भुताटकीचा सण आला - हॅप्पी हॅलोविन!!

Submitted by धनश्री on 31 October, 2013 - 13:11

आला, आला, भुताटकीचा आनंदी सण आला. सगळ्यांना हॅप्पी हॅलोविन!! Happy

मागच्या वर्षी हॅलोविनच्या या धाग्याला माबोकरांनी खूप छान प्रतिसाद दिला. तुमच्या प्रोत्साहनाने हुरूप आला. यावर्षी देखील त्याच उत्साहाने आणि त्याच धावपळीत या वर्षीची सजावट केली. भोपळे आणले , चित्रं काढली, आणि कोरीव काम केले. यंदा ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चित्रीत करण्याचा हा प्रयत्न.

सर्वप्रथम शेतातून भोपळे आणले. त्या वरची माती, पालापाचोळा, धुवून टाकला. स्वच्छ झालेले हे टवटवीत भोपळे.
प्रचि १

मग झाकण तयार करायचे. त्यासाठी पंचकोन किंवा षटकोन आखून, कोरून काढायचा. कापताना सुरी सरळ न खुपसता किंचित तिरक्या कोनात कापायचे. यामुळे झाकण आत न पडता आठवडाभर चांगले राहते. गोल गरगरीत नाही कापायचे. भोपळा हवेने जसा मऊ पडत जाईल तसे हे झाकण आतच पडते.
प्रचि २

प्रचि ३

आमचे उत्साही मदतनीस. Happy
प्रचि ४

नवशिक्यांनी कोनाचे बिंदू दाभणाने कोरले तर सुरी आत जायला सोपे जाते. लहान मुलांना मदतीला घ्या पण अगदी जातीने लक्ष द्या. उत्साहाच्या भरात लागायची भीती असते.
प्रचि ५

मग आतल्या बिया, गर काढून टाकायचा. काही लोक बिया धुवून, वाळवून, भाजून, सोलून खातात. (छे, छे, किती ती क्रियापदं!! खूप काम आहे. जाऊ दे.)
प्रचि ६

प्रचि ७

कागदाने भोपळा पुसून त्यावर नक्षी काढायची. जो भाग काढून टाकायचा आहे तो गडद रंगवायचा. मग एक एक भाग कोरत, कोरत, डिझाईन पूर्ण करायचे.
प्रचि ८

लेकीने खूप जबाबदारीने काम केलंय यावर्षी. तिच्या कलाकृती पुढे येतीलच.
प्रचि ९

प्रचि १०

नंतर त्यामधे एखादी मेणबत्ती किंवा एलईडी दीवा लावायचा. आणि मग हवे तसे हे भोपळे मांडायचे.

यावर्षी भारतातून आजी-आजोबा आले आहेत. त्यांच्या या कलाकृती.
प्रचि ११

प्रचि १२

हा माझा एक प्रयोग. बाळ खाणारा राक्षस. बघा कसा मजेत बाळाला चावून चावून खातोय.
प्रचि १३

भूतबंगला.
प्रचि १४

कुणीतरी आहे तिथं!!
प्रचि १५

हा माझ्या लेकीचा आवडता गॅन्डॉल्फ द ग्रे. लॉर्ड ऑफ द रिंग मधला.
प्रचि १६

इतका छान जमला म्हणून तिला साईन करायला सांगितली. अर्थात मूळ चित्र आंतरजालावर मिळाले. मग उदयने तिला चित्र काढायला मदत केली. पण संपूर्ण कोरीव काम तिचे आहे.
प्रचि १७

उयची कलाकारी. चकी डॉल. गूगलवर तिचे फोटो बघायला मिळतील. मुलगी यावर्षी हाच कॉश्च्युम करणार आहे.
प्रचि १८

याला ओळखलंत का? हीथ लेजरने ही भुमिका गाजवलीये.
प्रचि १९

हा पणजोबा भोपळा. भला मोठा, ढब्बूढोल आहे.
प्रचि २०

काही भुताटकीच्या वस्तु, प्राणी, कबरी पण मांडायच्या. एखादा मेलेला माणूस टांगायचा.
प्रचि २१

येणार्‍या भुतांसाठी तयार केलेला राजरस्ता.
प्रचि २२

आणि ही कवटी त्यांचे जोरदार स्वागत करायला. तिच्यात आवाजाचा सेन्सर आहे. लहान मुलं घोळक्याने बडबडतच येतात. ती आली की ४ फुटावरूनच हा म्हणेल, डोन्ट यु डेअर, आय सी यू!! Happy
प्रचि २३

आपण स्वतः देखील एखादा अवतार धारण करायचा.

मग संध्याकाळी एकापाठोपाठ भुतं यायला लागतात. ती भुतं म्हणतात, "ट्रिक ऑर ट्रीट?" आपण घाबरल्यासारखे करायचे आणि म्हणायचे, "ट्रीट फोर शुअर." आणि येणार्‍या भुतांचे चॉकलेट देऊन स्वागत करायचे.
तुमच्या घरच्या भोपळ्यांचे फोटो, सजावट नक्की पोस्ट करा.
हॅप्पी हॅलोविन!! Boo!! Happy

यावर्षी दिवाळी आणि हॅलोविन अगदी पाठोपाठ आले आहेत. तेव्हा विचार केला की जरा दिवाळी ची सजावट सुद्धा यानेच करूया. म्हणून ही पणती आणि जरा वेलबुट्टीची नक्षी. यंदा तापमानाने प्रचंड घोळ केलाय. २-३ दिवसांपूर्वी केलेले भोपळे जास्त तपमानाने वाळल्यासारखे झालेत. त्यामुळे बरीच डिझाईन्स केली तशी टिकून राहिली नाहीत.

प्रचि २४ दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा!!

राग, लोभ, मत्सर, द्वेष, उदासीनता, भ्रष्टाचार यासारखी भुते सर्वांच्या जीवनातून दूर होऊन आनंदाची दिवाळी येऊ दे. याच या दोन सणांच्या शुभेच्छा. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव धनश्री!!! एक से बढकर एक कलाकार आहेत तुझ्या कुटुंबात..

एकेक कलाकृती अतिशय आवडली..

बाळ खाणारा तर कल्पकतेची कमाल आहे..
सुप्पर्ब सुपर्ब!!!

मने, ग्रेट! अमेझिंग! शब्दात वर्णन करणे अशक्य आहे इतक्या सुंदर कलाकृती आहेत.
तु, स्वराराणी, उद्य सगळ्यांचेच अभिनंदन.
दीपावलीच्या अनेकानेक शुभेच्छा!

सही Happy

जबरी आहे हाँटेड हाउस .. भोपळ्यांचं कोरीवकाम आणि ड्रॉइंग पण मस्तं..
भोपळ्यांच्या आतल्या लाइट इफेक्ट मुळे चेहर्यावर शेडींग केल्या सारख्या शेड्स ़काय झकास आल्यायेत !

बोले तो एकदम झक्कास! त्या एवढ्याश्या पोरीनं इतकं सुरेख कोरीवकाम केलंय? तिला एक भली मोठी शाब्बासकी. सगळेच भोपळे सुरेख दिसताहेत. भारी कल्पनाशक्ती आणि चिकाटी! Happy

रच्याकने, तुमच्या घराबाहेरचा सीन माझ्या लेकीला भारीच आवडलाय. बहुतेक पुढच्या हॅलोविनला माझ्या मानगुटीवर बसणार आमची विच! Happy

सहीच.. जबरदस्त.. एकाच घरात सारे कलाकार भरले हे विशेष..
नाहीतर आपली इथे साधे कात्रीने सरळ कागद कापायची बोंब.. Wink

सहीच!
आमच्याकडे हॅलोविनच्या भुताने आत्ता हात-पाय पसरायला सुरुवात केलीये त्यामूळे यंदा तर काही खास केले नाही पण पुढच्या वर्षी हा प्रकार करावा लागेल. टीप्स उपयुक्त!

Pages