फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेमंत, दिवाळी नसतानाही एवढे प्रदूषण असते दिल्लीत तर फटाके वाजवून त्यात अजून कशाला भरा घालायची हा मुद्दा वर अनेक ठिकाणी चर्चिला गेला आहे

मला या वेळी काही लोक असे दिसले कि आम्ही तसे फार फटाके वाजवत नव्हतो. यावेळी ही वाजवणार नव्हतो पण फुरोगामी लोकांनी हे आवाहन केल्यामुळे आम्ही आता थोडे तरी फटाके वाजवणारच! नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे अशी एक जुनी म्हण आहे त्याची आठवण झाली

थोडक्यात बॉलीवुड गँग, लिबरल आणि कमिनुस्टी विचारवंत रंडके झाले पाहिजेत पण आम्ही फटाके वाजवणारच ही वृत्ती या वेळी वाढली आहे .
पर्यावरणाचा समतोल ढळत चाललाय , चार दिवस फटाके वाजवल्या ने प्रदूषण मध्ये अजून भर पडेल , रंग पंचमीच्या वेळी कोट्यवधी लिटर पाण्याची नासाडी होते हे सगळं मान्य !

पण हिंदूंच्याच प्रत्येक सणाला हे पर्यावरण प्रेमी , मानवता वादी आणि पशुप्रेमी विचारजंत बाहेर पडतात .
दिवाळीच्या वेळी फटाक्यामुळे पशू पक्षी प्राणी ना आवाजाचा त्रास होतो , ते घाबरतात अशी या विचार जंताची धारणा असते काही अंशी ते खरं आहे !
पण बकरी इदला लाखो निरपराध बकऱ्या कापल्या जातात , ते स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधी लिटर पाणी वाया जाते , नवीन वर्षाच्या रात्री अख्ख्या जगात फटाके फोडतात , त्यावेळी हे सगळे विचाप्रवर्तक शूरवीर गायब का असतात हे आज पर्यंत समजले नाही .

भरपूर फटाके फोडा. भरपूर आवाज, भरपूर धूर करा. माझं काही म्हणणं नाही. इथे लिहिण्यात वेळ वाया घालवू नका. फटाके फोडायला जा.

पण हिंदूंच्याच प्रत्येक सणाला हे पर्यावरण प्रेमी , मानवता वादी आणि पशुप्रेमी विचारजंत बाहेर

ह्या कोणत्या पदव्या ह्यांना देत आहात.

त्या उपाध्य पण स्वतःची खूप मोठी प्रतिष्ठा आहे.
कोणाला पण त्या उपाध्य देवू नका

त्या उपाध्य पण स्वतःची खूप मोठी प्रतिष्ठा आहे.
कोणाला पण त्या उपाध्य देवू नका>>>>>>>>>>

कोणताही धागा all site's user's म्हणजेच सर्वांसाठी असावा या मताला माझा कायम पाठिंबा असतो , म्हणून अशा धाग्यांवर सर्वांना इज्जत द्यावीच लागते , हा अलिखित नियम आहे Happy

शाब्दिक फटाके कशाला? खिसा रिकामा आहे वाटत़‌ं>>>>>>

उद्या एक तासाचे मुहूर्त ट्रेडिंग आहे , त्या ट्रेडिंग च्या प्रॉफिट चा स्क्रीन शॉट टाकू का ? Happy

चर्चेला राजकीय वळण द्यायचा हेतू नाही. पण काही ठराविक विचारधारा असलेले लोकं फटाक्यांचे समर्थन करतात असे दिसून येते. हे करताना ते हिंदू सण आणि संस्कृतीचा संबंध फटाक्यांशी जोडून भावनिक मेसेज करतात. आजही तसेच काही स्टेटस दिसले. ते खाली शेअर करतो. ते माझे विचार नाहीत. तरी मला सर्व प्रकारचे विचार शेअर करून त्यावर विचार मंथन व्हावे असे वाटते म्हणून शेअर करतो.

IMG_20231112_010935.jpg
.
IMG_20231112_010951.jpg
.
IMG_20231112_011005.jpg

दारु गुटका तंबाखू मुळे त्या त्या व्यक्तिच्या शरिराची हानी होते पण सार्वजनिक आरोग्याची प्रत्यक्श हानी होत नाही. फटाक्यांमुळे होणार्‍या ध्वनि व वायु प्रदूषणामुळे सार्वजनिक हानी होते शिवाय व्यक्तिगत त्रास होतो. त्यामुळे ही तुलना गंडली आहे.

दारु गुटका तंबाखू मुळे त्या त्या व्यक्तिच्या शरिराची हानी होते पण सार्वजनिक आरोग्याची प्रत्यक्श हानी होत नाही. फटाक्यांमुळे होणार्‍या ध्वनि व वायु प्रदूषणामुळे सार्वजनिक हानी होते शिवाय व्यक्तिगत त्रास होतो. त्यामुळे ही तुलना गंडली आहे.
Submitted by प्रकाश घाटपांडे on 12 November, 2023 - 13:26

Passive Smoking ही संकल्पना, रेल्वे स्टेशनवरील 'थुंकण्याने रोग पसरतात' ही उद्घोषणा आपल्या कानावरून कधी गेली नाही वाटते!!!
(अर्थात मीही फटाके लावू नये, याच मताचा आहे. सनातन संस्था गेली कित्येक वर्षे फटाके फोडणे हे कसे हानिकारक आहे याबद्दल प्रबोधन करत आहे.)

मराठीत फटाके वाजवणे, फुलबाजी, झाडं, चक्र उडवणे असे शब्दप्रयोग असताना , हल्ली फटाके फोडणे असं का म्हटलं जातं सर्रास ? तू माझी मदत कर सारखच हे ही खुप खटकतं कानाला.

फटाके म्हंजे अपघात, शारीरिक इजा, ध्वनी प्रदुषण वगैरे साठी गरज नसताना जाणून बुजून दिलेलं आमंत्रण म्हणून मी फटाक्यांचं समर्थन कधीच करू शकणार नाही. असो.

दारु गुटका तंबाखू मुळे त्या त्या व्यक्तिच्या शरिराची हानी होते पण सार्वजनिक आरोग्याची प्रत्यक्श हानी होत नाही.

दारूच्या नशेत खून होतात,दरोडे टाकले जातात,दंगली होतात,छेडछाड होते .
ही सार्वजनिक हानी नाही का?
एका व्यक्ती ल कॅन्सर झाला की त्या पूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट येते घरदार विकायला लागते.
ही सार्वजनिक हानी नाही का.

तरुण पोरं व्यसनाच्या आहारी गेले तर देश रसातळाला जाईल.
फटाक्यांनी इतकी मोठी तरी सार्वजनिक हानी होत नाही.

कशाचे ही समर्थन करता

मराठीत फटाके वाजवणे, फुलबाजी, झाडं, चक्र उडवणे असे शब्दप्रयोग असताना , हल्ली फटाके फोडणे असं का म्हटलं जातं...

कदाचित तो रस्सी बॉम्ब, लवंगी माळ अशा मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे 'फोडणे' हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा! कारण 'वाजवणे' हे क्रियापदसुद्धा जरी नादनिर्मितीशी संबंधित असले तरी ते अनेकदा सुसह्य, सुमधुर आवाजासाठी वापरले जाते. जसे की, तबला वाजवणे, पेटी वाजवणे, बासरी वाजवणे इ. याउलट 'फोडणे' हे क्रियापद अशा क्रियेसाठी वापरले जाते ज्यात अचानक मोठा आवाज निर्माण होऊन त्या वस्तूचे बारीक बारीक तुकडे होतात. जसे की दगड फोडणे, खडक फोडणे, फुगा फोडणे, काचेची एखादी वस्तू फोडणे. फटाकासुद्धा वाजल्यानंतर अचानक मोठा आवाज निर्माण होतो आणि त्या फटक्याच्या चिंधड्या चिंधड्या होतात. म्हणून कदाचित 'फटाके फोडणे' हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा!

बाकी 'तू माझी मदत कर' हे मलाही खटकते, आजकाल जवळपास सर्वच मराठी चित्रपट, मालिकांमध्ये असेच बोलले जाते.

कुटुंबांचे घर विकले ही सार्वजनिक हानी??

सर, तुमच्याकडे जे काही आहे ते अस्सल दर्जाचे आहे, मी संपर्कातून पत्ता दिला तर मला कुरियर कराल का? काय त्याचे पैसे असतील तेही सांगा, मी काय फुकट मागत नाही, नैतर परत माझी सार्वजनिक हानी झाली म्हणाल

फटाके ,इथे पिंची मध्ये रात्रीचे साडेबारा वाजले आहेत, अजून आवाज येत आहेत
बंदी प्रदूषण वेळेची मर्यादा वै सगळं ऑन पेपर ओक्के

फाटके वाजवण्यातला जो अनपेक्षित आवाज आघात असतो तो सर्वात त्रासदायक होतो. अगदी बंदी नका घालू, धा वाजे पर्यंत वाजवा किती ते पण नंतरएकदम फुल स्टॉप अस जरी झालं तरी सुसह्य होईल खुप.
इथे ही अजून वाजायायत आणि आता पुढचा आवाज किती मोठा आणि किती वेळाने ह्या विचाराने झोपेचं मस्त खोबरं झालाय.

पिंची मध्ये रात्रीचे साडेबारा वाजले आहेत, अजून आवाज येत आहेत
>>>>

आम्ही आता रात्रीचे दीड वाजता आईसक्रीम खायला गेलेलो.
इथे सगळी दुकाने नुसती उघडीच नाही तर लक्ष्मी पूजन सुद्धा चालू होते आणि फटाके वाजवणे सुद्धा..

पूजेचा रात्रीचा मुहूर्त होता का?

आणि आता तर रात्रीचे तीन वाजत आहेत तरी बाहेरून आवाज येत आहेत Happy
बंदी नक्की काय आहे? असल्यास अगदीच हास्यास्पद प्रकार आहे.

Passive Smoking ही संकल्पना, रेल्वे स्टेशनवरील 'थुंकण्याने रोग पसरतात' ही उद्घोषणा आपल्या कानावरून कधी गेली नाही वाटते!!!>>>>
भले तुमचा माझा थेट परिचय नाही पण तुम्हाला माझ्या कानावरुन हे गेले असण्याची शक्यता किती वाटते? दुसरी गोष्ट सार्वजनिक ठिकानी धूम्रपान वा थुंकणे सुद्धा गुन्हा आहे पण ती हाताळण्याची क्षमता यंत्रणेत नाही. अनेक गोष्टी कागदावर आहेत पण त्याची अंमलबजावणी नाही. दिल्ली तल्या प्रदूषणाचे गांभीर्य बातम्यातून आपल्याला समजते. त्यात आपण फटाके फोडून आपल्या शहराच्या प्रदूषणात भर कशाला टाकावी हा विचार या सुसंस्कृत लोकांच्या मनात येत नाहीत काय?

तरुण पोरं व्यसनाच्या आहारी गेले तर देश रसातळाला जाईल.
फटाक्यांनी इतकी मोठी तरी सार्वजनिक हानी होत नाही.>>>तरुण मुलांमधे उन्माद निर्माण करुन त्यांची विचार शक्ती कुंठीत करुन त्यांना आपल्या व्हेस्टेडे इंटरेस्ट असलेल्या क्षेत्रात गुंतवून ठेवायचे यात सुद्धा युवाशक्तीचा अपव्यय होतो.
फटाक्याचा व धर्म संस्कृतीचा काही ही संबंध नसताना फटाक्या वर प्रबोधन करणे हा धर्मावर घाला आहे अशी आवई उठवणारे हे धर्माचे भांडवल करुन पर्यावरणाचे नुकसानच करत असतात.

फटाके फोडू नका सांगणारे खरेच हिंदु विरोधी, भारत विरोधी आहेत.
त्यांना माहीत आहे की असं सांगितल्याने "आमच्या धर्मावर हल्ला" असा आक्रोश करून किंवा "जाओ पहिले उस आदमी की साइन केले आव"गिरी करून लोक मुद्दाम जास्त फटाके फोडणार ज्या मुळे फटाके फोडणाऱ्यांचेच तुलनेत जास्त नुकसान होते आणि जास्तीचे फटाके फोडल्या गेल्याने ध्वनी, वायू प्रदूषण जास्त होते.
तरीही दर वर्षी मुद्दाम फटाके फोडू नका सांगत असतात. Wink

काल आमच्या भागात रात्री 2 वाजेपर्यंत फटाके वाजवणे सुरू होते. धर्माच्या रक्षणासाठी वेळ आणि पैसा घालवणाऱ्या ह्या युवा वर्गाबद्दल अभिमान वाटतो

दहापट फटाके वाजवलेत यावर्षी. तीन वर्षांची खोट भरून काढली आहे.
फटाक्यांना पर्याय म्हणजे दिवाळीलाच पर्याय शोधावा लागेल. तो आहेच. हलोविअन सण साजरा करणे. इतक्या गोष्टी पाश्चिमात्य उचलल्या मग हे तरी का सोडा?

बाकी आप्पीलच्या टीम कुक याने कौतुक केले आहे. (आइ फोन्सचा दणका !!)

<< पण हिंदूंच्याच प्रत्येक सणाला हे पर्यावरण प्रेमी , मानवता वादी आणि पशुप्रेमी विचारजंत बाहेर
ह्या कोणत्या पदव्या ह्यांना देत आहात.
त्या उपाध्य पण स्वतःची खूप मोठी प्रतिष्ठा आहे.
कोणाला पण त्या उपाध्य देवू नका
नवीन Submitted by Hemant 333 on 11 November, 2023 - 11:11. >>

------- फटाक्यांचा शोध चीन मधे लागला आहे...
फटाके फोडण्याचा हिंदू धर्माशी तसा संबंध नाही.
तामिळनाडू (स्टॅलिन मुख्यमंत्री आहेत) मधे शिवकाशी येथे देशातील ७० % फटाके तयार होतात.

बोकलत मोड "मी एक आवाजी फटाका फोडतो आणि त्याचा आवाज टेप करुन ठेवतो....
पुन्हा पुन्हा एकण्यासाठी " Happy

<< हालोविन मध्ये फटाक्यांसारखे सार्वजनिक उपद्रव कारक आहे का ? उगाच काहीही कारणे.
Submitted by कॉमी on 13 November, 2023 - 00:14. >>

------ या दिवशी लहान मुलांना चॉकलेट / कँडी / गोड पदार्थ (काही ठिकाणी पैसे?) वाटण्याचा प्रघात आहे.
ओळखीच्या लोकांकडेच जा असे लहानग्यांना नेहेमी सांगितले जाते. अनोळखी लोकांनी दिलेले काहीही घ्यायचे नाही ( किंवा घ्यायचे आणि नंतर टाकायचे). चॉकलेटमधे काही " वेगळे" पदार्थ टाकले असण्याची शक्यता असते.

भारतात आला तर भारतीय लोक यामधेही आपली कल्पकता दाखवतील.

Pages