पास्ता बा रा ए वे ए ठि विनय श्टाईल

Submitted by परदेसाई on 21 October, 2013 - 09:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
१. पेने पास्ता (नळ्या) चार मुठी / २ ओंजळी.
२. Bertoli/Ragu किंवा तत्सम पास्ता सॉस २ १/२ ते ३ मोठे डाव.
३. Light cream (किंवा Half & Half) २ १/२ ते ३ मोठे डाव.
४. लसून पेस्ट किंवा चिरलेली.
५. १ मोठा टोमॅटो.
६. तेल ४ टेबलस्पून (Canola oil / Vegetable Oil)
6. ऑरेगानो ( सुपरमार्केटमधे मसाल्याच्या बाटल्या असतात तिथे मिळतात, चुरडलेली सुकी पाने असतात).
७. ईटालियन अर्ब्स (मेकॉरमिक किंवा तत्सम कंपनीचे. सुपरमार्केटमधे मसाल्याच्या बाटल्या )
८. सुक्या मिरचीचा चुरा ऐच्छिक...
९. साखर.

क्रमवार पाककृती: 

पास्ता शिजवा: लिटर सव्वा लिटर पाणी उकळत ठेवा. त्यात १ टेबलस्पून तेल, १ ते १ १/२ टीस्पून मीठ आणि १ ते १ १/२ टिस्पून साखर घाला. पाणी नीट उकळू लागले की त्यात पास्ता टाकून तो शिजवून घ्या.
(मी एका माणसाला दोन पुरेपूर भरलेल्या मुठी असं प्रमाण धरतो). पास्त्याची एकादी नळी चावून बघा. आतून घट्ट/सुकी वाटली तर अजून शिजायला हवी, आणि अगदीच नरम वाटली तर जास्त शिjaली. या दोन्हीं state च्या मधे नीट शिजवा. लगेच गाळून पाणी काढून टाका. लगेच थंड पाण्यात पास्ता धुवून घ्या. पास्ता सॉस खूप वेळाने करायचा असेल तर पास्त्याला थोडं तेल लावून झाकून ठेवला तर तो चिकट होत नाही. लगेच करायचा असेल तर प्रश्न नाही.

पास्ता सॉसः
नॉनस्टीक भांड्यात २ टेबलस्पून तेल तापवा. त्यात टोमॅटोचे तुकडे मध्यम आकाराचे तुकडे टाका. एक दोनदा परतायचे आहेत पण फार शिजवायचे नाहीत. लगेच लसूण पेस्ट आणि १ Tea स्पून ओरेगानो टाका (मला लसूण काप आवडतात, म्हणून मी थोडी पेस्ट आणि थोडे तुकडे टाकतो). एकदा परता.
आता पास्ता सॉस टाका. जरा उकळी आली की क्रीम टाका. आता उकळी येऊ द्या.
आता त्यावर ईटालियन अर्ब्स १/२ टीस्पून, आणि हव्या असल्यास सुख्या मिरचीचा चुरा टाका.
अंदाजाने मीठ टाका.
लगेच वाढायचे असल्यास त्यातच पास्ताच्या नळ्या टाकून ढवळा.
नाहीतर वाढायच्या आधी १०/१५ मिनिटे तयार केलेला सॉस आणि पास्ता मिसळून गरम करा.

वाढणी/प्रमाण: 
दोन माणसांना हा पास्ता पुरेसा होतो.
अधिक टिपा: 

. पास्ता आणि सॉस फार वेळ एकत्र करून ठेवलं की ते मिश्रण घट्ट होतं आणि मग पास्ता सॉस जाणवत नाही. (म्हणून मी आल्यावर लगेच पास्ता खायला लावला).
. पास्ता एकदा उकडून, तेल लावून फ्रीजमधे ठेवला तर सॉस तयार करायला १५ मिनिटं लागतात (प्राची).
. पेने ऐवजी कुठलाही पास्ता चालतो पण स्पगेटी मात्र या सॉसमधे मला आवडली नाही.
. माझ्या लेकी कधीही/केव्हाही बाबाची ही रेसिपी करून खातात एवढी सोप्पी रेसिपी आहे.
.गरम गरम वाढल्यास उत्तम (वाढताना सॉस दिसला पाहिजे).

माहितीचा स्रोत: 
मित्र व घरी केलेले प्रयोग. मुलं
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पावभाजी पडली ? म्हणजे ? <<< पावभाजीचं भरलेलं भांडं गाडीत आडवं झालं. उरलेली भाजी रस्त्याने खाल्ली...

शुंपी... रेसिपी उद्या... Happy

काल या रेसिपीने पास्ता केला. डब्यात घेउन गेलेले मेंबर एकदम खुश आहेत. धन्यवाद देसाई!
आता डीजेच्या रेसिपीने एकदा बनवायचा आहे, होममेड सॉस.

देसाईंच्या हातचा पास्ता खाल्ल्यापासून मी याच पद्धतीनं पास्ता करते. सायोनं सांगितलेला फ्रॅन्सेस्को रिनाल्डी (https://www.francescorinaldi.com/) ब्रँडचा पास्ता सॉस वापरते. मिक्स हर्ब्स न घालता नुसती बेसिलची पानं घालते. टोमॅटो चंक्स नाठाळांना आवडत नाहीत म्हणून ते घालत नाही. एक टे स्पू बटर पण घालते. त्याची भारी चव येते. ग्रिल्ड भाज्या- कलर्ड पेप्पर, ब्रोकोली घालते. मला खूप जास्त क्रिमी चव आवडत नाही म्हणून क्रीम कमी आणि सॉस जास्त घालते. एकटीच असेल जेवायला तर साध्या ऑऑमध्ये करण्याऐवजी चिली ऑयलमध्ये करते. पण करते याच रेसिपीने बर्का Wink तर बर्‍याच दिवसांपासून फोटो टाकणार होते त्याला आज मुहुर्त लागला. त्यानिमित्तानं इथं आधी केलेली भंकस वाचून हहपुवा झाली Biggrin

IMG_2865 (1).JPG

अरे वा!

("प्लेट जरा लडबडली आहे" असं म्हणायचा मोह आवरता आवरता सुटला .. आणि "बरोबरचा गार्लिक टोस्ट फ्रोजन असतो तो वाटतं" हे ही .. : p)

Pages