दीड दमडीचा धुमड्या (Movie Review - Dhoom - 3)

Submitted by रसप on 23 December, 2013 - 00:21

"ट्रकच्या मागे लिहिलेली वचनं" हा तत्वज्ञानाचा एक अविरत स्त्रोत आहे. द व्हेरी फेमस 'बुरी नजरवाले, तेरा मूह काला' पासून अनेक उत्तमोत्तम शेरही मी तिथे वाचलेत. पण अगदी हल्लीच, काही दिवसांपूर्वीच एका ट्रकवर वाचलेलं वचन मात्र सगळ्यांवर कडी असावं -
"भाई हो तो ऐसा, ना मांगे हिसाब ना मांगे पैसा !!"
ह्याच उदात्त विचारसरणीचा एक जादूगार नव्वदच्या दशकात शिकागोमध्ये होऊन गेला, हे काल धूम-३ पाहिल्यावर समजलं. पण हा जादूगार तर ट्रकवाल्या पेक्षाही उदात्त विचारसरणीचा असतो. तो अशी अपेक्षा स्वत:च्या भावाकडून नव्हे, तर बँकेकडून ठेवतो आणि कर्ज घेतो. पण ती बँक म्हणजे महाराष्ट्र सरकार नसतं आणि कर्ज घेणारा कुणी शेतकरीही नसतो. त्यामुळे व्यवहारास चोख बँक, हफ्ते चुकवणाऱ्या जादूगाराला नोटिशीची जादू दाखवते आणि हबकलेला हताश जादूगार आत्महत्या करतो. त्याने आत्महत्या केल्यावरही बँकेच्या अधिकाऱ्याचं हृदय द्रवत नाही. बिच्चाऱ्याला ट्रकवाला व जादूगाराचे उदात्त विचार माहित नसतात. तो जादूगाराची तारण मालमत्ता जप्त करवतो आणि त्या जादूगाराचा लहान मुलगा, मोठा झाल्यावर बँकेच्या कायदेशीर कारवाईचा बेकायदेशीर बदला घेतो. मायला ! चोर तो चोर, वर शिरजोर ? असाच आहे धुमड्या, अर्थात धूम - ३.

धुमड्याची सुरुवात आश्वासक होते. आमिरची सनी लिओनीश पाठ दिसेपर्यंतची पहिली काही मिनिटं आपल्या अपेक्षा उंचावतात. नंतर कैच्याकै भंकस सुरु होते. बाईक चालवणारा चोर आमिर स्वत:चे तोंडही लपवत नाही आणि अमेरिकेचे पोलिस इतके दुधखुळे असतात की ते त्याला ओळखू शकत नाहीत. लगेच पुढच्या दृश्यात अभिषेक आणि उदय चोप्रा कृत गुंडांची पिटाई दाक्षिणव्रात्य सिनेमाला लाजवेल अशी आहे. पुढल्या चाकावर गोल गोल फिरणारी रिक्षा पाहिल्यावर तिचा स्टिअरिंग कॉलम बनवाणाऱ्या कंपनीच्या मालकाचा उर अभिमानाने भरून आला नसेल, तरच नवल !
केवळ दोन चोऱ्या करून अमेरिकन पोलिसदलास हवालदिल करणाऱ्या एक अज्ञात चोरास पकडण्यासाठी, दोन धुमड्यांतील सुपरफ्लॉप कामगिरीनंतरही आंतरराष्ट्रीय 'सुपरकॉप' ठरलेल्या 'जय दीक्षित'ला (अभिषेक बच्चन) खास भारतातून बोलावले जाते. कारण कदाचित हे असावं की, हा चोर (आमिर खान) चोरी केल्यावर हिंदीत निरोप सोडत असतो - "तुम्हारी ऐसी की तैसी." गाड्याबरोबर नळ्याची यात्रा होते, तसा जयबरोबर 'अली'ही (उदय चोप्रा) येतोच !
पुढे काही बाही होत राहतं आणि सगळ्याचा हिशोब थोडक्यात मांडायचा झाल्यास - सुमारे ३ तासाच्या धुमड्यात तासभर बाईक्स व्रुमव्रुमत राहतात. तासभर आमिरवरून कॅमेरा हलत नाही. अर्धा तास गाणी, नाच, सर्कशीत जातो. १५ मिनिटं अभिषेक बच्चनच्या नाकावरील माशी उडवण्याच्या असफल प्रयत्नात जातात आणि उर्वरित १५ मिनिटं उदय चोप्रा प्रेक्षकांना वात आणण्यासाठी वापरतो. कतरिना पानात कतरी सुपारी असते, तशी हरवते किंवा पोह्यांवर भुरभुरवलेल्या खोबऱ्यासारखी नुसतीच दिसते.

dhoom-3-3a.jpg

आमिरचे बचकांडेपण कधी नव्हे इतकं धुमड्यात जाणवतं. त्या बाईक्सचा धुडांवर बसल्यावर त्याचे पाय खाली कसे पोहोचत असतील, हा एक संशोधनाचा विषय आहे.
दोरावरून बाईक चालवून एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डींगमध्ये जाणे असो की चालू-चालूमध्ये बाईक बोटमध्ये कन्व्हर्ट होणं असो की दोन बाईक्स एकमेकांना खटाखट जोडल्या जाऊन त्यांची एक चार चाकी बनून तिने उडी मारणं असो, सगळंच आजच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतील असामान्य बुद्धिमानांसाठी एक जबरदस्त 'फूड फॉर थॉट' ठरायला हरकत नाही.
एकंदरीतच सगळे पाठलाग, स्टण्ट्स बॉन्ड-फॉण्ड, स्पायडर-वायडर मॅनांनी शिकवणी लावावी असेच.

धुमड्या संपल्यावर जरा वेळाने शांतपणे विचार केल्यावर लक्षात आलेल्या चार गोष्टी -

१. आमिर आणि शाहरुखमध्ये काही फारसा फरक नाही. दोघेही स्वत:च्या प्रेमात आकंठ बुडलेले आहेत. 'जतहैंजा' मधला समर आणि धुमड्यातला समर दोघेही सारखेच पकवतात.
२. उदय चोप्रा हे यश चोप्रांना पडलेलं एक भयानक स्वप्न असावं, जे खरं झालंय.
३. प्रत्येक सिनेमागणिक अभिषेक बच्चन एक लांबलचक ठोकळा बनत चालला आहे.
४. रोहित शेट्टी, तू एकटा नाहीस.

साधारण साडे नऊला धुमड्या संपला. माझ्या सुदैवाने दहा वाजता कलर्सवर '24' चा शेवटचा भाग होता. आमिरने केलेल्या घोर अपेक्षाभंगावर अनिल कपूरने अप्रतिम साकारलेला 'जयसिंग राठोड' एक उत्कृष्ट उतारा होता. त्यामुळे पराकोटीचा निराश झालेलो असतानाही मी शांतपणे झोपी जाऊ शकलो आणि सुचलेल्या बऱ्याच शिव्या विसरू शकलो !
थँक यू, अनिलकाका !

रेटिंग = जतहैंजा
http://www.ranjeetparadkar.com/2013/12/movie-review-dhoom-3.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधारण साडे नऊला धुमड्या संपला. माझ्या सुदैवाने दहा वाजता कलर्सवर '24' चा शेवटचा भाग होता. आमिरने केलेल्या घोर अपेक्षाभंगावर अनिल कपूरने अप्रतिम साकारलेला 'जयसिंग राठोड' एक उत्कृष्ट उतारा होता. त्यामुळे पराकोटीचा निराश झालेलो असतानाही मी शांतपणे झोपी जाऊ शकलो आणि सुचलेल्या बऱ्याच शिव्या विसरू शकलो ! >>>>>>>>>>>>> Sad
मी नेमका ९ चा शो बघायला गेलेलो...... Angry

काही काही पिक्चर्स ग्रुप बरोबर जाउन टवाळाक्या करत पहायला याव ह्यासाठी बनतात हो , समझा करो . Happy सगळे रिव्ह्यु वाचून मला आमच्या कॉलेजच्या गॅन्ग ची अन म्याटीनी सिनेमांची आठवण येतेय Happy ग्रुपातले काही बाइक्स पहातात, काही शिट्या स्पेशालिस्ट असतात, काही लॉजिकची चिरफाड करायला धावणारे, काही शिकागो पहायला आलेले,काही कतरीना ला पहायला आलेले, काही थेटरातल्या इतरांना, उरलेले ही भट्टी एन्जॉय करायला .

हो....... झालाच ....कधी नाही ते "आमिर खान" साठी खास गेलेलो... मला वाटले "द-लाश" पासुन काहीतरी बोध घेतला असेल त्याने Biggrin कसे काय... "द-लाश" ग्रेट होता असे म्हणावे लागेल Happy

१. आमिर आणि शाहरुखमध्ये काही फारसा फरक नाही. दोघेही स्वत:च्या प्रेमात आकंठ बुडलेले आहेत. 'जतहैंजा' मधला समर आणि धुमड्यातला समर दोघेही सारखेच पकवतात.
२. उदय चोप्रा हे यश चोप्रांना पडलेलं एक भयानक स्वप्न असावं, जे खरं झालंय.
३. प्रत्येक सिनेमागणिक अभिषेक बच्चन एक लांबलचक ठोकळा बनत चालला आहे.
४. रोहित शेट्टी, तू एकटा नाहीस. <<< Lol

धुमड्या<<< Lol

रसप .....................

आमिर खान चे नाव "समर" नाही "साहिर" आहे......... तु मिक्सअप केलेस Wink

कायबिएन डोंबलाचे मतः-
तुटकी फुटकी बातमी......

आताच आलेल्या बातमी नुसार मुंबई पोलिसांनी बहुचर्चित धुम -३ चित्रपट पाहिल्या नंतर विधान सभे वर मोर्चा नेला आहे.. पोलिसांच्या शिष्टमंडळाने राज्याचे गृहमंत्री श्री आर आर पाटील यांची भेट घेउन त्यांच्या जवळ एकमुखाने मागणी केली आहे..की "धुम सिरीज मधल्या एसीपी जय दिक्षित आणि इंस्पेक्टर अली यांना तत्काळ बडतर्फ करावे अथवा "सीआरएस" देउन त्यांना सेवानिवृत्त करावे" तीनही चित्रपटात चोराला पकडण्यात अपयश आल्याने तसेच अतिशय सुमार अभिनय करुन पोलिसांची आब्रु सिनेमागृहाच्या वेशीवर टांगल्याने त्यांना शिक्षा करण्यात यावी आणि अश्या प्रकारचा अभिनय करणार्या अभिनेत्यांना आधारवाडी अथवा येरवडा तुरुंगात डांबण्यात यावे आणि त्यांना येताजाता उठता बसता "पोकळ बांबुचे फटके" देण्यात यावे. या मागण्या सुध्दा करण्यात आलेल्या आहे

त्या बाईक्सचा धुडांवर बसल्यावर त्याचे पाय खाली कसे पोहोचत असतील, हा एक संशोधनाचा विषय आहे.
+ १००००००

बाकी परिक्षण नेहमीसारखे मस्तच.. मी तशीही आमिर फॅन नाहीय त्यामुळे पाहणार नव्हतेच, पण परिक्षणाने मस्त करमणुक केली. धन्यवाद.

oops Sad हा चित्रपट पहावा की नको असा विचार सुरू होता.. आमिरच्या प्रेमापोटी मी त्याचा 'मेला' आणि 'मन' हे दोन्ही (टीव्हीवर.. थिएटरमध्ये नाही.. एवढे पैसे कोण घालवणार) चित्रपट पाहिले आहेत. पण आता सगळीकडूनच या चित्रपाटावर यथेच्छ टीका सुरू आहे म्हटल्यावर कष्ट करून कमावलेले पैसे आणि वेळ वाया घालवणे म्हणजे पायावर कु-हाड मारून घेण्यासारखे आहे, हे अस्मादिकांच्या लक्षात आले आहे. so, घरी बसून आमिरचे जुने व चांगले चित्रपट (जो जिता वही सिकंदर, सरफरोश, अंदाज अपना अपना) पाहीन म्हणत्ये.. btw जतहैजा रेटिंग देण्याइतपट वाईट आहे? आणि तोपण आमिरचा चित्रपट? हे वाचून कससचं झालयं... कठीण आहे. Sad

btw... हा दोष 'समर' या नावाचा तर नव्हे??? Wink जतहैजामध्ये पण समर आणि इथेही तेच.. म्हणून विचारलं...

त्या बाईक्सचा धुडांवर बसल्यावर त्याचे पाय खाली कसे पोहोचत असतील,>> मला ही ह प्रश्न पडलेला

Rofl

हा चित्रपट बघणार नव्हतोच. हल्लीचे हिंदी सिनेमे बघणं केव्हाच सोडून दिलंय. पैसा आणि वेळेचा अपव्यय शिवाय आपल्या आयक्युचा अपमान. चायला.

मी आमिर खानचे थेटरात फर्स्ट डे फर्स्ट शोला पाहिलेले पिक्चरः
गझनी, मेला, मन, परंपरा, आतंक ही आतंक!!!

धूम ३ पाह्यला असतात तर लिस्ट अजून छान दिसली असती नै!!

.

एकदम टूकार!!!! बाईक्सची अ‍ॅड आहे हा मूवी.

आमिर सारख्या बुटक्याला घेवून एकदम चूक केलीय.

अभिषेक बिचारा तग धरायचा प्रयत्न करतो पण कसले काय.. उदय चोप्रा बर्‍याच (नाकाच्या वगैरे) सर्जर्‍या करून जरा बरा दिसतो एवढेच म्हणून शकतो त्याच्याबाबातीत.

कतरीना- हि काय करतेय इथे?

मला फक्त धूम आवडलेला.... हे नंबर लागले की घसरता एकदम.

धूम२, धूम ३ बंडल....

वाट्च बघत होते या परीक्षणा ची, पण रसप थोडक्यात आटोपलत. Sad
तुम्हाला आमिर ने चांगली संधी दिलेली, तुम्ही वाया घालवलीत.
काल सिनेमा बघितल्यावर तुमचे परीक्षण वाचण्या ची उत्सुकता होती, आमिर आणि तुम्ही दोघांनीही निराश केलेत.

शेवटाचे चार मुद्दे 'क ह र' आहेत!

धमाल लिहीलंस.
प्रत्येक रोलसाठी ठराविक काही गोष्टी "key" असतात. त्याचा विचार व्हायलाच हवा आहे.
पोलिस ऑफिसर म्हणताच डोळ्यासमोर बुटका, किडमिडा, अशक्त व्यक्ती नजरेसमोर येत नाही. तर रानटी, मस्तवाल, मिशीवाला बाप्या समोर येतो.
धूम प्रकाराची कॉन्सेप्ट पाहता, चोर अतिशय हूशार, टॉल अ‍ॅंड हँडसम आहेत, शिवाय बाईक राईडर म्हणून शोभणारी व्यक्ती हवी. अभिनयात आमिर इतरांना खाऊन टाकतो, खरं असलं तरी पर्स्नॅलिटीला साजेसा प्रयोग असावा.

"चोरी" हे धूम कॉन्सेप्ट्च वैशिष्ट्य इथे गडबडलेलं असल्यानं पिच्चर बाराच्या भावात गेल्याच समजतंय, शिवाय याआधीचे सगळे धूमडे हिरो असल्याने भावले, हा सूपरहिरो करण्याच्या नादात अजूनच वाट लागलीये.

बाकी, रणजित रेटिंग देण्याची "जतहैजा" स्टाईल भन्नाट Lol

आणि कतरिना वाला परिच्छेद तर :हहपुवा:

Pages