युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला मदत हवी आहे.---माझे बेसन लाडु करुन झाले. खाल्यावर लक्षात आले कि बेसन अजुन भाजायला पाहेजे होते. आता साखर घातल्यावर पुन्हा भाजुही शकत नाही. आता काय करु त्या लाडवाचे? लाडु पुन्हा फोडुन ते मिश्रण डब्यात घालुन कुकर मधे ठेउन एक वाफ काढली तर बेसन शिजेल का? बेसन थोडेच कच्च वाटते.

दुधात शिजवून खीर करू शकता.
किंवा नावडत्या पाहुण्यांना आग्रहाने खायला घालून संपवा. Proud

मला पण एक प्रश्न होता. मला कुळथाचं पीठ करायचं आहे. कुळीथ्/हुलगे आहेत घरी. ते मिक्सरमधून काढण्याआधी धुउन वाळवून भाजून घ्यायचे असतात का?

कुळीथ भाजुन मग त्याचे पीठ करतात (असे ऐकले आहे). खुप चांगले भाजावे लागते म्हणे.
आम्ही तयार आणतो, सो घरी कधी नाही केलेय.
कुळीथ आहे तर त्याची उसळ करा...

कुळीथ आधी भाजायचे मग ते जात्यावर हलकेच भरडायचे म्हणजे साल मोकळी होतात. मग साल वेगळी करण्यासाठी पाखडायचे. म्हणजे स्वच्छ साल विरहीत डाळ मिळते. मग ती डाळ गिरणीत द्यायची दळायला. अशा तर्‍हेने केलेले पीठ सुंदर लगते चवीला आणि पिवळसर दिसते रंगाला. साल काढली की काळपट पणा येत नाही पिठाला. पण परदेशात किंवा शहरात एवढे शक्य नाही करणे एवढ्याशा पीठासाठी.

आम्हाला ही असे पीठ तयार मिळते गावाहुन. पण तिकडे मदतनीस बायका असतात आणि प्रमाण ही जास्त असते म्हणूनच शक्य होते.

धुवायचे नाहीत.
मस्तं वास सुटेपर्यंत भाजायचे. करपवायचे नाहीत.
मग थंड करायचे.
मग दळायचे.
लहानपणी आम्ही जात्यावर दळायचो.

कुळथाचं आमसूल घालून केलेलं पीठलं आणि भात हे कंफर्ट फूड आहे माझ्यासाठी.

शूम्पी, धुवुन वाळवायची गरज नाही, पण चांगले भाजावेत कुळीथ आणि जमेल तेवढी जास्तीत जास्त साल काढून टाकून मग पीठ करावे.

कुळथाचे पिठलं करायचं असेल तर कुळीथ भाजायलाच लागतात. तो देशावरचा शेंगोळया प्रकार करतात त्यात बहुतेक भाजत नाहीत असेच दळतात. श्रीरामपूरला असताना बघितलं आहे.

हिम्सकुल आम्हाला आवडतं पिठलं. अर्थात ह्यात दोन प्रकार आहेत ज्यांना आवडतं त्यांना खूप आवडतं आणि आवडत नाही त्यांना अजिबात आवडत नाही. विशेषतः कोकणातील लोकांना खूप आवडतं.

कुळथाचं पिठलं हे कोकणी लोकांचं फारच आवडतं खाद्य आहे ह्याची मला पूर्णत: कल्पना आहे..

प्राजक्ता, मोड आलेल्या हिरव्या मुगाचे अनेक पदार्थ बनवता येतील :

१) चाट : कच्चे किंवा आवडत असल्यास उकडून / वाफवून त्यांना तिखट-मीठ-चाटमसाला, वरून कांदा टोमॅटो कोथिंबीर शेव पेरून खाणे.
२) किंचित तेलावर / बटरवर परतून तिखट मीठ लावून पण मस्त लागतात.
३) मुगाचे डोसे : http://www.maayboli.com/node/46883
४) मूग घालून कोशिंबीर : कोचवलेली काकडी, किसलेले गाजर, मोड आलेले मूग, मीठ, साखर, लिंबाचा रस. हवी असल्यास वरून फोडणी.
५) मोड आलेले मूग घालून तांदळाची खिचडीही छान होते. मूग डाळ थोडी कमी घालायची व त्या ऐवजी मोडाचे मूग घालायचे.
६) उपमा, सूप, सॅलड इत्यादींतही छान लागतात.

अरुंधती, करेक्ट मी पण हेच सुचवणार होते. वरील सगळेच ऑप्शन बेस्ट. मी तर असं काही करण्यासाठी मुद्दाम मूग जास्त भिजत घालते उसळीसाठी भिजवताना. मूगाची आमटी पण मस्त होते नेहमीच्या आमटी सारखीच. पण त्यासाठी दोन कप नाही लागणार.

शूम्पी, कुळथाला हॉर्स ग्राम म्हणतात कारण मला अस वाटत की ते खरच घोड्यांना खायला घालतात पौष्टिक म्हणून .

Pages