"ट्रकच्या मागे लिहिलेली वचनं" हा तत्वज्ञानाचा एक अविरत स्त्रोत आहे. द व्हेरी फेमस 'बुरी नजरवाले, तेरा मूह काला' पासून अनेक उत्तमोत्तम शेरही मी तिथे वाचलेत. पण अगदी हल्लीच, काही दिवसांपूर्वीच एका ट्रकवर वाचलेलं वचन मात्र सगळ्यांवर कडी असावं -
"भाई हो तो ऐसा, ना मांगे हिसाब ना मांगे पैसा !!"
ह्याच उदात्त विचारसरणीचा एक जादूगार नव्वदच्या दशकात शिकागोमध्ये होऊन गेला, हे काल धूम-३ पाहिल्यावर समजलं. पण हा जादूगार तर ट्रकवाल्या पेक्षाही उदात्त विचारसरणीचा असतो. तो अशी अपेक्षा स्वत:च्या भावाकडून नव्हे, तर बँकेकडून ठेवतो आणि कर्ज घेतो. पण ती बँक म्हणजे महाराष्ट्र सरकार नसतं आणि कर्ज घेणारा कुणी शेतकरीही नसतो. त्यामुळे व्यवहारास चोख बँक, हफ्ते चुकवणाऱ्या जादूगाराला नोटिशीची जादू दाखवते आणि हबकलेला हताश जादूगार आत्महत्या करतो. त्याने आत्महत्या केल्यावरही बँकेच्या अधिकाऱ्याचं हृदय द्रवत नाही. बिच्चाऱ्याला ट्रकवाला व जादूगाराचे उदात्त विचार माहित नसतात. तो जादूगाराची तारण मालमत्ता जप्त करवतो आणि त्या जादूगाराचा लहान मुलगा, मोठा झाल्यावर बँकेच्या कायदेशीर कारवाईचा बेकायदेशीर बदला घेतो. मायला ! चोर तो चोर, वर शिरजोर ? असाच आहे धुमड्या, अर्थात धूम - ३.
धुमड्याची सुरुवात आश्वासक होते. आमिरची सनी लिओनीश पाठ दिसेपर्यंतची पहिली काही मिनिटं आपल्या अपेक्षा उंचावतात. नंतर कैच्याकै भंकस सुरु होते. बाईक चालवणारा चोर आमिर स्वत:चे तोंडही लपवत नाही आणि अमेरिकेचे पोलिस इतके दुधखुळे असतात की ते त्याला ओळखू शकत नाहीत. लगेच पुढच्या दृश्यात अभिषेक आणि उदय चोप्रा कृत गुंडांची पिटाई दाक्षिणव्रात्य सिनेमाला लाजवेल अशी आहे. पुढल्या चाकावर गोल गोल फिरणारी रिक्षा पाहिल्यावर तिचा स्टिअरिंग कॉलम बनवाणाऱ्या कंपनीच्या मालकाचा उर अभिमानाने भरून आला नसेल, तरच नवल !
केवळ दोन चोऱ्या करून अमेरिकन पोलिसदलास हवालदिल करणाऱ्या एक अज्ञात चोरास पकडण्यासाठी, दोन धुमड्यांतील सुपरफ्लॉप कामगिरीनंतरही आंतरराष्ट्रीय 'सुपरकॉप' ठरलेल्या 'जय दीक्षित'ला (अभिषेक बच्चन) खास भारतातून बोलावले जाते. कारण कदाचित हे असावं की, हा चोर (आमिर खान) चोरी केल्यावर हिंदीत निरोप सोडत असतो - "तुम्हारी ऐसी की तैसी." गाड्याबरोबर नळ्याची यात्रा होते, तसा जयबरोबर 'अली'ही (उदय चोप्रा) येतोच !
पुढे काही बाही होत राहतं आणि सगळ्याचा हिशोब थोडक्यात मांडायचा झाल्यास - सुमारे ३ तासाच्या धुमड्यात तासभर बाईक्स व्रुमव्रुमत राहतात. तासभर आमिरवरून कॅमेरा हलत नाही. अर्धा तास गाणी, नाच, सर्कशीत जातो. १५ मिनिटं अभिषेक बच्चनच्या नाकावरील माशी उडवण्याच्या असफल प्रयत्नात जातात आणि उर्वरित १५ मिनिटं उदय चोप्रा प्रेक्षकांना वात आणण्यासाठी वापरतो. कतरिना पानात कतरी सुपारी असते, तशी हरवते किंवा पोह्यांवर भुरभुरवलेल्या खोबऱ्यासारखी नुसतीच दिसते.

आमिरचे बचकांडेपण कधी नव्हे इतकं धुमड्यात जाणवतं. त्या बाईक्सचा धुडांवर बसल्यावर त्याचे पाय खाली कसे पोहोचत असतील, हा एक संशोधनाचा विषय आहे.
दोरावरून बाईक चालवून एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डींगमध्ये जाणे असो की चालू-चालूमध्ये बाईक बोटमध्ये कन्व्हर्ट होणं असो की दोन बाईक्स एकमेकांना खटाखट जोडल्या जाऊन त्यांची एक चार चाकी बनून तिने उडी मारणं असो, सगळंच आजच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतील असामान्य बुद्धिमानांसाठी एक जबरदस्त 'फूड फॉर थॉट' ठरायला हरकत नाही.
एकंदरीतच सगळे पाठलाग, स्टण्ट्स बॉन्ड-फॉण्ड, स्पायडर-वायडर मॅनांनी शिकवणी लावावी असेच.
धुमड्या संपल्यावर जरा वेळाने शांतपणे विचार केल्यावर लक्षात आलेल्या चार गोष्टी -
१. आमिर आणि शाहरुखमध्ये काही फारसा फरक नाही. दोघेही स्वत:च्या प्रेमात आकंठ बुडलेले आहेत. 'जतहैंजा' मधला समर आणि धुमड्यातला समर दोघेही सारखेच पकवतात.
२. उदय चोप्रा हे यश चोप्रांना पडलेलं एक भयानक स्वप्न असावं, जे खरं झालंय.
३. प्रत्येक सिनेमागणिक अभिषेक बच्चन एक लांबलचक ठोकळा बनत चालला आहे.
४. रोहित शेट्टी, तू एकटा नाहीस.
साधारण साडे नऊला धुमड्या संपला. माझ्या सुदैवाने दहा वाजता कलर्सवर '24' चा शेवटचा भाग होता. आमिरने केलेल्या घोर अपेक्षाभंगावर अनिल कपूरने अप्रतिम साकारलेला 'जयसिंग राठोड' एक उत्कृष्ट उतारा होता. त्यामुळे पराकोटीचा निराश झालेलो असतानाही मी शांतपणे झोपी जाऊ शकलो आणि सुचलेल्या बऱ्याच शिव्या विसरू शकलो !
थँक यू, अनिलकाका !
रेटिंग = जतहैंजा
http://www.ranjeetparadkar.com/2013/12/movie-review-dhoom-3.html
हूवर डॅम आहे तो.
हूवर डॅम आहे तो.
>> हूवर डॅम आहे तो. मला नाही
>> हूवर डॅम आहे तो.
मला नाही वाटत तो हूवर डॅम आहे असं ..
http://www.filmapia.com/published/movies/d/dhoom-3
तो स्विट्झर्लँड मधला आहे ..
अहो शोले थ्री डी येनारे तीन
अहो शोले थ्री डी येनारे तीन तारखेला. मी नक्की जाणार.
>>मला नाही वाटत तो हूवर डॅम
>>मला नाही वाटत तो हूवर डॅम आहे असं ..
+१
आणि ज्ञानेशची माहितीदेखील अचूक आहे.
पण जेम्स बॉन्ड (पिअर्स
पण जेम्स बॉन्ड (पिअर्स ब्रॉस्नन) उडी घेतो तो सीन जबरदस्त शूट केला आहे असे आठवते.
>> वर्ल्ड इज नॉट इनफ
रसपा.. भारी मजेशीर परिक्षण
रसपा.. भारी मजेशीर परिक्षण
अरे मला सांगा चोर कोण असतो
अरे मला सांगा चोर कोण असतो ??????????????
^^^ यशराज फिल्म्स.
^^^
यशराज फिल्म्स.
ज्ञानेश
ज्ञानेश
यातील माझा सर्वात आवडता
यातील माझा सर्वात आवडता संवाद:
Bank owner: "Somebody has been robbing us..."
Local police lady: "It's a thief, sir"
यावर "द मास्क" मधल्या त्या पोलिस अधिकार्याचे फेमस उत्तर आठवले:
"There it is, boys, she broke the case. Come on, get these rubbernecks out of here."
अरे तुम्ही लोक एव्हढे उभे
अरे तुम्ही लोक एव्हढे उभे आडवए धुऊन काढताय त्या धूम ३ ला, पण मी गेल्या दोन दिवसांत धूम आणि धूम २ बघितले तेही एव्हढेच, मे बी थोडे कमी अचात आणि अतर्क्य होते .. मग ह्याच धूम ला आशी सावत्र ट्रीटमेन्ट का देता, आँ?
(मला आवडला बुवा धूम ३ .. चांगली करमणूक होती ..
आणि आमिर का क्या कहना .. :))
आताच पाहिला. बेक्कार बेक्कार
आताच पाहिला. बेक्कार बेक्कार बेक्कार पिक्चर.
धूम १ मधे स्टोरी होती. धूम २ मधे ह्रितिक होता. धूम ३ मधे उदय चोप्रा आहे. धन्यवाद!!
अभिषेकच्या बायकोचा रोल कुणी
अभिषेकच्या बायकोचा रोल कुणी केलाय ? रिमी सेन नाहीच का ? आणि उदयची हिरवीण कोण ?
स्पॉयलर अलर्ट. स्पॉयलर
स्पॉयलर अलर्ट. स्पॉयलर अलर्ट. स्पॉयलर अलर्ट. स्पॉयलर अलर्ट. स्पॉयलर अलर्ट. स्पॉयलर अलर्ट.
काय ते दोघे कविता बिविता म्ह्नत बसतात येडे. चोरीसाठी असलं भावनिक ठिगळ जोडण्यापेक्षा "चोरीसाठी चोरी" हे धूम लॉजिक कायम ठेवलं अस्तं तर. त्या बाईकने जेवढी रूपे घेतली आहेत त्याच्या निम्म्याने चोरीचे प्रसंग घेतले असते तरी मजा आली अस्ती. एकही चोरी धड घेतलेली नाही. असल्या पिक्चरमधे "चोरी नेमकी कशी घडते" हेच तर कमाल प्रसंग असतात. तिथे यांनी पळवाट शोधली आहे चक्क. लॉजिकमधे एक दोन झोल असले तर सोडून देऊ, इथे तर लॉजिक नाहीच्चे.
मै कभी कुछ नही भूलता म्हणणारा समर जय दिक्षितला ओळखत नाही? अरे त्यानेच गोळी घातली ना तुला? तुला घातली नसेल तर तुझी जखम त्यानेच चेक केली, म्हणजे तू त्याला कधीतरी पाहिलं आहेसच. तरी ओळखत नाही??
कमली कमली गाण्यामधे कतरीना जे काही करते ते पाहून बँक मॅनेजर जॅकी श्रॉफला जे सांगस्तो ते खरं आहे हे पटतं. सर्कस इज अबाऊट गर्ल्स इन्शॉर्टस्कर्ट्स. जस्ट लाईक कतरीना.
हा आचार्य बहुतेक अजून ८०च्याच दशकामधे जगतोय. बाप का बदला वगैरे विषय घेऊन. टशन पण असलाच होता.
मला आवडला. म्हणजे एकदा
मला आवडला. म्हणजे एकदा पहाण्या सारखा नक्कीच आहे. सलमान शाहरुख च्या सिनेमां पेक्षा उजवा आहे. आपण आमीर चा सिनेमा म्हणुन एका फार उंचीने / अपेक्षेने पहायला जातो. ती मात्र पूर्ण होत नाही. ही भुमिका रणबीर ने मस्त केली असती.....
आजुनही काही लोकांना सिनेमा पहायचा आहे. तेंव्हा रहस्याची चर्चा टाळावी.....
लॉजिक वगैरे बाजूला ठेवून
लॉजिक वगैरे बाजूला ठेवून चित्रपट पाहिला. आवडला. आमिरचं काम, त्याच्या केवळ चेहरा आणि डोळ्यांतून दिलेले एक्स्प्रेशन्स सुपर्ब! धुम ३ मध्ये अभिषेकचा रोल केवळ तोंडी लावण्यापुरता आहे. त्यामुळे पुढच्या धूममध्ये कदाचित एखादा डॅशिंग हिरो पोलिस म्हणून पहायला मिळू शकतो, असे वाटते.
अभिषेकने आता बीग बींचे जुने चित्रपट पाहत घरीच बसावे, हे उत्तम (हे माझे वैयक्तिक मत).
२. उदय चोप्रा हे यश चोप्रांना
२. उदय चोप्रा हे यश चोप्रांना पडलेलं एक भयानक स्वप्न असावं, जे खरं झालंय.>> वा वा
बाकी आप्तमित्रांनी उधळलेल्या संगीन शिव्या ऐकून थिएटरकडे फिरकायची प्राज्ञाच झालेली नाही.
RIP Dhoom 3
"यातील माझा सर्वात आवडता
"यातील माझा सर्वात आवडता संवाद:
Bank owner: "Somebody has been robbing us..."
Local police lady: "It's a thief, sir"
अरे त्याला माहीत नसेल चोरी
अरे त्याला माहीत नसेल चोरी करणार्याला काय म्हणतात
तो शिकागो चा "अली" असेल
नंदिनी +१ भावनिक ठिगळ धूम
नंदिनी +१ भावनिक ठिगळ धूम साठी एकदम कुचकामी. त्याऐवजी ह्याला अप्पूराजा २ असे नाव द्यायचे. त्या लीग मध्ये जास्त फिट झाला असता.
अप्पू - आमिर राजा -
अप्पू - आमिर
राजा - कतरीना????
अप्पू - आमिर राजा -
अप्पू - आमिर
राजा - कतरीना????
>> लॉल !!
>> Local police lady: "It's a
>> Local police lady: "It's a thief, sir"
where's preet bharara when the bankers need him !
where's preet bharara when
where's preet bharara when the bankers need him ! >>>>>>त्याला देवयानी कटरिना च्या जागी हवी असेल..
उदयन.., >> तिला देवयानी
उदयन..,
>> तिला देवयानी कटरिना च्या जागी हवी असेल..
कृपया प्रीत भराडा याचा लिंगबदल करू नये.

आ.ण.,
-गा.पै.
प्रीत आहे काय......... मी कधी
प्रीत आहे काय......... मी कधी पासुन प्रिती वाचत आहे...:अओ:
केला बदल............उगाच मला
केला बदल............उगाच मला भर रस्त्यात बेड्या नको पडायला ..
उदय बेड्या पडल्या तरी
उदय बेड्या पडल्या तरी ठीक.........पण.................
अरे देवा इथे ही भरारी का?
अरे देवा इथे ही भरारी का?

अप्पु राजा
एक गाणे घ्यायचे राहिले ......
एक गाणे घ्यायचे राहिले ...... मस्त सुट झाले असते या चित्रपटात
अभिषेक आणि आमिर खान वर चित्रण करायला हवे होते..
प्रसंग : आमिर खान बँक चोरी करण्यासाठी जात असतो अभिषेक त्याच्या मागावर असतो .. अभिषेक ला माहीत असते की आमिर खान हा चोर आहे परंतु अभिषेक ने पहिल्या धुम मधे एक संवाद मारलेला असतो " चोर को सिर्फ चोरी करते समय ही पकडा जा सकता है" त्यामुळे खाल्लेल्या मिठाशी उर्फ बोललेल्या संवादाशी प्रतिबध्द राहुन अभिषेक आमिर च्या मागावर असतो.... तेव्हढ्या आमिर ला कळते अभिषेक माझ्या मागावर आहे .. तो लगेच बाईक थांबवतो आणि मागे वळुन अभिषेक शी बोलु लागतो......लगेच तिथे एक गाणे चालु होते.......
आमिरः लंबुजी लंबुजी .....
अभिषेकः बोलो टिंगुजी
आमिरः- मेरे रस्ते मे टांग ना अडाना.. मेरे रस्ते मे टांग ना अडाना..
अभिषेकः इस फॉरेन की बँक को हात ना लगा ना हो हाथ ना लगाना ...
Pages