चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांचे पहिले गाणे ' मेरा नाम आओ, मेरे पास आओ' हे ये गुलिस्तान हमारा या देव आनन्दच्या चित्रपटात होते.ते जॉनी वॉकरवर चित्रीत झाल्याने त्याला सूटही झाले होते. त्यावेळी बहुधा डॅनी नट नसावा. किंवा बनण्याच्या मार्गावर असावा. विशेषं म्हणजे गायक म्हणून हा ब्रेक सचिन देव बर्मनसारख्या बुजुर्गाने दिला. त्या काळी क्वचितच नवा गायक ट्राय केला जायचा. सुन सुन कसमसे हेही आहे पण ते नन्तरचे...

डॅनीचा हीरो म्हणून एक चित्रपट होता , नाव नाही आठवत .
त्यात तो आणि त्याचा कम्पू वाह्यात कॉलेज-स्टुड्न्ट आसतात
राजकुमार त्याला सुधरवणारा प्रोफेस्स्र आहे .

>> त्यात तो आणि त्याचा कम्पू वाह्यात कॉलेज-स्टुड्न्ट आसतात
राजकुमार त्याला सुधरवणारा प्रोफेस्स्र आहे .
<<

बुलंदी?

लोक्स, अ आ अ सिनेमा चा वेगळा धागा आहे.

१ हजाराची नोट - सुंदर सिनेमा. १.३० / १.४५ तासांचा आहे. लक्ष्मी ला गरीबाघरी करमत नाही म्हणून ती गरीबाच्या घरात येत नाही आणि आलीच तर जस्त वेळ थांबत नाही. ही साधीशी गोष्टं साध्याच पद्धतीनं सांगितलीय. पण काळजाला भिडते.

सगळ्यात मह्त्वाचा म्हणजे अभिनय. त्यात सगळ्याच कलाकारांनी बाजी मारलीय. विशेषतः उषा नाईक. संवाद त्या त्या प्रसंगाला साजेसे चुरचुरीत आहेत, भावस्पर्शी आहेत, मार्मिक पण आहेत. भाषा यवतमाळ कडची. कपडे, मेकप, सेट सगळं (सामान्य प्रेक्षकाच्या नजरेतून) कथेशी प्रामाणिक.

एकाच वेळी मनोरंजक आणि वास्तवदर्शी चित्रपट बनवण्यात दिग्दर्शक पुरेपूर यशस्वी झालाय. नक्की बघा.

मेरा नाम आओ , मेरे पास आओ हे गाणे मूळ असे आहे. मात्र नन्तर त्यातली मेरा नाम आओ ही ओळ गाण्यात जिथे जिथे आली आहे तिथे कट केली आहे. यू ट्युबवर सर्च मात्र मेरा नाम आओ असाच द्यावा लागतो. आम्ही पूर्वी पिक्चर पाहिला तेव्हा गाणे मूळ रूपात होते. माहिती अशी आहे की नागा लॅन्ड मध्ये ज्या अनेक ट्राईब्ज आहेत त्या पैकी आओ ही एक जमात आहे. नागा आओ . त्या जमातीचा रोष होऊ नये म्हणून ती सर्वत्र एडिट केली आहे. पिक्चरचे स्टोरी भारत चीनच्या सीमेवरील नागा प्रदेशात घडते असे आहे. भारतात काय होइल सांगता येत नाही Happy
रच्याकने देव आनन्द शर्मिला टागोरचा हा एकमेव चित्रपट. आणि केवळ एस डी बर्मनच्या संगीता नेच स्मरणात राहिलेला.!

http://www.wealthx.com/articles/2014/comedian-jerry-seinfeld-tops-wealth...

शाहरुख खान जगातला दुसर्या क्रमांकाचा श्रीमंत अभिनेता Happy
elow are the top 5 wealthiest actors on the Wealth-X list:

Rank Name Estimated Net Worth*
1 Jerry Seinfeld 820
2 Shah Rukh Khan 600
3 Tom Cruise 480
4 Tyler Perry 450
5 Johnny Depp 450

* in US$

.

एक्स मॅन - फ्युचर पास्ट :- बघितला.. ठिक आहे प्रत्येकाला संधी ठिकठाक संधी दिली आहे . चित्रपटाच्या शेवटी आधीच्या भागात जे जे एक्स मॅन मरण पावले आहेत ते सगळे जिवंत होतात का >? कसे ??? या साठी चित्रपट बघावा लागेल Happy

सिनेमाचा ट्रेलर बघून आणि त्या टायगर चा चेहरा बघूनच बघावासा वाटत नाही Sad

एक हजारची नोट बघितला अतिशय आवडला .आजोबाही बघितला आणि ज्या सगळ्या त्रुटी इथे डिस्कस केल्या गेल्या त्या जमेस धरताही आवडला Happy

एक्स मेन - डेज ऑफ फ्युचर पास्ट बघितला..

मस्त घेतला एकूणच पिक्चर.. दोन तीन नवीन म्युटंट्स अ‍ॅड झालेत.. थ्रीडी इफेक्ट्स मस्त आहेत.. स्लो मोशन मधला एक सीक्वेन्स तर धमाल आहे.. अतिप्रचंड स्पीडने वावरणारा एक म्यूटंट घेतला आहे आणि त्याने केलेल्या गोष्टी स्लो मोशन मध्ये दाखवल्या आहेत.. आणि त्याच वेळेस एक मस्त गाणे आहे..

कन्सेप्ट पण जबरी आहे. सध्या होणारा विध्वंस टाळण्यासाठी भूतकाळात जाऊन तिथली एक घटना बदलायची आणि त्याचा परिणाम झाल्यामुळे भविष्य काळ पण बदलायचा.. पण हीच गोष्ट देजा वू मध्ये पण वापरून झालेली आहे.. इथे फक्त म्युटंट्स आहेत हे वेगळे पण.. देजा वू मध्ये मशिन वापरुन ही गोष्ट घडवली आहे तर इथे म्यूटंट मध्ये ती शक्ती आहे.

एकदा बघण्यासारखा नक्कीच आहे.. काही सीन पैसा वसूल आहेत..

स्लो मोशन चा सीन भारी आहे.. या चित्रपटात बर्याच प्रश्नांची उत्तर मिळतात.. खास करुन वॉल्वरिन बद्दल .
सगळ्याच एक्स मन मधे त्यालाच जास्त भाव दिलेला आहे ...

फर्स्ट क्लास तर सुरुवात होती ना आणि तेव्हा तो लोगन होता वॉल्वरिन नाही Happy या चित्रपटात जेव्हा तो मागे जातो तेव्हा हातातुन त्याच्या चाकु ऐवजी हाडे येतात ..कारण तो वेळी तो झेविरिअर्स च्या हातात गेलेला नसतो

लोगान म्हणून पण त्याचा एकच सीन आहे..

आणि त्याच्या हातात चाकू तो स्ट्रायकरच्या हातात गेल्यावर येतात झेवियरच्या कडे गेल्यावर नाही.

हो नावात गडबड झाली स्ट्रायकर ऐवजी झेविअर लिहिले गेले Happy
तो सीन बार मधला आहे .. जेव्हा मॅग्निटो त्या दोन जनांना मारायला जातो.. तेव्हा लोगन च्या शरिरात धातु नसतात म्हणुन मॅग्निटो चे त्यच्या कडे लक्ष जात नाही

नवीन पिक्चरमध्ये स्ट्रायकर पण दाखवलाय..

मला ह्या सिरीजची क्रोनोलॉजी चुकल्यासारखीच वाटते.. पुढे मागे आल्यामुळे सिक्वेन्स मध्ये फारच घोळ होतो..

जेम्स बॉण्ड मध्ये पण तसच झालय सध्या.. अचानक एकदम जेम्स बॉण्डचा उदय कसा झाला हे दाखवलय.. पहिला पिक्चर त्यावरच का नाही काढला हेच कळत नाही..

नवीन पिक्चरमध्ये स्ट्रायकर पण दाखवलाय..>> शेवटी पण तो स्टायकर च्या रुपात रोगन असते बहुतेक स्ट्रायकर ती टेक्नोलॉजी वापरुन लोगन च्या शरीरात धातु भरतो. लोगन म्युटन आधीपासुनच होता ज्याची जखम लगेच भरुन येते म्हणुन त्याच्यावर ती टेक्नोलॉजी वापरली जाते .. बहुतेक असे आहे ..

जेम्स बाँड चा उदय ??????? कोणत्या चित्रपटात ?????

बहुतेक सगळे आता भविष्यात जाण्या ऐवजी भुतकाळात जात आहेत.. याची सुरुवात "फायनल डेस्टिनेशन" पासुन सुरु झाली वाटते ... जिथे शेवटच्या चित्रपटात वर्तुळ पुर्ण करुन शेवट तिथे करतात जिथे "फायनल डेस्टिनेशन" सीरिज च्या पहिल्या चित्रपटाची सुरुवात झालेलेली असते

एक्स मेन - डेज ऑफ फ्युचर पास्ट बघितला.. मस्त आहे चित्रपट Happy
येस्स, तो स्लो मोशन मधील सीन सगळ्यात भारी

Pages