चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला जशी तुलना अमिताभ आणि अभिषेक ची होत होती तशी किमान जॅकि आणि टायगर ची होणार नाही ...

जॅकि ला नाचताच येत नव्हते तर टायगर चांगला नाचतो... किमान या बाबतीत तरी तुलना होणार नाही

झंपी, थॅन्क्स. येथील त्याचे रिव्यूज एवढे छान नव्हते त्यामुळे बघावा की नाही विचार करत होतो. हा ज्यांना आवडेल त्यांना क्लिंट ईस्टवूड चा "ट्रबल विथ द कर्व्ह" सुद्धा आवडेल त्यात क्रिकेट वगैरे नाही, पण चांगला आहे.

कोण ते लडाख चीनला देतंय!!! (लडाख आणि तिबेटमध्ये गफलत झाली असावी).

टायगर श्रॉफच्या बॉबकटचा आता जो कट झालाय तो आधीपेक्षा बरा आहे. ट्रेलर मी पण पाहिलं 'टू स्टेट्स'च्या वेळेस. जॅकीची बासरी हिट झाली होती म्हणून पोराला पण वाजवायला लावलीय काय?

फारएन्ड, छान म्हणजे एकदा पाहण्यासारखा आहे. धो धो आवडेल असा नाही की रकानेच्या रकाने तारीफ करु शकता. आणि सुरु कधी होतो व संपतो कळत नाही म्हणजे एक तास चाळीस मिनिटंच आहे. बोर असे होत नाही. मूवींग फास्ट आहे.

रॉबिनहूडांनी टाकलेल्या त्या टायगरचे फोटो बघून आणि वरचा आधीचा फोटो बघून वाटते की ह्याने मग काय सर्जर्‍या केल्या की काय? Proud

हा करीना कपुर सारखा दिसतो अशी पोस्टर्स फिरतायेत फेबु वर>> रॉहूने पोस्ट केलेल्या प्रचित तर डिट्टो वाटतोय Proud

काल डीडी वर रात्री अचानकच चित्रा पालेकर यांचा मातीमाय पाहायला मिळाला. बघायचे राहून गेलेले चांगल्या आशयाचे चित्रपट असे अचानक खजिना गवसल्यासारखे पाहायला मिळतात आणि सुखद अनुभव देऊन जातात. अतुल कुलकर्णी आणि नंदिता दास यांची कामे फार सुंदर झाली आहेत. नंदिता दास यांना या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अस्वस्थ करणारा विषय तितकेच अस्वस्थ करणारे अभिनय. फार आवडला. ज्यांना वेगळ्या धाटणीचे आशयपूर्ण आणि अस्वस्थ करणारे चित्रपट पाहायची आवड असेल त्यांनी शक्य झाल्यास नक्की पाहा.

डॅनी तसा बराचसा स्मार्ट दिसतो, पण मुलगा पुर्वी जाम बायकी आणी ढोल्या दिसायचा, आता बरा दिसतोय.

http://ibnlive.in.com/news/snapshot-meet-rinzing-denzongpa-actor-danny-d...

टायगर श्रॉफ चीनी-नेपाळी-तिबेटीयन-लडाखीयन असा मिश्रीत युवक आहे. मेरा भारत महान. एकात अनेकता!

रॉहू, ते नेपाळी गाणे का? त्या दोघांनी दू.द.वरच्या 'यह है आशा' कार्यक्रमात म्हटले होते तेच का? तुम्हाला कुठे मिळाले तर मला पण द्या. त्या गाण्याचे नक्की शब्द माहीत नसल्याने कुठे शोधता पण येत नाही.

Pages