
पुढे सांगते ना
साक्षात्कार
हं तर इथल्या सगळ्या सुग्रणी आणि सुग्रण्यांनो,
ही कहाणी आहे मला झालेल्या साक्षात्काराची!!!
दिनांक १८ डिसेंबर २०१३ , रात्री ८ ते ८.३० आणि हाच तो दिवस \[ किंवा हीच ती रात्र म्हणुयात हवं तर] आणि हीच ती वेळ जेव्हा मला साक्षात्कार झाला.
तर झालं असं की मी ती उद्योजक गोखल्यांची मालिका "होणार सुन मी या घरची" बघत होते. तर त्यातली आई आज्जी म्हणजे फार फार कर्तृत्ववान बाई. तिच्यासारखे मुगाचे डोसे कुण्ण कुण्णाला जमत नाहीत.अगदी इतकी वर्ष तिच्या सहवासात काढलेल्या श्री च्या सुगरण आईलाही [ नर्मदा] नाही.
पण कालच्या भागात ते जान्हवीला मात्र जमले , अगदी आईआज्जीसारखेच छान. अग श्री तिला म्हणत होता तूही आईआज्जीसारखीच कर्तृत्ववान आहेस. आणि हीच ती वेळ मला अचानक साक्षात्कार झाला की अरेच्चा मलाही छान जमतात की हे मुगाचे डोसे म्हणजे आपणही अगदी आईआज्जीसारखेच कर्तृत्ववान आहोत की कसलं भारी वाटलं मला मग. ताबडतोब रात्री साडेआठ वाजता मुग भिजत घातले , मध्यरात्री बरोब्बर एक वाजता अलार्म लावला आणि उठुन ते उपसले. आणि आज सकाळी बेकफास्टला मुगाचे डोसे तयार.
तर आता साहीत्य आणि कृतीकडे वळुयात.
१] एक वाटी मोड आलेले मुग
२] ८\१० लसुण पाकळ्या
३] मुठभर कोथिंबीर बारीक चिरुन
४] २ हिरव्या मिरच्या
५] तव्यावर घालण्याइतके तेल
६] चवीप्रमाणे मीठ
७] १ चमचा भाजलेले जिरे
ही झाली तयारी . आता प्रत्यक्ष कृती:
प्रथम जिरे , मिरच्या आणि लसुण पाकळ्या मिक्सरवर [माझ्याकडे पाटा वरवम्टा नसल्याने मि मिक्सरच वापरते मात्र इच्छुकांनी शक्य असेल तर पाटा वापरायला हरकत नाही ]बारीक वाटा . आता त्यातच मोड आलेले मुग थोडेसे पाणी बारीक घालून वाटा. छान डोशाच्या पिठासारखे झाले की त्यात भरपुर कोथिंबीर व मीठ घाला.
तव्याला तेलाचा हात पुसुन घ्या आणि त्यावर या तयार मिश्रणाचे मस्त पातळ डोसे घाला. झाकण ठेवायला विसरू नका. आता छानपैकी वास दरवळायला लागेल. याचा अर्थ आता झाकण काढा आणि डोसा उलटा. आणि थोड्याच वेळात मस्त पैकी डोसा तयार.
घ्या खाऊन पोटभर आता.
करुन बघा आणि कर्तृत्ववान असल्याचा हा पुरावा सादर करा
आईआज्जीच्या पानातला डोसा आणि माझा डोसा अगदी सारखेच दिसतायत.
माझा गैरसमज झाला.
माझा गैरसमज झाला.
मी मोडसुद्धा यायची वाट न
मी मोडसुद्धा यायची वाट न बघता, रात्री अख्खे मूग भिजत घालून, सकाळी ते लागेल तशा पाण्यात वाटून घेते. १ वाटी मुगाला २ चमचे (पोहे खायचा चमचा हे माप) तांदूळ असे भिजवते. लक्षात असेल तर मेथीदाणे घालते ५-६. आणि वाटताना मूठभर पातळ पोहे धुवून घालते.
शिवाय मीठ, ध-जि-पूड आणि मिरच्या, कोथिंबीर त्यात घालून छानपैकी डोसे करते!
मग मी किती कर्तृत्ववान असेन!
मी तर मग त्या आईआज्जीपेक्षा
मी तर मग त्या आईआज्जीपेक्षा सुपर कर्तृत्त्ववान की काय ते आहे!! कारण मी मागच्या वर्षीच ही रेसिपी करून पाहिली होती. काय सुरेख झाले होते मुगाचे डोसे!!
तांदळाचं पीठ थोडे क्रिस्पी
तांदळाचं पीठ थोडे क्रिस्पी व्हायला<< शूम्पे कर्तृत्ववान होण्यासाठी डोसे मौसुत हवेत :))
कर्तृत्ववान होण्यासाठी डोसे
कर्तृत्ववान होण्यासाठी डोसे मौसुत हवेत ) >> आमचं कर्तृत्व मौ न पडता कुरकुरीत रहातं म्हणायचं हा का ना का !
<<आमचं कर्तृत्व मौ न पडता
<<आमचं कर्तृत्व मौ न पडता कुरकुरीत रहातं म्हणायचं हा का ना का !>>
शुंम्पी... काय म्हणू? साष्टंग्ग दंडवत घालते!
आमचं कर्तृत्व मौ न पडता
आमचं कर्तृत्व मौ न पडता कुरकुरीत रहातं म्हणायचं हा का ना का !>>> हे भारी होतं D:
असे केलेले मूगडोसे घशाला ठेपत
असे केलेले मूगडोसे घशाला ठेपत नाहीत का? नुस्ती मूगी मूगी चव मला घशाला नको वाटते. मी एक अख्खा डोसा पण नाही खाऊ शकत. माझं काही चुकत असेल का?
घाबरू नकोस वल्लरी मूगाचे डोसे
घाबरू नकोस वल्लरी मूगाचे डोसे करायला कर्तृत्व लागते खायला नाही
हो वल्लरी म्हणूनच थोडे
हो वल्लरी म्हणूनच थोडे तांदूळपिठ किंवा बेसन किंवा रवा वापरायचा म्हणजे ते घशाला लागत नाही आणि मुगाचा विशिष्ट वास येत नाही.
धाग्याने शंभरी गाठलेली पाहून
धाग्याने शंभरी गाठलेली पाहून मुगाला कसला साक्षात्कार झालाय ते बघावं.... असे म्हणून आलो खरा पण आता मूग गिळून गप्प बसावे हेच उत्तम...;)
मग कागदात एत्श शोशले जाउन
मग कागदात एत्श शोशले जाउन वाया नाही का जाणार?
हे बोबडे बोल कोणी डिसायफर करुन इथे लिहिल का???
साधना+१ अग काय
साधना+१

अग काय
रेसिपी आणि प्रतिक्रिया भारीच.
रेसिपी आणि प्रतिक्रिया भारीच.
कर्तृत्ववान होण्यासाठीचे
कर्तृत्ववान होण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणुन मूग भिजत घलण्यात आले आहेत
आमच्याकडे मुग दळुन आणुन
आमच्याकडे मुग दळुन आणुन त्याचे डोसे करणार आहेत उद्या...
च्..च.. बिचारे मूग......
च्..च.. बिचारे मूग...... कर्तृत्ववान व्हायचंय कोणाला आणि भरडले जातायेत कोण........
जोराते धागा. ही आय्डीया
जोराते धागा.
ही आय्डीया ब्येस आहे. आपण डोसे बनवून कर्तृत्ववान बनायच आणि खाणार्यानी मुग गिळायचे.
काल मुगाचे डोसे प्रकार झाला.
काल मुगाचे डोसे प्रकार झाला. साबा कर्तुत्ववान आहेत माझ्या
मी पण कर्तृत्ववान झाले या
मी पण कर्तृत्ववान झाले या रविवारी..

मस्त झालेले डोसे
थँक्स
मी यालाच आधी मुगाची धि
मी यालाच आधी मुगाची धि म्हणायचे !
म्हणलं जरा तुमच्यासारखं मुगाचे डो करून क**वान का काय ते व्हावं !
पण जळ्ळं मेलं लक्षण मुगाच्या गोधड्या झाल्यात
ते सिरीलीत घालतात तसं पाणी घालून पातळ करावं का ?
मग मुगाची आमटी करावी लागेल
मग मुगाची आमटी करावी लागेल
मी पण कुरकुरित कर्तुत्ववान !
मी पण कुरकुरित कर्तुत्ववान ! त्यामुळे घरातली सारी माणसे आज मुग गिळुन :ड
मी अर्धी वाटी मूग + अर्धी
मी अर्धी वाटी मूग + अर्धी वाटी मसूर + अर्धी वाटी लाल लहान चवळी भिजत घातली...दुसर्या दिवशी त्यात ८ पाकळ्या लसुण , ५ मिरच्या , जीरं ,मीठ , तांदुळ पीठ , थोडी साखर आणि पाणी घालुन मिक्सर मधुन काढुन डोसे केले...
मस्त झालेले...
हे २ माणसांसाठी नाश्त्याचं
हे २ माणसांसाठी नाश्त्याचं प्रमाण
रेसिपी पण छान आणि तुम्ही
रेसिपी पण छान आणि तुम्ही लिहीलं पण खुप छानं...
>मी पण कुरकुरित कर्तुत्ववान !
>मी पण कुरकुरित कर्तुत्ववान ! त्यामुळे घरातली सारी माणसे आज मुग गिळुन :ड<<
हे स्वःघोषित आहे आणि त्यात घरची आज मूग गिळून (डोसे चांगले / वाईट सांगु शकत नाही ना) त्यामुळे बाद ठरु शकते
ह. घ्या.
अने ५ मिरच्या??? जामच बाई
अने ५ मिरच्या??? जामच बाई तिखट हो तू!!!
(उन्हाळ्यात कमी खा मिरच्या)
आमी अजून कर्तृत्ववान व्हायचोत... नवर्याने तंबी दिलेय उडीद नी तांदळाचे डोसे खाऊ घालतेस तेवढे पुरे. ते मूग कच्चे गिळेन त्यापेक्षा (नाहीतरी रोज गिळतोच तुझ्यापुढे काय करणार!) पण हे अस्ले प्रकार खाऊ घालण्यापेक्षा आपले कर्तृत्व नॉनव्हेज पदार्थात दाखवून चिकन, मटण, फिश आणि आम्हालाही उपकृत करा.
काय करणार बै... कर्तृत्व दाखवायची संधीच देत नाहीत घरचे....
नाहीतर आईआज्जी पण चकीत झाल्या असत्या माझं कर्तृत्व बघून ... भला उसके डोसे मेरे डोसोंसे कुरकुरीत खमंग कैसे!! 
आमचं कर्तृत्व मौ न पडता
आमचं कर्तृत्व मौ न पडता कुरकुरीत रहातं म्हणायचं हा का ना का !>> शूम्पी पंच!!

) साहित्यच भारी वाटतंय. धन्स. 
अगदी अगदी
प्रज्ञा९ तू सुचवलेल्या पद्धतीने करून बघेन (माझ्यापुरतेच... त्यामुळे ..कर्तृत्व बिर्तृत्वची भानगडच नको
स्वप्ने.... कमी तिखटा च्या
स्वप्ने.... कमी तिखटा च्या मिरच्या.. हे डोसे मस्त लगतात टोमेटो सॉस बरोबर....
Pages