चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुजा +१
शिवाय कायम परदेशात हिरो किंवा हिरोईन ला खूप चांगले मित्र किंवा सहकारीच भेटतात, वाईट दुष्ट असे नाही, डे टु डे लाईफ मधे जिथे श्वास घ्यायची फुरसद नसते तिथे हे मित्र आपापला काम धंदा सोडुन हिरोईन ला साइट सिइंग करवत असतात, ते प्रॅक्टिकली शक्य नसतं बहुतेक वेळा! पण जादा लॉगिक हिंदी चित्रपटांना लावायचे नसतात Wink

गँग्स ऑफ भुत आणि यंगिस्तान दोन्ही नेटकर च्या कृपेने पाहता आले (टीपी)

ठिक आहे.. फुकट बघता येत असेल तर बघा... जॅकी भगनानी पेक्षा रणबीर कपुर असता आणि स्टोरी अजुन चांगली लिहिली असती तर उत्तम झाला असता

फक्त आधी ते होणार्या नवर्याने लग्नाच्या आदल्या दिवशी नाही म्हणणे .आणि अचानक तिने मॉड फोटो पाठवल्यावर एकदम तिच्या प्रेमाबद्दल साक्षाकार झाल्यासारखा तिच्या पाठी पाठी येणे पटले नाही. >>> तो लग्न याच कारणासाठी मोडतो की ती एकदम काकूबाई टाईप आहे (तो तीला कॉफी शॉप मधे बोलतो, 'लंडन जाके मैं बहोत बदल गया हूं पर तुम बिलकूलभी नही बदली' अस काहीतरी)

मग मॉडर्न कपडे घातले फक्त की माणूस मॉडर्न होतो का?>> तसा दिसत तरी असेल, पण विचार मॉडर्न (सुधारक) होतील का हे सांगू शकत नाही.

Queen सिनेमा चांगला आहे. कंगनाचे कामही चांगले आहे. पण तिचे अ‍ॅमस्टर्डॅमचे मित्र आणि विजयालक्ष्मी जास्त लक्षात रहातात. त्या सर्वाची कामे जास्त सहज केलेली वाटतात.काही प्रसंग; पर्स चोरापासुन वाचवण्याचा, युथ हॉस्टेलमध्ये कंगनाला झोपेतुन उठवतात, बाथरुम मधील किंचाळणे आणि रुममेट्चे गोंधळणे, शेवटी टॅक्सीमधील "Made in India" चा डायलॉग, मस्त आहेत. एकदा बघायला ठीक आहे.

आणि अचानक तिने मॉड फोटो पाठवल्यावर >>> उलट तो प्रसंग मस्त जमून आला आहे. तिला विजयालक्ष्मीला फोटो पाठवायचा असतो, पण ती चुकून त्याला पाठवते..

<<तिला विजयालक्ष्मीला फोटो पाठवायचा असतो, पण ती चुकून त्याला पाठवते..>> अस आहे तर . ते काही लक्षात आल नाही. त्यानंतर त्याचा फोन आल्यावर ती त्याला ती जिथे कुठे असते तिथे बोलावते आणि नंतर तिथे भेटल्यावर मात्र आपण भारतातच भेटू अस सांगते तेव्हा बरच वाटल. असच वागायला पाहिजे होत अस वाटल. जशास तसे Happy

मला एक कळले नाही. एका शॉप मध्ये कंगणा आणि तिचे फ्रेंडस जातात. जिथे ती आपल्या घरच्यांसाठी खरेदी करत असते आणि तीचे फ्रेंडस तिला चिडवत असतात. नंतर ते चौघेही खुप हसतात. कोणता जोक होता तो???

स्नेहल,
ती कुठल्या दुकानात जाते आणि काय घेते नाही लक्षात आलं का ?
अ‍ॅडल्ट टॉइज च्या दुकानात जाऊन भलत्या गोष्टींना भलते समजून खरेदी करत असते, तो सीन hilarious होता !

हो, मी कालच पाहिला मराठी यलो,एक अप्रतिम चित्रपट. गतिमन्द मुलीच्या जीवनावर आधारित असा. असे बरेच सिनेमे येऊन गेलेत मराठीतही, पण हा सर्वात जास्त प्रभावी ठरतो याचे कारण जिच्या जीवनावर हा सिनेमा काढला आहे, ती स्वतः त्यात भूमिका करत आहे.

त्याचबरोबर इतर सहकलाकारान्चे कसबही वाखाणण्याजोगे, मृणाल कुलकर्णी, मनोज जोशी, ऊपेन्द्र लिमये यान्चा अभिनयही मस्तच.

गतिमन्द मुलीचे आयुष्य , तिच्या आईच्या जीवाची तगमग, मेहनत ते या मुलीचा एक यशस्वी जलतरणपटू हा प्रवास सुन्दरपणे दाखवला आहे.
तान्त्रिक बाबीही छान !
चित्रपटाचे यलो हे शीर्षक कुतुहल जागवते पण ते कळावे म्हणुन हा सिनेमाच बघा,
एक सकारात्मक विचार समाजाला देणारा येलो नक्की आवडेल सर्वाना.

अ‍ॅडल्ट टॉइज च्या दुकानात जाऊन भलत्या गोष्टींना भलते समजून खरेदी करत असते, तो सीन hilarious होता !>> अगदी अगदी लोळले गडाबडा! Rofl

यलो पाहायचा आहे. रिव्ह्यू खूप छान आहेच पण ट्रेलर बघीतल्यापासूनच उत्सुकता आहे.
गतीमंदच! टायपो नाही.

मतिमंद आणि गतिमंद ह्यात फरक आहे. मतिमंदत्व म्हणजे mental retardation आणि गतिमंदत्व म्हणजे slow learner. साधारण आयक्यू सत्तरपेक्षा कमी असेल तर मतिमंदत्वाचे निदान होते. ७० ते ९० च्या मध्ये आयक्यू असल्यास गतिमंदत्वाचे निदान होते. डाऊन सिन्ड्रोम असलेल्या मुलाचा आयक्यू ह्या रेंजमध्ये असणे शक्य आहे त्यामुळे गतिमंद हा शब्द बरोबर असावा.

ट्रेलर बघताना गौरीचा प्रवास खूप प्रेरणादायी वाटतो. हा चित्रपट लहान मुलांबरोबर बघावा का ? म्हणजे सहा-सात वर्षाच्या मुलाला हा चित्रपट डिस्टर्बिंग वाटू शकेल का ? मला आवडेल मुलाबरोबर हा चित्रपट बघायला.

यलो , मी ही पाहिला. खर्‍या गौरी गाडगीळ नेच सिनेमातही काम केलय. मला आवडला सिनेमा. ती डाउन्स सिन्ड्रोम असलेली मुलगी आहे.
सगळ्यांची कामं मस्त झालीयेत. तिला ,तिच्या आजाराला सिनेमाच महत्वाच पात्र करून रडगाण नाही बनवलय ह्याच विषेश कौतुक वाटल.

मी उद्या बघायचा विचार करतेय यलो .
स्नेहनिल अग प्रियतमा आत्ता जुना झाला ( तीन -चारआठवडे ) ."सौ देवधर" सिनेमा आला होता ( सई ताम्हणकर चा ) त्याच वेळी रिलीज झाला होता. त्या सिद्धार्थ जाधवला टारझन च्या वेशात बघवत नाही. Happy

अगो, सिनेमा पाहण्यापूर्वी लेकाला त्याला समजेल अश्या भाषेत डाऊन्स सिण्ड्रोमबद्दल सांग. म्हणजे अजिबात डिस्टर्बिंग नाही वाटणार.

आम्ही गुजराथमध्ये असताना आमच्या सोसायटीत एक डाऊन्स सिण्ड्रोम असणारा मुलगा होता. साधारण आदित्यच्याच वयाचा. (ई.४थी-५वी) आदित्यनं १-२वेळा त्याचा उल्लेख 'वेडा' असा केल्यावर मी एक दिवस त्याला त्या सिण्ड्रोमबद्दल शास्त्रीय माहिती दिली. त्याचा खूप फायदा झाला.

'यलो' पाहिला. आजवर स्पेशल मुलांवरचे जे काही निवडक सिनेमे आले आहेत, त्या तुलनेत एकदम फ्रेश आणि आशावादी ट्रीटमेंट आहे. सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय आहे. उपेंद्र लिमये छा गया है! गौरीच्या परिघावरील परिचित ते तिच्या निकटवर्तीयांमधील एक हे त्याचं ट्रान्झिशन कथानकात सुरेख दाखवलं आहे. (मृणाल कुलकर्णीचा अभिनय आता फार एकसाची वाटतो. पण ते वाटणं माझ्यापुरतं असू शकतं.) संवादांवर मेहनत घेतलेली आहे.
स्विमिंग पूलमधली, निळ्या पाण्याची दृष्यं डोळ्यांना सुखावणारी आहेत. (त्यामुळेच मला सिनेमा अधिक आवडला असण्याची शक्यता आहे.)
डाऊनस सिण्ड्रोमबद्दल प्रचारकी थाटात माहितीचा महापूर ओतलेला नाही. संवाद लक्षपूर्वक ऐकले, तर सिण्ड्रोमची प्रमुख लक्षणं विचारात घेतलेली आहेत. (इतरांनी तेवढी जरी लक्षात ठेवली तरी ते मूल आणि त्याचे कुटुंबीय यांना जगणं सुसह्य होतं.)
लहान गौरीचं काम करणारी मुलगी आणि नंतर प्रत्यक्ष गौरी गाडगीळ यांचा स्क्रीन प्रेझेन्स खूप सुंदर रितीनं समोर येईल याची खबरदारी घेतली आहे.
सिनेमा अवश्य पहा. आपल्या शाळकरी मुलांनाही नक्की दाखवा. "येस्स! यू कॅन डू इट!" ही संपूर्ण सिनेमाची टॅगलाईन आहे.

यलो अगदी पहाच. मुलांना घेऊन पहा. बर्‍याच जणांनी लिहिलं आहे, तसं यात कोणतीही ग्लोरिफिकेशन नाही की ईमोशनल ड्रामे नाहीत की ओढूनताणून आणलेल्या टडोपा मोमेन्ट्स नाहीत. मस्त, पॉझिटिव्ह सिनेमा आहे.

आम्ही आमच्या मुलाला डाऊन्स सिन्ड्रोमबद्दल माहिती देऊन मग सिनेमा दाखवला. त्यालाही खूप आवडला.

काही संवाद मस्त आहेत. काही गोष्टी खटकल्याही, पण त्या नजरेआड केल्या Happy

काल २ स्टेट्स बघितला, मला आवडला Happy
आलिया भट्ट फार सुंदर दिसलीये, काम पण छान आहे तिचं.
बाकी सपोर्टींग कास्ट पण भारी आहे.
अर्जून कपूर अ‍ॅक्टींग मधे ठिकठाक, पण काही ठिकाणी थकलेला आणि बोदल्या दिसतो. त्याच्या ऐवजी बाकी दुसरा नॉर्थी दिसणारा, फ्रेश स्क्रीन प्रेझेंस असणारा हीरो (रणबीर कपूर /सिद्धार्थ मल्होत्रा /शाहिद कपूर) असायला हवा होता.

नेटच्या कृपेने २ स्टेट्स बघते आहे.. इतका कॅची वाटत नाहीये..
अर्जुन कपुरबद्द्ल +१
सध्या सौंदीन्डियन लोकांनी घेरलेले असल्यामे आलिया अजिबात तशी वाटत नाहीयं .. हेमावैम!

Pages