पापण्यांतला पाऊस

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

पुर्वी आपण जेव्हा जेव्हा भेटायचो,
तेव्हा तेव्हा पाऊस पडायचा.

पाऊस मग नेहमी सोबत असायचा
कधी सर..
तर कधी झर झर...

पण यंदा...
आशेचे ढग दाटत होते,
पांगत होते,
मन ओथंबून गेलं.

तू येशील... भेटशील...

शेवटी सगळा पाऊस
पापण्यांत शिल्लक राहीला...
आणि यंदाचा पावसाळा
कोरडाच गेला.

काल पाऊस आला
नि मी दार उघडलं...
पुर्वी आपण भेटलो की पाऊस यायचा,
आता निदान पाऊस आलाय म्हणून
तरी भेटूया...

येशील ना?
दार उघडचं आहे..
आपण भेटलो की पाऊस येणार हे नक्की,
अजून तो पापण्यांत शिल्लक आहे.

प्रकार: 

दक्षिणा, कसलं मस्त लिहितेस ग तू !!! मी शक्यतो कविता वैगरे वाचत नाही. पण तुझे नाव पाहून लिन्क उघडली आणि खूप आवडली कविता. खूप छान. मनापासून शुभेच्छा!

खूपच सुरेख आणि अवीट… ही कविता "माझी असती" तर कित्ती बरं झालं असतं असं वाटायला लावणाऱ्या फार मोजक्या कविता माझ्याकडच्या यादीत आहेत …. तुझी ही कविता आज त्या यादीत जाउन बसली एवढं नक्की…>>>> + १

दक्षे, तोडलस!!

काल पाऊस आला
नि मी दार उघडलं...
पुर्वी आपण भेटलो की पाऊस यायचा,
आता निदान पाऊस आलाय म्हणून
तरी भेटूया...

येशील ना?
दार उघडचं आहे..
आपण भेटलो की पाऊस येणार हे नक्की,
अजून तो पापण्यांत शिल्लक आहे.

एकदम सही.. खल्लास !!

आपण भेटलो की पाऊस येणार हे नक्की,
अजून तो पापण्यांत शिल्लक आहे.

मस्त!

बाकी ह्या आकृतीबंधात लिहिणार्‍या 'प्रतिथयश' कवींनी सावध व्हावे कारण आता मुस्काटफोड कवी मैदानात उतरले आहेत Light 1 Lol

खूपच छान कविता दक्षिणा.एकदम तरल. आवडली.
तुमची कविता वाचून सुधीर मोघ्यांच्या कवितेतल्या या ओळींची आठवण आली.

'पाऊस किती दिवसात फिरकलाच नाही ,
पाऊस कधी कुणाला कळलाच नाही ,
पाऊस ऋतूचं निमित्त करून येतो ,
पाऊस पापणीत कधीचा दडलेला असतो'

विदिपा Rofl
अरे प्रेक्षक नकोत का कविता वाचायला?

बाकि ज्यांनी ज्यांनी कवितेचं कौतुक केलं त्यांना धन्यवाद.

दक्षु... ये कब हुआ... म्हण्जे तू कविता पहिल्यांदाच लिहिलीस??? ती पण एकदम आहाहा!!!! वॉव, हा गुण म्हाईत नव्हता तुझा... टू गुड!!!!

विदिपा.. Lol

व्वा ! सहज साध्या शब्दांतील अभिव्यक्ती.... वाचकापर्यंत सहजतेने भाव पोहोचविणारी....
शेवटच्या खंडातले आर्जवदेखील सहज, संयत शब्दात...... छानच.

पुर्वी आपण भेटलो की पाऊस यायचा,
आता निदान पाऊस आलाय म्हणून
तरी भेटूया...

अजून तो पापण्यांत शिल्लक आहे.

वाह दक्षुतै!
पुन्हा पुन्हा वाचली.
मस्तच जमलीये!

मीही पुन्हा पुन्हा वाचतेय, खुप आवडली.
कविता खुपच सहज, अगदी विनासायास उतरलीये. पण तुझ्या नेहमीच्या आविर्भावाचा त्यात पूर्ण अभाव असल्यामुळे ती आणखी जास्त भावतेय असंही लक्षात आलं. तुझं असं आर्जवी आणि जरासं अंतर्मुख होऊन व्यक्त होणं खुप लोभसवाणं आहे. कवितेत उमटलेला हा संयत भाव प्रतिक्रियांमधूनही पुन्हा पुन्हा अधोरेखित झालाच आहे.

लिहित आणि व्यक्त होत रहा अशीच.

सईशी सहमत ! Happy
पण तरीही असं वाटतय की बर्‍याच दिवसांनी मला माहीत असलेली दक्षी बघायला मिळाली. बेफी म्हणतात तसे आता लेखन थांबवू नकोस. पुलेशु Happy

Pages