Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31
होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.
विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रताळी कुठली इतकी इन्फर्मेशन
रताळी कुठली इतकी इन्फर्मेशन घ्यून काय लोणचं घालणारे? राग>>> हाहाहा मस्तच दक्षिणा ताई खूप दिवसांनी हा शब्द ऐकला. आमच्या घरातील पेटंट शब्द होता हा. रताळी
घरच्या सगळ्याच सासवा रताळ्या
घरच्या सगळ्याच सासवा रताळ्या आहेत. बेबी आत्या नंबर १ रताळी
आई आज्जींच म्हणजे मला बघा अन
आई आज्जींच म्हणजे मला बघा अन फुले वहा.
गुरुवार दि. १७ एप्रिल २०१४ :
गुरुवार दि. १७ एप्रिल २०१४ : अपडेट्स
~ जान्हवी श्री ला सांगत आहे, "काकांच्या आयुष्यात कुठली स्त्री नाही. आपण सवत सवत म्हणून जिचे नाव घेत होतो ती दारू आहे हे तर आपण पाहिलेच. शिवाय मी छोट्या आईलाही साफ़ विचारले याबद्दल तेव्हा त्यानीही हे कबूल केले की त्या दारुलाच आपली सवत समजत होत्या." श्री हे समजून घेत नाही, "म्हणून काय काका म्हणजे चांगला माणूस झाला नाही. तो या शहरातून गेला पाहिजे हे सत्य. तो गेला तरच या घरात शांतीने सारे काम चालेल." जान्हवीला काका आणि छोटी आई यांची ताटातूट बघायची नाही. श्री बधत नाही आणि जान्हवी आपला मुद्दा सोडत नाही. या दोघांचा वाद भांडणाच्या पातळीवर येऊन पोचतो आणि त्यांचे हे संभाषण नेहमीच्या चोरून सारे ऐकण्याचा सवयीची शिकार असलेली इंदुबाई ऐकते आणि दुसर्या दिवशी आईआजी व बेबी एकत्र बोलत बसल्या असता त्याना नेहमीचा मसाला वापरून सांगतेच. नित्याच्या सवयीनुसार आईआजीही ती जे काही बोलते याची शहानिशा न करता लक्ष्मीकांतमुळे आपल्या घरात आता पुन्हा नव्या पतीपत्नीत फूट पडत जाणार हे मानतात.
दुसर्या दिवशी जान्हवी बॅन्केत आल्यावर लक्ष्मीकांतला फोन करते, त्याच्या प्रकृतीची चौकशी करते. जान्हवीचा आपुलकीचा आवाज ऐकून काकालाही आनंद होतो. जान्हवी म्हणते, "काका, मला तुम्हा भेटायचे आहे. काही बोलायचे आहे. मी सायंकाळी घरी येते..." लक्ष्मीकांत काहीसा गोंधळतो परंतु तरीही त्याला बरे वाटते. ही सून आपल्या संसाराला दिशा देणारी शाबीत होईल असे त्याला वाटत असते. सायंकाळी जान्हवी त्याच्याकडे येते. दोघे बोलत बसतात. लक्ष्मीकांत श्री कडून आलेल्या प्रस्तावाबाबत बोलतो आणि मी नोकरीबाबत होकार देणार असेही म्हणतो. जान्हवी त्याला विचारते, "इतके चांगले विचार तुम्ही करता मग तुम्ही छोट्या आईला कमी का लेखता ?" लक्ष्मीकांत ठासून उत्तरतो, "नाही, जान्हवी...शरा माझ्यासाठी सर्वस्व आहे. ती महत्त्वाची व्यक्ती आहे." जान्हवी शांतपणे त्याच्याकडे पाहात विचारते, "असे तुम्ही बोलता मग तुमच्या आयुष्यात जर छोटी आई सर्व आहे तरीही तिच्यापेक्षा तुम्हाला दारूही कशी महत्त्वाची वाटते ?" लक्ष्मीकांत एक शब्दही न बोलता गप्प बसतो.
उद्याच्या भागात तो सांगत आहे जान्हवीला...."मी श्री ने दिलेली नोकरीची ऑफर स्वीकारली आहे जान्हवी."
मामा आज थोडक्यात? जाऊदे तसं
मामा आज थोडक्यात? जाऊदे तसं पण काही विशेष घडतंच नसेलना मालिकेत.
बरं, तेजश्री प्रधान अका
बरं, तेजश्री प्रधान अका जान्हवी गुटगुटीत झालीय. त्यामुळे बरी नाही दिसत हो हल्ली. आणि कशाला ते हातभर ब्लॉउज घालायचे? शोभायला हवे ना?
तिचे डोळे एकदम बटबटीत वाटतात काही काही अँगलने.
(हं, आता या जान्हवीच्या चाहत्यांनो.. करा सुरुवात)
एकाच प्रिंटच्या पण वेगवेगळ्या
एकाच प्रिंटच्या पण वेगवेगळ्या रंगाच्या ३ साड्या नेसते ती गोगॄऊ ची मालकीण जान्हवी. एक पिवळी, लाल आणि काळी....
ती इशाची आई पण एक सोनेरी, एक हिरवी आणि एक काळी साडी नेसते..प्रिंट एकच्..रंग वेगळे
ही काय भानगड आहे आणि सिरिअलवालोंना हे कसे उमगत नाही, कळेना....
मामा, काल श्रीने समस्त
मामा, काल श्रीने समस्त भारतीयांच्या वतीने मांडलेले उच्च विचार लिहायला विसरलात का
झंपी...झंपे...झंपुडे...लव्ह
झंपी...झंपे...झंपुडे...लव्ह यु गं....रुलायेगी क्या अब?????
मला जान्हवीच रत्ताळी
मला जान्हवीच रत्ताळी दिसतेय...
रिअल लग्न झाल्यावर लांब
रिअल लग्न झाल्यावर लांब बाह्यांचे ब्लाऊज घालतात का? टीआरपी घसरत असावा त्यामुळे शिरेलवाल्यांकडे कपडे देण्यास पैसे नाहीत आता....
१. अन्जू..... कालच्या भागात
१. अन्जू..... कालच्या भागात लक्ष्मीकांत आणि शरयू यांची श्री घडवून आणत असलेली ताटातूट हाच एकमेव विषय होता....ज्या निर्णयाला जान्हवी विरोध करीत आहे.
२. नताशा..... "...भारतीयांच्या वतीने मांडलेले उच्च विचार....". मी समजलो नाही तुला नेमका कोणता मुद्दा म्हणायचा आहे ते.
झंपी...झंपे...झंपुडे...लव्ह
झंपी...झंपे...झंपुडे...लव्ह यु गं....रुलायेगी क्या अब????? >> अनु

मामा, RG आणि श्री ह्यांच्यात
मामा, RG आणि श्री ह्यांच्यात घराचे भाडे आणि इतर formalities बद्दल बोलणे चालले असताना श्री त्यांना काहीच माहीती देत नाही. नेहमीप्रमाणे मालीका वाढवण्यासाठी खोटी आणि अर्धवट माहीती देतो. त्यावेळी RG भारतीयांच्या व्यवहारांबद्दल टोमणे मारतात. तेव्हा श्री म्हणतो की आम्ही भारतीय व्यवहार, पैसे यांपेक्षा समोरच्या माणसावर जास्त विश्वास ठेवतो. असे बरेच काही.
पण एकूणच मराठी सिरियल्सचा
पण एकूणच मराठी सिरियल्सचा कपडेपट निराशाजनकच असतो. एकटी जान्हवीच का, सगळ्या सासवांच्या साड्या, सर्व पुरुषांचे कपडे तेच ते आहेत. त्यांना बहुधा स्वत:चे कपडे स्वत: आणायला लागतात का माहित नाही. आणि केवळ याच सिरियलमध्ये नाही, तर सर्वच मराठी सिरियल्समध्ये हेच दृश्य असतं.
सर्वात भयाण कपडेपट मराठी सारेगपमच्या आत्ताच्या सीझनचा होता. अभिजितचे कोट, टीशर्ट, स्पर्धकांचे कपडे, अवधूतचे कपडे सगळेच अरारा प्रकारातले होते. असो.
हिंदीत काय सीन असतो? कपडे स्पॊन्सर्ड असतात की आपापले आणतात?
कायकी बुव्वा! मला तर वाटायचे
कायकी बुव्वा! मला तर वाटायचे ड्रेपरी विभाग असतो, कपडे मिळतात ते तिथेच ठेवून यायचे काम झाले की, घरी आणायचे नाही, इथे तर घरी सुद्धा हे लोक चांगले कपडे घालत असतील...
इथे तर घरी सुद्धा हे लोक
इथे तर घरी सुद्धा हे लोक चांगले कपडे घालत असतील...
विनिता, मोदक गं तुला माझ्याकडुन. असले कपडे मी घरीही घालत नाही.
पोर्णिमा, स्वतःचे कपडे नाही
पोर्णिमा, स्वतःचे कपडे नाही आणायला लागत, निर्मातेच देतात.
बरेच महिने अगोदर जान्हवीच्या
बरेच महिने अगोदर जान्हवीच्या अंगावरचा ड्रेस कोणत्या तरी हिंदी मालिकेत ही दिसला होता. तसे ते दोन्ही फोटो बहुतेक पहिल्या भागात आहेत होसुमीयाघ च्या.
जान्हवी पोक काढून बसतेय, इतकी घाण दिसते. शी..
खास करून श्री समोर पोक काढूनच
खास करून श्री समोर पोक काढूनच उभी राहते. त्याची उंची बहुतेक तिच्यासमोर कमी आहे.
शुक्रवार दि. १८ एप्रिल २०१४ :
शुक्रवार दि. १८ एप्रिल २०१४ : अपडेट्स
~ शरयू आणि श्री तर दुसरीकडे जान्हवी व लक्ष्मीकांत अशी दोन जोड्या सांगत आहेत एकमेकाला आपल्या मनातील काही निर्णय. श्री पटवून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे छोट्या आईला की तिच्या नवर्याला तिने विसरून जायला हवे कायमचे म्हणजेच तो दुसरीकडे नोकरी करायला लागेल आणि त्याची सारी व्यसने सुटली जातील व तो सुखी राहू शकेल. शरयूला आपल्या नवर्याने तिला सोडून दुसरीकडे कायमचे जाणे ही कल्पना पचनी पडणे कठीण आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर किती आणि कसे प्रेम करते ते श्री ला सांगत आहे. नवरा असा व्यसनी कधीच नव्हता तर तो परिस्थितीमुळे तसा झाला आहे. मग ही परिस्थिती निर्माण होण्याचे कारण काय होते ? श्री च्या या प्रश्नावर रडतरडत का होईना पण शरयू आपला धीर एकवटते आणि सांगते "श्री मला बाळ होणार होते...." श्री ला हा धक्काच असतो कारण त्याला अशी काही सबब असेल यावर विश्वासच बसत नाही. तो आपल्या छोट्या आईला खोदूनखोदून प्रश्न विचारतो आणि माहिती काढतो तिच्याकडून. शरयू सांगतेही सारे. लक्ष्मीकांतला त्याच्या वर्तनाबद्दल आईने घराबाहेर जरी काढलेले असले तरी पत्नी म्हणून ही त्याच्यावर प्रेम करीत असतेच. ज्या ठिकाणी आता लक्ष्मीकांतने घर घेतलेले आहे तिथे शरयू बाजाराच्या निमित्ताने गोकुळमधून बाहेर पडते व त्याला भेटत असते. या संबंधात ती गरोदर राहते. दोघानाही साहजिकच खूप आनंद होतो. आपल्या गर्भावस्थेची बातमी घरी कुणाला कळू नये यासाठी शरयू काळजी घेत असते. पण लहानग्या श्री वर तिची खूप माया असल्याने त्याला काही कळत नसले तरी हळूच त्याला जवळ घेऊन ती "तुझ्यासाठी मी एक लहान बाळ आणणार आहे..." असे गुपीत सांगत असते. तो छोटा श्री आनंदाने तिला म्हणतही असतो "पण छोटी आई मला लहान बहीण हवी...". त्याची ही लाडिक मागणी ती लक्ष्मीकांतलाही सांगते. त्यालाही आनंद होतो. आता त्याला पटते की आपण घरापासून दूर राहून चूक करीत आहोत आणि आत्ताच्याआत्ता आईकडे जाऊन तिचे पाय धरून क्षमा मागावी आणि मला घरी घे....शरयू गरोदर आहे...तिला होणार्या मुलीला आशीर्वाद दे आणि तुझ्या पंखाखाली ती मोठी होऊ दे....अशी प्रार्थना करणार असे तो शरयूला सांगतो. पण आपल्या या अवस्थेबद्दल आपण सासूपासून सारे काही लपवले आणि आता त्याना कसे उत्तर देवू, कसे तोंड दाखवू या विचाराने वेडीपिशी होऊन ती जमिनीवर कोसळते व त्यातच तिचा गर्भपात होतो. हा धक्का दोघानांही जबरदस्त असतो. शरयू तर कोलमडून पडतेच पण लक्ष्मीकांत पुन्हा दारूच्या आहारी जातो आणि त्यात आणखीनच गुरफटत जातो. कुणाचे चूक वा कुणाचे बरोबर याबद्दल आता वाद नसतोच, परिस्थिती अशी आलेली आहे दोघांच्यापुढे की इथून पुढे दोघांनी संसार करायचा एकत्रित वा स्वतंत्रपणे. लक्ष्मीकांत जान्हवीला स्पष्ट सांगतो, "मी जीवनात अपयशी ठरलो आहे. आता माझी सावली इथे नकोच. श्री ने दिलेली नोकरीची ऑफर मी स्वीकारणार आणि जाणार इथून मी निघून. शरयूची काळजी घ्यायला तुम्ही सारे समर्थ आहात. ती नक्की इथे तुमच्यासमवेत सुखी राहील."
आजचे कथानक लक्ष्मीकांत जान्हवीला सांगत आहे तर शरयू श्री ला....दोघे केवळ ऐकत राहिले आहेत. कारण या दोघांच्या दृष्टीने यातील कित्येक माहिती नवीनच आहे. श्री आणि जान्हवी आता आईआजी समोर उभे आहेत आणि लक्ष्मीकांत हाच विषय त्यांच्या बोलण्यात आला आहे.
आजचा भाग खूपच चागला वाटला.
आजचा भाग खूपच चागला वाटला. लीना भागवत आणि प्रसाद ओक चा अभिनय अप्रतिम
मामा गुड अपडेट्स पण काकाच्या
मामा गुड अपडेट्स पण काकाच्या दारू पिण्याचं शरयूने केललं समर्थन पटत नाही, कितीतरी वेळा आपण बघतो ज्यांना व्यसनं करायची आहेत त्यांना कारणे काहीही पुरतात, शरयूवर नाही का आघात झाला मग तिने केलं का कुठलं व्यसन?
दारु पिण्याचे समर्थनं कधी ही
दारु पिण्याचे समर्थनं कधी ही पटण्यासारखे नसतातच
अन्जू आणि अदिति.... पत्नीने
अन्जू आणि अदिति....
पत्नीने आपल्या पतीवर जीवापाड प्रेम करावे हे मालिकेत दाखविणे कितीही योग्य असले तरी एकीकडे दारूला सवत समजायचे आणि तिचा उपभोग नित्यनेमाने हाच सत्यवान घेत असेल तर आजच्या सावित्रीने त्याला ठोकरून दिले पाहिजे असे दृष्य दाखविले असते तर दिग्दर्शकाचे स्त्री वर्गाकडूनच कौतुक झाले असते. इथे मात्र नेमके उलटे. आता हीच बया जर नवर्याच्या तर्र होऊन हिला मारण्याचे समर्थन करत असेल तर प्रेक्षक हताश होणारच.
शिवाय लक्ष्मीकांत दुसरीकडे आपल्या सूनेसमोर दारू पिण्याचे जे वर्णन करतो तेही पाहावत नव्हते.
बाकी वर सुजा ने अभिनयाच्या संदर्भात लीना आणि प्रसाद यांचे जे कौतुक केले आहे त्याला अनुमोदन देताना असेही म्हणेन की लीना भागवत सर्व स्त्री पात्रांमधील अभिनयाच्या बाजूने फार उच्च दर्जाची अभिनेत्री सिद्ध झाली आहे. कालचा अपत्यासंदर्भातील दोघांचाही अभिनय उत्कृष्ट असाच होता.
ली.भाचा आणि प्रसाद ओक या
ली.भाचा आणि प्रसाद ओक या दोघांचाही कालचा अभिनय इतका अस्सल होता की क्षणभर माझा गळा दाटुन आला होता.
ली.भाचा आणि प्रसाद ओक या
ली.भाचा आणि प्रसाद ओक या दोघांचाही कालचा अभिनय इतका अस्सल होता की क्षणभर माझा गळा दाटुन आला होता.>>++११
मी म्हटले भाचा कुठून आला?
मी म्हटले भाचा कुठून आला?:D
पुवि
पुवि
शनिवार दि. १९ एप्रिल २०१४ :
शनिवार दि. १९ एप्रिल २०१४ : अपडेट्स
~ ह्या भागात श्री आणि जान्हवी कालच्या लक्ष्मीकांत शरयू यांच्या बाळाच्या विषयात गुंतले आहेत आणि जे प्रखर आणि दुर्दैवी सत्य समोर आले व शरयू अशाही स्थितीत आपल्याला काहीही माहिती न होऊ देता अत्यंत कठीण असे आयुष्य कंठीत आहे हे पाहून दु:खी झाले आहेत. दोघानींही आता प्राप्त परिस्थितीतून चांगले काय करता येईल याबाबत आईआजीना भेटून सारे काही सांगायचे असा निर्णय घेतला आहे.
शरयू गोकुळवरून नवर्याला फोन लावून श्री व जान्हवी यांच्याच संदर्भात बोलते. लक्ष्मीकांतला आपली अकाली गेलेली मुलगी म्हणजे जान्हवी असेच वाटते. दोघांनी आपल्याला समजून घेतले असल्याने आता मी श्री च्या सल्ल्याचा मान ठेवून मुंबईबाहेर नोकरी स्वीकारणार असे तो शरयूला सांगतो. सुरुवातीला शरयूला आपला नवरा आता नोकरी करण्याचा विचार करत आहे ह्या बातमीने आनंदित होते; पण पुढल्याच वाक्यात तो म्हणतो की नोकरीसाठी मुंबई सोडावी लागेल त्यावेळी शरयू कासाविस होते. तुम्ही बाहेर राहू शकत नाही, मी तुमच्यासोबत येते असे म्हणू लागते. पण लक्ष्मीकांत तिला समजावून सांगतो की जान्हवी तुझी मुलगी आहे असे समज आणि त्या सर्वांच्यासमवेत आनंदाने राहा. शरयू नवर्याचे ऐकायला तयार नाही. ती म्हणते फोनवर आता बोलत नाही, मीच तुमच्याकडे येते आणि आपण सविस्तर बोलू.
श्री आणि जान्हवी आईआजीच्या रुममध्ये येतात. तिथे इंदूबाईचा इंग्रजीचा क्लास चालू आहे. ती तिथून निघून जाईपर्यंत दोघे गप्प उभे राहतात. आईआजीना सुरुवातीला कळत नाही की या दोघांच्य मनात कसले विचार चालू आहेत. त्या दोनतीन वेळा तोच प्रश्न विचारतात. मग श्री "मी लक्ष्मीकांतकाकांच्यासंदर्भात बोलायला आलोय..." एवढे वाक्य उच्चारताक्षणीच आईआजी संतापतात. या घरात त्याचे नाव घ्यायचे नाही असे ठरले असताना परतपरत तुम्ही दोघे तो विषय का इथे आणता आहात ? असे काय झाले आहे तुम्हाला ? श्री गप्प राहतो तर जान्हवी आपल्याला काहीतरी सांगायचे आहे असा चेहरा करून उभी राहते पण तिचेही धाडस होत नाही. शेवटी श्री धीर एकवटून आईआजीला आपण समजतो तशी परिस्थिती नाही असे सांगतो. तरीही आईआजी "ज्या मुलाने दुसरे लग्न केले आहे त्याला परत इथे आणण्याची कल्पना तुम्हाला सुचली तरी कशी ?" हाच धोशा लावतात. जान्हवी समजते की आईआजींच्या मनातील हा गैरसमज लागलीच दूर करणे जितके आवश्यक तितकेच त्या बाळाविषयीसुद्धा सांगायला हवे.
सोमवारच्या भागात श्री आणि जान्हवी दोघांनीही लक्ष्मीकांत शरयूच्या बाळाबाबतीत आईआजींना सांगितले आहे. आईआजीना खूप धक्का बसलेला आहे.
Pages