
पुढे सांगते ना
साक्षात्कार
हं तर इथल्या सगळ्या सुग्रणी आणि सुग्रण्यांनो,
ही कहाणी आहे मला झालेल्या साक्षात्काराची!!!
दिनांक १८ डिसेंबर २०१३ , रात्री ८ ते ८.३० आणि हाच तो दिवस \[ किंवा हीच ती रात्र म्हणुयात हवं तर] आणि हीच ती वेळ जेव्हा मला साक्षात्कार झाला.
तर झालं असं की मी ती उद्योजक गोखल्यांची मालिका "होणार सुन मी या घरची" बघत होते. तर त्यातली आई आज्जी म्हणजे फार फार कर्तृत्ववान बाई. तिच्यासारखे मुगाचे डोसे कुण्ण कुण्णाला जमत नाहीत.अगदी इतकी वर्ष तिच्या सहवासात काढलेल्या श्री च्या सुगरण आईलाही [ नर्मदा] नाही.
पण कालच्या भागात ते जान्हवीला मात्र जमले , अगदी आईआज्जीसारखेच छान. अग श्री तिला म्हणत होता तूही आईआज्जीसारखीच कर्तृत्ववान आहेस. आणि हीच ती वेळ मला अचानक साक्षात्कार झाला की अरेच्चा मलाही छान जमतात की हे मुगाचे डोसे म्हणजे आपणही अगदी आईआज्जीसारखेच कर्तृत्ववान आहोत की कसलं भारी वाटलं मला मग. ताबडतोब रात्री साडेआठ वाजता मुग भिजत घातले , मध्यरात्री बरोब्बर एक वाजता अलार्म लावला आणि उठुन ते उपसले. आणि आज सकाळी बेकफास्टला मुगाचे डोसे तयार.
तर आता साहीत्य आणि कृतीकडे वळुयात.
१] एक वाटी मोड आलेले मुग
२] ८\१० लसुण पाकळ्या
३] मुठभर कोथिंबीर बारीक चिरुन
४] २ हिरव्या मिरच्या
५] तव्यावर घालण्याइतके तेल
६] चवीप्रमाणे मीठ
७] १ चमचा भाजलेले जिरे
ही झाली तयारी . आता प्रत्यक्ष कृती:
प्रथम जिरे , मिरच्या आणि लसुण पाकळ्या मिक्सरवर [माझ्याकडे पाटा वरवम्टा नसल्याने मि मिक्सरच वापरते मात्र इच्छुकांनी शक्य असेल तर पाटा वापरायला हरकत नाही ]बारीक वाटा . आता त्यातच मोड आलेले मुग थोडेसे पाणी बारीक घालून वाटा. छान डोशाच्या पिठासारखे झाले की त्यात भरपुर कोथिंबीर व मीठ घाला.
तव्याला तेलाचा हात पुसुन घ्या आणि त्यावर या तयार मिश्रणाचे मस्त पातळ डोसे घाला. झाकण ठेवायला विसरू नका. आता छानपैकी वास दरवळायला लागेल. याचा अर्थ आता झाकण काढा आणि डोसा उलटा. आणि थोड्याच वेळात मस्त पैकी डोसा तयार.
घ्या खाऊन पोटभर आता.
करुन बघा आणि कर्तृत्ववान असल्याचा हा पुरावा सादर करा
आईआज्जीच्या पानातला डोसा आणि माझा डोसा अगदी सारखेच दिसतायत.
बोंबलले माझे
बोंबलले माझे कर्तुत्व!
मिरच्या, लसुण पाकळ्या, जिरे, मीठ आणि कोथिंबीर (आमच्याकडे तोंडात आलेली चालत नाही), वाटले. त्यातच मोड आलेले मुग घालुन वाटले. पिठ थोडे कडु वाटले. तिथेच आम्चे नसलेले कर्तुत्व गळपाटल्याची शंका आली. आणी अतिशय यशस्वी तव्यावर पण ते उलटले जाइनात, मउ झाले, कच्चे राहु लागले, त्याने यावर शिक्कामोर्तबच झाले.
माकाचु?
मुग्धे माझे पण मुगाचे किवा
मुग्धे माझे पण मुगाचे किवा मिक्स डोसे मउच होतात पण मी ते तव्यावर टाकले की त्यावर झाकण ठेवते आणि २-३ मिन ने काढते.. मग त्याला जरा वेळ राहु देते...मग ते उलटले जातात....पातळ घालायचे.......थोड मिश्रण टाकुन वाटी किंवा डावेने गोल गोल पसरवायचे आणि पातळ करायचे
मनिषा. मी पण बर्याचदा केलेत
मनिषा. मी पण बर्याचदा केलेत मुगाचे डोसे, पण यवेळी खर्या अर्थाने कर्तुत्ववान ठरले. कुरकुरीत झाले होते आणि चक्क साबांकडुन न विचारता प्रतिसाद आला... मस्त झालेत. दुपारी नणंद आली तिला विचारल तुला डोसे देउ का, तर ती नको म्हणाली, तर तेव्हाही साबा म्हणाल्या अग खा मस्त झालेत..
है का नै कर्तुत्ववान?
अरे वा.....मुग्धटले....
अरे वा.....मुग्धटले....
केलेत मुगाचे डोसे, पण यवेळी
केलेत मुगाचे डोसे, पण यवेळी खर्या अर्थाने कर्तुत्ववान ठरले. कुरकुरीत झाले होते .........
कुरकुरीत कसे बै?
अगं पण कडु का झाले पीठ?
अगं पण कडु का झाले पीठ?
अगं पण कडु का झाले
अगं पण कडु का झाले पीठ?.......कोथिंबीर वाटून घातल्यावर पदार्थ कडवट होतो.
हो का? देवा?
हो का? देवा?
कोथिंबीर वाटून घातल्यावर
कोथिंबीर वाटून घातल्यावर पदार्थ कडवट होतो.???????? मी पण घालते तसं पण कडवट नाही होत......म्हणजे अजुनपर्यंत नाही झाला....
mi pan tray karnar mugache
mi pan tray karnar mugache dose mhanje pudhe lagn zalyavr sasari "kartutvawan" hoin :p :p :p
मी केले आज डोसे, चवीला मस्तच
मी केले आज डोसे, चवीला मस्तच झाले होते,कैरी पण किसून टाकली होती
पण मेले ते नीट उलटलेच गेले नाहीत,थोडे थोडे तांदळाचे पीठ टाकत गेले ,
शेवटी शेवटी मस्त उलटले गेले पण ते तांदळू मुगाचे घावन वाटत होते
मी कर्तृत्ववान नाही
मुग आधी कमी पाणी घालुन छान
मुग आधी कमी पाणी घालुन छान वाटुन घ्यायचे घट्टसर चटणी सारख मग हळुहळून थोड थोड पाणी घालुन हव तितक पात़़ळ करायच,
उलटत नसतिल तर २चमचे कणीक, १ चमचा बेसन घालुन मिक्स करुन तसच ठेवा.व्यवस्थि निघतिल.
Pages