Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रजनीकांतचा सिनेमा कुणीच
रजनीकांतचा सिनेमा कुणीच पाहिला नाही की काय?
ती आख्खी एक्स-मेन सिरीज मी
ती आख्खी एक्स-मेन सिरीज मी पाहिलेली नाही. पहिल्यापासून (सिक्वेन्स मधे) बघावी काय?
नाही.. त्यांनी ज्या क्रमाने
नाही.. त्यांनी ज्या क्रमाने सिरीज सुरु केली आहे तशीच पहा..तरच मज्जा येइन
अंकु - नीट कळाले नाही.
अंकु - नीट कळाले नाही. विकीपिडीया वर एक्स-मेन (२०००), एक्स-मेन युनायटेड (२००३), द लास्ट स्टॅण्ड (२००६)... अशा क्रमाने रिलीज झालेले आहेत असे दिसत आहे. त्याच क्रमाने पाहा असे म्हणत आहेस का?
. विकीपिडीया वर एक्स-मेन
. विकीपिडीया वर एक्स-मेन (२०००), एक्स-मेन युनायटेड (२००३), द लास्ट स्टॅण्ड (२००६)... अशा क्रमाने रिलीज झालेले आहेत असे दिसत आहे. त्याच क्रमाने पाहा असे म्हणत आहेस का? >> हो. ज्या क्र माने रेलीज झाले आहेत त्या क्रमाने क्रोनोलॉजी नाहि ये, ती मागे-पुढे आहे.
आयर्न मॅन फॅन आहेत का कोणी.
आयर्न मॅन फॅन आहेत का कोणी. काल कसिनो रॉयल, आयर्न म्यान एकदमच लागले होते. दुनिया दारी पण!
मी (आयर्न मॅन) पहिले दोन
मी (आयर्न मॅन) पहिले दोन पाहिले आहेत अमा, आवडले. तिसरा पाहायचा आहे अजून. कसिनो रोयाल बॉण्डचा का?
मीही आयर्न मॅन फॅन.. तिसरा पण
मीही आयर्न मॅन फॅन.. तिसरा पण छान आहे. पण मला पहिलाच फार आवडतो!
काल अचानक एका च्यानलवर 'दो
काल अचानक एका च्यानलवर 'दो दुनी चार' सापडला. नाव पाहून आधी नक्की कुठला सिनेमा आहे हे लक्षात येईना. पण जस्ट सुरू झाला होता आणि बरा असावा असं वाटलं, म्हणून बघायला सुरूवात केली तर जरा वेळाने बजाज स्कूटरवरचा ऋषी कपूर दिसला. मग आठवलं, की हा नुकताच येऊन गेलेला ऋषी-नीतूचा सिनेमा.
सिनेमा एकदम हलकाफुलका, बॉलीवूडी ड्रामेबाजी अजिबात नसणारा. कथानक पण साधंसुधंच. ऋषी कपूर काय काम करतो! त्याचा सूक्ष्माभिनय तर मला कायमच आवडतो. नीतू सिंग पण छान.
शाळाशिक्षकांची अपुरी कमाई, वरकमाईसाठी केला जाणारा क्लासेसचा उद्योग, चारचाकी विकत घेण्यासारखी स्वप्नं प्रत्यक्षात आणताना त्यांना कराव्या लागणार्या खटपटी-लटपटी, जनरेशन गॅप, शिक्षणक्षेत्रातल्या अपप्रवृत्ती, त्यापायी सच्च्या शिक्षकांची होणारी कुतरओढ हे सगळं हलक्याफुलक्या, खुसखुशीत आणि काही धमाल प्रसंगांमधून दाखवलं आहे.
मला सिनेमा आवडला.
आयर्न मॅन फॅन आहेत का कोणी.
आयर्न मॅन फॅन आहेत का कोणी. >>>> मी आहे. तिन्ही पार्ट पाहीलेत आणि आवडलेत.
मी सुदधा आर्यन मॅन ची फॅन
मी सुदधा आर्यन मॅन ची फॅन आहे...पण् त्याचा परफॉर्मन्स सगळ्यात जास्त मला अव्हेंजर्स मधे आवडला.
रॉबर्ट चा तरुणपणीचा ओन्ली यु नावाचा एक चित्रपट पण छान आहे.
आर्यन मॅन माझेही तिन्ही बघून
आर्यन मॅन माझेही तिन्ही बघून झाले आहेत..मस्त आहेत तिन्ही.. पहिलाच जास्त आवडतो.. तिसरा बहुतेक आर्यन मॅचचा शेवटचा भाग असावा.. ट्रिलोजी करुन संपवली सिरीज बहुतेक..
एक्स मेन चे आधीचे सगळे रिलिज गेल्या आठवडयात स्टार वर का एचबीओवर दाखवत होते..
आर्यन म्यान चे सगळे पिच्चर
आर्यन म्यान चे सगळे पिच्चर जाम आवडले हा।
पण एक्स मेन सिरीज माझी सगळ्यात फेवरेट आहे… त्यात तर जिम्मि… (लोगन ) वुल्वरिन सगळ्यात आवडता .
त्याचे सगळे पिच्चर आवडीने न झोपता बघतो…. नवीन एक्स मेन- पास्ट फ्युचर नाही बघितला अजून जाण्याच्या प्लान मध्ये कोणीतरी नाक खुपसतो
आयर्न मॅन फॅन आहेत का कोणी.
आयर्न मॅन फॅन आहेत का कोणी. >>>> मीसुद्धा तीन्ही पार्ट्स पाहीले. छान आहेत तिन्ही. पण पहिला पार्टच विशेष आवडला.
बापरे. हिंदी पिक्चरवर कोणी
बापरे. हिंदी पिक्चरवर कोणी चर्चा करतानाच दिसत नाहिये
बादवे सिटी लाईट फिल्म कोणी पाहीलेय का? हंसल मेहता आणि राजकुमार रावचे खूपच कौतुक केले जातेय.
तिसरा बहुतेक आर्यन मॅचचा
तिसरा बहुतेक आर्यन मॅचचा शेवटचा भाग असावा.. >>> नसेल . आता पेपर ला पॉवर मिळाली आहे पुढच्या चित्रपटात दोघे ही आर्यन मॅन बनुन धुमाकुळ घालणार बहुतेक
उदयन .. त्यानी त्याची पॉवर
उदयन .. त्यानी त्याची पॉवर असलेली चीप टाकून दिली की समुद्रात तिसर्या भागाच्या शेवटी..
हो पण परत बनवू शकतो... आता
हो
पण परत बनवू शकतो... आता अँवेन्जर २ मधे काय करणार आहे?
स्नेहनिल, शहिद नंतर राजकुमार
स्नेहनिल, शहिद नंतर राजकुमार खुप आवडायला लागलाय. फार देखणा नसल्याने कुठल्याही भुमिकेत शोभतो.
सिटीलाईट चे परीक्षण वाचले. त्यात त्याची पत्नी जो व्यवसाय करते आणि त्याबद्दल त्याला ज्या प्रकारे कळते, ते मला जरा फिल्मी वाटले. पण तरीही बघेनच.
त्यानी त्याची पॉवर असलेली चीप
त्यानी त्याची पॉवर असलेली चीप टाकून दिली की समुद्रात तिसर्या भागाच्या शेवटी..
>>>> हो, मलाही वाटतयं कि सिरिज संपली
काल (मराठी चित्रपट) आंधळी
काल (मराठी चित्रपट) आंधळी कोशिंबीर पाहिला. टाईमपास आहे. कलाकार अशोक सराफ, वंदना गुप्ते, आनंद इंगळे, मृण्मयी देशपांडे, हेमंत ढोमे इ. आहेत. आणि हो प्रिया बापटही आहेत.
मृण्मयी देशपांडेला आधी कुंकू मालिकेत पाहिली होती. कोणत्याश्या श्रीमंत माणसाची भोळीभाबडी सत्यवचनी पत्नी म्हणून. चित्रपटात पहिल्यांदाच बघितले. तिचाही वावर कमालीचा सहज आहे. मस्त निभावलेय तिचे कॅरेक्टर.
आयर्न मॅन फॅन क्लबात मी पण!
आयर्न मॅन फॅन क्लबात मी पण! खर तर रॉ. डा. ज्यु. क्लबात
मी काल स्पिलबर्गचा.. MUNICH
मी काल स्पिलबर्गचा.. MUNICH बघितला. १९७२ साली ऑलिंपिक च्या खेळाच्या दरम्यान इस्रायली खेळाडूंची हत्या केली होती आणि त्या हत्येचा इस्रायलने बदला घेतला होता.. तो विषय. डीव्हीडी मधे स्पिलबर्गचे निवेदनही आहे. हा चित्रपट वादात सापडला होता असे आठवतेय.
पण बघताना मात्र मला खुप आवडला. स्पिलबर्गने तो काळ ऊभा करायला बरीच मेहनत घेतली आहे. प्रत्येक कलाकार त्या त्या भुमिकेत अगदी फिट्ट. डॅनियल क्रेग कमी महत्वाच्या भुमिकेत आहे पण त्याच्या डोळ्याच्या एका शॉटसाठी तिथे त्याचीच गरज होती असे वाटले.
माझा आवडता एरिक बाना ( ब्रॅड पिटच्या ट्रॉय मधला, हेलनच्या मानलेल्या नवर्याचा भाऊ ). या सूडासाठी त्याची
निवड होते खरी पण तो मनाने अगदी भाऊक.. आणि अगदी तस्साच तो दिसतो. इंग्रजी चित्रपटात नायक सहसा
रडताना दिसत नाही.. यात मात्र तो तसा दिसतो. आपल्या तान्ह्या बाळाला जोजवताना तर तो अगदी अस्सल वाटतो.
ही डॉक्यूमेंटरी नाही असे स्पिलबर्गने आवर्जून सांगितलेय.. तरी बघण्यासारखा आहे.
काल हॉलीडे पाहिला. बं ड
काल हॉलीडे पाहिला. बं ड ल.
गाणी सुमार.
सोनाक्षी सिन्हा चं पात्र बकवास. सुरुवातीलाच फौजी अक्षयची जुल्फे बघुन निराशा झाली. आणि मग गोविंदाला बघुन.
तीच ती स्टोरी. पण विलन भारीये. संपुर्ण चित्रपटात एक विलन तेवढा आवडला.
परवा "Holiday "
परवा "Holiday " पाहिला....
सोनाक्षी, गाणी आणि काही बालिश चुका टाळल्या असत्या तर Wednesday , Special २६ नंतरचा चित्रपट मिळाला असता... असो ....
शेवटच निरोपाच गाण जमून आलंय .... नैना अश्क ना हो ....!!!
हॉलिडे आवडला मला, कंटाळा आला
हॉलिडे आवडला मला, कंटाळा आला नाही. अॅक्शन मस्त आहे, (अ. आणि आ. आहेच), गाणीपण आवडली.
लव स्टोरी बंडल, उगाचच घुसडलेली. गोविंदा हा सैन्याधिकारी म्हणजे कहरच आहे.
गोविंदा हा सैन्याधिकारी
गोविंदा हा सैन्याधिकारी म्हणजे कहरच आहे. >>>>>
मी तर शेवटपर्यंत वाट बघत होतो कि .... आता असे कळेल कि गोविंदा सैन्याधिकारी नाही ... !!!!
एक खूप जुना चित्रपट पाहण्यात
एक खूप जुना चित्रपट पाहण्यात आला ..बहुदा १९७० चा असेल " Duel " ... स्पीलबर्ग काकांचा आहे .... केवळ अप्रतिम .. !!!
typical Hero नाही ... heroin नाही .... फक्त एक कार आणि त्याचा पाठलाग करणारा एक truck .. (त्या truck वाल्याचा चेहरा तर शेवटपर्यंत दिसत नाही ) ...
स्टोरी कशी present करावी याचा तो धडा आहे .... २ तास कसे जातात कळतच नाही ....
रणथंबोर.. त्या चित्रपटाचे
रणथंबोर.. त्या चित्रपटाचे नाव कालपासून आठवायचा प्रयत्न करत होतो. थरारक आहे तो !
धन्यवाद रणथंबोर .. आज पाहिला
धन्यवाद रणथंबोर .. आज पाहिला Duel
उत्कंठावर्धक आहे अगदी.
Pages