मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<की परिक्षित नि जनमेजयांच्या राज्यातल्या काही सुरस व चमत्कारिक गोष्टी दाखवणार?>>
थोडे अवांतर, परंतु महाभारत युद्धानंतर ६० वर्षांत सगळे पांडव, कृष्ण, बलराम, यादवसेना संपले. ते कसे संपले हे कोणीतरी लिहून काढायला हवे. अत्यंत हृद्य, अ:तकरण हेलावून टाकणार्या घटना आहेत.

थोडक्यात,
महाभारतानंतर ३६ व्या वर्षात कृष्ण्-पुत्र सांब आणि त्याच्या मित्रानी केलेल्या कुचेष्टेने रागावून मिळालेला नारदमुनींचा शाप, कौरवांकडून यादवसेनेबरोबर लढलेला कृतवर्मा आणि पांडवांकडून लढलेला कृष्ण्-भक्त सात्यकी यांच्यातली बाचाबाची, त्यातून कृतवर्मा, सात्यकी, कृष्ण्-पूत्र प्रद्युम्न, प्रद्युम्न्-पुत्र अनिरुद्ध या सर्वांचा वध, बलरामाचा समुद्रात बुडून मृत्यु, कृष्णाचा पायाला बाण लागून मृत्यु , म्हातारा झालेल्या अर्जुनाने कृष्ण पत्नी आणि यादवांच्या मुलांचे रक्षण करण्याची धडपड, त्यात सामान्य दरोडेखोरांकडून अर्जुनाचा पराभव हे वाचताना हृद्य पिळवटून निघते. ज्यानी 'महाभारत' घडवून आणले त्यांची सामान्य माणसांसारखी दुरावस्था वाचवत नाही.
परीक्षित आणि जनमेजय यांची कथाही वाचनीय आहे.

म्हातारा झालेल्या अर्जुनाने कृष्ण पत्नी आणि यादवांच्या मुलांचे रक्षण करण्याची धडपड, त्यात सामान्य दरोडेखोरांकडून अर्जुनाचा पराभव >> हे नाही वाचले कुठे. यादवांचा नाश आणि कृष्णाचा मृत्यू हे माहित होते पण हे नंतरचे नाही वाचले कधी.

महाभारत युद्ध १८ दिवस चालले. पण ते १८ दिवस सलग नव्हते. एक आड एक दिवस युद्ध विरामाचा होता. असे कुठेतरी वाचले आहे.

काहीही म्हणा पण स्टार प्लस वरचे महाभारत हे "महाभारताच्या कथेकडे" एका विशिष्ट आणि महत्त्वाच्या दृष्टीकोनातून पहाते.

तो म्हणजे साम्राज्यासाठी/खुर्ची साठी नाहीतर मग कसलातरी बदला घेण्याची प्रत्येकाची धडपड !!

आणि सत्ता मिळवण्याचे कारण म्हणजे "धर्म स्थापण्यासाठी" असो की "अधर्माने बळकावून स्वत:च्या फायद्या साठी वापरण्यासाठी" असो.

अश्वथामा, द्रुपद, कीचक, विराट, दुर्योधन, शकुनी, पांडव, पांडू, धृतराष्ट्र, सत्यवती वगैरे मंडळीना कुठे ना कुठे सत्ते ची लालसा होतीच.

ती स्वत: साठी असो की त्यांच्या कुणा नातेवाईकासाठी असो....

काहीही म्हणा पण स्टार प्लस वरचे महाभारत हे .........दृष्टीकोनातून पहाते.
अनुमोदन.
मला तर भीष्म नि पांडव यांच्या धर्माबद्दल फारच शंका येऊ लागली आहे. धर्म म्हणण्यापेक्षा साम्राज्यासाठी सगळा खटाटोप, असेच दिसते.
अर्थात माझा त्याला काहीच आक्षेप नाही, आक्षेप फक्त त्याला धर्म म्हणण्याला आहे.
तशी एव्हढी प्रचंड लांबलचक गोष्ट असूनहि कधीहि कंटाळा येत नाही. कितीदा ऐकली, पाहिली तरी परत परत पहाविशी वाटते, म्हणजे कसली जबरदस्त गोष्ट आहे ही!
उगाच नाही म्हणत व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम

सुर्यास्त झाल्यावर विराट वर आक्रमणा करायला आलेल्या कौरवांपुढे अर्जुन आणि उत्तर हे दोघे आल्यानंतर जेव्हा कर्ण आणि अर्जुन हे दोन तोडीस तोड धनुर्धारी भिडतात तेव्हा भीष्म आकाशात एक चुंबकीय गोळा सोडून दोघांचे बाण विफल करतात तेव्हा वाटते की भीष्म हाच सर्वश्रेष्ठ धनुर्धारी...

त्यांचे पुढे कर्ण आणि अर्जुन हे काहीच नाही.......!!!
भीष्म पितामह का जवाब नाही...

*****

आणि सध्या कृष्ण कुठे गेला आहे?

पांडव अज्ञात वास संपल्यानंतर फक्त एकशे एक (शंभर कौरव आणि एक कर्ण) जणांनाच आव्हान करतात.
निष्पाप लोकांचा रक्तपात टाळण्यासाठी!!

पण ते एकशे एक जण भीष्मांना पुढे करतात.
पांडव भीष्मांशी युद्ध करायला नाही म्हणतात...!!!

पण ....
पांडव इंद्रप्रस्थ नियमाप्रमाणे परत मागतात आणि दुर्योधन म्हणतो की एक तुकडा सुद्धा मिळणार नाही; त्याचे काय झाले?

एवढे सगळे चालले आहे पण मग कृष्ण कोठे आहे?

तो शांती प्रस्ताव कौरवांकडे घेवून जातो त्याचे काय झाले?

युद्धाच्या वेळी अभिमन्यू नक्की किती वर्षाचा होता. ह्या कथानकानुसार पांडव वनवासात जायच्या आधी सुभद्रा प्रेग्नंट होती मग तो फक्त १३ वर्षाचा होता का?

पण ते एकशे एक जण भीष्मांना पुढे करतात.
कारण काहीतरी युक्तिवाद करून शकुनि म्हणतो हे हस्तिनापूरवर आक्रमण आहे, त्याचा प्रतिकार करणे हा हस्तिनापूरच्या सेनापतीचा (भीष्माचा) अधिकार नि पर्यायाने उत्तरदायित्व आहे. भीष्मालाहि वाटले असेल आपण पांडवांशी बोलून काही तडजोड काढू.

कर्ण, भीष्म दोघांनीहि काही प्रतिज्ञा केल्या, वैयक्तिक. नि मग त्या निभवायच्या म्हणून मनाविरुद्ध वर्तन करावे लागले.

कर्णाचे ठीक आहे. पण भीष्माने हस्तिनापूरचे रक्षण करीन अशी प्रतिज्ञा केली होती. त्यात हस्तिनापूरचे भले व्हावे असा काही क्लॉज नव्हता वाटते! नाहीतर धृतराष्ट्र, शकुनि यांचे चाळे बघून म्हणायचे की हस्तिनापूरच्या भल्यासाठी मी तात्पुरते हस्तिनापूरबद्दलचे सर्वाधिकार माझ्या हाती घेतो, नि जेंव्हा चांगला राजा येईल तेंव्हा परत राज्य त्यांच्या हवाली करीन. तसे केले असते तर? नाहीतरी कोण कुठला शकुनि नि त्याचे ऐकणारा ध्रुतराष्ट्र यांच्या पेक्षा हस्तिनापूरचे भले भीष्मामुळेच झाले असते, ध्रुतराष्ट्राला सुद्धा पंडू सारखा अधिकृत राज्याभिषेक होऊ शकलाच नव्हता, तरी तो का म्हणून दादागिरी करत होता? त्यापेक्षा तसेच राज्याभिषेक करून न घेता अधिकार हाती घेऊ शकला असता भीष्म. पांडवांसारख्या चांगल्या लोकांची दुर्दशा, अपमान झाले नसते.

व्यक्तिगत विचारांच्या आहारी जाऊन, राज्याचे नुकसान डोळ्यादेखत बघायचे तर काय उपयोग त्या सामर्थ्याचा? प्रतिज्ञेनुसार राज्य केले नाही म्हणून त्याचे गुणगान गायचे,

ठीक आहे, कथानक प्रचंड ग्रिपिंग आहे, नुसतीच स्तुति नाही तर टीका करायला सुद्धा मूळ कथानकात दम असावा लागतो, तो आहे.

मग कृष्ण कोठे आहे?
म्हणजे काय? अहो आय पी एल चालू आहे शारजा, दुबै वगैरे ठिकाणी. ते बघायला नाही का जायचे?
महत्वाचे काय? क्रिकेट की कधीहि क्रिकेट न खेळलेले लोक?

आता आय पी एल भारतात आल्यावर येईल परत. मॅच नसेल तेंव्हा.

Happy Light 1

सर्व शंभर कौरवांच्यात 'विकर्ण' याने द्रौपदी वस्त्रहरणाचा विरोध केलेला असतो, हे पांडव का लक्षात घेत नाहीत त्याला त्याचा फायदा मिळायला हवा होता ना?

सध्या सगळेच एपिसोड इन्टरेस्टिंग आहेत. कालच्या भागात कॄष्णाचे डाय्लॉग्ज मस्त होते. तो दुर्योधन आणि शकुनीला इशारा देतो भीश्म - द्रोण-कर्ण यांचा वध कपटाने वध होईल - तो सीन मस्त होता.

मैत्रेयी मम. परवा पण दुर्योधन,कृष्ण आणि अर्जुन ह्यांना एकत्र बघायला मस्त वाटल.

कुंती दिवे लावत असते तेव्हा धृतराष्ट्र आणि तिच्यातला सीन छान होता, तिचे डायलॉग आणि अभिनय छान होता.

कुंतीचा आणि धृतराष्ट्र चा सीन, अभिनय आणि डायलॉग खरेच खूपच छान होता....
आता युद्ध कधी सुरु होते त्याची उत्सुकता आणि युद्धा चे चित्रीकरण कसे आहे त्याबद्दल खुपच उत्सुकता आहे.

आज रात्री 5-May-2014 8:30 pm IST काय होईल ??

सुदेष्णा च्या सांगण्यावरून द्रौपदीचा अभिमन्यू सोबत टिपिकल सावत्र-आईपणा होईल ?

की

आदर्श आईचा आदर्शवाद द्रौपदी कडून झिरपेल ?

कुंती माद्री सारखा? सख्खा सावत्र भेद न करणारा आईपणा ?

मला कधी कधी कळत नाही. पाच पांडव वाचले, त्याचे एवढे कसलं कौतुक महाभारतात. त्यांची सर्व मुले (उपपांडव) आणि अभिमन्यू, घटोत्कच ही मुले बळी पडलीचना ह्या युद्धात.

अंजू,
ते जिंकले!!
कदाचित त्यांनी त्यांच्या विरुद्ध लिहीणार्‍यांना मारून टाकले असेल.
या मोठ्या गोष्टीतून काय घ्यायचे हे समजणे कठीण. आत्तापर्यंत पांडव व भीष्म यांच्याबद्दल जेव्हढा आदर होता त्यामानाने आता त्यांच्याबद्दल माझा आदर कमी झाला आहे.
मला स्वतःला वाटते की भीष्म, कर्ण यांच्यासारखी टोकाची भूमिका घेऊ नये, युधिष्ठिर सुद्धा धर्माच्या अट्टाहासामुळे नि स्वतःबद्दल अति गर्व बाळगून समजून उमजून शकुनीच्या दुष्कृत्यांना सामोरे गेला. यात त्यांचा अहंकार दिसून येतो. नि अहंकारापायी वैयक्तिक नि देशाचे बरेच काही काही वाईट झाले.

कृष्णासारखे व्हावे. शकुनीसारख्या लोकांपासून सावध रहावे. भीष्माला कळले होते की शकुनीचे लक्षण ठीक नाही, त्याचा वेळीच नि:पात केला असता तर बरेच काही वाचले असते, पण तसे झाले नाही.

कसला स्पीड आहे ह्या लोकांचा
तू तिथे मी च्या दिग्दर्शकाने काढली असती हि मालीका तर अजून गंगेची दोन तीन पोरेपण कशीतरी पाण्यात गेली असती

निमिष, कृष्ण द्रौपदीला काल सांगतो की पाच पांडवच वाचतील बाकीचे शंतनू राजाचे सर्व वंशज ह्या युद्धात मरणार. त्याने द्रौपदी अस्वस्थ झालीय, आज तिची सर्व मुले एकत्रित, आनंदात दाखवली. शेवटी ती कृष्णाला सांगायला येते की हे युद्ध मला नकोय.

पण खरंच असं झालं होतं का? का ह्या महाभारतात हे कथानक दाखवलंय, मला शंका वाटते.

द्रौपदीच्या अंगात एक शक्ती असते ती अग्नीतून उत्पन्न झाली म्हणून, ती आग लावू शकते. दोनदा दाखवलंय, एकदा अर्जुन सुभद्रेला आणतो तेव्हा आणि परवा अभिमन्यू येतो तेव्हा (आगीची सीमारेषा काढते, ते कोणी ओलांडू शकत नाही) , मग हेच तिने दू:शासन तिला ओढत आणतो तेव्हा का नाही केले, तो कसा तिला हात लावू शकतो, असे प्रश्न मात्र मनात येतात.

हे सगळ कृष्ण देव असणे अन त्याला सगळ माहित असणे हे दाखवण्याच्या नादात पांडवच चुकीचे दिसू लागलेत.
किमान दुर्योधनाला ही आशा , विश्वास तरी होता की तो जिंकेल . इथे स्वतःचेही सगळे लोक मरणार हे माहित असतानाही युद्ध करणे यात कसला आलाय धर्म ?

केदार,
कृष्णाने तेही सांगितलंकी, हे युध्द समाजासठी हवं आहे. प्रतेशोधासाठी युध्द करु नका हे त्याने पुर्वी चं सांगितलेलं असतं.
अन्जू १++

वीरो के वीरो की, धरती के रत्नोकी, ये सारी है संताने
ले कर चले है लहू कुरु वंशो का; जिसमे इन्हे है अभिमान .

असं उपपांडव येताना गायलं गेलं ! कुरु वंशाचे रक्त कुठून आले यांच्यात Happy

Happy

Pages