साक्षात्कारी मुगाचे डोसे

Submitted by मनिषा लिमये on 18 December, 2013 - 23:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पुढे सांगते ना

क्रमवार पाककृती: 

साक्षात्कार
हं तर इथल्या सगळ्या सुग्रणी आणि सुग्रण्यांनो,
ही कहाणी आहे मला झालेल्या साक्षात्काराची!!!
दिनांक १८ डिसेंबर २०१३ , रात्री ८ ते ८.३० आणि हाच तो दिवस \[ किंवा हीच ती रात्र म्हणुयात हवं तर] आणि हीच ती वेळ जेव्हा मला साक्षात्कार झाला.
तर झालं असं की मी ती उद्योजक गोखल्यांची मालिका "होणार सुन मी या घरची" बघत होते. तर त्यातली आई आज्जी म्हणजे फार फार कर्तृत्ववान बाई. तिच्यासारखे मुगाचे डोसे कुण्ण कुण्णाला जमत नाहीत.अगदी इतकी वर्ष तिच्या सहवासात काढलेल्या श्री च्या सुगरण आईलाही [ नर्मदा] नाही.
पण कालच्या भागात ते जान्हवीला मात्र जमले , अगदी आईआज्जीसारखेच छान. अग श्री तिला म्हणत होता तूही आईआज्जीसारखीच कर्तृत्ववान आहेस. आणि हीच ती वेळ मला अचानक साक्षात्कार झाला की अरेच्चा मलाही छान जमतात की हे मुगाचे डोसे म्हणजे आपणही अगदी आईआज्जीसारखेच कर्तृत्ववान आहोत की कसलं भारी वाटलं मला मग. ताबडतोब रात्री साडेआठ वाजता मुग भिजत घातले , मध्यरात्री बरोब्बर एक वाजता अलार्म लावला आणि उठुन ते उपसले. आणि आज सकाळी बेकफास्टला मुगाचे डोसे तयार.
तर आता साहीत्य आणि कृतीकडे वळुयात.
१] एक वाटी मोड आलेले मुग
२] ८\१० लसुण पाकळ्या
३] मुठभर कोथिंबीर बारीक चिरुन
४] २ हिरव्या मिरच्या
५] तव्यावर घालण्याइतके तेल
६] चवीप्रमाणे मीठ
७] १ चमचा भाजलेले जिरे
ही झाली तयारी . आता प्रत्यक्ष कृती:
प्रथम जिरे , मिरच्या आणि लसुण पाकळ्या मिक्सरवर [माझ्याकडे पाटा वरवम्टा नसल्याने मि मिक्सरच वापरते मात्र इच्छुकांनी शक्य असेल तर पाटा वापरायला हरकत नाही ]बारीक वाटा . आता त्यातच मोड आलेले मुग थोडेसे पाणी बारीक घालून वाटा. छान डोशाच्या पिठासारखे झाले की त्यात भरपुर कोथिंबीर व मीठ घाला.
तव्याला तेलाचा हात पुसुन घ्या आणि त्यावर या तयार मिश्रणाचे मस्त पातळ डोसे घाला. झाकण ठेवायला विसरू नका. आता छानपैकी वास दरवळायला लागेल. याचा अर्थ आता झाकण काढा आणि डोसा उलटा. आणि थोड्याच वेळात मस्त पैकी डोसा तयार.
घ्या खाऊन पोटभर आता.
करुन बघा आणि कर्तृत्ववान असल्याचा हा पुरावा सादर करा

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात दोन डोसे होतात
अधिक टिपा: 

आईआज्जीच्या पानातला डोसा आणि माझा डोसा अगदी सारखेच दिसतायत.

माहितीचा स्रोत: 
चूकुन जास्त मुग भिजवले गेल्यामुळे ते संपवण्यासाठी केलेला यशस्वी प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नही sssssssssssssss
माझ्या मुगाच्या डोस्यात थोडे तांदूळ असतात, म्हणजे माझी कर्तृत्ववान व्हायची रेसिपी चुकली......हे भगवान. आता मी कोणत्या तोंडाने (हाताने) पुन्हा मुगाचे डोसे करु ?

चूकुन जास्त मुग भिजवले गेल्यामुळे ते संपवण्यासाठी केलेला यशस्वी प्रयोग <<< बरीच कर्तृत्ववान दिसते आहेस Lol

मी पण करुन बघणार आणि कर्तृत्ववान होणार Happy

मस्त. माझे आणि सानुचे लाडके आहेत हे डोसे. मने मने मने म्हणजे मी पण कर्तृत्ववान.. की कायसिशी आहे की.

वर मला गेल्या वर्षी झालेला साक्षात्कार ह्याला अडाई म्हणतात (न आंबवता केलेल्या डोश्याला) इती मंजुडी. म्हणजे ती आईआज्जीपेक्षा जास्त कर्तृत्ववान आहे.

सामी, मी तर मोड आलेले मुग नसले तर साधी मुगाची डाळ/ सालीसकटची डाळ+ तांदुळ आज काल तर मटकीची डाळ् असं बरच काही पौष्टीक त्यात घालते. थोड्याचे डोसे, थोड्याचा ढोकळा, थोड्याचे अप्पे करते. आपण आ.आ. पेक्षा जास्त घटक घालतो म्हणजे आपण जास्त कर्तृत्ववान आहोत असं म्हणून पाठ थोपटून घे बरं स्वतःचीच Wink

कवे नाव असलेला प्रतिसाद जरा आधी लिहीला असता तर माझे कष्ट वाचले असते.. या साक्षातकारणीला शोधण्याचे.. नावावर क्लिक करा,, मग लेखण .. मग अंदाज घ्या.. एव्हड्या वेळात हे असे १० डोसे खाल्ले असते मी Wink

पण या डोस्याला काहीतरी वेगळे नाव आहे.. मला काही आठवेणा Uhoh

अदिती नक्की करुन बघ.
कवे आता तू माझी मैत्रीण म्हणजे तूही करतुतववान की कायस असणारच ना ग.
ए पण त्यात तू घालतेस तसा इतका मालमसाला नाही घालायचा नायतर नाय होता येत कर्तृत्ववान वगैरे Wink

बापरे म्हणजे मंजुडी आईआज्जीपेक्षा पण कर्तृत्ववान की क्काय Uhoh

एक नंबर......मी पण कर्तृत्ववान होणार हे डोसे करून......येस्स्स्स्स्स

वर्षे पण मी दिलेले नावच बरोबरे . कळ्ळ Angry

आणि तसंही नाव नका शोधु, डोसे करा आणि कर्तृत्ववान व्हा
वैसेभी नाममे क्या रखा है ऐसा शेक्सपिअर ने बोला था ना !

मस्त Happy

पण मी भिजवलेले मूग रात्री एक ते सकाळी आठमध्ये मोड येण्याइतके कर्तृत्ववान* नसतात त्यामुळे मला जरा जास्त वेळ उपसून ठेवावे लागतील Lol

ह्याला अडाई म्हणतात (न आंबवता केलेल्या डोश्याला) इती मंजुडी. म्हणजे ती आईआज्जीपेक्षा जास्त कर्तृत्ववान आहे.>>> Biggrin

पण ही अडई नव्हे, मोड आलेल्या मुगाच्या धिरड्यांना/ डोश्यांना पेसरट्टू म्हणतात.

आता ठरवा, मी मिती कर्तृत्ववान आहे ते Proud

मुगाच्या धिरड्यांना/ डोश्यांना पेसरट्टू म्हणतात. >> हे शबास मंजूडी Proud

मने आम्ही पेसरट्टूच म्हनणार.... पेसरट्टू... पेसरट्टू..... पेसरट्टू.... Rofl

मस्त आहेत मुगाचे डोसे... पण एक वाटी मोड आलेल्या मुगाचे फक्त दोनच डोसे?

आणि तेलाचा हात तव्याला पुसण्यासाठी कुठल्या तेलात हात किती बुडवायचा आणि असा तेलाने निथळत असलेला हात गरम तव्याला पुसताना तळव्याचाच डोसा होऊ नये म्हणुन काय काळजी घ्यावी तेही लिहा कोणीतरी. (मी कर्तृत्ववान नसल्याने मला माहित नाही ) Happy

आधी गटग ठरवा, मग बघू काय ते>>तो मानही जास्त कर्तृत्ववान व्यक्तीचाच गो. तुच यजमानीण आमची

मस्त आहेत मुगाचे डोसे... पण एक वाटी मोड आलेल्या मुगाचे फक्त दोनच डोसे?>> आधीचे डोसे कर्तृत्ववान होण्याच्या नादात धारातिर्थी पडले ग Wink

मला सिर्षक वाचुन "माझा साक्षातकारी ह्रूदयरोग" आठवतेय.. इथे पोष्टी वाचुन.. "माझा साक्षातकारी हास्यरोग" व्हायची वेळ आलीये Rofl

अडाई मध्येक्फक्त मूग कुठे असतात.

पण इतक्या कर्तुत्व्वान बायका आहेत इथे त्यांच्यापुढे कोण बोलणार वा सांगणार?

(हे कर्तुत्ववान म्हणजे शहाणे (अति) समजायचे का? Proud

बरे, डॉट ताई.. रेसीपी लिहिण्याची कला आहे तर उद्याला होनासूमी चा एपिसोड तुम्ही लिहू शकता की...

ए, मला सांगा की मी नक्की करतुतवान आहे की नाही? कविन हो म्हणतेय तर टिंब (.) नाही म्हणतेय. मी ऑफिसात\घरी वैगरे तोंड लपवून फिरू की नको? कन्फुझ झालीय ना मी.

Pages