सायकल राईड - ३

Submitted by केदार on 23 April, 2014 - 02:53
ठिकाण/पत्ता: 
बोपदेव घाट किंवा लोनावळा

अखिल मायबोली विना पेट्रोल / डिझेल वाहन प्रसारक मंडळ घेऊन येत आहे तिसरी राईड.

तर ठरवा कुठे जायचे ते.

पर्याय १. बोपदेव घाट
पर्याय २. लोनावळ्या जवळपास

साधारण ५० + किमी जाऊन येऊन करू. लोनावळ्याकडे जायला मला आणि अमितला आवडेल, पण ती राईड मग १००+ होईल. वाटल्यास अलिकडूनही वापस येता येईल.

ज्यांनी मला विचारले त्यांना रविवारच जमणार आहे. त्यामूळे रविवारी ठरवत आहे.

माहितीचा स्रोत: 
बसका राव? थोडीफार माहिती आम्हालाही आहे. :)
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 26, 2014 - 20:00 to रविवार, April 27, 2014 - 02:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धाब्यावर जाऊन न जेवता घरी? असं पण असतं >>> मोह टाळावा मामी. मोह वाईट Happy

तसे नाही. सकाळी ढाबे उघडत नाहीत. शिवाय साधारण ६ तासात १०० किमी होतात. मग दुपारी १२ ला घरी Happy

व किंवा त्या धाब्यावर जाऊ वर लिहिलेल्या. >> हो तिथेच. शक्यतो उन लागण्याआधी घरी Happy

सातीतै, तसे नाही. थोडा वेळ विश्रांती घ्यावी आणि मग पुन्हा सायकलवर स्वार होऊन रस्त्याला लागावे.

मी शुक्रवार पर्यंत सायकल बघतो आहे. शुक्रवारी नाही जमली तर शनिवारी सायकल घेऊन २०-३० किमीची एक वैयक्तिक राईड मारेनच आणि रविवारसाठी तयार होईन.

जेवण तर शक्य नाही होणार कारण नाहीतर तिकडेच झोपावं लागेल. मोह टाळावासा वाटत नाहीये पण इलाज नाही.
लस्सी पिऊ ..पोटास बरी असते Wink
भारत शनिवारी माझा हाफ day आहे office एखादी casual राइड मारू शकेन संध्याकाळी. कळव मला.
आणि जे लोक येणार आहेत ते वर लिस्ट अपडेट का नाही करत ?! कोण कुठे राहत ते समजल तर मीटिंग point ठरवता येईल. मी suncity वरून bypass ने येणार

अमित, मी सकाळी राईडसाठी जाणार आहे. तू संध्याकाळी बर्‍यापैकी विश्रांती घे. रविवारी लवकरच निघायचे आहे.

मी औंधमार्गे हिंजवडीला येईन. मला ते बरे पडेल.

राम राम

मी साधारण २० ते ३० किमी पर्यंत गेलो आहे आजवर ,
एकूण अंतर ५० पर्येंत ठिक ,जास्त नको, गेल्या काही दिवसात सायकल चालविली नाही, कालच गोव्यावरुन परतलोय , उद्या शुक्रवार आणि शनिवार छोटी राईड मारतो , नॉर्मल/कंम्फर्ट वाटल्यास शनिवारी दूपारपर्येंत फायनल सांगतो.
मी आल्यास वारजेवरुन (वारजे ओव्हरब्रीज) हायवे गाठेल.

भारत कोणती सायकल घेणार आहेस? रोड कि हायब्रिड?

किरण कुमार जर थोडेफार अ‍ॅक्टिव्ह असाल (व्यायाम / रनिंग) तर तुम्हालाही नक्कीच जमेल. हळू हळू. पहिल्या राईडला लोकांनी ३५ किमी सहज पार केले होते. ग्रूप मोटिव्हेशन मध्ये हे सहज शक्य होते.

अरे अमित असं काही नाही, ढाबा १० शिवाय उघडणार नाही, आपण लोणावळ्याला जरी गेलो तरी त्या वेळेपर्यंत तिथून पुढे आलेलो असू.

मस्तच किरण.

ह्या राईड आणि ह्या पुढच्या सर्वांसाठी मी एक वॉटस अ‍ॅप ग्रूप बनवत आहे. तुझा नं मला मेल कर किंवा विपूत दे म्हणजे तुला ही त्यात टाकतो.

राईड सुरूव्ह्यायच्या आधी सर्व एकमेंकानां कॉल करतात त्यापेक्षा व्हॉटस अ‍ॅप डिबी Happy बरा.

सई पुढच्या वेळी जमव. एकच लक्ष्य ५० शी सख्य वगैरे घोषणा मनात नोंदवून ठेव. Happy

आपण इंद्राला भेटायला पनवेल पर्यंत जाऊ, इंद्रा अन मुंबईचे कोणी असतील तर सायकल बखोटीला मारून पनवेल ला येतील,

तिथे ती फेमस मिसळ (आता आहे का?) खाऊन परत. मला हा प्लान देखील चालेल एखाद्या राईडला होऊन जाऊदे १७५ ! Happy

मेराभी पोझिशन सई जैसाही है.. नवीन सायकल घ्यायला अजून मुहूर्त सापडत नाहीये..

ह्यावेळेस पण जमणार नाही..

पनवेल फारच लांब आहे. मला चिमणच लेख आठवला... जिवाची मुंबई :p

तिथे ती फेमस मिसळ (आता आहे का?) >> दत्त स्नॅक्सची मिसळ म्हणतोयस का? मिळते की..

हर्पेन.. तुमचा उत्साह बघुन हुरुप वाढतोय...

उदयन..,

>> व्हिडीओ शुटींग करायला

व्हिडियो शूटिंगवालासुद्धा पाठोपाठ त्याच रस्त्याने सायकलीवरून चाललाय. तुमच्या लक्षात आलेलं दिसंत नाही वाटतं! Wink

आ.न.,
-गा.पै.

मी ९९.९९ % येणार आहे.
कितीला निघायचं ते ठरवा.. मला उद्या परत उन्हात नाही यायचं घरी..
६ ला वाकड पुल का ? मी साडेपाचला कोथरूडातून निघेन

६ ला वाकड पुल चालेल.

अगदी कितीही स्लो चालवली तरी २० किमी प्रति तास अ‍ॅव्हरेज धरता येतेच. Happy तसे २३-२४ भरेल. पण २० धरले तरी आपण साडेसातच्या आत सिद्धू ढाब्यापाशी पोचून ८ ला परतीला सुरूवात करू शकतो.

९९.९९ नाही १०० टक्के ये. बाकीच्यांनी देखील पुलाखाली उभे राहा ठिक ६ ला. आणि पग्या उद्या नाही, परवा रविवारी.

>>>> इकडे पुण्याला गावाबाहेर पडायलाच ६ किमी चालवावे लागते, खरे चालवणे नंतर चालू त्यामुळे साती तू पुण्याला ये मग बघ तुझे सायकलिंगचे अंतर कसे भराभरा वाढेल <<<<<
अगदी अगदी.
बर तुम्ही पुणे मुम्बई जुन्या हायवेला कु ठे मिलणार? देहु बायपास पाशी का?
किती वाजता पोहोचाल तिथे?

Pages