फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पन्नाशीच्या आसपास गर्दी, मोठे आवाज सहन करण्याची क्षमता बरीचशी कमी होते. त्यामुळे थोडाफार विरोध केला जातो. कदाचित पन्नाशीनंतर तो हिंदूविरोधी होतो का ह्यावर संशोधन व्हावे.>>>>>> आग्या , अगदी परफेक्ट निरिक्षण. वय वाढल कि गोंगाटाचा त्रास जास्त होतो. कामात लक्ष लागत नाही.डोकेदुखी रक्तदाब वाढतो. चिडचिड वाढते. मुलांचे कर्कश्य आवाजातील किंचाळणे, खेळणे नको नकोसे वाटते.स्वानुभव.

मनोरंजन महत्त्वाचे. इथे कुठला प्रश्न सुटणार थोडीच आहे.
>>>

ईथे तेच चालूय.
छोट्यामोठ्या आनंदासाठी फटाके फोडणारी लहान मुले किती क्रूर असतात हे दाखवायला मानव यांनी मनाने एक किस्सा रचला. म्हणे मोठ्या माळा फुटल्या. धूर घरात गेला. आजीबाईंना त्रास झाला. मग मुले त्यांच्याशी उद्धटपणेही वागली.

कोणाला ईथे सोल्युशनवर चर्चा नकोय. बस आरोपीच्या पिंजऱ्यात ऊभे करायचे आहे समोरच्यांना.

या किस्श्यातील खरेखोटेपणा दाखवायला मुद्दाम मी शहर विचारले. मुंबईत असे होत नाही मुद्दामच म्हटले. तर त्यांनी मुद्दाम मी राहत असलेल्या माझगाव शेजारील एका रेल्वेस्थानकाचे नाव घेतले.
लोकांना ईथे बस वादात जिंकायचे आहे. फटाक्यांच्या प्रदूषणाचे कोणाला काही पडले नाही.

जर त्या किश्यात मानव यांनी स्वत: कॅब न करता पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरले असते तर प्रदूषण कमी करायला हातभारच लागला असता Happy
पण हा विचार कधी आपल्या मनातही शिवत नसेल की शक्य तिथे पायी जाऊ, शक्य तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू..
अश्याच चर्चेसाठी मी तो पृथ्वीवरचे प्रदूषण कमी करूया धागा काढला आहे. प्लीज तिथे योगदान द्या.

पण मानव प्राणी >>पाळीव प्राणी>>खाण्याचे प्राणी ह्यांची उतरंड समाजमान्यच आहे.
विषारी वायुंपेक्षा विषारी विचारसरणी जास्त घातक आहे. त्या पोल्युशनचा आधी नायनाट करूया,

विषारी वायुंपेक्षा विषारी विचारसरणी जास्त घातक आहे. त्या पोल्युशनचा आधी नायनाट करूया,>>> आता जी विचारसरणी आपल्याला पटत नाही ती विषारी असे प्रत्येक पंथाचे लोक म्हणतात. प्रत्येकाला वाटते की आपल्याच विचारश्रेणीने जगाचे भले होणार आहे. फटाके वाजवल्याने प्र्दूषणात भर पडते, ते अपघात आगी घडवून आणतात, म्हणून फटाक्यांवर बंदी अशी विचारश्रेणी आहे तशी एवढ्याश्या प्रदूषणाने काय होणार आहे? फटाके वाजवणे आमचा अधिकार आहे त्यावर बंदी नको अशी ही विचारश्रेणी आहे.

पण मानव प्राणी >>पाळीव प्राणी>>खाण्याचे प्राणी ह्यांची उतरंड समाजमान्यच आहे.
५० वर्षांनी हि उतरंड अशी होईल,
रोबोट>> गाई गुरे>> कुत्रे>> मांजरे>> >> >> ..... झुरळे>> माणूस.

लोक किती परस्पर निष्कर्ष काढून मोकळे होतात ना!
विषय काय त्यानुसार आपण लिहीत असतो. विषयानुसार आपण अमुक ठिकाणी काही पाहिले असे सांगताना आपण त्या जागी का गेलो होतो, सोबत कोण होते, सगळे सांगायचे का?
डी जी शिपिंग मध्ये माझा चुलत चुलत भाऊ आहे. तो रे रोडला रहातो. त्याच्या उजव्या पायाला घोट्याला दुखापत झाल्याने प्लास्टर लावले होते. त्याची पुढे तपासणी करण्यास आणि ओके असेल तर प्लास्टर काढण्यास त्याला बलार्ड पियर येथील रेक्स चेंबर्स मधल्या मरिन मेडिकल सेंटर मध्ये घेऊन जायचे होते, त्याला घेऊन जात होतो. त्याला बस स्टँड पर्यंत चालत घेऊन जाऊन, बस मध्ये चढवून, तिकडे जवळच्या बस स्टॉप वर उतरवून चालवत घेऊन जाणार का?
दोघेच जण होतो तर ऑटो रिक्षा चालला असता, पण मुंबईत ऑटोरिक्षा नसतात, मग टॅक्सी केली. हे सर्व सांगणे आवश्यक आहे का?
माझा किस्सा खोटा वाटत असेल तर पूर्ण खोटा ठरवा त्यातील फक्त सोयीस्कर तेवढे खरे बाकी खोटे असे करू नका.

असो. आता या मी सांगितलेल्या घटनेवर कुणी आक्षेप घेतला नाही अथवा इतर कुठल्याही कारणास्तव मला टॅग केले नाही तर तूर्तास हे मा शे पो समजावे इथे.

ते सेंटीयण्ट्स बिईंग्स नावाचा काहीतरी प्रकार असतो म्हणे. म्हणजे झुरळं, पाली वगैरेंना मारलेलं चालतं, पण कुत्र्या-मांजरांना नाही, असं एका व्हिगन भारतीय माणसाने मल सांगितलं. तसंच फटाक्यांचा त्रास पण सेंटीयण्ट्स बिईंग्सनाच होत असणार. ह्यावर एक धागा निघायला पाहिजे. (तो आधीचा झुरळ-पालीवाला धागा नाही म्हणत आहे मी, तिथे त्यांना मारायचेच पर्याय आहेत.)

लोकं मला किस्से रचतोस म्हणता म्हणता स्वत: रचू लागलेत हे आवडले Happy
आता आणखी खरे खोटे करून मला हा आनंद गमवायचा नाहीये Happy

पण मानव प्राणी >>पाळीव प्राणी>>खाण्याचे प्राणी ह्यांची उतरंड समाजमान्यच आहे. त्यात हिपोक्रसी कशी ?>>> इथेच त्यांचा सार्कॅझम चा ऍटेम्प्ट गंडला Sad अतिरेकी तुलना केल्याने बॉल वाइड गेला. असो.

लोकांना ईथे बस वादात जिंकायचे आहे. फटाक्यांच्या प्रदूषणाचे कोणाला काही पडले नाही. >> बरोबर.
विषारी वायुंपेक्षा विषारी विचारसरणी जास्त घातक आहे. त्या पोल्युशनचा आधी नायनाट करूया,>>> आता जी विचारसरणी आपल्याला पटत नाही ती विषारी असे प्रत्येक पंथाचे लोक म्हणतात. >>> बरोबर

आमच्याकडे तुळशीच्या लग्नालाही फटाके ऊडवतात.
मधल्या काळात ईंडियाने वर्ल्डकप जिंकला तर तेव्हाही फटाके फुटायचे चान्सेस आहेत.
राहू द्या धागा.

आमच्याकडे तुळशीच्या लग्नालाही फटाके ऊडवतात.>>>>>>>>> एक किस्सा आठवला. आमचे एक चुलत आजोबांची म्हणे तीन लग्ने झाली. शास्त्रा नुसार दोन लग्ने झाल्यावर तिसरे लग्न तुळशीशी लावतात व त्यांनतर चौथे लग्न हे परत बाईशी होते. Biggrin Biggrin :

सर्वात मोठा सोहळा निवडणुका आता चालू होतील.
तरुणांचे आशा स्थान,थोर समाज सेवक , देशप्रेमी,राष्ट्रवादी, नेते जिथे जातील तिथे फटाके वाजणार च.

31 dec आहे पण त्या दिवशी फटाके वाजवले तरी .
प्रदूषण होत नाही
त्या फटाक्यांचा आवाज पण मंजुळ असतो.
त्या मुळे कोणाला त्रास होत नाही.
रात्री बारा वाजता फटाके वाजवून पण कोणाची झोप मोड होत नाही.
पाळीव कुत्रे पण घाबरून जात नाहीत
फक्त दिवाळी चे फटाके च भयंकर आवाज करतात .प्रदूषण करतात.

केशवकूल, पूर्वी माझा चकव्यावर अजिबात विश्वास नव्हता.
आधी त्याचे सार लक्षात न घेता त्याचा केवळ भौगोलिक अर्थ घेतल्याने तसे झाले होते.

ओ के .thank you.
चकव्याचे वैशिष्ट्य असते कि आपण चकव्यात फिरत आहोत हेच समजत नाही. उबो नि मुद्दामहून काडी लावली ... आता बुस्टर प्रतिसाद येणार आहेत.
ह्याला इंग्रजीत ग्राउंडहॉग हॉग डे म्हणतात म्हणे.

काल आमच्याकडे तुरळक म्हणतात तसे फटाके वाजले. दिवाळी खरोखर साजरी करणारे भाऊबीज, पाडव्याची ओवाळणी , गाठीभेटी, देणीघेणी यात रमले होते.

आमच्याकडे भाऊबीज, ओवाळणी, सासुरवाडीशी भेटीगाठी हे सर्व करून फटाकेही उडवले गेले. तसेच रात्री उशीरा मद्यपानाचा कार्यक्रमही झाला.

पण भाऊबीज पाडवा या सणांना फटाके कमी वाजवले जातात.
लक्ष्मीपूजनला सर्वात जास्त आणि जोरदार फटाके वाजवले जातात.
असे का?

फटाके या वर्षी कमी वाजले हे खरे. पर्यावरणप्रेमी म्हणून मला आनंदच झाला. पण त्यामुळे मी गाफील राहून पुढील वर्षी जनजागृती करायला मागे राहून चालणार नाही.

फटाके कमी वाजण्याची इतरही कारणे आहेत.

वसूबारस पर्यंत इथे जोरदार पाऊस होता. या पावसावरुन दिवाळीत नवे कपडे घालून मिरवायचे की नवा रेनकोट घालायचा टाईपचे जोक्स फॉरवर्ड होत होते. तसेच फटाके छत्रीखाली पेटवायचे का असेही व्यंगचित्र पाठविले जात होते.
पाऊस आणि बरखास्त असलेली महापालिका व त्यामुळे अधिकारहीन नगरसेवक व प्रचंड सक्रिय मनपा व पीएमार्डीए अधिकारी या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून मलातरी माझ्या घराजवळ आणि भोवतालच्या कित्येक किमी परिसरात फटाक्यांचे स्टॉल्स रस्ते आणि पदपथांवर दिसलेच नाहीत.
शहरांत काही थोडी मैदाने आहेत जिथे भाडे भरुन स्टॉल्स लावले जातात पण ते दूर असल्याने लोकांनी खरेदी कमी केली असावी.

त्यामुळे यावर्षी फटाके कमी वाजले म्हणजे पुढील वर्षी अशीच परिस्थिती राहील या भ्रमात राहिले नाही पाहिजे.

फटाके आणि प्रदूषण इथ पर्यंत च संबंध ठेवला तर काही वर्षात लोक फटाके वाजवण्याच कमी करतील.
पण फटाके दिवाळी मध्ये वाजवणे ह्याला काही शास्त्रीय आधार नाही.

लोकांना अन्न मिळत नव्हते फटाके काय वाजवणार.
दिवाळी मध्ये फटाके वाजवू नका.
अशा अर्थाच्या पोस्ट समाज माध्यमावर वाढल्या की मात्र जन जागृती होण्या ऐवजी.
फक्त फटाके वाजवण्यासाठी साठी च लोक जागी राहतील.

रात्री उशीरा मद्यपानाचा कार्यक्रमही झाला.>> यू टू ऋन्मेऽऽष ?
>>>>

मी नाही पित.
ज्यांना मद्यप्राशनातून आनंद मिळतो त्यांनी दारू पिऊन सण साजरा केला.
मी फसफसणारे पेय देखील पित नाही ज्याला सॉफ्ट ड्रिंक म्हणतात. मग दारू ज्याला हार्ड ड्रिंक म्हणतात ते दूरच.

मग लिहल कशाला..
काल भाऊ बीज होती ...
पवित्र दिवस आहे .बहिण म्हणजे स्त्री च तिचा आदर राखण्याचा दिवस आहे
मूर्ख अपवाद सोडले तर दारू पिऊन बहिणी कडे कोणी जात नाही.
ना तिच्या घरी दारू पीत.
घर एक मंदिर असते असे हिंदू मानतात .घरात असे खुले आम् दारू पिणारे फक्त ढोंगी पुरोगामी असतात
बाकी कोणी पित नाही.
ऋनमेष तू हिंदू विरोधी व्यक्त होतोस आणि ढोंगी पुरोगामी त्याचा सरसकट हिंदू बेवडे आहेत असा अर्थ काढतात .
अर्थात ते सत्य नाहीं

यंदा आमच्या भागात एकंदरीतच फटाके कमी 'वाजले'. प्रकाश देणारे फटाके मात्र बच्चे कंपनीने बऱ्याच प्रमाणात उडवले, त्यामुळे आवाज नाही तरी धूर झालाच. असो. किमान एका आघाडीवर तरी शांतता असे म्हणूया

Pages