उन्हाळ्यासाठी गारेगार बर्फ

Submitted by लसावि on 21 April, 2014 - 00:41

साहित्य -
एक रेफ्रिजिरेटर (चालू)
आईसक्यूब ट्रे (न गळणारा)
पाणी (प्यायचे)

कृती -
१. एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) पाणी घ्यावे.
२. स्वच्छ धुतलेल्या आईसक्यूब ट्रे मध्ये ते हळूहळू ओतावे*.
३. पाणी भरलेला हा ट्रे न हिंदकाळता फ्रीजच्या डीप फ्रीजर मध्ये ठेवावा. (कृतीचा हा भाग फार अवघड आणि महत्वाचा आहे. भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले पाणी न सांडता दुसर्‍या हाताने आधी फ्रीजचा आणि मग डीप फ्रीजरचा दरवाजा उघडणे हे एक परिश्रमसाध्य स्कील आहे.)
४. आता डीप फ्रीजचा आणि मग फ्रीजचा दरवाजा बंद करावा.
५. तुमच्या फ्रीजच्या लायकी प्रमाणे आणि तुमच्याकडे किती वेळ सलग वीज असते त्याप्रमाणे कधीतरी बर्फ तयार होईल.
६. बर्फ वापरायच्या वेळी तो ट्रे डायगोनली पकडून धुणे पिळल्याप्रमाणे हाताची हालचाल करावी. हे करताना काळजी घ्यावी कारण काही चुकार आईसक्यूब्स एकदम उडी मारुन नको तिथे पडू शकतात.
७. अशा प्रकारे तयार झालेला बर्फ इतर अनेक कृतीत वापरता येतो उदा. हळूच कॉलरमागून शर्टात टाकणे इ.इ.

* ही स्टेप करताना पाण्याशी गोड बोलल्यास चांगले आणि त्याला शिव्या घातल्यास खत्रूड आकाराचे क्यूब्स तयार होतात म्हणे. http://rationalwiki.org/wiki/Water_memory
फक्त इच्छाधारी नागांनाच नव्हे तर पाण्यालाही मेमरी असते हेच यावरुन सिद्ध होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्फाच्या अनवट कृतीकडून सकाळ्च्या तांब्याकडे ( इथे मा. अग्नीपंख यांनी गुगलेले जलपात्र या अर्थी हे शब्द वापरले आहेत.)
या धाग्याची धाव (मी घसरण म्हणत नाहीये...कारण धाग्याचे गांभिर्य राखण्याचे आवाहन धागाकर्ता श्री. आगाऊ यांनी केलेले आहे) चालू आहे असं नाही का वाट्त ?

मनीष, ट्रे डाव्या हातात धरायला सांगीतला असता तर बुप्रावादी आणि उजव्या तर परंपरावादी हे बरोबर ठरले असते. ट्रे हातात धरा दातात नको एवढाच मुद्दा.

मनीष, ट्रे डाव्या हातात धरायला सांगीतला असता तर बुप्रावादी आणि उजव्या तर परंपरावादी हे बरोबर ठरले असते. ट्रे हातात धरा दातात नको एवढाच मुद्दा.>>>
आगाउ लै भारी Proud
पण दातात तर तृण धरतात ना ? ट्रे का?

उत्तम रेसिपी आणि लेखन. इतर उहापोह संपूर्ण वाचेनच पण आत्ताच्या एखाद्या पानावरुन घागर मे सागर (की तांब्या मे सागर ?) प्रकारचा अर्थबोध योग्य होतो आहे.

हिवाळ्यासाठी गरम बर्फावरही संशोधन चालू आहे असे कळते. सौर उर्जा रीव्हर्स वापरली जात असावी असा अंदाज आहे.

गारेगार बर्फ करण्यात आले .परंतु थोडेच खाल्ले गेले .उरलेल्या दीड ट्रे बर्फाचे काय करावे? नासणार तर नाहीना?
शिळ्या बर्फाचे कोणते झटपट/ कमी तेल घालून पदार्थ करता येतील? (सांडगे/पापड सोडून)

ट्रे डाव्या हातात धरायला सांगीतला असता तर बुप्रावादी आणि उजव्या तर परंपरावादी हे बरोबर ठरले असते.>>> Rofl

जर ४-५ तासात बर्फ तयार झाला नाही तर फ्रिज उन्हात ठेवा. लगेच तयार होईल.

या बर्फाचे मन्चुरिअन करता येईल का?

बर्फाची लोणची ,मंचुरियन, करून ,फ्युजन च्या नावाखाली धर्म बुडवायची थेरं आहेत. आप्ल्या महान संस्कृतीत हिमाला देवत्व दिलय अस वर कोणीतरी म्हटलय ना? व्यवस्थित आंघोळ करून शुचिर्भूत होउन तांब्याला नमस्कार करून श्लोक म्हणून पाणी ट्रेत ओतायची आप्ली परंप्रा बुडवायला टपलेल्या लोकांचा णिषेध! Wink

बर्फाची लोणची ,मंचुरियन, करून ,फ्युजन च्या नावाखाली धर्म बुडवायची थेरं आहेत. आप्ल्या महान संस्कृतीत हिमाला देवत्व दिलय अस वर कोणीतरी म्हटलय ना? व्यवस्थित आंघोळ करून शुचिर्भूत होउन तांब्याला नमस्कार करून श्लोक म्हणून पाणी ट्रेत ओतायची आप्ली परंप्रा बुडवायला टपलेल्या लोकांचा णिषेध!>>>> Rofl

एकंदरित "तापलाय" बर्फ Wink

आमच्या घरात समर व्हेकेशनमध्ये स्नो मॅन बनवायची टूम निघतेय (all credit goes to the world famous book "Snowman all year long") या रेस्पिने बनवायचा झाल्यास एका स्नो मॅनसाठी बर्फाचा अंदाज माबोकर्स देतील का Wink

एका स्नो मॅनसाठी बर्फाचा अंदाज माबोकर्स देतील का>>>>>>>>>>>> त्या स्नो मॅनच्या उंची/रूंदीवर ते अवलंबून राहील.

आमचा स्नो मॅन डिझाइन फेजला स्पाइडरमॅन इत़का उंच असतो. बर्फाचा ढिगारा गोळा करायला कष्ट लागताहेत असं लक्षात आलं की आम्ही हिमगौरीच्या सात बुटक्यांचं डिझाइन प्र्पोज करतो Proud

ही रेस्पि मात्र कमी कटकटीची असल्याने असं वाटतंय की आमचा डिझाइन इश्यु न यावा. त्यामुळॅ पाचेक फुटी मध्यम बांध्याचा स्नो मॅन बनवावा म्हणतोय Happy

अमित व आक्षेप घेणारे समस्त आमच्या पुस्तकाचं नाव बघा >> तुम्ही नवीन पुस्तक लिहा आणि विका. मराठी माणूस इथंच कमी पडतो.

कुठे द्यावा कळलं नाही नीट, पण त्यातल्या त्यात याच धाग्याला सुसंगत माहिती म्हणून इथे डकवते आहे - आधुनिक जगात मानवाने कृत्रिम गारवा कसा निर्माण केला आणि बर्फाच्या/गारव्याच्या सहाय्याने जगाचा चेहरामोहरा कसा बदलला त्याची रंजक गोष्ट

बर झाला धागा वर आला . थंडी संपायला आली आहे.
ही रेस्पि विस्मृतीत गेली होती .
उन्हाळयात ऐनवेळी धावाधाव करावी लागली असती .

Pages