चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज एका स्शिनेमाचा बोर्ड पाहिला.

मछली जल की रानी है.

बी ग्रेड हॉरर मुवी पहाणार्‍यानी लाभ घ्याव.

काल शाहिद (२०१३ चा) नावाचा चित्रपट नेटफ्लिक्स वर पाहिला. इतर बघायला काही चांगलं दिसलं नाही, आणि ह्याला ३+ स्टार्स दिसले म्हणून बघायला घेतला आणि एका बैठकीत बघून संपवला. मला चित्रपटाबद्दल आधी काहीच कल्पना नव्हती, पण जे पाहिलं ते मनात रेंगाळत राहिलं. सगळ्यांचा अभिनय सुं द र.
'काय पो चे' मधला राजकुमार यादव ह्याची ह्या चित्रपटात प्रमुख भुमिका आहे. शाहिद आझमी नावाच्या क्रिमिनल डिफेन्स लॉयरच्या जीवनावर चित्रपट आधारित आहे. शाहिद हा दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत चुकीने पकडल्या गेलेल्यांच्या केसेस लढण्याकरता पुढे आला. त्याच्या वयाच्या साधारण १३-१४ वर्षापासूनचा प्रवास ह्या चित्रपटात दाखवला आहे. बाकी काही लिहित नाही कारण मला स्पॉयलर्स टाकायचे नाही आहेत. कुठे बघायला मिळाला तर नक्की चुकवू नका.

काल हमशकल पाहिला

टोटल बकवास आहे, चूकूनही त्यासाठी थिएटरला फिरकू नका.

तीन लोकांचेट्रीपल रोल , झेपत नाही अक्षरशा:

The book Thief - केवळ अप्रतिम- कथा , अभिनय आणि सर्वच काही

C I D ला एका प्रेताच्या खिशामधुन "हमशकल" या चित्रपटाचि तिकिटे मिळतात

ACP प्रदयुमन : - केस एकदम सोप्पि आहे दया, ह्याचा खुन नाहि झाला, हि आत्महत्या आहे आत्महत्या

हमशकल्स चे जोक्स...

घरवालोंके साथ हमशकल्स देखने जा रहे हो? एक सदस्य को घर पर ही रहने दो...
खानदान बच जाएगा!!

हमशकल्स आतंकवादीयोंको दिखादो...
आधे वैसे ही मर जायेंगे
बचे हुए साजीद खान को मार देंगे
दोनो साईड फायदा

आमीर आणि शाहीद हे असेच जोडगोळीने पाहायचे ठरवलेले चित्रपट.. पैकी आमीर खूप आवडला. शाहीद पाहायचा योग आलेला नाहीय अजून. नक्की पाहणार मिळाला तर.

मी काल होलीडे पाहिला. टोटल बकवास. एक माणूस (अक्षय कुमार) संपूर्ण दहशदवादी नेटवर्क नष्ट करतो आणि कोणाला काही सुद्धा पत्ता लागत नाही...रजनीकांत टाइप पिक्चर वाटला..सोनाक्षी सिन्हा तर पाहुणी कलाकार आहे. तिची आणि 2-3 बेसूर गाण्यांची अजिबात गरज नव्हती. . Uhoh

सोनाक्षी सिन्हा तर पाहुणी कलाकार आहे. तिची आणि 2-3 बेसूर गाण्यांची अजिबात गरज नव्हती. . >> त्यापेक्षा ओरिजनल थुप्पक्की असे काहीतरी नावाचा चित्रपट आहे तो बघा तामिळ आहे

गुलाब gyang पाहिला. बकवास. चांगल्या कथेचा सत्यानाश. बिचारी संपत, माधुरी सारखी ठुमके लावत बसली असती तर कधीच आपले काम तडीस नेऊ शकली नसती. आणि राजकारणी जुही तर एकदम फालतू. अपेक्षाभंग - बरे घरात लाठी नव्हती- tv वाचला

"Holiday " पाहिला....

सोनाक्षी, गाणी आणि काही बालिश चुका टाळल्या असत्या तर Wednesday , Special २६ नंतरचा चित्रपट मिळाला असता... असो ....

शेवटच निरोपाच गाण जमून आलंय .... नैना अश्क ना हो ....!!! >> अनुमोदन

मला थोडा वेगळा विषय वाटला म्हमून गेले बघायला, पण भ्रमनिरास झाला की हो राव. अक्षय कुमार भाव खाऊन जातो, पण त्याच्यापेक्षा तो व्हिलन जास्त चांगला वाटला मला. सोनाक्षी सिन्हा जाम इरिटेटिंग वाटली आणि दर १० मिनिटांनी येणारी गाणीपण.. गाण्यांशिवाय पिक्चर बनवायला कधी शिकणार आपले लोक? पैसा, वेळ आणि बरचं काही वाचेल की...

हमशकल पाहिला का कोणी? एवढे पेशन्स आणि गट्स असलेल्या माणसाला मनापासून सलाम.. साजिद खान उचलून तळ्यात फेकून दिले पाहिजे कोणीतरही. हा चित्रपट बकवाजच असेल यात शंकानाही, तरीपण जर कोणी पाहिला असेल तर मस्त चिरफाड करून रिव्ह्यू द्या ना राव.. प्लीज

सरकार पुढे मोठा प्रश्न उभा आहे ....आधी कुणाला वाचवायचं ....??

इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांना कि ....

"हमशकल्स" बघायला गेलेल्या प्रेक्षकांना ???

गंग ऑफ वासेपूर १-२ कसा वाटला .... माज्या तर डोक्यातून कित्येक महिने जात नव्हता ...
पहिला भाग मनोज वाजपेयी साठी आणि दुसरा भाग नवजुद्दिन सिद्दीक्की साठी बघायला पाहिजे...
अनुराग कश्यपची ताकद कळते राव... (खर तर हा एकाच सिनेमा आहे...फक्त मोठा कॅनवास असल्यामुळे दोन तुकड्यात दाखवलाय )

डायलॉग तर एक से एक ....
"भाई का... बाप का ... सब का बदल लेगा तेरा फैझल ..."
"यहा कबूतर भी एक पंख से उडता है . और दुसरे से अपनी इज्जत बचाता हे"
"हम अभी तक जिंदा हे ..क्युंकी हम सिनेमा नाही देखते....
"जब तक इस दुनियामे फिल्मे बनती रहेंगी ....लोग चू*** बनते रहेंगे "

दोन्ही गँग्ज मधे दिग्दर्शकाने भरपूर विचार केलेला आहे.. केवळ पडद्यावर दिसते तेच नव्हे तर ऐकू येणारे आवाज, चेहर्‍यावरच्या सावल्या, रंग... गाण्याचे शब्द आणि त्यांचे टाईमिंग..
फक्त शीर्षकासाठी खास देशी शब्द वापरायला हवे होते, ( गँग्ज ऑफ न्यू यॉर्क ची नक्कल टाळायला हवी होती. )

पानसिंग तोमर जाम आवडला ..... इरफान खान नावाचा उठता बसता Acting करणारा महामानव असल्यावर निराश होऊच शकत नाही ...

मस्त स्टोरी (सत्य घटनेवर आधारित)
मस्त Acting
मस्त Dialogue बाजी....

'बीहड़ मे बागी होते है डकैत मिलते है पार्लिमेंट में',
बेटा डरो मत… ये पुलिस कि वर्दी मे पुलिस हि है !

काल चक्क सलग बसून 'लेडीज व्हर्सेस रिकी बहल' पाहिला. थीम जरा निराळी वाटली म्हणून बघायचा ठरवला. पूर्वार्ध चांगला होता तसा. मात्र उत्तरार्ध (अनुष्का शर्माचं मॉडेलिंग या पल्याड उत्तरार्धात फारसं काही नव्हतंच) आणि शेवट टिपिकल बॉलिवूडी करून सिनेमाची अंतिमतः वाट लावली असं वाटलं.
परिणितीचं काम आवडलं. रणवीर सिंग अजिबात आवडत नाही.

मला रणवीर सिंगपण आवडला. Happy

परिणीती प्रचंड आव्डली होती. अनुष्का शर्मा तेवहा बरी दिसायची. आता बॅटमॅनमधल्या जोकरसारखी भ्याण हसते.

Pages