लेकीचा बर्थ डे होता.
एका आठवड्यात चार पाच वेगवेगळे ऑप्शन्स सांगून झाले कधी आई मला बटरफ्लाय चा केक तर कधी मिनी माउस चा... शेवटी एकेका प्रिन्सेस ची नावे घेता घेता गाडी आली मला मरमेड चा केक हवा आहे.
आणि अनायसे समोर एक नवी कोरी मरमेड बार्बी मिळाली. मग काय आपल्या बेकींग क्विन लाजो कडून स्फूर्ती घेउन मग मीही ह्या वेळी घरी केक करायचे ठरवले.
साधारण डोक्यात आयडीची कल्पना मांडली. साहीत्याची जमवाजमव केली. वेगवेगळ्या आकाराचे बेसीक केक बेक करून घेतले. मरमेड आयलंड आणी पाणी असे काहीसे करायचे होते.
म्हणून चॉकलेट आणि वॅनिला आयसिंग सोबत निळे आयसिंग. मरमेड सोबत मोती चांगले दिसतील म्हणून पर्ल कॅन्डी आणि केक वर किंवा इतर पाण्यात टाकायला फिश च्या आकाराच्या छोट्या स्प्रिंकलर कॅन्डी. पाणी कसे दाखवायचे ? मग जेली ची आयडीया सुचली.. एका भांड्यात जेली सेट करून घेतली.
केक ला बेस म्हणून एक मोठ्ठा चौरस आकाराचा ट्रे घेऊन त्याला अल्युमिनियम फॉइल लावली. मग दोन्ही मोठे केक मधोमध कापून त्याला व्हिप क्रीम लाऊन एकावर एक ठेवले. खालच्या गोल केक ला निळे आयसिंग केले वरच्या केक चा ला मरमेड ला बसवण्यासाठी त्रिकोणी खाच करून जागा करून घेतली. त्याचा रॉक दिसेल असा चोकलेटी आयसिंग करून आकार निट केला.
मग हिरव्या रंगाच्या आयसिंग ने पाण वनस्पती वेली वगैरे काढले. निळ्या केक वर थोड्या थोड्या अंतरावर मोती लावले. ट्रे मध्ये रिकाम्या जागेत फिश च्या आकाराची स्प्रिम्कल्र्स टाकून त्यावर जेली सेट केली. आणि तरीही थोडी जागा उरली मग त्यात उरलेल्या केक चा चुरा करून समुद्राची वाळू असल्याचा भास निर्माण केला. नंतर ऐनवेळी सुचले की अरे आपल्याकडे शंखाच्या चॉकलेट मोल्ड आहेत मग ते चॉकलेट बनवून त्या वाळूवर ठेवले. फायनली सगळे आयसिंग करून झाल्यावर पाण्यात पाय सोडलेली मरमेड त्यावर बसवली हे सगळं प्रकरण केक कापे पर्यंत फ्रीज मध्ये ठेवले.
हि बघा छान दिसतेय ना ?
पार्टी आधी दोन तास आयसिंग करायला सुरु केले होते. केक करताना खूप धाकधूक होती . वेळेत नाही झाला तर…. चांगला नाही दिसला तर… खूप गोड होईल का ? निट दिसेल का ? ३०-३५ जणांच्या पार्टीला पुरेल का ?वगैरे वगैरे… पण केक एकदम मस्त झाला होता त्याचा अगदी फन्ना उडवला बच्चे कंपनी एकदम खुश ! लेक ज्याला त्याला दाखवून सांगत होती … माझ्या मम्माने बनवला आहे केक. भरून पावले !
मस्त! स्मित किती उत्साही आया
मस्त! स्मित
किती उत्साही आया आहत तुम्ही एकेक! >>++++१११११११११११११११
बाप्रे! कसला सुंदर आहे
बाप्रे!
कसला सुंदर आहे अगं!
ऑफिसमध्ये पण सगळ्यांना दाखवला. सग़ळे अवाक!
जबरदस्त!! डॅफो, तुला मोठ्ठी
जबरदस्त!!
डॅफो, तुला मोठ्ठी शाबासकी...
खुपच सुंदर केलायस गं केक
खुपच सुंदर केलायस गं केक
हेवा वाटला तुझा. इत्का
हेवा वाटला तुझा. इत्का छन!!!! असाच ताकत जा. inspiration मिळली. बेकिन्ग चे क्लास घ्या. खूप चाल्तिल. मी पहिली हान admission la.
व्वा, मस्त !
व्वा, मस्त !
व्वॉव! संपदा किती सुंदर झालाय
व्वॉव! संपदा किती सुंदर झालाय अगं केक
खरंच कलाकार आहेस.
mastach
mastach
>>>> उत्साहाचं कायम कौतुक
>>>> उत्साहाचं कायम कौतुक वाटतं. <<<<अगदी अगदी.
येवढ्या धीराने पूर्वी न केलेली गोष्ट आयत्या वेळेस (तेच ते, दोनतिन तास आधी सुरू केले त्याचेच आयत्या वेळेस असे म्हणतोय) शांतचित्ताने यशस्वी करणे साधी बाब नाही. त्यातुन तो ३०/३५ बच्चे कम्पनीपुढे मान्डला जाणार म्हणजे परिक्षा लगेचच.
व्हेरी गुड्ड !
लेकीने मात्र जाम कॉलर ताठ करुन घेतली असेल......
मस्त!
मस्त!
बाबौ! केक आणी आयडीया एकदम
बाबौ! केक आणी आयडीया एकदम मार्व्हलस! जलपरी खूप गोड दिसतेय. बाकी सेटिन्ग पण झकास. माझ्या मुलीला सहज दाखवले.( पुढची कल्पना आल्याने आधी दाखवणार नव्हते.:फिदी:) तर फर्माईश आलीच की माझ्याही वाढदिवसाला असाच केक कर.
खूपच सुन्दर!
मस्त दिसतोय केक!
मस्त दिसतोय केक!
Saheech!!! Mamee>>> +१
Saheech!!!
Mamee>>> +१
धन्यवाद !
धन्यवाद !
कम्माल यार.......लेक भाग्यवान
कम्माल यार.......लेक भाग्यवान आहे तुझी
Wow....खुप मस्त झाला आहे.....
Wow....खुप मस्त झाला आहे..... Great Job Daffodils !!
सही
सही
मस्त ! करुन बघनार
मस्त ! करुन बघनार
डॅफो खरंच खुपच देखणा झाला आहे
डॅफो खरंच खुपच देखणा झाला आहे केक...!!!
शेवटचे वाक्य << माझ्या मम्माने बनवला आहे केक. भरून पावले ! --> काय मस्त वाटले असेल न तुला...भरुन पावले हेच वाक्य अगदी...
मस्त केक.
मस्त केक.
थॅन्क्स ऑल !
थॅन्क्स ऑल !
Pages