होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थॅन्क्स अन्जू....

मला अद्यापि आशा आहे मालिकेचा दर्जा सुधारेल याबाबत. पाहू या....आजीला लक्ष्मीकांत आणि शरयूबाबत माहीत नसलेली धक्कादायक बातमी समजली आहे....आणि कदाचित त्याना वाटेल की या दोघांना घरी ठेवावे किंवा श्री म्हणतो तसे याना मुंबईबाहेर नोकरीसाठी पाठवावे...जोडीने....तर किमान एक कुटुंब मार्गी लागेल अशी स्थिती होऊ शकते....त्यानंतर बेबीचा नंबर येईल.

होग पुण्याचीविनिता . अर्थात इतके वर्ष वेबीला काही बीबी केलेलं नाहीये त्यामुळे आत्ता कितपत दाखवतील माहित नाही. पण काकाच प्रकरण/ आरजी च प्रकरण मार्गी लागेपर्यंत भरपूर मालिका लांबवायला स्कोप आहे. मग बेबी च प्रकरण हातात घेतील. मध्ये ती सरू मावशी आहेच .अजून तीच लग्न कुठे झालाय ?

ती मधली काकू भोचक पणे श्री च आणि जानव्हीच बोलण ऐकतच आहे .तिची सवय जातेय कुठे . रताळी कुठली Happy

दक्षिचा 'रताळी' शब्द हिट आणि फिट झालाय अगदी इथे ह्या धाग्यावर. मालिकेतल्या बऱ्याच स्त्रियांना विशेषण द्यायला.

माझा डोक्यात ती ईंदु जबरदस्त जाते....तीच बरयं...खुपदा तीचा रोलच नसतो...डायलॉग पाठ करायची भानगड नाही..समोरचा जे बोलेल तेच रिपीट करायचं...वर पैसे पण मिळणार..... मस्त ना?? मी पण अशी भुमिका उत्तम रित्या वठवु शकेन/..... Rofl

सोमवार दि. २१ एप्रिल २०१४ : अपडेट्स

~ निव्वळ रडारडीने ओथंबून गेलेल्या आजच्या भागाचे वर्णन करायचे झाल्यास असेही सांगता येईल की खुद्द दिग्दर्शकालाही कथानक २० मिनिटांचे करता येत नव्हते हे दिसत होते; म्हणून प्रत्येक ब्रेकनंतर परत मागील भागातील दोन मिनिटांचा संवाद दाखविण्याचा कंटाळवाणा प्रकार दिसून आला.

आईआजी श्री व जान्हवीला लक्ष्मीकांतबद्दल तेच तेच बोलणे ऐकवीत आहे तर श्री "अगं आईआजी...तू शांत हो, आम्ही तुला दुसरे काही तरी सांगायला आलो आहे...एका कोवळ्या जीवाबद्दल..." हे कोवळ्या जीवाचे कोडे आईआजीला अर्थातच समजत नाही. श्री जान्हवी मिळून शरयूच्या गेलेल्या बाळाविषयी आईआजीला सांगतात. ती बातमी ऐकून त्या कोलमडूनच पडतात. रडतातही आणि आपण ना मुलाला ओळखले ना सूनेला ही भावना त्याना त्रस्त करते. श्री आणि जान्हवीला तिथून आपल्या खोलीत जाण्याविषयी त्या सूचना करतात कारण आता त्याना एकटेच आपल्या खोलीत पडायचे आहे.

आयुष्यभर चोरून ऐकण्याच्या सवयीनुसार बेबीआत्या या तिघांचा संवाद ऐकते व त्यातील अक्षरनअक्षर खाली येऊन अन्य तिघींना सांगते....मग त्या चौघींचा सामुदायिक रडण्याचा कार्यक्रम. रडतच मग त्या शरयूच्या खोलीत जातात. ती तिथे पुस्तक वाचत बसली आहे. तिला कवेत घेऊन या तिच्यावर कोसळलेल्या संकटाच्या संदर्भात परत रडू लागतात.

दुसरा दिवस....आईआजी, श्री आणि जान्हवी असे तिघेजण लक्ष्मीकांतच्या घरी आले आहेत.

मुग्धे, गाडी पुढे हलली तरी लगेच रेड सिग्नल येऊ शकतो.

मामा तुम्ही पहिल्या paraमध्ये योग्य वर्णन केलेय. चला ही मालिका बघायचे कित्येक महिन्यापूर्वी सोडले बरं झालं.

<<श्री, जान्हवी आणि आजी त्याच्या घरी जाणार आहेत>>>. आणि काकाला कदाचित घरी घेऊन येणार Happy

अनिश्का, काका नाही घरी येणार. श्री, जान्हवी आणि आजी त्याच्या घरी जाणार आहेत>>> हे आजच्या भागात होणारे आणि अनिश्का म्हणते ते उद्याच्या (बुधवार) भागात होणार... झायरातीत तारीख, वार, वेळ सगळ दाखवतात

काल काका परत आल्याची झाईरात बघुन नवरा म्हणाला चला म्हणजे ही मालिका संपणार तर... तर मी त्याला अजुन काय काय शिल्लक आहे याची यादी दिली. ऐकुन झीट आली बिचार्‍याला.

मग मी तसच लिहिलेलं....२३ उद्याच आहे ना??>>> हो ग राणो, मी नताशा हीच्या पोस्टीला मी उत्तर दिलय ते...

मंगळवार दि. २२ एप्रिल २०१४ : अपडेट्स

~ रडणे भाग-२ सुरू आहेच अगदी पहिल्या संवादापासून. श्री व जान्हवी दोघे बोलताना तोच मुद्दा आणि मध्येच श्री म्हणतो, "तू थांब इथेच मी आईआजीकडे जावून बसतो..." त्याला जान्हवी अर्थातच तयार होत नाही. ती म्हणते, "मग मी देखील येते त्यांच्याकडेच..." असा दोघांचा संवाद चालू आहे तो पर्यंत आजीच दार वाजवून त्यांच्या खोलीत येतात. कॉटवर बसून आपण जे केले ते बरोबर शाबीत झाले नाही अशा धर्तीचा संवाद या नवराबायकोला ऐकवितात आणि "आता आपण शरयूच्या खोलीत जाऊ या..." असे जाहीर करतात. श्री आईआजीला म्हणतो, "तू कशाला, मीच छोट्या आईला इथे घेऊन येतो..." पण प्रकरणात स्वतःला दोषी मानणार्‍या आईआजीला ते पसंत पडत नाही. आपणच तिच्याकडे जाऊ या असे म्हणत तिघेही शरयूच्या खोलीत येतात.

तिथे ती पुस्तक वाचत पडली आहे. सुरुवातीला जान्हवी व श्री याना खोलीत आलाचे विशेष आश्चर्य वाटत नाही तिला पण पाठोपाठा आईआजीही तिथे आल्यावर तिघानींही काहीतरी ठरवून इकडे आलेली आहेत इतके ती ओळखते. आजी शरयूला जवळ घेऊन "मला माफ कर, शरयू..." अशी विनंती करतात...त्यावेळी मात्र शरयू कोलमडते. ती समजून चुकते की बाळाच्या संदर्भात आईआजीना सारे समजले आहे कारण श्री "मी सांगितले आहे आईआजीला सारे, छोटी आई..." शरयूचा अश्रूंचा बांध फुटतो आणि सासूच्या गळ्यात पडून ती रडते....रडताना आपल्या नवर्‍याचे गुण ती गात आहे. आजी नंतर श्री आणि जान्हवीला घेऊन लक्ष्मीकांत ज्या ठिकाणी राहिला आहे तिकडे निघते.

लक्ष्मीकांत शहर सोडून जाण्याच्या तयारीत आहे. बॅग बांधून तयार आहे. त्याचवेळी तो आजारी पडल्यावर त्याला दवाखान्यात पोच करणारे त्याचे शेजारी तिथे येतात. त्याना पाहून लक्ष्मीकांत आनंदित होतो आणि कृतज्ञतेने त्याच्यासाठी कूकीजचा एक डबा भेटवस्तू म्हणून देतो. ते गृहस्थही लक्ष्मीकांत चाळ सोडून चालले आहेत हे समजल्यावर दु:खी होतात; पण "तुमची आठवण माझ्या मनी कायम राहावी यासाठी निरोपासाठी म्हणून गाण्याच्या दोन ओळी तुम्ही म्हणाव्यात अशी माझी तुम्हाला विनंती आहे..." असे आग्रहाने सांगतात. लक्ष्मीकांत फारसे आढेवेढे न घेता..."या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..." हे गाणे म्हणतो. शेजारी तल्लीनतेने ऐकत आहे....गाणे चालू असतानाच आईआजी, श्री व जान्हवी तिथे येतात. लक्ष्मीकांतला शेवटी आई आपल्या घरी आली आणि तिने आपल्याला माफ केले आहे ही भावना जास्त मोलाची वाटते. तो आईच्या पाया पडतो. ती दोघे वा त्यांच्याकडे पाहाणारे श्री आणि जान्हवी दोघेही काही बोलत नाहीत थोडा वेळ. मग लक्ष्मीकांत निर्वाणी बोलतो, "माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे जे होते ते झाले आहे. आता मी जातो इथून कायमचा..." ते ऐकून आजी मनी काहीतरी निर्णय घेतात.

त्याला कारमधून "गोकुळ" बंगल्यावर आणले जाते. दारात त्याच्यावर आरती ओवाळून शरयू त्याचे स्वागत करीत आहे. नर्मदाबाई आणि बेबीआत्या आनंदाने तो सोहळा पाहात उभ्या आहेत.

@अदिती, आईआज्जीची पणजीआज्जी होणार ना. << हो गं. पण पणजी आज्जी नाही आई पणजी. "आई" की वर्ड आहे इथे :)) रताळी Lol

मामा नेहमी प्रमाणे मस्त अपडेट्स डिटेल मधे..

चला जान्हवी ने एक संसार मार्गी लावला शेवटी :))

मामा गुड अपडेट्स. अखेर लक्ष्मीकांतला घरी आणायचा मुहूर्त सापडला. आता श्रीचे बाबा यायला किती महिने लावतायत?

<तिथे ती पुस्तक वाचत पडली आहे>

आमच्या टीव्हीत ती पलंगावर बसून डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वाचताना दाखवली. बाकी चालूद्या.

<चला जान्हवी ने एक संसार मार्गी लावला शेवटी स्मित)>

जान्हवीने यात काही केलेले दिसले नाही.

Pages