निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभा ती उन्हाच्या कवडसात चमकणारी कोवळी पाने तर नाही न? >>>>>>>>.ती पांढरी फ़ळे आहेत. नाव माहित नाही. ही मला सिंधुदूर्ग किल्ल्याच्या आवारात सापडली. Happy

कळम आणि कळंब एक असेल पण कदंब वेगळा..

शोभा ते खारफुटीच्या जंगलातले एक झाड आहे. आत चिकट पण बेचव गर असतो. याचाच एक गुलाबी प्रकार पण असतो. तो जास्त चांगला दिसतो Happy

खारफुटीतल्या जंगलातील काही झाडांचे चिक अपायकारक असतात त्यामूळे जपून हाताळावीत ( एकाचे नाव तर ब्लाईंडींग ट्री आहे. )

आमच्या शाळेच्या एका स्पर्धेत मला एक पुस्तक मिळाले होते. त्यात जी.ए. ची "प्लॅस्टीकचे विश्व" अशी कथा होती. त्या काळात प्लॅस्टीक नवेच होते. आज इतक्या सहजपणे आपण ते वापरतो पण आमच्यासाठी साधी प्लॅस्टीकची पिशवी हे अप्रूप होते. त्यासंबंधी एक लेख.

http://www.loksatta.com/navneet-news/histroy-of-plastic-475999/

सुरुवातीचे प्लास्टिक - कचकडे
१९५० पर्यंत घराघरात तांब्या-पितळेची भांडी वापरली जात. पितळेच्या भांडय़ात ठेवलेल्या आंबट पदार्थाची चव बदलते त्याला कळकणे म्हणतात. त्यासाठी भांडय़ांना आतून कल्हई केली जाई. कल्हई करणे म्हणजे कथलाचा (टिन) मुलामा देणे. १९५०च्या सुमारास बाजारात स्टेनलेस स्टीलची भांडी नुकतीच डोकावू लागली होती. साधारण त्याच सुमारास बाजारात प्रथम कचकडय़ाच्या वस्तू दिसू लागल्या. या वस्तू टेबलावरून खाली जमिनीवर पडल्या तर पिचत किंवा फुटत. कचकडय़ाच्या निमित्ताने प्लास्टिकची ही पहिली ओळख भारतीय समाजाला झाली. कचकडे हे सेल्युलोज नायट्रेट व कापूर यांच्या मिश्रणापासून बनवतात. या भांडय़ांनी हळूहळू तांब्या-पितळेच्या भांडय़ांना मोडीत काढले. कचकडे व्यवहारातून बाहेर पडायला बराच काळ जावा लागला. हळूहळू १९६०च्या सुमारास, भांडीच कशाला नायलॉनचे म्हणजेच एका अर्थी प्लास्टिकचे कपडेही बाजारात दिसू लागले.
१९७०च्या सुमारास बाजारात पीव्हीसी ऊर्फ पॉलिव्हिनाइल क्लोराइडच्या वस्तू येऊ लागल्या. जमिनीखाली मिळणाऱ्या क्रूड तेलाचे शुद्धिकरण करताना नाफ्था नावाचा पदार्थ तयार होतो. तो उच्च तापमानाला व उच्च दाबाखाली उकळवल्यावर इथिलिन नावाचा पदार्थ मिळतो. या इथिलिन व क्लोरिन वायूच्या मिश्रणातून इथिलिन डायक्लोराइड मिळते. त्यातून व्हिनाइल क्लोराइड बनवतात. त्याचे बहुवारीकरण (पॉलिमरायाझेशन) करून पीव्हीसी म्हणजेच पॉलिव्हिनाइल क्लोराइड तयार होते. तसेच हाय डेंसिटी पॉलिथिलिन (एचडीपीई) हा पदार्थही बनवतात. या दोन तऱ्हेच्या प्लास्टिकपासून घराघरात लागणाऱ्या अनेक वस्तू तयार झाल्या आणि त्यांनी घरातील तांब्या-पितळेच्या वस्तूंना हद्दपार केले. नाही म्हणायला स्टेनलेस स्टीलने मात्र आजपर्यंत चिवटपणे प्लास्टिकच्या या हल्ल्याला तोंड दिले आहे.
जगभर वाढत चाललेल्या लोकसंख्येला पुरे पडण्यासाठी तांबे-पितळ पुरेसे उपलब्ध नसल्याने प्लास्टिकसारख्या पदार्थाची गरज होती. प्लास्टिक हे नाव एखाद्या आडनावासारखे आहे. प्लास्टिकच्या कुटुंबात पॉलिथिलिन, पॉलिस्टायरिन, पीव्हीसी, पॉलिअमाइड (नायलॉन), टेरिलिन, फोरमायका, मेलेमाइन, सनमाइका, बेकेलाइट, पॉलिप्रॉपिलिन, सेल्युलोज अॅसिटेट, सीबीए, सेल्यूलोज नायट्रेट, फिनोलिक -अमिनो, पॉलिएस्टर इपॉक्सी-व्हिनाइल सेलीकोंस, युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन, पॉलिअॅक्रिलिक नायटराइट (ऑरीओन), सेल्यूलोज नायट्रेट (एरल्डाइट फेविकोल), सान, अॅसिटल, फ्लोरोप्लास्टिक, पॉलिसल्फोन, पॉलिकाबरेनेट रेझिन इत्यादी अनेक पदार्थ येतात.
अ. पां. देशपांडे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org

शोभा ते खारफुटीच्या जंगलातले एक झाड आहे. आत चिकट पण बेचव गर असतो.>>>>>>.फळं इतकी छान दिसत होती.:स्मित:
आणि तुम्ही म्हणालात हे साधनाला खायला दे. Uhoh Lol
पण ते फळ बघीतल्यावर मलाही मोह झाला होता. पण सगळे निगकर माझ्याभोवती फेर धरुन म्हणताना दिसले,
"नको नको बाई, करू नको घाई,
असेल विषारी,तर जीव निघून जाई. " Happy

शोभाताई हे झाड पहिल्यांदाच बघितले.

वरचे सर्व फोटो मस्त.

माझ्या माहेरच्या कोकणातील गावाचे नाव 'कळंबूशी'(संगमेश्वर तालुका) हे कळंबाची झाडे खूप असल्याने पडले असे म्हणतात म्हणून मी वरील प्रश्न विचारला.

शोभाताई हे झाड पहिल्यांदाच बघितले. >>>>>>>>>..हो. मी पण प्रथमच पाहिले. पण ती पिटुकली, पांढरीशुभ्र फळे फारच छान दिसत होती. Happy

अन्जू.. त्या भागातल्या अनेक कुटुंबाचा कूळवृक्ष कळम असतो. देवकासाठी त्याची काडी लागते. पण अनेकांना ते झाड माहीत नसल्याने कदंबाचीच काडी आणतात. कळमाच्या मानाने कदंब जास्त डोळ्यात भरणारा ना !

दिनेश दा उत्तम माहिती..
सगळ्यांचे फोटो, गप्पा मस्त...
मामी, निवडुंगाचे फुल आहे का ते?

जागू, खरेच प्रत्यक्ष बघायचे अजून जमले नाही मला.
लहानपणी मालवणला न्हाणीघराच्या बाजूला ठेवलेल्या सुरणाला असा फुलोरा आलेला ओझरता बघितला होता आणि त्याचा तो भयानक दर्प.. भितीच वाटली होती. जायचेच टाळत होतो मी तिथे.

नाही. हे तुळशीच्या कोणत्याही प्रकारातील फुल नाही.

क्ल्यु १ : पण किचन गार्डनमधीलच एक झाड आहे. जरा झूम आउट करायचं का?

**************************************

वॉव, जागू सुरणाचं फूल! मस्तच. रानटी सुरण आहे का? मी मागे महालक्ष्मी सरसमधून सुरण आणला होता तो कापल्यावर हाताला प्रचंड खाज येत होती आणि शिवाय तो शिजता शिजेना. हल्ली जे बाजारात सुरण मिळतात ते तितकेसे खाजरे नसतात आणि पटकन शिजतात. पण ते बेणं अस्सल रानटी होतं.

घरच्या कुंडीत लावलेले अळूही अजिबात खाजत नाही.

सुरणाचं फूल पहिलंदाच बघतेय.
प्लास्टिक लेख छान. इथे अति पाऊस आहे. दिवसभर अंधार. वॉ़क बंद.
काल इन्क्रेडिबल ह्युमन...१ भाग पाहिला. भारीये. अगदी हॉन्टिन्ग! असं वाटलं निदान आपण आपल्या फॅमिली ट्री बद्दल तरी काही तरी सुरवात करावी......माहिती जतन करावी.
बादवे...इथल्या टीव्हीवर तुम्ही मूळ्चे कुठले हे समजून घेण्यासाठी काय काय करा त्याची अ‍ॅड येतेय. आज ती दिसली तर नीट बघीन.
मामीच्या कि.बागेतलं ते काये कळलं नाही.

बाजारात जे सुरण येतात ना त्यांचा डोळा ठेवत नाही हल्ली. तो असला तर तो पेरूनही छान झाड येते. त्याची पानेही छान असतात. शोभेचे म्हणूनही लावता येईल. एक दांडा आणि वर छत्रीसारखे पान. ( जागू मग आठवणीने फोटो काढ. खरं तर हा फोटोही पुढच्या भागाच्या मुखपृष्ठावर छान दिसेल. )
इथे आफ्रिकेत अनेक कंद असतात बाजारात पण सुरण मात्र नसतो.. भारतात असताना अगदी आठवणीने खाल्ली असेन भाजी असे नाही, पण इथे मिळत नाही म्हंटल्यावर आठवण येते.

एखाद्या किचन हर्बचे झाड आहे बहुतेक. रोझमेरी ?
>>>> नाही, दिनेशदा. Happy

क्ल्यु २ : याची पानं एका विशिष्ट पीठाबरोबर वापरतात. आता यायलाच हवं हं. (झूम आऊटमधली पानं नीट बघा.)

मीपण ओवा लिहिणार होते पण माझ्याकडे ओवा होता तेव्हा अशी फुले नव्हती आणि पानेपण थोडी वेगळी होती.

मामी ग्रेट फोटोग्राफी, आता शेवटची दोन ओळखीची वाटली. आधी किचन गार्डन लिहिलं तेव्हा ओवा असेल का असं वाटलं पण खात्री नव्हती, ओळखण्याचे श्रेय निर्विवाद मानुषीताईना.

मामी ग्रेट फोटोग्राफी, आता शेवटची दोन ओळखीची वाटली. आधी किचन गार्डन लिहिलं तेव्हा ओवा असेल का असं वाटलं पण खात्री नव्हती, ओळखण्याचे श्रेय निर्विवाद मानुषीताईना.>>>>. अगदी.

हं.....मस्त फोटोग्राफी खरंच! मी पण ओव्याची फुलं पहिल्यांदाच पाहिली.
इटालियन हर्बज मधला ओरेगॅनो हे वाळ्वलेल्या ओव्याची पानं असतात का? किंवा प्रोसेस्ड पाने ...ओव्याची?

ओरेगानो म्हणजे ओवा नाही. छोटी छोटी गोल गोल पानं असतात ओरेगानोची. बाजारात ती हिरवी पानंही मिळतात.

मजोराम म्हणजे मरवा असतो.

इथे बरीच नावं मिळतील :

http://essentiallyunessential.blogspot.in/2013/03/herbs-and-spices-in-en...

आणि

http://www.namitaskitchen.com/wp-content/uploads/2012/08/ingredients-glo...

Pages