लाल मिरचीचा गोळा

Submitted by नलिनी on 16 January, 2014 - 16:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल ओली / ताजी मिरची २०-२५
मिठ चवीनुसार
लसूण १०-१५ पाकळ्या
कच्चे शेंगदाणे मुठभर

क्रमवार पाककृती: 

ताज्या लाल मिरच्या, मिठ आणि लसूण कमीतकमी पाणी घालून हे एकत्र गोळा होईस्तोवर पाट्यावर घसाघसा वाटावे. मिरची वाटताना हाताची आग होते ते आपल्याला सहन होत नसेन तर दुसर्‍याकडून वाटून घ्यावे. कारण हे प्रकरण मिक्सरवर म्हणावे तसे होतच नाही.

कच्चे शेंगदाणे घातल्यास आणखी चवदार लागते तसेच तिखटपणा जरा कमी होतो.

गरम गरम आसल तर गरम नायतर शिळी पण ज्वारीची नायतर बाजरीची भाकर , लाल मिरचीचा गोळा आन वर तेलाची धार..... अहाहा!

हिथं पाटावरवंटा नाय तवा फोटूबी नाय!

वाढणी/प्रमाण: 
तुम्हाला सोसल तसं.
माहितीचा स्रोत: 
आई, काकू, आजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा मस्त आठवण दिलीस. आमच्या घरी सगळ्यांचा आवडता प्रकार आहे. यात दाण्याऐवजी तीळ घातले की मस्त तिळाची चटणी होते. पाट्यावर वाटलेली अशी तिळाची चटणी अतीप्रचंड भारी लागते.

नलिनी, मस्त रेसिपी. आम्ही शेंगदाण्याएवजी ओल खोबर, सुकी लाल मिरची, चिंच वापरतो आता शेंगदाणे वापरुन मिक्सरवर ट्राय करेन. Happy तिखट अजिबात नाही.

बाप रे, नलिनी... नुसतं वाचूनच काटा आला अंगावर! पण १००% भन्नाट लागत असणार Happy
दुस-या कुणी केलेली चाटून बघायला पाहिजे एकदा... करणं आणि खाणं दोन्ही सोसण्यातले नाही!!

मस्तच! आमची आजी नेहमी करायची ही चटणी. आता आठवत नाही का आपण आम्ही सगळी भावंडं याला 'लाल मारुती' चटणी म्हणायचो. Proud
आता आठवण निघालीये म्हणल्यावर मिक्सरवर का होईना केलीच पाहिजे. Happy

मी खाल्ली नाहीय कधी पण असलं काही कधीमधी खायला खुप बरं वाटतं. आणि खाताना जर दोन्ही डोळ्यांना धारा लागल्या तर अजुन बरं वाटतं... पण कधीमधीच... Happy

आई ग! कशाला आठवण काढलीत. मला आताच्या आता पाहीजे
माझं फेव्हरेट फुड लाल मिरचीची चटणी आणि सुक्या भाकरी ( या चटणी सोबत नरम भाकरी खायला मजा नाही येत) आणि सोबत तळलेली कुरडई/मिरगुंड असेल तर स्वर्गसुख का काय ते म्हणत्यात ते.
मुरबाड वरुन आमचे शेजारी खास मला आवडते म्हणुन खास पाट्यावर वाटलेली चटणी( त्यात शेंगदाणे वै. काही नाही मस्त झणझणीत) आणि सुक्या भाकरी, मिरगुंड आणायचे. आहाहा! तोंडाला एव्हढं पाणी सुटलय की लाळ किबोर्डवर गळायची.
हल्ली शेजारी गावी जात नाहीत वाटतं, आठवण करुन द्यायला पाहीजे.

रेसिपेी मस्त्च.्तोंडालापाणेी सुटले.मेीरच्या वाटताना हतांचेी अआग होवु नये याकरता मेी हातात प्ला ,पिशवेी.लावते.

या आमच्याकडच्या लाल मिरच्या आणि लसूण..

मिक्सरवरच वाटलेय. लसणाची एकच गड्डी वापरली व शेंगदाणे वापरलेत.

आमच्याकडच्या हवेत टिकण्यासाठी, सर्व वाटण हिंग जिर्‍याच्या फोडणीत परतून घेतले. काय, जमलाय ना गोळा ?

दिनेशदा मस्त झालाय गोळा.

नलिनी मस्तच. रेसिपी.
माझ्याकडे पाटा-वरवंटा आहे. हाताने वाटावेसे पण वाटते पण छोटी लुड्बुड करेल शिवाय तिला नंतर घ्यावे लागते म्हणून पाट्याचा बेत कॅन्सल. पण मिक्सरवर करेन. कुंडीत लाल मिरच्याही कधिच्या वाट पाहताहेत आज संध्याकाळीच काढेन.

ज्यांना पाटा-वरवंटा हवा त्यांनी ह्यावर कुटा.:हाहा:

खरंच तुम्ही सगळे इथे असता तर सर्वाना वाटून टाकला असता. मी चिमूट चिमूट खाल्ला तरी दोन महिने संपायचा नाही मला !

नलु, तू दुष्ट आहे.>> थांकू! लवकरच हिरव्या मिरचीचा रगडा/ ठेचा, हिरव्या मिरचीची शेंगदाण्याची चटणी ह्याबद्दल लिहिन म्हणतेय. Happy

ज्यांना पाटा-वरवंटा हवा त्यांनी ह्यावर कुटा.>>>>:हाहा:

दिनेशदादा,
काय, जमलाय ना गोळा ?>>> भारीच! आणि फोटोपण भारीच!

पाट्यावर जरा आणखी घसा घसा वाटले की त्या बिया पण गोळ्यात एकजीव होणार मग चवीबद्दल आणखी काय बोलायचे? Happy

मी चिमूट चिमूट खाल्ला तरी दोन महिने संपायचा नाही मला !>>>इकडेच पाठवून दे. आमच्याकडे दोन- चार दिवससुद्धा पुरणार नाही.

नलिनी
आम्ही पण दिनेशसार्खाच हा गोळा मिक्सरवर वाटतो. पूर्वी पाट्यावरही वाट्लेला आहे.
अप्रतीमच लागतो.
हो पण आम्ही त्याला गुलकंद म्हण्तो......मग आफ्टर इफेक्ट्स कमी होतात. Wink

>> लवकरच हिरव्या मिरचीचा रगडा/ ठेचा, हिरव्या मिरचीची शेंगदाण्याची चटणी ह्याबद्दल लिहिन म्हणतेय.
कुफेहेपा :रागः
Happy