माझं लाडकं कोकण.-भाग : २ - मालवण.

Submitted by शोभा१ on 11 April, 2012 - 04:17

रविवारी सकाळी, मस्त बटाटा पोह्यांचा नाश्ता करून, विविध फोटो काढून पुढे निघालो.
१. चिरे.

२. हे चिर्‍यांचे कुंपण.

३.हे दगडांचे कुंपण.

४. हे निवडुंगाचे कुंपण.

५. आणि हे सिमेंटचे कुंपण.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.
१३.खारेपटण.

१४.खडकातली देवस्थळ्यांची घरे. ('खडक' हे त्या परिसराच नाव आहे. )

१५.हे आमची माध्यमिक शाळा. (खारेपाटण)

१६.बसस्थानक.(बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या.) Wink

१७.आमच्या सरांच्या घरी असलेली, त्याची छोटीशी बाग.

१८.

१९.

२०.लाल सदाफुली.

२१.अजून वेगळा रंग.

२२. ह्याच नाव काय?

२३.

२४.

२५.सोनचाफा.

२६.

२७.केदारेश्वर मंदिर. (हे मंदिर दुरुस्तीचे/पाडण्याचे कुणाच्या तरी मनात आले. त्याने गाभार्‍यावर पहार मारली. पण ती पहार त्याला परत काढताच आली नाही. ती पहार तिथेच होती. मी पाहिली आहे.मंदिर मात्र अजून आहे.)

२८.

२९.

३०.काकूच्या घरची फुले.

३१. बोंडू.

३२. काजू बिया.

३३.

३४.

३५.

३६.

३७. उन्हामुळे काही मोहोर करपून गेला आहे.

३८.अबोलि.

३९.

४०.साखर जांभाची छोटी फळ.

४१.त्यावर फिरणार ओंबिल. (हे फार भयंकर चावतात. स्वानुभव :फिदी:)

४२.चिकू.

४३.जास्वंद.

४८.तुळ्सी वृंदावन.

४९.भेंडी जास्वंद. (हे तिथे कळलेल नाव. ) हिच फुल सकाळी पांढर असत.

५०. आणि संध्याकाळी लाल होतं.

५१.निळी कोर्‍हांटी.

५२.

५३.हे माझ्या आत्याच घर. (मालडी)

५४. कौलांवर असलेलं धुराड.

५५.करवंदाच रोपट.

५६.केळीची बाग.

५७.

५८.खायच्यात का ?

५९.

६०.फुलांची परडी. (ही वेगळी आहे. :फिदी:)

६१.आगराला पाण्याची फवारणी.

६२.

६३.सूर्योदय.

६४.

६५.

६६.

६७.माड आणि पोफळी.

६८.वानरानी केळीची लावलेली वाट.

६९.सांगा बर ही फळ कसली आहेत?

७०.

७१.ही कसली फुले?

७२.ही आहे माली.

७३.

७४.तोंडली.

७५.हा मात्र मोगराच Proud

७६.काजूची बाग.

७७.फणस. (यातलाच डावीकडचा फणस, नंतर आम्ही काढला. ईकडे आणण्यासाठी. पण तो तिथेच विसरला :अरेरे:)

७८.

७९.कांचन.

८०. कांचनाचे फुल.

८१.हा आत्याच्या घरचा 'कापा' फणस. त्यातला अर्धा पुण्यात आणून खाल्ला. Proud

८२.कोयता.

८३. ओळखा पाहू.

८४.

८५.हा आमचा खूप जूना झोपाळा. (कमीत कमी १०० वर्षापूर्वीचा.)त्यावर बसलेले आजोबा, व नातू.

८६.झाडावर रहाणारी बेडकी.

८७.

८८.वाट पहाते कोळणीची. Proud (ही सकाळी २-३ तास ह्या एकाच जागी बसलेली होती.)

८९.चूल.

९०.पितळेचे ताट व झारे.

९१.या पक्षांचा आवाज साळुंक्यांसारखाच आहे. त्याच आहेत का या???

९२.

९३.गवताची गंजी.

९४.

९५.

गुलमोहर: 

खारेपाटण छान आहे. पण बरेच फोटो झालेत एका पानावर. सगळे दिसत नाहीत.
त्या त्रिकोणी फळाचे नाव कुंकु.

त्या त्रिकोणी फळाचे नाव कुंकु.>>>>>>>>>>>दिनेशदा ते, केशरी रंगाच फळ आहे. ते फळ वाळवून ठेवायच. आणि गरज असेल तेव्हा त्याच्या बिया पदार्थात टाकायच्या. Happy

मोनालिप, ते केशरी रंगाच फळ आहे. ते फळ वाळवून ठेवायच. आणि गरज असेल तेव्हा त्याच्या बिया पदार्थात टाकायच्या. Happy

व्वा वा!!! आख्ख्या गावाची ओळख करुन दिलीस शोभे!!! Happy
सुर्योदयाचे फोटो मस्तच!
दिवेआगारला पण असा प्रत्येक घरी झोपाळा आहे.
आणि हे काय? झाडावर रहाणारी बेडकी??? Uhoh

सर्वाना धन्यवाद.
माझ्या गावाची .आठवण येते... तालुका--लांजा... >>>>>>>कोणत गाव? नाव काय? (गावाच.):स्मित:
शोभा तुम्ही गोळप्यात कोणाकडे गेला होतात>>>>>>>मनोहर लेले.(माझ्या आत्याचे पतीदेव)
`ओळखा पाहु ' पक्षी धनेश ना ?>>>>>>>>बरोब्बर. १०० मार्क. Proud

छान!!
शोभे, काहि फोटो एकदम क्लियर आणि बरेचसे ब्लर असे का?
फोटो काढताना हात स्थिर ठेवत जा किंवा फोटो काढल्यावर थोडा झूम करून पाहत जा. बर्‍याचवेळा फोटो कॅमेरा स्क्रीनवर चांगला वाटतो पण संगणकावर नाही. Happy (फुकटचा सल्ला) Happy

वा! काजुचे झाड प्रथमच पाहीले. ज्यांना गाव आहे ते तुम्ही सर्व खरंच लकी आहात. मी माहेरची मुंबईकर त्यामुळे गाव नाही, वाटले कि लग्नानंतर तरी नवर्‍याचे गाव असेल, पण तो पण मुंबईकर निघाला. त्याला ही वाटायचे कि लग्नानतर बायकोचे गाव असेल....पण ... असो गावाची मजा काही निराळीच असते.

मला ने गं शोभे सोबत एकदा >>>>>>>>>>स्मितू, त्यासाठी वेळ काढावा लागतो. Wink
फोटो काढताना हात स्थिर ठेवत जा>>>>>>>>>जिप्स्या, तेच तर जमत नाही ना. वयोमानाप्रमाणे आता हात स्थिर रहात नाही. Proud
प्रचि ९१ : सातभाई आहेत. इंग्रजी नाव नाही माहित>>>>>..धन्यवाद.
ह्यातले बरेचसे फोटो दिसत नाहीयेत गं.. फुल्याच दिसताहेत......>>>>>>>कमाल आहे. Uhoh
वा! काजुचे झाड प्रथमच पाहीले. ज्यांना गाव आहे ते तुम्ही सर्व खरंच लकी आहात. मी माहेरची मुंबईकर त्यामुळे गाव नाही, वाटले कि लग्नानंतर तरी नवर्‍याचे गाव असेल, पण तो पण मुंबईकर निघाला. त्याला ही वाटायचे कि लग्नानतर बायकोचे गाव असेल....पण ... असो गावाची मजा काही निराळीच असते.>>>>>दोघांचीही इच्छा आहे, तर कोकणात जागा घेऊन घर बांधा. हा.का.ना.का. Happy

शोभा.. छानैत फोटो.. लक्की आहेस.. काजू,फणस.. काय काय झाडावर लागलेले पाहू शकतेस.. Happy
फळाचं नाव कुंकु.. पहिल्यांदाच ऐकलं आणी पाहिलं.. वॉव..

जागा घ्यायला जागा मिळतात का कोकणात? इथे उसगावात राहुन तिथे बघणार कोण? पण एक १०-१५ दिवसांसाठी घर मिळाले तर पुढच्यावेळी भारतात आल्यावर बघु वेळ काढुन नक्की जाउन येइन. तशी एकदा ३-४ दिवसासाठी लांजाला जाउन आले.

खूप छान.
'आमची शाळा', 'आमचं घर' यामुळें प्रचि अधिक भावतात.
फार पूर्वी रत्नागिरीहून कुडाळला जाताना एस्टी खारेपाटणच्या स्टँडवर गेली होती [प्रचि क्र. १६]; अजूनही अगदीं तसाच आहे हा स्टँड. चहाच्या 'हाटेल'वाल्याने छाती फुगवून ' मोठमोठी गलबतां येत पूर्वीं, अगदी ह्या तगात', असं सांगितलं होतं तेंही आठवलं !

भाऊ, मी पण तिथे ८२-८३ साली होते. तेव्हाच खारेपाटण आणि आत्ताच यात काहीच बदल नाही झालेला. फक्त बाजारपेठेतली बहुतेक दुकाने साधी(कच्च्या स्वरूपाची) होती, ती आता सिमेंटची बांधली जात आहेत. Happy
अजून एक फोटो आहे. त्यात एस. टी. पण आहेत. Happy

अनिल, मुकु, धन्यवाद. Happy
खारेपाटणचा किल्ला नाही पाहिला??? >>>>हेम आत्ता वेळ नव्हता, आणि पूर्वी माहित नव्हत. Uhoh

Pages