एक मेथीची जुडी, एक- दीड मुठ भाजलेले शेंगदाणे किंवा अर्धी वाटी दाण्याचं कुट, ८-१० लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, जीरे, मीठ, हळद, फोडणीपुरतं तेल.
मेथीची जुडी निवडून, धूवून, चिरून घ्यावी. शेंगदाणे, मिरच्या, लसूण, जीरे आणि मीठ पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. हे सगळे पदार्थ जितके मिळून येतिल तितकं चांगलं.
कढईत तेल-जीरे, हळदीची फोडणी करून त्यात मेथी परतून घ्यावी. १-२ मिनीट झाकण ठेवून शिजवावी. नंतर यात शेंगदाण्याचं पातळ वाटण घालून १०-१२ मिनीट उकळू द्या. भाजी तयार.
ही भाजी चपाती /भाकरी चुरून खाण्याइतपत पातळ असते.
औरंगाबादच्या आजूबाजूच्या भागात करतात बहूतेक अशी भाजी. आमच्या घरी, शेजारी कधी खाल्ली नव्हती. पण जावेच्या आईकडे त्यांच्या स्वैपाकाच्या बाईने करुन खाऊ घातली. तेंव्हापासून ही माझी आवडती भाजी झाली आहे.
पातळ असल्याने ही भाजी नेहेमीच्या मेथीसारखी चोरटी होत नाही. घरात एखादीच मेथीची जुडी असेल तर करायला सोयीची.
चिन्नु आणि इतरांनी दिलेल्या टिपा -
१.या भाजीत उकडलेला कांदाही घालतात. कांदा सालपटं काढून उकडायचा आणि चिरा देऊन ग्रेव्हीत सोडा. तेव्हढा वेळ नसेल तर कांदा सालासकट गॅसवर भाजायचा व गरम ग्रेव्हामध्ये चिरा देऊन घालायचा.
कांद्याची पातही मस्त लागते.
२. यातच थोडीशी शिजवलेली तुरीची डाळ पण मॅश करून घालता येते.
३. कच्ची हिरवी मिरची घेण्यापेक्षा भाजलेली हिरवी मिरची, मिरे पण वाटणात घालतात.
४. या पद्धतीने सगळ्या पालेभाज्या करता येतिल.
५. अशाच प्रकारच्या ग्रेव्हीमध्ये इतर भाज्या - घोसाळी, दोडकी, दुधी पण करतात.
मी हिच भाजी कोरडी करते. फक्त
मी हिच भाजी कोरडी करते. फक्त जिर्या ऐवजी मोहरीची फोडणी. मेथी परतुन घेतल्यावर, लसुण, हि.मी. आणि कच्चे दाणे भरड वाटुन वरुन घालायचे, मिठ घालुन एक वाफ आणायची. गरम भाकरी बरोबर झक्कास लागते.
माझ्या एका मैत्रिणीच्या मामी अचानक जेवायला गेलेकी, दारातुन ताजी मेथी खुडुन आणुन तव्यावर अशी भाजी करुन, गरम भाकरी असे जेवायला वाढायच्या.
ही पद्धत पण छान आहे, करुन बघणार नक्की.
भाजी करून खाण्याच्या
भाजी करून खाण्याच्या कल्पनेनंच तोंपासु
रच्याकने, अनुमति चित्रपटात रीमा लागू फोडणीत पेरभर कांद्याच्या फोडी फोडणीत घालते, लगेच मेथी घालते आणि वरून पाणी ओतते. ही कुठली रेसिपी म्हणे?
पातळ भाजी शेपूचीही >>> ही
पातळ भाजी शेपूचीही >>> ही आयड्या दिल्याबद्दल दक्षिणाला दोन शेपूच्या जुड्या बक्षिस
>> अनुमति चित्रपटात... ही
>> अनुमति चित्रपटात... ही कुठली रेसिपी म्हणे?
अनुमेथी.
अल्पना, रेसिपी मस्त आहे.
आमच्या घरी अशा पातळ भाजीला
आमच्या घरी अशा पातळ भाजीला मुद्दा भाजी म्हणतात बहुतेक.
मी परत तो सीन पाहिला तुम्ही लिहिल्यावर 
नवर्याची फेवरिट्ट!
बादवे सिंड्रेला केवढं मन लावून पिक्चर पाहिलाय तुम्ही
मस्स्त रेसिपी! तोंपासु...आज
मस्स्त रेसिपी! तोंपासु...आज उद्यातच करणार. डाळ मिसळणे प्रकार जरा ट्रिकी वाटतोय, चव बिघडायला नको.
बायदवे , मुद्दा भाजी म्हणजे जरा घट्ट असते ना, साधारण श्रीखंडासारख्या कन्सिस्टन्सीची.
मी पण तुरीची किंवा मुगाची
मी पण तुरीची किंवा मुगाची शिजवलेली डाळ मिसळून लसणीच्या फोडणीवर करते ही भाजी.
मैत्रेयी, मेथी शिजून जितकी होईल असं अंदाज असेल त्याच्या निम्मेच ते वरण घालायचे म्हणजे ती मेथीचीच वरण घालून भाजी वाटते. वरणाची मेथी घालून दाट आमटी वाटत नाही
मस्त आहे रेसिपी ..
मस्त आहे रेसिपी ..
मस्त रेसिपी. अश्या प्रकारची
मस्त रेसिपी. अश्या प्रकारची भाजी लवकरच करण्यात येईल.
मेथी कुठल्याही प्रकारे आवडते.
आमच्याकडे आशीच भाजी
आमच्याकडे आशीच भाजी कांद्याच्या पातीची करतात.
मिलिंदा, आंटी मत कहो ना! मला
मिलिंदा, आंटी मत कहो ना!
मला हे सर्व मंजुतैकरता लिहावं लागलं रे, स्पष्टीकरण म्हणून. जरा वरच्या पोष्टी वाचायच्या न कॉपी-पेस्टच्या आधी. नाहीतर मी कुठल्याच बाफवर वेळ सत्कारणी लावायच्या भानगडीत पडत नाही. जे माहीत आहे, त्याचा कुणाला तरी उप्योग व्हावा एवढाच सद-हेतु. तशी टींबही लावता येतात पण मग मूळ उद्देश्यावर पाणी फिरते.
चिन्नु, मला तुमच्या
चिन्नु, मला तुमच्या उद्देशाबद्दल शंका नाही.
तुम्ही लिहिलंत, चांगलं केलंत. फक्त दुसरी कडे लिहून येथे दुवा दिला तर वेगळी भाजी (उदा. कांद्याची) शोधणार्यांना पण सापडेल सहज. असा सांगण्याचा हेतू आहे.
हेच फक्त मिलिंदा स्टाईल मध्ये सांगितलं आहे
ओके
ओके
नाही, श्रिखंडाच्या
नाही, श्रिखंडाच्या कन्सिस्टंसीची नाहिये हि भाजी. पातळ असते त्याहून. वरण घालयचं म्हणजे फक्त २-३ टि.स्पून. सर्वात महत्वाचं म्हणजे, कुटाचा मसाला तेलात तेल सुटेपर्यंत परतला पाहिजे मगच पाणि घालायचे, नाहितर उग्र चव लागते. गरम पाणि घातले तर अजून चांगले.
मै, पातळ असते ही भाजी. ताटात
मै, पातळ असते ही भाजी. ताटात वाढता येणार नाही, वाटीच लागेल.
आशु म्हणतेय तसं खूप परतणं वैगरे मी नाही केलं कधी. खरंतर काहीच कुटाणा न करता जशी रेसेपीमध्ये लिहिलिये तशीच करते मी. तेल पण अगदी नावाला फोडणीपुरतं. पण तरीही छान लागते.
इथे बरीच व्हेरिएशन्स आली आहेत. काही व्हेरिएशन्स मी टिपांमध्ये घातलीत. आता याप्रकारे पण करुन बघणार. स्पेशली ते छोटे कांदे घालून.
काल पालकाची केली या पद्धतीनी.
काल पालकाची केली या पद्धतीनी. यम्मी झाली. धन्यवाद.
मी केली आज ही भाजी. मस्त झाली
मी केली आज ही भाजी. मस्त झाली आहे.
घरी सोलापुरी दाण्याची चटणी होती, त्यात लसूण, जिरं घालून गुळगुळीत पेस्ट करून परतलेल्या मेथीत घातली. मस्त मेथी मटर मलईसारखी दिसतेय. आणि चव तर मस्तच!
नवरा म्हणाला, मेथीत दाण्याची आमटी तर घातलीस, काय नवं केलंस?
मंजू, आम्ही पण आज रात्रीला
मंजू, आम्ही पण आज रात्रीला करणार आहोत.
मी पालक आणि शेपू पण करून बघितले या प्रकारे.
मी केली ह्या पद्धतीने. आवडली.
मी केली ह्या पद्धतीने. आवडली.
पूर्वी कधी ऐकलीही नव्हती .
पूर्वी कधी ऐकलीही नव्हती . मेथी आवडती भाजी आहे घरी. यापद्धतीने करून बघते लवकरच.
मी मेथीची भाजी जिरं आणि चिरलेला लसुन फोडणीला घालून त्यात बारीक लाल सुकी मिरची चिरून घालते नंतर चिरलेले गाजर घालते त्यात तिखट हळद मीठ घालून बारीक चिरलेली मेथी घालते झाकण ठेवून वाफ आली कि अर्धा चमचा साखर सोडते…. हि भाजी अगदी कोरडी होईपर्यंत परतायची असते. सुंदर चव लागते.
याशिवाय मुगाची डाळ किंवा बटाटा किंवा ओले खोबरे घालूनही करतात.
हीच भाजी शेवग्याच्या शेंगा घालून पण अप्रतिम होते … फक्त शेंगदाणा मिरचीची पेस्ट करतांना त्यात टमाटर घालायचे
तेल गरम झाले कि त्यात फोडणी करून त्यात मुठभर शेंगदाणे (कच्चे असतील तरी चालेल) दोन टमाटर हिरवी मिरची अन थोड आलं लसुन घालून बारीक करायचे… तेल गरम झाले कि त्यात फोडणी करून त्यात हि पेस्ट घालायची निट परतवून घ्यायची नंतर हळद,तिखट,मीठ धने जिरे पूड घालायचे आणि शेवग्याच्या शेंगा सोडायच्या परतवून झाकण ठेवून (झाकणवर पाणी टाकायचे म्हणजे भाजी पातेल्याला खाली लागत नाही) वाफ येऊ द्यायची आणि नंतर पाणी सोडून हवा तेवढा पातळ रसा करायचा गरम मसाला घालायचा. भाजी शिजली कि उतरवून कोथिम्बिर पेरायची. आमच्या घरी हि भाजी कर म्हणून माझ्याकडे सारखा हट्ट असतो येणाऱ्या पाहुण्यांचा
काल एकदाचा ही भाजी करायचा
काल एकदाचा ही भाजी करायचा मुहूर्त लागला. पोळी आणि भात दोन्हीबरोबर मस्त लागली. पुढच्या वेळेस पालक + मेथी एकत्र करणार.
मी केली आज अशी मेथीची भाजी
मी केली आज अशी मेथीची भाजी छोटे कांदे घालून... मस्त घमघमाट सुटलाय........

मी पण काल ही भाजी केली. वेगळी
मी पण काल ही भाजी केली. वेगळी आणि एकदम टेस्टी झाली होती.
Pages