चला अनुभवूया एक संगीतमय सकाळ - "रे सख्या" चा प्रकाशन सोहळा

Submitted by कविन on 21 October, 2013 - 06:36
ठिकाण/पत्ता: 
कार्यक्रमाचे ठिकाण: सावित्रीबाई फुले सभागृह, डोंबिवली (पूर्व) (स्टेशनपासून तसं लांब आहे पण रेल्वे स्टेशन मधून कल्याण दिशेच्या पुलाने बाहेर पडल्यास, तिथून सभागृहा पर्यंत रिक्षा सहज मिळतात)

------------

रविवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी, डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले सभागृहात रंगणार आहे सुरांची मैफल आणि कौतुकाची बाब म्हणजे ह्यात "वैभव जोशी, नचिकेत जोशी, ज्ञानेश पाटील, मयुरेश साने" हे चार मायबोलीकर मित्र आपल्या शब्दांनी आणि "केतन पटवर्धन" हा आपला मायबोलीकर मित्र स्वरांनी रंगत आणणार आहे.

केतनचं ह्या सुरमयी जगातलं पदार्पण मायबोलीकर मित्रांच्या साथीने होतय हे आपल्या मायबोली परिवारासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.

ते पाच जण स्टेजवर एक "मैफल गटग" करणार आहेत, आपण त्यांचं कौतुक करायला उपस्थित राहून आपलंही एक गटग करुयात. काय म्हणता?

कार्यक्रमाची संपूर्ण माहिती खाली देत आहे:-

कार्यक्रम स्वरूप: "रे सख्या" ह्या अल्बमचे वैभव जोशी आणि कौशल इनामदार ह्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रकाशन आणि त्यानंतर गीतकार आणि गायकांच्या साथीने रंगणार आहे शब्द सुरांची मैफल.

कार्यक्रमाचे ठिकाण: सावित्रीबाई फुले सभागृह, डोंबिवली (पूर्व)

(स्टेशनपासून तसं लांब आहे पण रेल्वे स्टेशन मधून कल्याण दिशेच्या पुलाने बाहेर पडल्यास, तिथून सभागृहा पर्यंत रिक्षा सहज मिळतात)

दिनांक: रविवार - २७ ऑक्टोबर २०१३

वेळ: सकाळी ११ वाजता

गीतकार: वैभव जोशी, नचिकेत जोशी, ज्ञानेश पाटील, मयुरेश साने आणि वा.ना. सरदेसाई

संगित संयोजन: कमलेश भडकमकर आणि सागर साठे

गायक: केतन पटवर्धन, डॉ.मृदूला दाढे जोशी, मंदार आपटे, मुग्धा हसबनीस, केतकी भावे जोशी

प्रमुख पाहुणे: कौशल इनामदार आणि वैभव जोशी

कार्यक्रमाचे पासेस डोंबिवलीत खालील ठिकाणी उपलब्ध आहेत:- विनीत बुक डेपो - डोंबिवली प., पै यांच्या "फ़्रेन्डस लायब्ररीच्या" सर्व शाखा.

पासेस करीता व अधिक माहितीसाठी नचिकेत जोशी, केतन पटवर्धन किंवा माझ्याशी संपर्क साधला तरी चालेल.

मग काय म्हणताय, येताय ना आपल्याच परिवारातल्या सदस्यांचं कौतुक करायला? कारण कार्यक्रम विनामुल्य असला तरी ही मैफल मात्र अमुल्य असणार ह्यात शंकाच नाही.

विषय: 
तारीख/वेळ: 
रविवार, October 27, 2013 - 01:30 to 04:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त...
मी येणार होतो...........पण सुट्ट्यांचा प्रोब्लेम असल्याने जम्या नै ...... Sad

हार्दिक शुभेच्छा.........!!!!!!!

अरे वा, डोंबिवलीत होतोय, सर्वांना शुभेच्छा आणि अभिनंदन, यायला जमणार असेल तर कळवीन मी कविता.

अभिमान वाटतो कार्यक्रमातल्या सर्वं मायबोलीकरांचा.

Mi yenare.. Happy

मंजे, आमच्याकडेही परीक्षा चालू आहेत. सानिकाला सांगितलय, कार्यक्रमाला यायचं असेल तर शुक्रवार, शनिवार अभ्यास करायचा नाहीतर ती आणि तिचा बाबा घरी राहील आणि मी एकटीच कार्यक्रमाला जाईन Proud

येस्स कवे..... प्रयत्न करतो.... आणि कोणी येणारे आहेत का वेस्टर्नहून??? म्हणजे ठरवून गाडी काढूनच जाता येईल.

भुंग्या, किरु ला विचार.

येणार असशील तर आधी सांग मला, म्हणजे फ्रेन्ड्स लायब्ररी मधे जाऊन पासेस आणून ठेवेन मी

ज्ञानेश, नचिकेत आणि मयूरेश ह्यांचे हार्दिक अभिनंदन.

प्रकाशनानंतर सी.डी. कुठे मिळेल ते कळवलेत तर बरे होईल.

ज्ञानेश, नचिकेत आणि मयूरेश ह्यांचं मनापासून अभिनंदन... एखादी क्लिप टाका रे. आणि खरेदीसाठी कुठे अन कधी सीडी मिळेल ते ही कळवा.
छान होऊदे कार्यक्रम.