शिक्षण आणि मूल्य - माझं मनोगत

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

रोज भरदुपारी ऑफिसच्या गाडीची वाट पाहताना एक बाई रोज दिसते. तिच्या हाताशी एक आणि पोटात एक अशी अवस्था. हाताशी असलेलं जेमतेम ३-४ वर्षांचं असेल. थोड्या दिवसात पोटातलं ही या जगात येईल.

मला एक प्रश्न रोजच पडतो तिला पाहून. कित्येक होऊ घातलेले आईवडील आपल्या येणार्‍या पाल्याच्या भविष्याचा किती आणि काय विचार करत असतील? स्पर्धा इतकी वाढली आहे. आजच व्हॉटसप वर कुणितरी मुंबईची कहाणी थोडक्यात मांडली होती. ते वाचून मनात आलं की ती कहाणी फक्त मुंबईची नसून भारतातल्या प्रत्येक वाढत असलेल्या शहराची आहे. जगण्यासाठी धडपड. मग एक मूल आधीच असताना दुसर्‍या मुलाचा विचार लोक का करत असतील?

आईवडील होणं ही प्रक्रिया फक्त शारिरिक आहे का? शारिरिक क्षमता आहे म्हणून मूलं जन्माला घालायची का? अर्थात सर्वच लग्न झालेले लोक असा विचार करतात असं नाही. पण जागरूक पालकत्व किती लोक करत असतील असा प्रश्न मला खरंच पडतो... रोजच.

आपणच खाऊनपिऊन सुखी राहण्यासाठी क्षणाक्षणाला मन मारून कसंबसं जगतोय, तिथे अजून एक मूल जन्माला घालून त्याला या जीवघेण्या स्पर्धेत आपण का ढकलतोय असा विचार त्यांच्या मनात एकदा तरी येत असेल का? आपणच आत्ता इतके भरडले जातोय, उद्या पुढे जाऊन ही स्पर्धा आणखी जीवघेणी होईल, त्यात आपल्या पाल्याचा निभाव लागेल का? किंवा त्या स्पर्धेत बळकटपणे उतरवण्यासाठी लागणारी सामुग्री ( शारिरिक्/आर्थिक्/मानसिक) आपण पुरवू शकू का? हा विचार होतो का?

रोज हात धुताना, नळ थोडावेळ जरी जास्ती सोडला गेला तरी डोक्यात येतं आपणच असा अपव्यय केला तर आपल्या पुढची पिढी काय वापरेल? तीच कथा पेट्रोलची. जागांचे भाव गगनाला भिडलेत, शिक्षण क्षेत्रात इतकी चुरस आहे. तिथे पुढची पिढी कसा टिकाव धरणार? नोकर्‍या नाहीत, उद्योग करायला पुरेसं आर्थिक पाठबळ आणि कुवत प्रत्येकाकडेच असेल असं नाही. आत्ता जरी दोन मुलं जन्माला घालण्याची (आर्थिक) (हो आर्थिकच, ९०% लोक आर्थिक कुवत पाहूनच मूलं जन्माला घालतात. एक जबाबदार व्यक्ती किंवा नागरिक बनवण्याची ईच्छा आणि ताकद असणारे खूप कमी आईबाप असतील.) कुवत असली तरी अजून दहा वर्षांनी बदलत्या जगात आपली कुवत तीच राहिल का याचा विचार किती आईवडील करत असतील? किंवा करतात?

पालकत्व म्हणजे फक्त जन्माला घातलेल्या मुलाला चांगलं चुंगलं खाऊ घालण किंवा सर्व भौतिक सुखं देणं इतकंच आहे का? त्याला उच्च दर्जाची मूल्य शिकवणं हे ही काम पालकांचंच ना? त्यासाठी त्यांनी स्वत: एक व्यक्ती म्हणूनही विकसित व्हायला हवं, मग व्यक्ती म्हणून विकसित होण्याबरोबरच कुटूंब, समाज आणि ओघानं देशाचा ही प्रश्न आलाच. मग लोकसंख्या आधीच इतकी वाढली आहे त्यात आपणच अजून भर घालायची? खेड्यात एक वेळ हे चित्र दिसलं तर नवल वाटायला नको, धरून चालो तिथे शिक्षणाचा अभाव आहे, पण शहरातही? जिथे 'शिकलेले' लोक राहतात असं आपण धरून चालतो पण ते ही असं वागताना दिसले की मनात येतं शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञान आणि पैसे मिळवण्याचं साधन झालंय.. मूल्यांशी त्याचं काही देणं घेणं राहिलं नाहिये आजकाल.

पुर्वी शिकलेली व्यक्ती म्हणजे 'शहाणी' अर्थातच सर्वार्थाने विचारी किंवा भलंबुरं समजणारी अशी व्यक्ती म्हणून समजली जायची. पण आज तसं दिसत नाहिये. शिकलेली म्हणजे फक्त मागे ढिगभर डिग्र्या मोठाले पगार आणि भरपूर भौतिक सुखं इतकंच नातं आहे शिक्षणाचं आणि आयुष्याचं.

विषय: 
प्रकार: 

>>>मुल्य किती अशी नव्हे, मुलं किती अशी चर्चा आहे ती<<<

अर्रेच्या, खरच की! मी आपला अजून शीर्षकावरच अडकलो आहे!
Happy

arc दोन्ही प्रसंगसाठी Lol
फार किरकिर पिरपिर करतात पोरंटोरं वाली लोक. मीपण बर्याचदा चिडुन "सरकार/जग/आम्ही मागे लागलो होतो काय तुमच्या 'प्लिज प्लिज मुलं जन्माला घाला' म्हणुन??" असे बोललेय.

arc, अगदी अगदी.... सुखाने खात नाही आणि खाउ पण देत नाही....

कुरकुर करुन का जगतात लोकं कुणास ठाऊक?

माझाही मित्र असाच म्हणायचा, आज भेंडी ४० रु. तर दोडका २५ रुपये..... मला एकदम सकाळचे रेडिओवरचे बाजारभाव ऐएकल्यासारखं वाटायचं.
मी एक दिवस चिडुन म्हटलं, अरे मग काय उपाशी राहतो का? पाहिजे तर ते कर... आणि मग आज किती रुपयांचं लंच झालं ते विचारणं सुरु केलं....

अशी मंडळी बहुदा आपलं दु:ख (?) दुसर्‍याला सांगुन स्वतः आनंदात राहतात, आपल्याला उगिच घोर Sad

स्वाती आंबोळे, झक्की, विजय, ज्ञानेश, इब्लीस यांचे म्हणणे पटले.
१. कोणाला किती मुले होऊ द्यायची हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न नाही का?
२. जगातलं पेट्रोलियाम लवकरच संपणार असं गेले कित्येक वर्षे ऐकतोय पण अमेरिका, कॅनडा मधेले शेल तेल, आणि आता तर रशिया पुरस्कृत आक्टिक मधेले उत्खनन (ज्याचे जगावर भयंकर परिणाम होतील म्हणून ग्रीनपीस ओरडतेय) याने इतकं तेल मिळालाय की निश्चिंत राहायला हरकत नाही. (तेलाचे भाव, प्रदूषण यांचा सामना करायला मला खात्री आहे नवीन शोध मदत करतील). असेच IP address संपणार, इलेक्ट्रीनिक्स मध्ये मूरचा नियम मोडणार आणि बऱ्याच काळज्या भेडसावतच असतात पण जग मार्ग काढतेच की.
३. लोकसंख्या वाढीचा निरोगी वेग हा २ पेक्षा थोडा जास्त समजतात. (२ माणसा पश्त्यात त्यांची २ अपत्ये लोकसंख्या साधारण तेवढीच ठेवतील असं माझा तर्क)
४. चीन १ मूल पासून २ मुले नियमाकडे जात आहे (मी चीन ची भलामण करत नाहीये या बाबतीत नियम नकोच फ़क़्त प्रबोधनच उपायकारक ठरू शकते जे भारत करण्याचा प्रयत्न करतोय)
५. माझ्या आई-वडिलांना समजा ३ मुले झाली असती (आम्ही दोघे आहोत) तर शिक्षण/ संगोपन/ संस्कार/ लक्ष यावर आमची आबाळ झाली असती का? मला नाही वाटत. किंवा मी एकच असतो तर मला आणखी चांगलं वाढवलं असता का ? तिथेही नकारार्थीच उत्तर येते.
६. इतरांसारखाच 'उच्च दर्जाची मुल्ये' बद्दल मला पण प्रश्न आहे. हाताची पाचही बोटे उच्च दर्जाची होतील का? दर्जा हा कालसापेक्ष नाही का? लुळी पांगळी श्रीमंती फोर मुल्ये असा दृष्टीकोन का?

आपलं दु:ख (?) दुसर्‍याला सांगुन स्वतः आनंदात राहतात, आपल्याला उगिच घोर>> अगदी

बहुदा आपलं दु:ख (?) दुसर्‍याला सांगुन स्वतः आनंदात राहतात <<
कन्या रास असणार त्यांची Happy

ह्या धाग्यावर थोडीशी पालकांच्या आर्थिक स्थितीची चर्चा झाली होती त्या अनुषंगाने..

मला कालच कळले की पुण्यातल्या एका इंटरनॅशनल स्कूल च्या प्लेग्रुपची फी ६०,०००/- रुपये आहे.
बापरे.. 'घरात कोणी लहान नसल्याने जग एवढं पुढे गेलंय हे कळलंच नाही आपल्याला' असं वाटलं क्षणभर.
तुम्हाला याहून अधिक फी असलेली प्ले ग्रुप माहिती आहेत का?
ह्या फी मध्ये ने-आण करणार्‍या बसची सुद्धा फी समाविष्ट नाहीये.
माझ्या माहितीत माझ्या पिढीत सर्वांचा शिशुवर्ग ते पदव्योत्तर शिक्षणापर्यंतचा संपूर्ण खर्च साठ हजाराच्या आसपास असावा. (परदेशी शिकायला जाणारे सोडून)

यक्ष यांच्या या धाग्याच्या धर्तीवर "प्लेग्रुपच्या फीया- नेमक्या किती" असा धागा काढायचे मनात होते. पण सगळे मुर्खात काढतील किंवा 'त्यात काय एवढं?' असं म्हणतील या भितीने नाही काढला.

पण खरच शिक्षणाचा खर्च इतका वाढला आहे का? मराठी माध्यंमाची फी देखील इतकी वाढली आहे का?

मला कालच कळले की पुण्यातल्या एका इंटरनॅशनल स्कूल च्या प्लेग्रुपची फी ६०,०००/- रुपये आहे.
>> फी अगदी योग्य आहे हे मी ठामपणे म्हणु शकते. मी माझ्या मैत्रिणीला साधे (international नाही) playgroup-S.kg setup करायला मदत केली होती त्या अनुभवावरुन सांगते
१. अशा शाळा प्रशस्त बंगल्यात जिथे खुप मोकळी जागा,अंगण असते आणि मोक्याची जागा असते अशा ठिकानी सुरु कराव्या लागतात. त्याचे भाडे/deposite commercial rate ने द्यावे लागते.पुण्यात खुप महाग आहेत जागा.
२. सर्व खेळणी ,furniture अत्यंत दर्जेदार, लहान मुलांसाथी हाताळण्यास योग्य,धोकादायक नसलेले आणावे लागते, जे प्रचंड महाग असते.सतत स्वच्छता करावी लागते
३.स्वतः owner ला तर वेगवेगळे course करावेच लागतात पण ,उरलेला teaching staff पण भर्पुर पगार देउन चांगलाच employ करावा लागतो.
४.non-teaching staff (watchman ,sweeper,मावश्या )पण खुप असतो आणि त्यांनाही व्यव्स्थित पगार दिला तरच ते लोक टिकतात आणि काम चांगले करतत.
५.maintainnace cost पण खुप जास्त असते.
६. सर्वात मह्त्वाचे म्हनजे प्रत्येक वर्गात खुप कमी मुले असतात, ती तितकी कमी असणेच अपेक्शित असते तरच मुलांना attention देता येते त्यामुळे cost recovery साठी फी वाढतेच. एव्हडे करुनही पहिले २ वर्षे नफा नसतोच .
internation schools are bound to be costly as their input cost is much more,staff is more competent.

मला कालच कळले की पुण्यातल्या एका इंटरनॅशनल स्कूल च्या प्लेग्रुपची फी ६०,०००/- रुपये आहे.>>> माझ्या मित्राने, त्याच्या सव्वादोन वर्षे वयाच्या मुलीला इंटरनॅशनल स्कूलमधे घातले. फी 1 लाख बत्तीस हजार फक्त/-

या विषयाचा ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांनी कमिंग अपार्ट नावाचे चार्ल्स मरे याने लिहीलेले पुस्तक वाचावे. त्याने जरी अमेरिकेबद्दल लिहीले असले तरी त्याने प्रथम समाजातला कुठला भाग अभ्यासासाठी घेतला आहे, कोणत्या गोष्टींना तो मूल्ये मानतो हे आधी स्पष्ट केले आहे. नंतर समाज कसा दुभंगला नि त्यात एका भागात मूल्ये काय आहेत, नि तीच मूल्ये काय आहेत हे आकडेवारी देऊन दाखवले आहे.

तसे पद्धतशीरपणे काही केले तर ते वाचनीय होते, त्यावर चर्चा होऊ शकते. ,

नाहीतर आहेच मायबोली! कुणिही उठावे नि काहीहि लिहावे. शीर्षक काय, लिहीतो काय याचा काही संबंध नाही.

मायबोलीत दिवाळी अंका साठी एक स्पर्धा होते. कुणितरी गोष्टीचा एक भाग लिहितो. तिथून पुढे कुणिहि मनाला येईल तसे ती गोष्ट पुढे न्यावी.
मायबोलीवरील समाजकारण, राजकारण, धर्म इ. सर्व विषयांवरील चर्चा या अश्याच असतात.

मज्जा आहे नि काय!
Light 1

यक्ष यांच्या या धाग्याच्या धर्तीवर "प्लेग्रुपच्या फीया- नेमक्या किती" असा धागा काढायचे मनात होते. पण सगळे मुर्खात काढतील किंवा 'त्यात काय एवढं?' असं म्हणतील या भितीने नाही काढला.

ट्री हाऊस वर एक धागा ऑलरेडी झाला होता. त्यात चर्चा झालेली आहे.

Pages