निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@सावली,
हायड्रेंजिया फुलाचा रंग मातीतल्या pH (मराठी शब्द ?) घटकावर अवलंबून असतो.
माती आम्लधर्मी (५.२ पेक्षा कमी pH) असेल तर झाडाला निळी - जांभळी फुले येतात
माती अल्कधर्मी ( ५.५ ते ६ pH) असेल तर झाडाला गुलाबी फुले येतात
खतांचा वापर करून मातीतला pH घटक नियंत्रित करता येतो आणि फुलांचा रंग बदलता येतो.
पांढऱ्या हायड्रेंजियावर मात्र pH घटकाचा परिणाम होत नाही. माझ्याकडे असलेल्या पांढऱ्या हायड्रेंजियाचे फोटो पुन्हा केव्हा तरी...
झाडाच्या जून फांदया रोवून नवी रोपे तयार करता येतात. जागूतैवर आॅर्ड् रींंचा मारा होणार आता Happy

जागू,
कृ.क. आणि हायड्रेंजिया एकदम झकास!
शशांक,
नर कोकिळ काळाभोर असतो हे वाचून तस्सल्ली मिळाली.२ वर्षांपूर्वी अगदी जवळून कोकिळ पाहिलेला.लालभडक डोळ्यांसकटच.पण नंतर आई म्हणाली की कोकिळेच्या अंगावर ठिपके असतात.तर ह्याच्या अंगावर नव्हते.आईच्या अंगणातल्या झाडांवर बरेच पक्षी येतात.त्यामुळेही तिचं खरं वाटलं आणि मा.बो.ची त्यावेळी सभासद नव्हते त्यामुळे विचारता आले नाही. आज बरं वाटलं. धन्यवाद!

वर्षू, शेवटी उर्वशी दिसलीच ना तूम्हाला. म्यानमार मधे जो किटक याचे परागीभवन करतो तो भारतात नाही, त्यामूळे भारतात याची रोपे तयार करणे कठीण जाते. तरी राणीच्या बागेत तीन रोपे तयार केली आहेत आणि आता त्यांना फुलेही लागतात. आणखी महीन्याभराने गेलात तर शेंगाही लागलेल्या असतील.

त्याचवेळी इतर झाडेही बहरलेली असतील.

जागू, या फळांचा रंग करून मामीच्या लेकीचा हात रंगवला होता मी. नायजेरीयातही हा वेल असतो. तिथे तो वॉटर लिफ किंवा इंडीयन स्पिनॅच म्हणून विकतात.
तू कधी याची कृती टाकली नाहीस ती ? कारवारी पद्धतीची आमटी व त्यात फणसाचा बिया आणि तिरफळं टाकून मस्त होते. मायाळूच ही. हिरव्या देठाची जास्त करून असते. त्याची पाने जाड असतात.

आज महाशिवरात्र - त्यानिमित्त बेल या वृक्षाची काही वैशिष्ट्ये देत आहे.
शास्त्रीय नाव - Aegle marmelos , फॅमिली/ कूळ : Rutaceae
इतर नावे - बेल, Bengal quince, golden apple, stone apple, wood apple, bili, त्रिपत्र, शिवद्रुम, बिल्ववृक्ष.
ज्या वृक्षाचे आपल्याला (मानवाला) खूपच फायदे आहेत त्याचे निसर्गात चांगले संरक्षण व्हावे म्हणून त्याला काही धार्मिक गोष्टी (ठराविक देवतांद्वारा) जोडलेल्या असाव्यात. (वै. मत) Happy
खालील माहिती - ( http://www.stylecraze.com/articles/amazing-benefits-of-bael/ ) या लिंकद्वारा -

1. Can cure diarrhoea, cholera, haemorrhoids, vitiligo:
2. Reduces gastric ulcer:
3. Antimicrobial property:
4. Can cure scurvy:
5. Can control cholesterol:
6. Can solve respiratory problems:
8. Can be used to treat heart diseases:
9. Can prevent constipation:
10. Can control diabetes:

Caution :
1. Too much bael consumption can cause stomach upsets and constipation
2. Bael can be harmful for pregnant women. Avoid bael during pregnancy.

वरील माहिती ही सर्वसाधारण माहिती म्हणूनच ध्यानात घ्यावी - याचा प्रत्यक्ष इलाज करावयाचा झाल्यास कोणा जाणकार वैद्याशिवाय करु नये ही विनंती. (सध्या मा बो. वर डॉ. सुरेश शिंदे यांचे अतिशय उद्बोधक लेख गाजत आहेत - त्यातही अशाच प्रकारे सावध केलेले आढळेल).

दिनेशदा, खूप सुंदर माहिती सांगता तुम्ही नेहमी. सितेची आसवं, रंजन हे पाहिले नाही. एकदा चित्रातून दाखवा प्लीज.

हेमा, सुरेख फोटो.

जिप्सी | 1 September, 2013 - 12:26
"सीतेची आसवं". नाव जरी करूण असलं तरी हि फुलं पक्की बदमाष आहेत. वाहत्या पाण्याबरोबर येणार्‍या किटकांचे शोषण करणारी.

सितेची आसवं खालील लिंकवर आहेत.
प्रचि १५

http://www.maayboli.com/node/29201?page=1

साधना, मी कोडे नाही घातले. मीच कोड्यात पडले. पण लगेच उत्तर मिळाले "जांभळा मायाळू" ! माझे आधीच्या पानावरचे पोस्ट संपादीत करून तिथेच नाव लिहिले आहे.

काल रात्री ११.४०, कांदीवली, मुंबई :
अचानक कावळा ओरडण्याचा आवाज आला. २-३ मिनिटे झाली तरी थांबेचना. कुतुहल वाटले, ईतक्या रात्री कावळा का ओरडतो? मग गॅलरीत जाउन बघीतले, एक नाही ३ कावळे घिरट्या घालत ओरडत होते. अंगणात थोडी हालचाल जाणवली. फ्लॉवर-बेड्च्या जागेत बोकयाने एका कावळ्यावर हल्ला केला होता. बाकीचे कावळे घिरट्या घालत ओरडत होते. शिकार झालेला कावळा बोक्याच्या तावडीतून सुटून गाडी खाली गेला. मग लपत छ्पत बाहेर आला, फ्लॉवर-बेड्मधे जिथे झाडे-झुडुप आहे तिथे जाऊन त्यावर खुरडत चढून पलिकडच्या आवारात गेला. बोका थोडावेळ थांबला मग तोही पलिकडच्या आवारात गेला. २०-२५ मिनिटांनी सर्व शांत झाले. बहुदा बोक्याने भोजन केले असावे.

आज महाशिवरात्र बेलाच्या झाडाची माहिती वाचली. हो फोटो बेलाच्या झाडाचा. बेलफळं पण लटकली आहेत. शंकराला बेल प्रिय आहेच पण आमच्याकडे कोकणात महा शिवरात्रीला महादेवाला आंब्याचा मोहोर वहायची प्रथा आहे.

From mayboli

हे आहेत मोहोराचे फोटो. नुसता मोहोर बघितला तरी आम्हाला मोहोराचा गोड वास यायला लागतो आणि मनाने गावाला जाउन पोचतो. प्रत्येक वासाशी आपल एक नात जडलेलं असत हेचं खरं
From mayboliFrom maybolihttps://picasaweb.google.com/lh/photo/

हेमा एकदम मस्तच ग... या दिवसांत रस्त्याने फिरताना वातावरणात गच्च भरलेला वेगवेगळ्या मोहोराचा वास जाणवतो. मुंबईत कदाचित जाणवणार नाही पण जरा पनवेलच्या पुढे गेले की जाणवायला लागतो. तसा आमच्या नव्या मुंबईत पण काही रस्त्यांवर जाणवतो Happy

बेलफळं तर सुंदर.. मी कित्ती दिवसांनी पाहिली झाडावर लटकलेली बेलफळं..

दिनेश, आंबोलीला हिरण्यकेशीला जाण्याच्या रस्त्यावर जिथे केवड्याचे बन आहे तिथेच बेलफळाचे एक झाड आहे. आठवत असेल बघा तुम्हाला.

रा रविवारी कामानिमित्त पुण्याला गेले होते. पुर्ण रस्त्यावर कित्तेक ठिकाणी पळस फुललेला. मला वाटते पांगारा यच्या नंतर फुलतो. कारण पांगारा दिसला नाही पण पळस मात्र भरपुर दिसला. नव्या/जुन्या मुंबईत मला पळस कुठेहि दिसलेला नाही आजवर. पांगारा मात्र भरपुर दिसतो. त्यामुळेच मला पांगारा आणि पळस यातला फरक कित्येक वर्षे कळतच नव्हता. मी पांगार्याचेच दुसरे नाव पळस आहे असे समजायचे.

पुणे शहरात चार पाच ठिकाणी जॅकरांडा दिसला.

एक्ष्प्रेसवे संपल्यावर जोशी वडेवाले वगैरे लाईन सुरू झाल्यावर एका ठिकाणि एक गुलाबी टॅबेबुया दिसला. काय झाड होते... पाय-यापाय-यासारख्या वर वर चढत जाणार्-या पुर्णपणे निष्पर्ण फांद्या आणि फांद्याना एकापुढे एक अक्षरक्ष: फेविकॉलने चिकटवल्यासारखी खुप तेजस्वी रंगाची गुलाबी फुले. स्ट्रॉबेरी आइसक्रिमच्या रंगाची.

फुले चिकटवताना देवाने एकही इंच जागा रिकामी सोडली नव्हती किंवा घिसाडघाई करुन फुले कशीही चिकटवलेलीही नव्हती. अगदी व्यवस्थित प्रत्येक फांदीच्या सुरवातीपासुन ते शेवटच्या टोकापर्यंत फुले लगडलेली. आणि ही फुले प्रत्येक फांदीवर. झाडाचे खोड सोडता एकही इंच जागा मोकळी नाही.. देव पण काय कलाकार आहे.... आहाहा...

मी जाताना पाहिले आणि येताना मुद्दाम लक्ष ठेऊन बाहेर बघत ते झाड पाहिले. सोबत कॅमेरा नव्हता याची प्रचंड हळहळ वाटली .. विसरले घेऊन जायला Sad आणि मोबाईलमध्ये आले नसते...

यावर्षी गुलाबी टॅबेबुया जरा जास्तच गुलाबी दिसतोय. बहुतेक दीर्घकाळ रेंगाळलेल्या थंडीचा परिणाम असावा. गेल्या वर्षीपर्यंतचा मी पाहिलेला गुलाबी टॅबेबुया खुप फिकट आणि मातकट असा गुलाबी रंगावर असायचा. त्यामुळे गुलाबी टॅबेबुया मला अजिबात आवडत नव्हता. पण यावर्षीचा गुलाबी रंग अगदी गुलाबी थंडीसारखा बहरलाय....

नुसता मोहोर बघितला तरी आम्हाला मोहोराचा गोड वास यायला लागतो आणि मनाने गावाला जाउन पोचतो. प्रत्येक वासाशी आपल एक नात जडलेलं असत हेचं खरं >>>> अगदी खरे. मोहोराचा वास पहिल्यांदा अनुभवला तेव्हा वयाची पस्तीशी पार केली होती. या वासाबरोबर लहानपणी घरी कुकरमधे शिजणार्‍या आंबेमोहोर तांदूळाच्या वासाची आठवण झाली होती.

त्या होड्या ना रुई/मांदार च्या असणारेत....ज्याच्यातून म्हातार्‍या बाहेर पडतात. एक अगदी केसांसारखा पुंजका असतो आणि त्याला खाली एक बी असते. या झुडपाची परागीवहन करण्याची ती स्ट्रॅटेजी आहे. Happy

वर्षूदी - तू वरती जे दोन फोटो टाकले आहेस - गुलाबी फुलांचे ते हेच आहे का कन्फर्म करशील का ?
cleome speciosa ( Showy Spider Flower)

या वासाबरोबर लहानपणी घरी कुकरमधे शिजणार्‍या आंबेमोहोर तांदूळाच्या वासाची आठवण झाली होती.>>> मधु मकरंद खरचं नाक बदलता आलेस असते तर तुम्हाला मागितले असते Happy मी कित्येकदा हा भात घरी करतो. कधीच आंबेमोहोराच्या वासासारखा त्याचा गंध आलेला नाही. माझ्यामते आंबेमोहोर भात हा मोहोराचा रवाळपणा आणि तांदळाचा आकार ह्या तुलणेवरुन आंबेमोहोर तांदूळ हे नाव पडले असावे.

शांकली रियाने सकाळी फोटो टाकलेला व्हॉट्सप वर. तो फोटो रुईचा नाहीय. शेफ्लेरा असावे. रिया होडीचा फोटो टाकणार आहे. Happy

शेफ्लेराची फुले खुप लहान असतात त्यामुळॅ रियाला ती दिसली नसावीत. आणि होडीच्या आत कापुस तयार व्हायच्या आधीच ती होडी तिच्या हातात आली, त्यामुळे तिला कापसाचय जागी लेअर्स दिसताहेत.

आता रियाने लवकर सगळे फोटो इथे टाकले की सगळ्यांचे शंका निरसन होईल.

वर्षूदी - तू वरती जे दोन फोटो टाकले आहेस - गुलाबी फुलांचे ते हेच आहे का कन्फर्म करशील का ?
cleome speciosa ( Showy Spider Flower)

हो हेच आहे. मी होतेना तिच्या शेजारी गळ्यात गळा घालुन, ती फोटो घेत असताना Happy

शाकंली तु रुईबद्दल लिहिलेस त्यावरुन आठवले. रुईला अगदी मस्त हिरव्या करंज्या लागतात. मला माहितच नव्हते. मी सहजच एकदा पाहिजे आणि रुईला हे काय लागले म्हणुन निरिक्षण केले तेव्हा लक्षात आले Happy

नमस्कार मंडळी! इतक्यात इकडे यायला जमलच नाही... पण सगळ मस्त चालय...
दिनेश दा, ललितापंचमी बद्दल खुप रोचक माहिती...
जागु,.... गुलाब, कोकिळ, केळी, हायड्रेंजिया सगळच एकदम भन्नाट...
हेमा... आफ्रि़कन ट्युलिप प्रथमच बघतेय... काय डेरेदार वॄक्ष, आणि काय विलोभनिय रंग!
दिल खुष हो गया.

शशांक जी, सेन्स ओफ ह्युमर जोरदार(सुर्यफुल)....

टोम्याटो मस्तच!!!

वा वरती सर्वांनी टाकलेले फोटो सुंदर. बेलाचे झाड, बेलाची माहिती मस्त आणि समयोचित आहे आजच्या दिवशी.

हेमा आंब्याचा मोहोर छान, सुवास दरवळला. यंदा मात्र कोकणात हवामानामुळे आमच्या गावाला सगळ्यांच्या बागेतला मोहोर करपला (देवगड तालुका), परवा गावाला फोन केला तेव्हा कळले. वाईट वाटले एखादी गोष्ट जन्माला येण्याआधीच तिचे विसर्जन होणे, निसर्गाची किमया, काय करणार.

आंबेमोहोर तांदूळ >>> हा तांदूळ दुकानातून विकत घेताना पूर्वी हातावर खसाखसा चोळून तो वास घ्यायचे - तिथेच त्याचे मूल्यमापन "आंबेमोहोर तांदूळ" आहे का नाही हे व्हायचे .... Happy मग घरी आणून शिजायला लागला की सगळीकडे त्याचा नुसता घमघमाट सुटायचा - अगदी आंब्याच्या मोहोरासारखाच वास .... Happy - माझी आजी त्याला "बारकाचा" तांदूळ म्हणायची ...

यंदा मात्र कोकणात हवामानामुळे आमच्या गावाला सगळ्यांच्या बागेतला मोहोर करपला (देवगड तालुका), परवा गावाला फोन केला तेव्हा कळले. वाईट वाटले एखादी गोष्ट जन्माला येण्याआधीच तिचे विसर्जन होणे, निसर्गाची किमया, काय करणार. >>>> अरेरे.....

Pages