मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

kuruche vanshajch ki pandaw.
असे म्हणतात.
पण प्रत्यक्षात पाची पांडवांच्या जन्माशी कुरु वंशाचा काही संबंध नाही. त्यांना दत्तक घेऊन जबरदस्तीने कुरु वंशात आणले. म्हणून ते जगले!

अर्जुनाचा पराभव्,कृष्णाचा मृत्यु वगैरे या गोष्टी घडल्या तेव्हा कृष्ण १२५ वर्षाचा आणि अर्जुन ११० की असच कितीतरी वर्षांचा होता असं वाचलय...कारण वनवास, अज्ञातवास, इंद्रप्रस्थ चे राज्य तयार करणे व काही दिवस ते चालवणे नंतर युद्ध मग ३६ ( नेमका आकडा माहित नाही ) वर्षे राज्य चालवणे...नंतर द्वारका बुडणे या सर्व गोष्टी होउन राज्य त्याग करुन स्वर्गाच्या रस्त्याला निघणे ...हुश्श्........नक्की किती वर्षे जगले हे लोकं???

पण प्रत्यक्षात पाची पांडवांच्या जन्माशी कुरु वंशाचा काही संबंध नाही. त्यांना दत्तक घेऊन जबरदस्तीने कुरु वंशात आणले. म्हणून ते जगले!>>>>>>>>>>>>>> +११११ कौंतेय आणि माद्रेय फारफार तर म्हणु शकु का???

येस अनिश्का त्या पाची पांडवांना आईच्या नावानेच ओळखायला हवे, कारण पांडूची प्रत्यक्ष ती मुले नाहीतच. खरं म्हणजे युधिष्ठिर, धृतराष्ट्र आणि विदुर व्यासांची मुले त्यामुळे खरे रक्ताने कुरु कोणीच नाही, शंतनुचा रक्ताचा वंश नाही खरं म्हणजे, सत्यवतीच्या रक्ताचा म्हणायला हवा कारण व्यास सत्यवती पुत्र. अर्थात त्यावेळी वंशाच्या संकल्पना वेगळ्या होत्या.

ज्या ऋषींनी सत्यवती कडे समर्पणाची ( सुचक शब्द सापडत नाहीये ) मागणी केली मला त्यांचं नाव आठवत नाहीये......हा सर्व मामला त्यांच्याच वंशाचा....कारण सत्यवतीची दोन्ही मुले (जी कुरुवंशाची होती) ती निपुत्रिकच वारली ना?? मग वंश पुढे जावा म्हणुन सत्यवती ने लग्नाआधी झालेल्या पुत्राला वंशवाढवण्यासाठी बोलावले....मग जी मुलं जन्माला आली म्हणजे विदुर, पंडु. ध्रुतराष्ट्र वगैरे ते कुरु नाहीतच......उलट्सुलट गोष्टी आहेत या....मी तर्क लावणं केव्हाच थांबवलय

उलट्सुलट गोष्टी आहेत या.
बरोबर.
त्या काळी काय झाले ते नंतरच्या काळात प्रचलित अश्या धर्माच्या, समाजकालीन चालीरीतींशी सुसंगत असणे कठीणच.
पण प्रत्यक्ष जे जसे झाले त्याचे वर्णन करण्यात पांडवांचे, भीष्माचे सगळे बरोबर असे दाखवण्याचा अट्टाहास आहे असे मला वाटते.

चालू काळात नाही का, कुणि काँग्रेसच्या लोकांना शिव्या देतात तर कुणि इतर पक्षाच्या. अजून पाचशे वर्षांनी इतिहास लिहिणारा माणूस काय विचाराने लिहील कुणास ठाऊक.

खरे तर अत्यंत तर्कशुद्ध,न्यायाला धरून, चुका न करता सगळे जगले तर त्यात लिहिण्यासारखे काय? काही तर्कविसंगत, अन्यायकारक, चुकीचे वर्तन घडले नि त्यातून काही अति महत्वाचा बदल झाला जगात तरच त्यात काही लिहिण्यासारखे होते.

ते पराशर मुनी
रूशीमुन्री त्या काळात ऐष करत होते.

आसाराम बापु त्या काळात जन्माला यायला हवा होता

मुनी बदनाम हुआ डार्लिन्ग तेरे लिये

Proud

दोन दिवस महाभारत बोअर झाले. कालियामर्दन आणि गोवर्धन दोन्ही एपिसोड सो सो होते. दोन्ही कृष्ण पण नाही भावले मला, आपला नेहेमीचाच कृष्ण छान आहे.

दोन दिवस महाभारत बोअर झाले.
+१०००

शेवटी कृष्ण इंद्राला म्हणतो, हा पर्वत खाली करायला मदत कर. एक सेकंदभर मला वाटले की तो इंद्र खाडकन तो पर्वत खाली करेल नि त्याखाली कृष्णासक्कट सगळे जमिनीत गाडले जातील. मग इंद्र, हिंदी सिनेमातल्या खलनायका प्रमाणे, मोठमोठ्याने खदखदा हसेल. मग शंकर येईल नि तो इंद्राला दम देईल. मग इंद्र पर्वत बाजूला करेल नि कृष्ण आणखी एक चमत्कार करून सगळ्यांना जिवंत करेल, मग हो ज्जाय एक धम्माल गरबा!! Proud
फुक्कट लांबण लावली आहे,
मला जुन्या महाभारतातले युद्ध आठवते, छान दा़खवले होते. कोण कोण कसे कसे मेले ते दाखवले होते.

आता खरोखरचे महाभारत सुरु आहे, मतमोजणीचे. ते बघा. कलियुग सोडून त्या द्वापार युगाची लफडी का बघत बसलाय?

<<<पण प्रत्यक्षात पाची पांडवांच्या जन्माशी कुरु वंशाचा काही संबंध नाही. >>>>

शंतनूशी विवाह होण्याआधी सत्यवतीला पराशर ऋषीकडून वेद व्यास हा पुत्र होतो. पुढे शंतनूशी विवाह झाल्यानंतर तिला चित्रांगद आणि विचित्रवीर्य हे पुत्र होतात. शंतनू आणि चित्रांगदाच्या मृत्युनंतर विचित्रवीर्य राजा बनतो. हा विचित्रवीर्य हा मद्यपी असतो आणि त्याच राज्याकडे लक्ष नसतं म्हणून सत्यवती त्याचे लग्न अंबा, अंबिका व अंबालिका ह्या राजकन्येशी करून देण्याचं ठरवते ,आणि त्यांना जिंकून आणण्यासाठी भीष्माला पाठवते , मात्र अंबाने शाल्व राजकुमाराला आपला पती वरल्यामुळे अंबिका व अंबालिका यांचा विवाह विचित्रवीर्यासोबत करून दिला जातो. मात्र तो पुत्रप्राप्ती पूर्वीच निधन पावतो म्हणून सत्यवती भीष्माला कुरुवंश वाढण्यासाठी अंबिका व अंबालिका ह्या दोघींशी संबध ठेवुन अपत्यप्राप्तीचा सल्ला देते मात्र भीष्म त्यास नकार देतो म्हणून सत्यवती तिचा आधीचा पुत्र वेद व्यास ह्याला हीच आज्ञा देते. व्यासमुनीमुळे अंबालिकाहीला पांडू आणि अंबिका हिला धृतराष्ट्र हे पुत्र होतात. तेसेच त्यांना परीश्रमी ह्या दासीकडून विदूर हा पुत्र होतो ,म्हणजे वेद व्यास हे कौरव पांडवांचे आजोबा, ज्यांचा कुरु वंशाशी तसा काहीही संबध नाही.
पांडूची पत्नी कुन्ती मात्र तिला सुद्धा यम , वायू आणि इंद्र ह्यांच्यामुळे युधिष्ठिर, भीम , अर्जुन हे पुत्र झाले , आणि पान्डूची द्वितीय पत्नी माद्री हिला अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव हे पुत्र झाले , म्हणजे ह्यांचा ही तसा कुरु वंशाशी संबंध नाही .

गांधारी जेव्हा गर्भ धारण करते तेव्हा तिला युधिष्ठिर जन्माबद्दल कळत आणि त्या विलापात तिच्या प्रसववेदना सुरु होतात आणि ती एका मांसाच्या गोळ्याला जन्म देते. ती नंतर वेदव्यासांना शरण जाते आणि ते ह्या मांस गोळ्याला १०० भागांत विभागून त्यांना १०० तुप असेलेल्या भांडयात ठेवतात हेच ते १०० कौरव .

माझ्या मते महाभारत हे लोकांनी कसे वागू नये ह्या बद्दल मार्गदर्शन करणार काव्य आहे . म्हणजे विवाहापूर्वी आलेल्या संबधातून जन्मास आलेली संतती , द्रौपदीचे ५ पती ( म्हणजे पत्नीने नेहमी एक पती रहाव ) , द्रौपदीचा जन्म , सत्यवतीचा जन्म ( जो माशापोटी होतो.) , अंबा वर भीष्मा कडून झालेला अन्याय थोडक्यात स्री आणि तिच्याशी संबधीत असलेल्या गोष्टी ज्यात स्त्रीचा अपमान / अन्याय / मार्यादा उल्लघन या व अश्या विचित्र गोष्टी झाल्यास "महा भारत च " होणार असं सुचवणारे . थोडक्यात खाप जमातीच काव्य रूप . त्यातलात्यात कृष्णपर्व हेच आल्हाददायी आहे.

२३ मे २०१४ चा एपिसोड एकदम झकास होता.
दुर्योधन कृष्णाला बंदी बनवतो, त्यानंतरच्या कृष्णाच्या मायावी लीला आणि भयप्रद विश्वरूप दर्शन...

कृष्ण सगळ्या चराचरात भरून राहिला आहे हे दर्शवण्यासाठी दिग्दर्शकाने वापरलेली सिनेमेटीक लिबर्टी ज्यात महाभारतातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या जागी दुर्योधना ला कृष्ण दिसतो ते लाजवाब ... आवडले.

स्क्रीनप्ले एकदम मस्त !!
स्पेढाल इफेक्ट पण छान ...

आता वाटतंय की पुढचे युद्धाचे प्रसंग पण अशीच कल्पकता लढवून आणि जोरदार स्पेशल इफेक्ट द्वारे दाखवण्यात येतील ... नक्कीच .. पुढे मजा येईल...बघायला !!

कालचा कर्ण आणि त्याचा आतडं पिळवटणारा आक्रोश, दोन्ही अगदी उत्तम. वृषाली त्यामानाने फारच तकलादू वाटली.

कालचा कर्णाचा सीन मस्त झाला होता. एकंदरी त महाभारतामधलाच तो माझा फार आवडता सीन आहे,

त्या अभिनेत्याचे नाव काय आहे? सुरूवातीपासून चांगलं काम केलंय. किंबहुना या मालिकेमधे व्हिलन पार्टीच चांगलं काम करतेय आणि हीरोपार्टीमधे एकटा कृष्ण अभिनय वगैरेची जिम्मेदारी घेऊन बसलाय.

शबाना, कर्णाच्या पोस्टला अनुमोदन. खूप सुंदर केला कर्णाने अभिनय.

मला एक प्रश्न पडलाय, महाभारत उत्तरेत घडलं, तिथे समुद्र नाहीये, यमुना नदीचा परिसर आहेना तो मग नेहेमी अर्ध्य देताना समुद्र का दाखवतात? नदीकिनारी शुटींग करायला हवं होतं ना. नेहेमीच समुद्र दाखवतात, काल कर्णाचा आक्रोश दाखवला तेव्हा, मागे भीष्म आणि द्रौपदी संवाद होता तेव्हा.

नंदिनी,

अहम शर्मा नाव आहे त्याचे . मलाही दुर्योधन व शकुनी आवडले . दुर्योधनाचा अभिनय ही छान होता आधीच्या भागात- कधी कधी फार ओढून ताणून डायलॉग मारतो मात्र. कृष्ण मस्तच आहे - हळू हळू कृष्णाबद्दलचे मत बदलत चालले आहे. पांडवाना सकारात्मक दाखवले तरी बऱ्याच गोष्टी पटत नाहीत. दैवीकरण केले कि सगळ्याच त्यांच्या गोष्टी उदात्त होतात असे एकूण दिसते.

अंजू

मालिकेचे चित्रीकरण गुजरात मध्ये आहे त्यामुळे गंगा समुद्राच्या रुपात दाखवली आहे. Happy भीष्म आणि कर्ण दोघेही भल्या पहाटे गंगेवर अर्घ्य देण्यासाठी असत - इति शिवाजी सावंत.

हा महाभारत काळचा नकाशा - किती छोटा होता आर्यावर्त. mahabharat map.jpg

थांकू शबाना. तेच मला वाटतं की शुटींग नदीकिनारी करायला हवे होते.

युधिष्ठिर झालेल्या कलाकाराने पण काही वेळा छान अभिनय केलाय. बाकी नंदिनीला मम.

Pages