साक्षात्कारी मुगाचे डोसे

Submitted by मनिषा लिमये on 18 December, 2013 - 23:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पुढे सांगते ना

क्रमवार पाककृती: 

साक्षात्कार
हं तर इथल्या सगळ्या सुग्रणी आणि सुग्रण्यांनो,
ही कहाणी आहे मला झालेल्या साक्षात्काराची!!!
दिनांक १८ डिसेंबर २०१३ , रात्री ८ ते ८.३० आणि हाच तो दिवस \[ किंवा हीच ती रात्र म्हणुयात हवं तर] आणि हीच ती वेळ जेव्हा मला साक्षात्कार झाला.
तर झालं असं की मी ती उद्योजक गोखल्यांची मालिका "होणार सुन मी या घरची" बघत होते. तर त्यातली आई आज्जी म्हणजे फार फार कर्तृत्ववान बाई. तिच्यासारखे मुगाचे डोसे कुण्ण कुण्णाला जमत नाहीत.अगदी इतकी वर्ष तिच्या सहवासात काढलेल्या श्री च्या सुगरण आईलाही [ नर्मदा] नाही.
पण कालच्या भागात ते जान्हवीला मात्र जमले , अगदी आईआज्जीसारखेच छान. अग श्री तिला म्हणत होता तूही आईआज्जीसारखीच कर्तृत्ववान आहेस. आणि हीच ती वेळ मला अचानक साक्षात्कार झाला की अरेच्चा मलाही छान जमतात की हे मुगाचे डोसे म्हणजे आपणही अगदी आईआज्जीसारखेच कर्तृत्ववान आहोत की कसलं भारी वाटलं मला मग. ताबडतोब रात्री साडेआठ वाजता मुग भिजत घातले , मध्यरात्री बरोब्बर एक वाजता अलार्म लावला आणि उठुन ते उपसले. आणि आज सकाळी बेकफास्टला मुगाचे डोसे तयार.
तर आता साहीत्य आणि कृतीकडे वळुयात.
१] एक वाटी मोड आलेले मुग
२] ८\१० लसुण पाकळ्या
३] मुठभर कोथिंबीर बारीक चिरुन
४] २ हिरव्या मिरच्या
५] तव्यावर घालण्याइतके तेल
६] चवीप्रमाणे मीठ
७] १ चमचा भाजलेले जिरे
ही झाली तयारी . आता प्रत्यक्ष कृती:
प्रथम जिरे , मिरच्या आणि लसुण पाकळ्या मिक्सरवर [माझ्याकडे पाटा वरवम्टा नसल्याने मि मिक्सरच वापरते मात्र इच्छुकांनी शक्य असेल तर पाटा वापरायला हरकत नाही ]बारीक वाटा . आता त्यातच मोड आलेले मुग थोडेसे पाणी बारीक घालून वाटा. छान डोशाच्या पिठासारखे झाले की त्यात भरपुर कोथिंबीर व मीठ घाला.
तव्याला तेलाचा हात पुसुन घ्या आणि त्यावर या तयार मिश्रणाचे मस्त पातळ डोसे घाला. झाकण ठेवायला विसरू नका. आता छानपैकी वास दरवळायला लागेल. याचा अर्थ आता झाकण काढा आणि डोसा उलटा. आणि थोड्याच वेळात मस्त पैकी डोसा तयार.
घ्या खाऊन पोटभर आता.
करुन बघा आणि कर्तृत्ववान असल्याचा हा पुरावा सादर करा

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात दोन डोसे होतात
अधिक टिपा: 

आईआज्जीच्या पानातला डोसा आणि माझा डोसा अगदी सारखेच दिसतायत.

माहितीचा स्रोत: 
चूकुन जास्त मुग भिजवले गेल्यामुळे ते संपवण्यासाठी केलेला यशस्वी प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना, अग शब्द नीट लिहीण्यात काही नसत. जे काही असत ते मुगाच्या डोस्यात. आणि मी कॉपी पेस्ट न करता स्वत:हून लिहिले बर का!

मी पण हिरव्या सालीची मुगाची डाळ भिजत टाकून मग बाकी सर्व तुम्ही सांगितलेले साहित्य घालून नेहमी करते डोसे. Happy Happy :

आणि तेलाचा हात तव्याला पुसण्यासाठी कुठल्या तेलात हात किती बुडवायचा आणि असा तेलाने निथळत असलेला हात गरम तव्याला पुसताना तळव्याचाच डोसा होऊ नये म्हणुन काय काळजी घ्यावी तेही लिहा कोणीतरी. Proud

तेलाचा हात तव्याला पुसण्यासाठी >>>>>>>>>>>> ए हा प्रकार मला खरच माहित नाहिये.. मी चमच्याने तव्यावर तेल सोडते.. खरच तेलाचा हात तव्याला कसा पुसतात? की गार तव्याला हात पुसुन नंतर तवा तापवायचा?

छान लागतात हे डोसे. आम्ही कोरडेच आख्खे मुग दळुन आणतो. ऐन वेळेवर त्यात पाणी टाकुन व नुसतं तीखट्,मीठ, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबिर (आवडत असल्यास लसुण ठेचुन) घालुन केले की पटकन होतात आणि मस्त स्वाद.हे ही खुप पौष्टीक असतात. आमच्या बाबांना डायबेटीसवर कुणीतरी हे खाण्याचा सल्ला दिला होता.

चला डोसे करून कर्तुत्व दाखवायची वेळ आलिये..... आईआज्जींना म्हणाव इकडे माबो वर या एकसे एक कर्तुत्ववान डोसे खायला.... परत कधी डोसेच खाणारं नाहीत..... Biggrin

की गार तव्याला हात पुसुन नंतर तवा तापवायचा?<<<<<<<<< हो असंच करते मी.

तेलाबीलात बुचकळायचा नाही हात बर्का साधनातै. फकस्त एक थेंब तव्यावर घालायचा आणि तो हाताने तव्याला चोळायचा म्हणजे डाएटपण होत बरं

डोश्यांपेक्षा रिप्लाय लै भन्नाट आलेत<<< म्हणजे डोसे भन्नाट नाह्वीयेत असं म्हणायचंय का पुण्याची विनिता तुम्हाला Wink

की गार तव्याला हात पुसुन नंतर तवा तापवायचा?<<<<<<<<< हो असंच करते मी.>>>>>> ओक्के.. धन्स.. अन दुसरा डोसा करताना काय करायचं मग?

मी निर्लेप तव्यावर करते त्यामुळे पहिल्यांदा घातलेलच तेल मला पाच डोश्यांना पुरतं [अडिच माणसे घरात असल्याने पाचाहुन जास्त डोसे कधी केलेच नाहीयेत त्यामुळे माहीत नाही]

पेसरट्टू? कोण ते मुगाच्या डोशांना नावं ठेवतय?
तुम्हाला माहितीये का... श्री लहान असताना आईआज्जीनं मुगाचे डोसे केले होते. त्याला तो पेसरट्टू म्हणाल्यावर जे काही रट्टे मिळालेत...
त्यामुळे त्याचं असं (आताचा श्री) झालय.. म्हैतै?
तेव्हा... हे मुगाचे डोसेच.

म्हणा.. मुगाचे डोसे (तिनदा म्हणा. मी लिहिणार नाहीये तिनदा).

पेसरट्टूच म्हणणार आम्ही.

नुसते डोसे करून कर्तुत्ववान होणं सिद्ध होत असेल आमच्या सेल्व्हीबाई अतिअतिअतिकर्तुत्ववान आहेत. मुगाचे झालंच तर गव्हाचे, ज्वारीचे, पोह्याचे, बेसनाचे हाताला येइल त्या डब्यातल्या पदार्थच्चे डोसे बनवते.

पाचाहून जास्त डोसे केल्याचं स्मरत नाही>>>>> हायला टिंबे, क्कॉय लक्की आहेस....आमच्याकडे तुझे डोसे गुणिले ८ /९ एकावेळेस लागतात, त्यामुळे मी मिळेल त्या तव्यावर डोसे घालत सुटते....;)

प्रिय टिंब, टिंबुकली
डोसे मस्तच असणार.. मला मूग़ आणण्यापासून सुरुवात आहे त्यामुळे जरा थांबा

फोटो मस्त आहे.
मी पण मोड आलेल्या जास्तीच्या मुगांचे असेच दोसे करते पण मी त्याला मुगाची धिरडी म्हणायचे इतके दिवस. मी पण कर्तुत्ववान कि काय आहे म्हणजे. Proud

प्रतिसाद Lol

Pages