आयुष्यात एखादं तरी दाहक वास्तव असतं. प्रत्येकाच्या असेलच असं नाही, पण बहुतेकांच्या असतंच. हर प्रकारानं आणि निकरानं त्याला टाळण्याचा, नाकारण्याचा प्रयत्न करावा आणि कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक तीव्रतेने आयुष्यानं ते वास्तव माणुस गाफील असताना कुणीतरी तोंडावर सणसणून दगड भिरकवावा तसं फेकुन मारावं... काय अवस्था होईल? हेच जर एखाद्या अडनिड्या वयातल्या मुलासोबत घडलं तर? तोही प्रथम भेलकांडून हतबल होईल आणि आवाक्याच्या बाहेर गेल्यावर त्वेषानं चवताळून परिस्थितीवर तुटून पडेल... जमेल त्या मार्गानं!!
पण फँड्री इतकाच नाही... मी माझ्यातला माणुस शोधत जाते, माझ्यातली संवेदनशीलता तपासत जाते, माझ्यामुळे आणि माझ्यापासून सुरू होणा-या समाजाचा एक हिस्सा म्हणुन माझ्या वाट्याला भिरभिरत आलेल्या ह्या दगडाचा मी थिएटरात नेम चुकवला तरी मनावर मात्र तो येऊन आदळतोच! मंजुळेंनी नेमच इतका अचुक धरलाय... तिथे वाल्याच्या बायकोसारखं मी पाप केलं नाही म्हणत बाजूला व्हायला वावच नाही. आजही चहूबाजूंना 'ड्रायव्हर', 'कामवाली बाई' (स्वतः घाण केलेली स्वच्छतागृहं तिच्याकडून साफ करून घेणं वगैरेही आलं त्यात!), 'वॉचमन' अशा प्रकारची असंख्य 'बिरुदं' आणि वर्णभेदही येतात कानांवर.. अर्थात हा फक्त एक दाखला, असे हजारो दाखले. त्यामागे दडलेल्या माणुस नावाच्या प्राण्याचं काय? मी अडवते का कुणाला असं संबोधताना? अशी वागणुक देणा-यांना परावृत्त करते का? म्हणजे काय काय करायला लागेल? मी स्वतः खरंच पूर्णपणे माणुसकीनं वागते का? प्रश्न. अनेक प्रकारचे. नागराज मंजुळे तुम्हाला टोचत रहातात. अनेक प्रसंगांमधून. - हा फॅण्ड्री आहे. पण पुन्हा, एवढाच नाही.
हे सगळं बेमालुमपणे अगदी जाता जाता करत मंजुळे तुमचं मनोरंजनही करतात. त्यांचा चंक्या ज्या सहज आणि लिलया जत्रेच्या जल्लोषात सामील होतो त्याच सहजतेनं. कोणतीच गोष्ट कशाचपासून वेगळी करता येत नाही.
एरवी अडम तडम तडतडबाजा असलेली माझी बहिण चित्रपट पहाताना वरचेवर डोळ्यांना रुमाल लावत होती. म्हणजेच चित्रपट भिडला असं नव्हे, माहिताय. पण नि:शब्द जडत्व घेऊन घरी पोचल्यावर आपोआपच 'माणसानं माणसाशी माणुसकीनं वागणं' यावर माझा आणि तिचा रंगलेला दीर्घ परिसंवाद पार प्रत्येक कुटुंबियाची पाळंमुळं खणत गेला, मागच्या आणि आमच्या पिढीतल्या प्रत्येकाबद्दल ते येणा-या पिढीला काय पोचवायचं इथंपर्यंत. दोघीच्या दोघीच निवांत असताना, वेळेचं बंधन नसताना एरवी स्वतःचीच सालं कशाला काढत बसलो असतो? त्यापेक्षा अनुपस्थित गोतावळ्याबद्दल ही अश्शीच आणि तिचं तस्संच हा मुखवास चघळत बसणं सोप्पं नव्हतं का? वर आणि तो मंजुळेंच्या डोईजड चित्रपटावर रामबाण उताराही तर झाला असता! पण...
उत्खननालाच बसायचं तर अनेक गोष्टी निघतील. पण ते प्रत्येकानं आपापलं करावं. कारण मला जे सापडलं तेच बाकिच्यांना मिळेल असं नाही शिवाय असंही होऊ शकेल की मलाच शंभर गोष्टी मिळाल्या आणि कुणाला एकही नाही... तेव्हा तो शेवटी ज्याचा त्याचाच प्रश्न रहातो.
अलकनंदा दासगुप्तांचं संगीत आणि विक्रम अमलाडींचा कॅमेरा हे दोन महत्वाचे कलाकार आहेत चित्रपटात. शीर्षकापासूनच दोघंही मनाचा ठाव घेतात आणि ती पकड घट्ट घट्ट होत जाते... एकेक फ्रेम बघत रहावी अशी आणि एकेक तुकडा रिवाईंड करुन मुद्दाम ऐकण्यासारखा. किशोर कदम ह्या माणसाला मला एकदा सेटवर जाऊन निरखायचं आहे. ह्या माणसाला स्वतःला तरी कल्पना असेल का स्वतःच्या रेंजची?? स्विच ऑन्/ऑफ नावाची चीज हा करतो तरी कशी? ह्या माणसाबद्दलचं कुतूहल दिवसेंदिवस वाढतंच चाललंय. 'ल्हान हाये अजून', 'शेण घेऊ का?'तली लाचारी, गल्लीच्या वळणावरच्या त्या बेतशीर झोकांड्या, जिवाच्या आकांतानं केलेली शेवटची पळापळ.. सगळं अचंबीत करणारं.
त्याच्यासमोर त्याच ताकदीनं उभी राहिलेली जब्याची आई. यांचं नाव मला माहिती नाही पण भुमिकेचं सोनं म्हणजे काय याचा वस्तुपाठ आहे तिची भुमिका. मग जब्या आणि पि-या. तीन चतुर्थांश सिनेमा होईतोवर तर माझं ध्यान पि-याकडंच. 'आता खाली कसा उतरू'पासून ते ओशाळवाणं होऊन नवी कापडं कशी आहेत विचारणं असो... 'तुझा झगा गं झगा गं ' करत जिवलग दोस्ताला गाण्यात गुंफणारा लोभस पि-या. मी प्रेमात पडले त्याच्या. 'नायकाचे बेस्ट दोस्त' अशी काही कॅटेगरी केली तर सुरज पवारचा पि-या १००% पहिल्या पाचात!
पि-यापाठोपाठ चंक्या. अफलातून. मंजुळेंचा कलंदर चंक्या मोहवून टाकतो. 'तुझा विश्वास आहे ना, मग होईल' भिडलंच. त्याचं आणि जब्याचं नातं केवळ देखणं आहे. जब्या मात्र मला अधूनमधून आवडला आणि मग शेवटचा. त्याचं ते डोळ्यांच्या कोप-यातून शालूला निरखत रहाणं आणि ओघानंच ओठांवर उमटणारं अस्फुट स्मित लाजबाब. संवादफेक मात्र सोमनाथ अवघडेच्या मुळच्या हस-या जिवणीमुळं थोडीशी सदोष झालीये असं मला वाटलं. पण सायकलच्या आणि पेप्सीच्या प्रसंगात शिवाय जत्रेत बत्ती घेतल्यावरचा त्याचा प्रयत्न चांगला होता. राजेश्वरी खरातची शालू निरागस. ती तशीच अपेक्षितही होती. बामणीण चिमणीच्या गोष्टीसाठी ज्योती सुभाष नावाच्या देखण्या म्हातारीचं अनपेक्षित दर्शन सुखद. खरंतर अगदी एकच वाक्य बोलणा-या सुरखीपासून ते 'वढ पाच'ची म्हणणा-या न्हाव्यापर्यंत, जो तो ज्या त्या ठिकाणी एकदम फिट आहे, चपखल.
बाहेर धुमाकुळ घालणा-या आणि मलाही तेवढीच भुरळ घातलेल्या अजयच्या 'प्रितीच्या विंचू'ची अनुपस्थिती भावली. ते कुठेही आलं असतं तरी टेंपोच गेला असता. 'साजूक पोली अन म्हाव-या 'सारखं त्याचंही ठिगळच झालं असतं. त्या मोहाला बळी न पडण्याबद्दल मंजुळेंचं विशेष कौतुक.
मंजुळेंनी डोक्याला खुराक दिलाय, साखरेत घोळवलेल्या कडू गोळीच्या डोससारखा. हा स्क्रू नवं काही आदळेपर्यंत डोकं पोखरत रहाणार. भविष्यातही जेव्हा जेव्हा फॅण्ड्री बघेन तेव्हा तेव्हा तो स्क्रू पुन्हा लोहचुंबकासारखा येऊन मेंदूला चिकटेल आणि आपलं काम करत राहील हेही आत्ताच माहितीये..
पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय.. पहिलाच प्रयत्न (प्रयत्न म्हणायचं का??) इतका खणखणीत... बस्स लगे रहो!! मंजुळेंच्या पुढच्या सगळ्या दमदार वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा..
असीम, तुझ्या काही मुद्द्यांशी
असीम, तुझ्या काही मुद्द्यांशी सहमत नाही पण तू लिहिलं मात्र चांगलं आहेस.
काहींच्या गझलामधले विषय आधी
काहींच्या गझलामधले विषय आधी पुन्हा पुन्हा येऊन गेल्यासारखे वाटतात. (य)
नाही समजलं...
नाही समजलं...
सई
सई
http://dearcinema.com/interview/mff-2013-interview-fandry-director-nagra...
सई, तुला उद्देशून नव्हे ते..
सई, तुला उद्देशून नव्हे ते..
काहींच्या गझलामधले विषय आधी
काहींच्या गझलामधले विषय आधी पुन्हा पुन्हा येऊन गेल्यासारखे वाटतात. (य) >>>
सई, तुला उद्देशून नव्हे ते.. >>>
@ असीम, म्हणजे ते कोणाला तरी उद्देशून आहेतर. अगोदर मला वाटले की तू हा निव्वळ दाखला दिलायेस, मात्र तुझा उद्देश वेगळा दिसतोय. कारण या लेखाशी असंबध असे हे विधान आहे. आणि मी गझलकार असल्याने माझ्यासाठी सूचक.
तुला एकच सांगू इच्छीतो की, इथे बहुतेकांनी हा सिनेमा समोरुन पाहिलाय त्यामुळे जब्याचा दगड कोणाला लागला,
कोणाला चाटून गेला. मी मात्र पलिकडे जब्याच्या बरोबर उभा होतो.. त्यामुळे तो दगड मला लागण्याचा प्रश्नच नाही.
माझी पोस्ट वेगळ्या मुद्द्याबाबत आहे, तो केवळ योगायोगही असू शकतो असेही मला वाटते. म्हणून मला अशा वैयक्तिक पातळीवर टार्गेटकरणे गरजेचे नसावे. आणि फार वळवळ असल्यास ( ९४२०९५२५७३) हा माझा मोबा. नं.
फोन कर, सोक्षमोक्ष करुया.
..............................
@ सई, या पोस्टसाठी मी आपली माफी मागतो .. मात्र संबंधीताची वि.पू बंद असल्याने माझा नाईलाज आहे.
शाम तू का एव्हढे मनाला लावून
शाम
तू का एव्हढे मनाला लावून घेतलंस. तुझा हेतू साफ असेल तर लावून घ्यायची गरजच नाही. तुझा मोबाईल नंबर तुझ्याकडेच ठेव. तुझी ती विद्वत्ताप्रचूर पोस्ट आणि आमची ती वळवळ होय ?
तू गझलकार म्हणून तुला झोंबतेय का पोस्ट ? इथे नागराज मंजुळे आहे असं समज, त्याला कसं वाटेल हे तुला समजले असं समजू. नसेल समजले तर फरक पडत नाही. तू वाद घालायला आणि असतील नसतील ते फोन नंबर, तुझ्या घराचे गूगल लोकेशन काहीही देऊ शकतोस..
नॉट इंटरेस्टेड !
मग स्वतःची (काहींच्या
मग स्वतःची (काहींच्या गझलामधले विषय आधी पुन्हा पुन्हा येऊन गेल्यासारखे वाटतात.) पोस्ट कोणाला उद्देशून होती आणि तिचा या लेखाशी काय संबंध सांग?
कळूदेना तुला नक्की काय म्हणायचंय ते? की दिलय नाक मग खुपसा कुठेही.
छान
छान
१००
१००
मग स्वतःची (काहींच्या
मग स्वतःची (काहींच्या गझलामधले विषय आधी पुन्हा पुन्हा येऊन गेल्यासारखे वाटतात.) >>>> गझल या जगात तू एकटाच लिहीतोस का ?
पोस्ट कोणाला उद्देशून होती आणि तिचा या लेखाशी काय संबंध सांग? >> कशासाठी सांगायचं ? गरज वाटत नाही. तुला चिनूक्स ने अतिशय अचूक असं उत्तर दिलंय तरी तुझंच टुमणं चालू ठेवलं आहेस, त्यावरून तुला उत्तर देण्यात काही अर्थ आहे का ?
कळूदेना तुला नक्की काय म्हणायचंय ते? की दिलय नाक मग खुपसा कुठेही.>> तू आधी तुला काय म्हणायचंय ते स्पष्ट म्हण की. फॅण्ड्री पायताण वरून काढलाय असं तुला म्हणायचंय तर तसं म्हण. स्वतः असंबद्ध काहीही लिहायचं, त्याबद्दल कुणी काही विचारू नये आणि दुस-याने काही लिहीलं की धावून जायचं.. कै च्या कै.
आणि मी सभ्यपणे लिहीतो आहे तेव्हां नाक खुपसणे वगैरे शब्दप्रयोग आवरते घ्यावेत.
कथा, कविता, सिनेमा, गझला या
कथा, कविता, सिनेमा, गझला या अशा गोष्टी आहेत की ज्यातला आशय कुठे ना कुठे , कधी ना कधी येऊन गेल्य़ासारखं वाटू शकतं. म्हणून कुणी या गझलेवरून ही गझल लिहीली असं म्हणत नाही. तसं कुणी म्हटलं तर काय होतं हे आता पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही आणि या विषयावर पुन्हा काही स्पष्टीकरण देण्याचीही.
सिनेमा समोरून पाहणं हे प्रकरण काही कळालं नाही सिनेमा समोरून पाहतात तसंच सगळ्या कलाकृतीही समोरूनच पाहत/ वाचत असावेत अशी माझी कल्पना आहे.
काहींच्या गझलामधले विषय आधी
काहींच्या गझलामधले विषय आधी पुन्हा पुन्हा येऊन गेल्यासारखे वाटतात. (य) >>>
कथा, कविता, सिनेमा, गझला या अशा गोष्टी आहेत की ज्यातला आशय कुठे ना कुठे , कधी ना कधी येऊन गेल्य़ासारखं वाटू शकतं >>>>
याला आमच्याकडे बिनबुडाचे म्हणतात. . .
--------------------------------------------------------------
याचे त्याचे लिखाण ढापणारांशी बोलण्यात अर्थ नाही.
(No subject)
कोणताही गुन्हा केला नसेल तर
कोणताही गुन्हा केला नसेल तर वाईट वाटून घेण्याची काय गरज आहे … असे संबंधित काहीतरी वाचले वरती …. तर आपण गुन्हा केला तर गिल्ट वाटत असते. हा सिनेमा पाहिल्यावर जे वाटतंय ते गिल्ट नाही मी वर म्हणल्याप्रमाणे कुठेतरी यांचं जिनं आपल्याला माहिती नाहीये तोपर्यंत सर्व नॉर्मल असतं ...होतंच…पण जेव्हा आपण हे प्रत्यक्ष उघड्या डोळ्याने बघतो आणि त्यातल्या त्यांच्या वेदना समजून घेतो तेव्हा संवेदनशील मनाला कुठेतरी बोचऱ्या भावना जाणवतात आणि ते अगदीच साहजिक आहे. भावना जागृत व्हायला आपण प्रत्यक्ष गुन्हेगार वर्गात असणं गरजेचं नाही…. किंबहुना मी तर म्हणेन त्या तश्या गुन्हेगारांना हे सर्व पाहून काही वाटणारही नाही…. त्यांच्यात तेवढी संवेदनशीलता असती तर ते तसे वागलेही नसते …
कुठेतरी यांचं जिनं आपल्याला
कुठेतरी यांचं जिनं आपल्याला माहिती नाहीये तोपर्यंत सर्व नॉर्मल असतं >>> kya baat
आयला चिमणि घावायला पायजे
आयला चिमणि घावायला पायजे राव...
फँड्री पाहिला...आवडला...
दिग्दर्शकाने वास्तव मांडलय ... नाटकीय नाही ... जे आहे हे अस आहे... तो थेट भाष्य करत नाही.... खर म्हणजे सिनेमा बोलका आहे...
जब्या शेवटी बरोबर नेम साधतो अन तो भिरकावलेला दगड जखम करून जातो... फकस्त रगद येत नाय .. बस
Mayee, chhan lihun gelis
Mayee, chhan lihun gelis
Rohit, 'bolaka cinema' sahamatach!
Aseem ani Shyam, let it go...
सई काय बोलू ! एखादी कलाकृती
सई काय बोलू ! एखादी कलाकृती आपल्याला आत्म्यापर्यंत हलवून जाते . तिच्यावर लिहिणं ही एक सक्ती बनते,तो ऐच्छिक विषय नसतो.अशा वेळी असं लेखन हातून होतं.
हा लेख आणि साजिराचे त्यावरचे प्रतिसाद वाचून मी फँड्री बघायचा ठरवलाय , एरवी चक्क घाबरत होते बघायला.इतकं वाईट आहे सामाजिक वास्तव. इतरही अनेक प्रतिसाद लेखाच्या वाचनाची रंगात वाढवणारे.
किशोर कदमबद्दल जे वाचलं त्यावर प्रतिक्रिया एवढीच की त्याची रेंज खूपच आहे, तो हे अभावग्रस्त जीवन जगलाय, त्यातून तगलाय. सोपं नाही. संदर्भ पूर्णच करायचा तर इतकंच की या प्रवासात त्याच्यातला कवी मागे राहून गेलाय,performer उरलाय.
सुरेख लिहीलंय! प्रोमोज का बरं
सुरेख लिहीलंय!
प्रोमोज का बरं असे होते? अगदीच वेगळं इंप्रेशन देत होते प्रोमोज.
हा लेख वाचला नसता तर कदाचित नसता पाहिला गेला सिनेमा.>>+१
कालच पाहिला. सिनेमाटोग्राफी/पार्शवसंगीत मस्तच आहे. काही काही फ्रेम्स तर अप्रतिमच. सौमित्र आणि एक्-दोन कलाकार सोडले तर सगळेच नवे, तरीही अभिनय एकदम मस्तच. चित्रपटाचा वेग काही ठिकाणी कमी आहे पण ते गरजेच आहे अस वाटलं. जब्याचे डोळे किती बोलके आहेत. पिर्यापण मस्तच.
प्रोमोमुळे लव स्टोरी पाहायला आलेले लोक नंतर कंटाळले होते असं वाटलं.
***** स्पॉयलर (कदाचित वाटेल) ******
जब्याने दुकानातील जीन्स पाहतानाचे / दुसर्या दुकानातील पक्षी/मासे पाहतानाचे डोळ्यातील भाव मस्त वाटले. जत्रेत धुमशान नाचणारा जब्या दुसर्याच फ्रेम मध्ये डोक्यावर कंदील(???) घेऊन अश्रु ढाळत उभारतानाच प्रसंग अथवा शेवटच्या प्रसंगातील ते टांगलेले डुक्कर घेऊन जाताना शाळेतील भिंतीवरील महापुरुषांचे चित्रं सरकत जातात आणि शेवटी जब्यावर कॅमेरा येतो हे प्रसंग तर फार भिडले.
जब्याचा काळी चिमणी शोधायचा ध्यास, शालूला लिहिलेली चिठ्ठी, पेप्सी विकायची धडपड असे छोटे छोटे प्रसंग छान जमलेत.
मला आवडला. सईचे लिखाण ही मस्त
मला आवडला.
सईचे लिखाण ही मस्त जमुन आले आहे.
वर कोणितरी म्हटले आहे की टाइमपास मुळे मराठी सिनेमा थिएटर मधे पाहाणार नाही......
तसे करु नका. त्याची आणि ह्याची तुलनाच नाही.
तो सीडी/फुकट पाहायचाच सिनेमा होता आणि हा मोठ्या पडद्यावरच पाहिला पाहिजे.
हवे तर अजुन एक स्पॉइलर....
ही लव्हइश्टोरी न्हाई......
काल बघुन आलो, जब्याने
काल बघुन आलो,
जब्याने दुकानातील जीन्स पाहतानाचे / दुसर्या दुकानातील पक्षी/मासे पाहतानाचे डोळ्यातील भाव मस्त वाटले. जत्रेत धुमशान नाचणारा जब्या दुसर्याच फ्रेम मध्ये डोक्यावर कंदील(???) घेऊन अश्रु ढाळत उभारतानाच प्रसंग अथवा शेवटच्या प्रसंगातील ते टांगलेले डुक्कर घेऊन जाताना शाळेतील भिंतीवरील महापुरुषांचे चित्रं सरकत जातात आणि शेवटी जब्यावर कॅमेरा येतो हे प्रसंग तर फार भिडले.>>+१०००
सूंदर लिहलय......... चित्रपट
सूंदर लिहलय.........
चित्रपट संपताना तो अपुर्ण राहीला कि काय असे वाटते, जब्याच्या प्रेमासारखा ...
‘फँड्री’ कसा पाहावा? (-- गणेश
‘फँड्री’ कसा पाहावा?
(-- गणेश मतकरी)
(हे सर्वांनाच सर्वोत्तम परीक्षण वाटणार नाही, शिवाय काही मुद्द्यांबद्दल असहमतीही असेल. माझ्यापुरतं बोलायचं झालं, तर 'हा सिनेमा म्हणजे अन्यायाविरूद्ध लढा, जातिव्यवस्थेचं चित्र, तरल प्रेमकथा इ. इ. नव्हे, तर स्वतःतच असलेल्या न्युनगंडाशी लढाई आहे.' असं जे मी पहिल्यापासून म्हणत होतो, तस्संच म्हणणारं कुणीतरी आणखी आहे- याचा आनंद झाला.
)
वर असीम भागवत यांनी दिलेल्या दुव्यामध्ये स्वतः नागराज देखील म्हणताहेत- "...But if someone likes the film because it’s issue-based, I can’t stop them. Like after the screening, someone in the audience shouted, “Jai Bhim”. Maybe it’s after a long time that he saw his representation on screen."
प्रत्येकाचा दृष्टीकोन आणि पूर्वग्रह वेगळे असू शकतात, मात्र आपल्या दृष्टीकोनाच्या आणि आपल्याला जाणवलेल्याच्या पलीकडेही काहीतरी असू शकतं, आणि नेमकं तेच त्या कलाकृतीचं मर्म आणि बलस्थान असू शकतं- हे मी माझ्यापुरतं तरी नेहमी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो.
चित्रपट संपताना तो अपुर्ण
चित्रपट संपताना तो अपुर्ण राहीला कि काय असे वाटते, जब्याच्या प्रेमासारखा ...>>>>१११११+
प्रत्येकाने आवर्जून पहावा असा
प्रत्येकाने आवर्जून पहावा असा सिनेमा. सुरेख लिहिले आहेस सई.
काल सिनेमा पाहिल्यावर परत हा लेख वाचला. जास्त काही लिहीत नाही पण राष्ट्रगीताचा सीन मस्तच.
माझ्या अपेक्षेप्रमाणे परिक्षण
माझ्या अपेक्षेप्रमाणे परिक्षण आहे मतकरींचं. पटणारं.
'पण पुन्हा, फँड्री फक्त इतकाच नाही' हे आणि <<<आपल्या दृष्टीकोनाच्या आणि आपल्याला जाणवलेल्याच्या पलीकडेही काहीतरी असू शकतं, आणि नेमकं तेच त्या कलाकृतीचं मर्म आणि बलस्थान असू शकतं<<< तिथेही सापडतंय
जितका चित्रपट आवडला तितकाच हा
जितका चित्रपट आवडला तितकाच हा लेखही आवडला अगदी शिर्षकासकट.
बंगाली / मराठी प्रेक्षक, वाचक
बंगाली / मराठी प्रेक्षक, वाचक यांनी एखादी कलाकृती उचलून धरणे याला देशात महत्व देतात. महाराष्ट्रात नाटकांनी वैचारीक/ प्रायोगिक नाटकांची सवय लावलीय. फॅण्ड्री मुळे चित्रपटसृष्टीत असे बदल होतील का ? की अशी लाट आली तर लोक वैतागतील ?
अजून पाहिलेला नाहीये. पण
अजून पाहिलेला नाहीये. पण तुमचे लिखाण खूप आवडले.
Pages