असतील तर ती धावतील कारण आजकाल ८ वाजताही भयानक ऊन असते.

आणि मुख्य इच्छाशक्ती Happy

पण आधी लिहिल्यासारखे शक्यतो वजन ठेवू नका / वा अत्यंत कमी ठेवा.

>>>>> किती वाजता पोहोचाल तिथे? <<<<<<
माझा प्रयत्न होता Sad पण नेमके लिम्बीच्या बाबान्नी उदकशान्त घेतलीये त्याकरता पौडला जावे लागणार Sad Sad Sad

आजच्या राईडचे वैशिष्ट्ये !

१. १०० टक्के हेल्मेटधारी.
२. पहिल्यांदाच दोन मेडिकल किट सहित राईड (माझ्याकडे अन केदार दिक्षित कडे)
३. पहिल्यांदाच पंक्चर किट आणि सायकल पंपसहित राईड. ( केदार दिक्षित)
४. पहिल्यांदाच फक्त दोनच मिसळ मागवल्या. Proud सगळ्यांनी हेल्दी नाश्ताव्रत घेतले होते Happy
५. सगळ्यात मोठी ग्रूप राईड. - शेवटच्या पाचांची ८० + किमी अ‍ॅव्हरेज राईड.

गुड जॉब टीम !! आता वृत्तांत येऊद्या.

केदार, KD (रादेक), मनोज, किरण, पराग आणि पिंगू राईड ला फार मजा आली. सुंदर सूर्योदय, अप्रतिम राईड आणि कानिष्काला तितकाच मस्त भरपेट नाश्ता Wink बाकी आपल्याच 'बिरादारीतली' माणस भेटली ह्यपेक्षा अजून काय हव !!! केदार सायकल राईड - ४ गटग ची आतुरतेने वाट पाहत आहे ..होय आत्तापासूनच Happy
Cycle Ride_1.jpgCycle Ride_2.jpg

लै भारी!!!

१००% हेल्मेटधारींचे विषेश अभिनंदन Happy

मस्त मजा आली राईडला... मी पहिल्यांदाच ह्या बाजूच्या हायवेला आलो. एक्सप्रेस हायवे पर्यंत येऊन परतलो.. माझे साधारण ५० किमी झाले. ह्यावेळी ते स्ट्रावा / मॅपमायराईड चालल्याने स्पिड/एलेव्हेशन पण समजलं. सुरुवातीचे काही अंतर त्याने ट्रॅक न केल्याने अ‍ॅव्हरेज स्पिड १६.२ दाखवला पण तो जरा जास्त असेल.
सकाळी लवकर हायवेवर सायकल चालवायला छान वाटलं. फक्त गेल्यारविवारी उन्हाचा खूपच चटका बसल्याने, ह्यावेळी मला काही झालं तर मॅक्स १० पर्यंत घरी पोचायचं होतं. सगळे ठरलेल्या वेळी जमले असते तर अजून काही अंतर जाता आलं असतं.
पुढच्यावेळी ह्याच रूटवर अजून अंतर जाऊया..

. व्वा . मस्तच.............अभिनंदन....

सायकल गटगला पहिल्यांदाच हजेरी लावली, खूप छान अनुभव , शिवणे ते वाकड आणि परतीचा प्रवास केला ही सायकलिंगची सुरवात म्हणता येईल . फार तर ४० ते ५० किमी झाले असावे. ग्रुपमध्ये सायकलिंगची मजा काही वेगळीच असते. (मी गटगला असलो तरी गट्टग मिसले )

Happy Happy Happy

व्वा मस्तच! सगळ्यांचे अभिनंदन.. फोटो छानच Happy पुढच्या वेळी मलाही यायचंच आहे..

किरण कुमार, फार तर ४० ते ५० किमी?? Uhoh
अहो मी ३०+ किमी करून आले तर अत्यानंद झाला होता!!

सगळ्यांच्या सायकली गिअरच्या आहेत का? >> हो. लॉंग राईड साठी हलकी चासी आणि गिअर्स असल्याशिवाय पर्याय नाही.

फक्त मनोज (जो अजून माबोकर नाही) सायकल गिअरची असूनही १८५७ मधील होती, हलक्या हायब्रिड बॉडीवरून सायकल कशी चालेल ह्याचे प्रात्यक्षिक घेताना त्याने माझी सायकल काही किमी चालवली. तो खरचं धन्य आहे. तश्या रनगाड्यावरूनही त्याचे ऑलमोस्ट १०० किमी झाले. हलक्या / मस्त गिअरच्या सायकलवर त्याचा वेळ अन शक्ती वाचेल असे मी मार्केटिंग केल्यामुळे आता तो बुलेट घ्यावी की सायकल ह्या द्विधा मनस्थितीत आहे.

किरण पुढच्या वेळी पूर्ण सफर ये. आता रोज तयारी कर Happy

ह्यावेळी घरी यायला मला ऑलमोस्ट सव्वा वाजला होता. पूर्ण उन्हात राईड झाल्यामुळे नंतर सगळ्यांना दम लागत होता. त्यामुळे आता सहाची सुरूवात न करता साडेचार, पाचची आणि वेळेवरच सुरूवात करायची ठरले आहे. Happy

अमित, ठरल्याप्रमाणे लवकरच ४ ची घोषणा होईल.

>>> सगळ्यांच्या सायकली गिअरच्या आहेत का?
हो. सर्वांच्या सायकल्स १८ ते २१ गिअरच्या आहेत.

केदार, अमित, केडी यांच्या सायकली इम्पोर्टेड आहेत आणि वजनाला खूपच हलक्या असल्याने लांब प्रवासासाठी अतिशय उपयुक्त.अशा आहेत.

माझा मात्र देशी घोडा हिरो लाईट एज १८ गिअर्सचा. वजनाला इतका हलका नाही. पण १००-१५० किमी राईड सहज करता येईल इतपत.

तुमच्या सायकलीन्ना मागिल बघायचे आरसे का नाहीत? असल्यास कुठे आहेत?
मी आरशाशिवाय सायकलही चालवायचो नाही, अगदी चौविस इन्ची विदाऊट गिअर नॉर्मल ह्यान्डल सायकललाही आरसा असायचाच!
मी एक गॉगल तयार केलेला, त्याला उजव्या डोळ्याच्या बाजुच्या काडीला पुढे एक गोल आरसा बसवलेला, असा उजवा डोळ्याच्या कोपर्‍यातुन बघितले की मागचे दिसायचे! Happy
मी गंभिरपणे सायकलीची सोय करण्याचे मागे आहे, जेव्हा सोय होईल तेव्हा नक्की येईन.

धन्यवाद.
मी वजन कमी व्हावे आणि कॅलर्या जळाव्या या हेतूने सायकल घेतल्याने गिअरची सायकल घेतली नाही.
तसेच जवळपास १४ वर्षानी सायकल चालवताना जमेल का ही धाकधूक होती.
Wink
आता मात्रं जमेलच असे वाटते.
येत्या दिवाळीत जमवते.

सायकलचे डेटेल्स:
केदार - Trek ७.२
मी आणि KD - Bergmont helix २.३
पराग - Montra - hybrid
भारत - Hero Hybrid (हि खर्या अर्थाने Hybrid आहे ;). रोड cycleसारख handle, breaks आणि बाकी सगळ common hybrid प्रमाणे Happy )
किरण/मनोज: रणगाडा ..होय केदार बोलला त्याप्रमाणे हेच एक नाव त्याला suit आहे
केदार कसलं मार्केटिंग केलास रे .. मनोज ला बुलेटवरून सायकल वर आणला. आज तर तो cycle hunt ला बाहेर पण पडलाय.

मनोज ला बुलेटवरून सायकल वर आणला. आज तर तो cycle hunt ला बाहेर पण पडलाय. >> Lol

मनोज लंबी रेसका घोडा आहे. Happy

कॅलर्या जळाव्या या हेतूने सायकल घेतल्याने गिअरची सायकल घेतली नाही. >>

साती,
गिअर केडन्स साठी उपयोगी आहे. उलट चढावर जर ३-५ ने चालवली तर डबल रेटने कॅलरी जळतील कारण जास्त वेट्स पडतात.

तस्मात चांगली सायकल घे / आम्ही मदत करू आणि मग कर्नाटका ते पुणे राईड पण कर. आम्ही सर्व वाटल्यास महा. बॉर्डरवर येऊन तुझ्या सोबत पुण्यात येऊ. Happy

Pages