द लंचबॉक्स चित्रपट परीक्षण

Submitted by अश्विनीमामी on 21 September, 2013 - 09:28

एकटेपणा......

दमविणारा , भिवविणारा, रडविणारा.... दुर्धर रोगांशी साहसाने सामना करणार्‍यांचे कौतूक होते, त्यांच्या लढ्याची पुस्तके छापून येतात, ब्लॉग्स आवडीने वाचले आणि शेअर केले जातात. पण एकटेपणाशी
एकट्यानेच लढा देणार्‍याच्या पदरी फक्त आणि फक्त उपेक्षाच येते. कोरड्या वैराण वाळवंटात भटकणारा जीव जसे आपला मृत्यूच आता शक्य आहे हे माहीत असूनही रोज काही पावले पुढे टाकत जातो मृगजळाच्या मागे भगभगीत वाळूच आहे हे सत्य माहीत असूनही त्या हिरव्या-निळ्या मरीचिकेत रमून जातो तसे एकटेपण भोगणार्‍याचे होते. सर्वकाही असूनही हा एकटा जीव आपल्या वैयक्तिक
वाळवंटातून एकेक दिवसाची वैतागवाणी पावले टाकत पुढे जातो. दुकटे होण्या च्या काही शक्यता जरी निर्माण झाल्या तरी बावचळतो. घाबरतो. थोडी फार पावले पुढे टाकून परत मागे येतो आणि आपल्याच कोषात मग्न होतो.

कालच प्रदर्शित झालेल्या द लंच बॉक्स ह्या सिनेमात इला आणि साजन ह्या अश्या दोन जिवांची कथा
अतिशय संवेदनशील पद्धतीने मांडली आहे. बॉलिवूड नावाने उगीचच जगभर प्रसिद्ध झालेल्या गर्हणीय चित्रपटशैलीशी फारकत घेउन रितेश बत्रा ह्या दिग्दर्शकाने एक हळुवार कथा अतिशय नजाकतीने, पण सादरीकरणाची लय बिघडू न देता मांडली आहे. एडिटिंग इज जस्ट राइट.

मुंबईतील एका दिवशी ह्या कथेची सुरुवात होते. जीवनाची तीचती चेपलेली पुंगळी सरळ करून रोज नव्या उत्साहाने एका अतिरेकी दिवसाला सामोरे जाणारे मुंबईकर! त्या लोकल्स, स्टेशनवरील गर्दी आणि बॅगा घेऊन कार्यालयाच्या दिशेने चिंबलेली पावले टाकणारे चाकरमाने लोक. ह्यातलाच एक साजन. मध्यमवयीन विधूर. आपल्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन नाशीकला स्थायिक होण्याची वाट बघत असतो.

बायको वारल्यावर, कसलेच कौटुंबिक बंध न उरलेला, त्यातून एकल कोंडा , विक्षिप्त झालेला ,
कुठेच फिट होऊ न शकणारा साजन इर्फान खानने नुसता रंगवला नाहीतर जिवंत केला आहे. एकट्याने आवरून कार्यालयात येणे. रोजचे रूटिन काम पण बारकाईने, निगुतीने करणे. कारण काही डिस्ट्रॅक्षनच नाही! न बायकोचा फोन न मुलांच्या/ घरच्या कटकटी. जिवंत राह्ण्यासाठी आवश्यक म्हणूनच केवळ करायची ती नोकरी. लोकल मधून धक्के खात घरी आल्यावर कॉलनीतील मुलांवर व्यक्त होणारा वैताग. पार्सल एकट्याने उघडून वाढून घेणे आणि जेवणे. बाल्कनीत उभे राहून धुम्रपान करणे. असह्य झाले कि डोळे मि टून पडणे. हे जीवन असेच एक दि वस संपून जाणार आहे हे अधोरेखित करणारा
आजुबाजूचा न बदललेल अवकाश. जुनी सायकल, जुने पाने सामान, व्ही एच एस टेप्स त्याव र बायकोने रेकॉर्ड केलेले जुन्या मालिकांचे भाग. सगळे कसे साकळलेले. कुंद एखादा विनोद सुचला तर, हपिसात वादावादी झाली तर एखादे गाणे आवडले तर सांगायला, शेअर करायला कोणीच नाही असा
एकसंध एकटेपणा.

ह्यात एकदम बदल होतो म्हणजे एक दिवस त्याला इलाने बनवून दिलेला डबा चुकीने मिळतो. घरच्या जेवणाला तरसलेला ( हपापलेला नव्हे) साजन सुखावतो व सर्व फस्त करतो. आपली इलाशी ओळख आधीच झालेली असते. नवर्‍याचे लक्ष वेधून घेण्यासाठी शुष्क संसारात परत जान आणण्यासाठी धडपड णारी इला उत्तम चविष्ट अन्न बनवून नवर्‍याला पाठवत असते पण कामाच्या रेट्यात, विवाहबाह्य संबंधात गुंतलेला तो तिला समजून घेणे सोडा, तिचा पारच अनुल्लेख करत असतो. त्यांच्या संसारातला साचलेपणा तिला असह्य होतो. पण उपाय सापडत नाही म्हणून ती तशीच गतानुगतिकतेने दिवस-रात्री मोजत जगत असते.

डबा चाटूनपुसून खाल्लेला पाहून इला आशावते. पण मग अदलाबदल झाल्याचे कळल्यावर निराश
होऊन एक चिठ्ठी डब्यात टाकते. अहो आश्चर्यम! त्या चिठ्ठीचे उत्तरही येते. आंतरजालावरही आता अभावानेच आढळणारी अ‍ॅनॉनिमिटी ह्या दोघांना अपघाताने नसीब होते. दोघे आपापले जीवन, विचार शेअर करतात. अनवधानाने मनाने जवळ येत जातात. भेट्णे अपरिहार्य होते त्या पॉइन्टलाच कथानक एक वळण घेते आणि एका अनपेक्षित, अनिश्चित क्षणी हा प्रवास संपतो. इन्सेप्शनच्या शेवटाप्रमाणेच हाही शेवट हुरहुर लावून जातो. डबेवाल्यांच्या ज्ञानोबा माउलीच्या जपात सूर आणि पावले मिळवून आपण बाहेर पडतो. आपल्या जीवनातल्या हुकलेल्या संधी, मैत्रीच्या शक्यता पडताळून पाहात,

पण कथानकाचे आणि दिग्दर्शनाचे कौशल्य हेच आहे कि कुठेही मनात कडवटपणा उरत नाही. मनाचे बंध कुणाशी, काही काळ का होईना जुळले तर! नाहीतर पुढे आहेच एकटेपणाशी झुंज! सारे माहितीचे
आणि असह्य! गॉड ऑफ स्मॉल थिंग्जमधील अम्मू -वेलुथा, मुराकामीच्या आय क्यू ८४ मधील तेंगू आणि आओमामी अश्या काही अपघाताने भेटलेल्या जोडप्यांचा संदर्भ घेतल्यास दिग्दर्शकाचे विषय हाताळणीतील कौशल्य अधिक नजरेत भरते आणि मनावर एक सुखद अस्तर पसरते. इला आणि साजन यां चे वैयक्तिक विश्व कधीच एकमेकांत मिसळत नाही. ती तिचे जीवन जगते आणि तो त्याचे. पण जगात
कुठे तरी तो आहे आणि ती आहे ह्या जाणिवेनेच त्यांच्या जीवनातला एकटेपणा मिटतो. आपल्या आईचे जीवन ज्या चाकोरीत घट्ट बांधले गेले होते ते आणि तसेच आपलेही जीवन जात आहे; जाणार आहे ह्याची जाणीव झाल्यावर ती हादरते. पण जीवन संपवत नाही' तर एका वेगळ्या दिशेने स्वतःचा प्रवास चालू करते. ह्यात तिला साजनची सोबत हवी असते, गरजही असते पण तो नाहीच आला तरीही तिचा
निर्णय झाला आहे. ती स्त्रीवादी नाही, फक्त एक माणूस म्ह्णून जगण्यातील घुसमट, तोचतोपणा नाकारून नवे काहीतरी अनुभवायचा आपला हक्क ती तपासून बघणार आहे.

रोजचे आंबट दही नको वाटले तरी खावे लागणार्‍या माण सा ला अनपेक्षित पणे एखाद दिवशी
तिरामिसू मिळाले तर काय वाटेल तशी साजन ची मनःस्थिती होते. इलाला भेटायच्या कल्पनेने तो फुलतो
पण आपल्या मध्यमवयीन सेन्सिबिलीटीज त्याला नाकारता येत नाहीत. तिला नुसते बघून तो मागे फिरतो. पण रिटायरमेंट व पुढे येणार्‍या वृद्धत्वाला निमूटपणे स्वीकारावे अशी स्वतः ची समजूत
घालणारा तो जगून बघण्याच्या एका आदिम योलो जाणिवेतून आयुष्याला परत सामोरा जातो.
मनाची घट्ट बंद केलेली दारे किलकिली करून बाहेरचा प्रकाश, प्रेमाची, सहअनुभवाच,, सहवेदनेची जाणीव अनुभवायचे धाडस करतो. पुढे काय तर ग्यानबा तुकाराम! इब्तदाए इश्क में हम सारी रात जागे अल्ला जाने क्या होगा आगे?

करण जोहरने सादर केली असली तरीही ही रूढ अर्थाने प्रेम कथा नाही. त्याला साचेबंद अंत नाही उत्तरायण सारखी कंपॅनिअन शिपची कथा पण नाही. या वयात को णीतरी पाहिजेच ना असा मध्यमवर्गी द्र् ष्टिकोण ह्यात नाही. तर जीवनाने तुम्हाला कसलाही डाव दिलेला असो तो खेळून बघितला पाहिजे, त्यातल्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या पाहिजेत असे ह्या चित्रपटातून व्यक्त होते. हा एक दृष्य अनुभव आहे दोन माणसांच्या जीवन रेखा एकमेकांत मिसळू बघतात त्याचा. चित्रपटाची नेपथ्य, कॅमेरा इत्यादी अंगे पण अतिशय पूरक आहेत. मुंबई अंगावर येत नाही. पात्रांची आर्थिक परिस्थिती, त्यांच्या जगण्यातूनच दिसत राहते. नवाजुद्दीन सिद्दीकीचे काम नेहमीप्रमाणेच उत्तम. त्याच्या परिस्थितीतील विसंगती, फाइल वर भाजी चिरणे, लोकल मध्ये बसून! सहज विनोद निर्माण करणारी संवाद फेक ...
हा कलाकार नेहमीच एक गोळीबंद पर्फॉरमन्स सादर करतो.

भारती आचरेकरांची आवाजी सोबत इला बरोबरच आपल्यालाही मिळत राहते. एक भुतानीज प्रेमगीत रात्री च्या अंधारात ह्वेत विरत जाते तो क्षण फार गोड वाटला मला! तेव्ढ्या पुरते इला आणि साजनचे प्रेम जिवंत होते. शक्यता अशक्यतेच्या धुक्यातून पुढे यायचा प्रयत्न करतात एकटेपणाला दुसरा एकटेपणा येऊन मिळतो आणि अंतर्धान पावतो.

डबेवाल्यांचे खास मराठी पण नीट पकडले आहे. ते कुठे तरी हलवून टाकते. त्यांचे मेहेनती प्रामाणिक चेहरे
जवळीक साधतात. कदाचित मी मराठी असल्याने असेल.

मुराकामीने लिहिल्या प्रमाणे,

" I'm tired of living unable to love anyone. I don't have a single friend - not one. And, worst of all, I can't even love myself. Why is that? Why can't i love myself? It's because I can't love anyone else. A person learns how to love himself through the simple acts of loving and being loved by someone else. Do you understand what i am saying? A person who is incapable of loving another cannot properly love himself.”
― Haruki Murakami, 1Q84

सोमवार पासून डबा लावावा म्हणते जेवायचा.

मुराकामी यांचे कोट जालाव रून साभार. पण पुस्तक पैसे देऊन विकत घेतले आहे तरीही आक्षेप असल्यास
काढून टाकते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीप्ती नवल ह्यांची अजून एक सुंदर मुव्ही आहे कसक. अवश्य बघा.
https://www.youtube.com/watch?v=BHZPFVczLbE

आणि 'थोडा सा आसमान' ही दोन भागांची मालिका आहे तीही पहा:
https://www.youtube.com/watch?v=ZZfPN6t9Y0Q

हसरत मोहनी:

https://www.youtube.com/watch?v=Oar7tIPesoI

मला स्वतःला तरी हा डब्बा चित्रपट अजिबात आवडला नाही. फारच सुमार आणि अतर्क्य वाटला. ईलाने कधीच ओढणी न परिधान करण्याचे कारणही कळले नाही. एकीकडे नॉनग्लॅमरस भुमिका म्हणायचे आणि दुसरीकडे शरीराला घट्ट बसणारे व खोल गळा असणारे कमीज घालायचे. एका दृश्यात ती एका अंगावर पहुडलेली असताना तर इतके अश्लील दर्शन होते की या चित्रपटाला कलात्मक / समांतर / नॉन-कमर्शिअल चित्रपट का म्हणावे असा प्रश्न पडला. हे मान्य की आजच्या काळात बनणारे इतर सर्व चित्रपट यापेक्षाही बर्‍याच जास्त प्रमाणात स्त्री-कलाकारांना एक्स्पोज् करतात पण म्हणून या चित्रपटानेही तीच वाट चोखाळावी का? मग याला वेगळा का म्हणावे?

नायिका निम्रत कौर अगदीच माठ वाटते. तिला पाहून तरूणपणच्या अमृता सिंगची आठवण येते. फरक इतकाच की ती रांजण होती.

कथानक तर इतके लहान आणि अतर्क्य आहे की डबा नवर्‍याला न मिळता दुसर्‍या कुणाला तरी मिळतोय हे सलग इतके दिवस कोणी सहन करेल यावर शेंबडे पोरदेखील विश्वास ठेवणार नाही. तसेच रोज बटाटा-फुलकोबीची भाजी डब्यात दिली तर नवरा बायकोत भांडणे होणार नाहीत का?

भारती आचरेकरांचा मधून मधून कानावर पडणारा आवाज नकोसा वाटतो. तसेच डब्यातील अन्नाबद्दल आभार प्रदर्शन न करता उलट जास्त मीठ टाकल्याची तक्रार आली म्हणून दुसर्‍या दिवशी डब्यातील अन्न तिखट बनविण्याचा सल्ला देखील पटत नाही.

भारतातील शाळकरी वयातील मुले आजही मोठ्या माणसांना काका / चाचा / अंकल असे संबोधतात. असे असताना परदेशी पद्धतीप्रमाणे या चित्रपटातील लहान मुले मिस्टर फर्नांडिस असे संबोधताना का दाखवावीत? अर्थात भारताबाहेर राहणार्‍यांनी भारतीय समाजजीवनावर आधारित कथानक असलेले चित्रपट दाखविले की अशी गल्लत होणारच.

इतके असूनही चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहू शकलो कारण चित्रपटाच्या या काही जमेच्या बाजू:-

  1. प्रथम क्रमांकावर अर्थातच इरफान आणि नवाजुद्दीन यांचा सहजसुंदर अभिनय.
  2. अब तक छपन्न फेम नकुल वैदचं बर्‍याच कालावधीनंतर पडद्यावरील दर्शन.
  3. मुंबईतील जनजीवनाच सुखद चित्रीकरण.
  4. कार्यालयातील वास्तवदर्शी वातावरण.
  5. नवाजुद्दीनचे अनाथ असणे, त्याची प्रेमकहाणी, त्याच्या विवाहात त्याच्यातर्फे ईरफानने उपस्थित राहावे म्हणून त्याने केलेली विनंती आणि प्रत्यक्षात तो प्रसंग व त्यावेळी काढलेले छायाचित्रे हे सारे फारच हृदयस्पर्शी वाटले.
  6. चित्रपटात गाणी नसणे.

सुरेख परिक्षण ! पहिले एक दोन परिच्छेद तर खासच !

वरच्या प्रतिसादातले आक्षेपाचे मुद्दे नाही पटले. आता काही लोकाना कलाकृती पाहताना आस्वादकाचा चष्मा नाही सापडत, मग समिक्षकाचाच चष्मा लावुन कलाकृती पाहिली जाते या वर आपण काय म्हणणार?
मग म्हणायला मोकळे "फारच सुमार आणि अतर्क्य वाटला" म्हणजे स्वतःचे "वेगळे"पण मिरवायला मोकळे!

ईलाने कधीच ओढणी न परिधान करण्याचे कारणही कळले नाही>>> अर्रे? घरात असताना कशाला वापरेल ती ओढणी? कमाल आहे. लोक काय काय बघतात Uhoh

तीनी अजिबात मेकप केलेला नाहिये, हे नाहि का दिसलं तुम्हाला? ती घरात कॅजुअल वावरताना दाखवलिये..

<<<<<गंध, मलाही खूपदा असेच वाटते की आपल्या आजूबाजूला आपली अनेक लोकांशी तशी मैत्री असते पण खास असे काही नाते नसते. अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आपले जवळचे असे मित्र असतात. कधी वाटते मागिल जन्मी आपले ते कुणीतरी असावे.>>>>

बी मला अगदी अगदी असेच वाटत असते अनेकदा....

थोडे अवांतर... त्याबद्दल क्षमस्व

बी, तू गौरी देशपांड्यांच्या कथांचा चाहता आहेस ना? मग त्यांच्या कथांमधल्या नायिकांचे नवरे लौकिकार्थाने गुणी, सहृदयी, एकनिष्ठ वगैरेच असतात तरीही तिच्या नायिका का 'आनंदांचे प्रदेष' धुंडाळायला जातात?

काल पाहिला लंचबॉक्स.

मला ठिकठाक वाटला. अगदी भरभरुन आवडण्यासारखा अजिबात वाटला नाही. चित्रपटात वापरलेली तंत्रे याआधी अशा प्रकारच्या चित्रपटात खुप वेळा वापरली गेली आहेत. भारती आचरेकरचे कॅरेक्टर खुप इरिटेटींग वाटले. वरच्या मजल्यावरच्याशी संवाद म्हणजे तो अख्ख्या बिल्डिंगला किंवा निदान शेजा-यांना तरी ऐकू येणार.

पण मला शेवट आवडला. आशावादी वाटला. सहसा आर्टी फिल्ममध्ये आशावाद नसतोच, यात तो तिला शोधायला निघतो हे मला आवडले.

परिक्षण मात्र आवडले. परिक्षणात जे लिहिलेय ते चित्रपटात मुद्दाम शोधावे लागते. Happy

गुगळ्यांचा प्रतिसाद आवडला. त्यांनी आवडण्यासाठीचे जे मुद्दे लिहिले ते मलाही चित्रपटात आवडले नवाजुद्दीनचे कॅरेक्टर खुप आवडले. मेरी अम्मी कहा करती थी.. संवादाच्या वेळेस त्याचा चेहरा बघवत नाही. त्याचे अनाथपण खुप जाणवुन जाते त्या प्रसंगात.

धन्यवाद साधना.

<< नवाजुद्दीनचे कॅरेक्टर खुप आवडले. मेरी अम्मी कहा करती थी.. संवादाच्या वेळेस त्याचा चेहरा बघवत नाही. त्याचे अनाथपण खुप जाणवुन जाते त्या प्रसंगात. >>

सहमत.

भारतातील शाळकरी वयातील मुले आजही मोठ्या माणसांना काका / चाचा / अंकल असे संबोधतात. असे असताना परदेशी पद्धतीप्रमाणे या चित्रपटातील लहान मुले मिस्टर फर्नांडिस असे संबोधताना का दाखवावीत?

ते मुद्दाम तसे दाखवले असे मला वाटले. तो सगळ्यांपासुन तुटलेला असतो हे दाखवण्यासाठी. रोज भेटणारी मुलेही त्याला अंकल म्हणु शकत नाही इतका तुटकपणा त्याच्यात भरलेला असतो, त्याच्या घरात बॉल गेला म्हणजे तो गेलाच हे त्यांना बॉल मागायच्या आधीच माहित असते. त्याच्या समोर राहणारी मुलगी जेवताना खिडकी बंद करुन घेत असायची. पण शेवटी तो त्यांच्याशी संवाद साधतो तेव्हा तीही खिडकी बंद न करता त्याला पाहुन हात हलवते.

एखाद्या गृप - जसे फॅमिली/ मित्र/ मैत्रिणी/ कलीग्ज - मधील व्यक्तींना कधी कधी बरोबरीच्या किंवा आसपास समुहात वावरणार्‍या व्यक्तीची एकदम शिसारी येते. त्याला त्या व्यक्तीचे वागणे देखील कारणी भूत असते किंवा दिसणे एखादी सवय, ह्या मुळे मग ती शिसारी बिल्ड अप होत जाते. नक्कोच ही व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर असे त्या गृपातील व्यक्तींना वाटत जाते. पण अश्या वागणुकीचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होत असेल हे लक्षात घेत्ले जात नाही. - साजन ही एक अशी व्यक्तिरेखा आहे.
जसे घर बायको- मुलांमुळे इतर समाजाशी जोडले जाते तसे त्याचे होत नाही. एकटा एकटाच पडत जातो.
बेचव जीवन, बेचव जेवण सगळेच. एकट्याशी पण वाद. संवादच नाही.

ह्यामुळे तर तो अचानक डबा ट्रान्सफर झाल्याने हरखतो. संसारात मग्न माणूस वैतागेल बायकोला लगेच फोन देखील करेल पण ह्याला तितक्याशाही ह्युमन इंटरअ‍ॅक्षनची गंमत वाटते. त्याचा आतला राजा माणूस, सेन्सिटीव्ह स्वभाव, विनोद बुद्धी कुठे मेलेली नाही पण ती व्यक्तच होत नाही त्याला हे अचानक आउट्लेट भेटते.

शक्यता अशक्यतेच्या धुक्यातून पुढे यायचा प्रयत्न करतात एकटेपणाला दुसरा एकटेपणा येऊन मिळतो आणि अंतर्धान पावतो.>>>किती अलवार लिहीलय.या ओळीवर मी जाम फिदा.
.अमा , परिक्षण जसंच्या तसे उतरलंय जे मला पिक्चर बघताना वाटलेलं अन मला उगाचच आठवण आली, अ स्पेशल डे .. मधल्या सोफियाची. अगदी दिग्दर्शकाच्याच नजरेतन लिहील्याप्रमाणे शब्दचित्रण उतरलंय .खुप सुन्दर लोलकिय असा देखनेका नजरिया आहे तुमच्यापाशी ...

एका दृश्यात ती एका अंगावर पहुडलेली असताना तर इतके अश्लील दर्शन होते की या चित्रपटाला कलात्मक / समांतर / नॉन-कमर्शिअल चित्रपट का म्हणावे असा प्रश्न पडला.
>>>>>>>>
लहानपणी मला वाटायचे की कलात्मक/समांतर सिनेमा म्हणजे वास्तव चित्रणाच्या नावाखाली अश्लीलता बिनधास्त दाखवता येते अश्या कलाकृती. अर्थात मला असे वाटण्याचे कारण माझ्या पाहण्यात तेव्हा जे काही चारचौदा कलात्मक चित्रपट आलेले त्यात असे चित्रण होते. तुमची पोस्ट नेमकी उलटी असल्याने गंमत वाटली Happy

असो, हा चित्रपट पाहण्याचा योग अजून आला नाही, मात्र उत्तम परीक्षणाचा मान राखत चर्चाही खूप ईंटरेस्टींग चालू आहे. वाचायला मजा आली, दुर्दैवाने चित्रपट न पाहिल्याने चर्चेत उडी घेता येत नाही.

कभी अलविदा ना कहना उर्फ कन्कचा विषय वर निघालेला, ते पाहून आठवले, शाहरूखचा चाहता म्हणून पैल्याच आठवड्यात थिएटर गाठले होते, पण एस्सारके आणि केजेओ या जोडीकडून लार्जर दॅन लाईफ मनोरंजनपटाची जी अपेक्षा होती ती पार धुळीस मिळाल्याने हा जराही आवडला नव्हता.. काही पब्लिक तर शेवटी निघताना शाहरूखला शिव्या घालत होते कारण त्यांच्यामते त्याने व्यभिचारी वृत्ती दाखवत दुसर्‍याची बायको पळवली.. अर्थात यावरून आपले समाजमन लक्षात यावे.
(शाहरूखला लंगडे केले होते ते बहुधा सहानुभुती मिळवायला असावे, पण फायदा नाही झाला..)

त्यानंतर केजेओ कुठेतरी म्हणाला की त्याने काळाच्या पुढे सिनेमा बनवलाय, दहा-बारा वर्षांनी लोकांना हा सिनेमा पचनी पडेल आणि आवडेल.. झाली नसावीत अजून, थोडी अजून वाट बघूया म्हणतो .. बाकी मधल्या काळात म्हणजे नुकतेच त्याने एआयबी रोस्ट सारखा आणखी एक काळाच्या पुढचा शो होस्ट केला ती एक गोष्ट वेगळी..

सांगायचा मुद्दा हा की अश्या चित्रपटांच्या कथा तुम्हाला पटतात की नाही हे तुमचे विचार कसे आहेत आणि तुम्ही कोणत्या वातावरणात वाढला आहात, यावरूनही ठरते.. यात प्रत्येक वेळी चूक की बरोबर असे नसते.. बाकी थोडे नंतर लिहितो..

अमाचे परिक्षण चित्रपटापेक्षाही आवडले, चित्रपट पण छान आहे.

कन्क फार उथळ होता, मला स्वत:ला शाहरुख फार कमी चित्रपटात आवडलाय, तो अतिशय उत्तम अभिनेता आहे पण त्याची अभिनयात होउ शकणारी ग्रोथ त्याच्या स्वप्रेमात आणि सुपस्तार्‍ ईमेज मधे अडकुन कधिच थान्बलिय.

काही पब्लिक तर शेवटी निघताना शाहरूखला शिव्या घालत होते कारण त्यांच्यामते त्याने व्यभिचारी वृत्ती दाखवत दुसर्‍याची बायको पळवली>>> कॉलिंग फारेण्ड!!!! Proud

एखाद्या गृप - जसे फॅमिली/ मित्र/ मैत्रिणी/ कलीग्ज - मधील व्यक्तींना कधी कधी बरोबरीच्या किंवा आसपास समुहात वावरणार्‍या व्यक्तीची एकदम शिसारी येते. त्याला त्या व्यक्तीचे वागणे देखील कारणी भूत असते किंवा दिसणे एखादी सवय, ह्या मुळे मग ती शिसारी बिल्ड अप होत जाते. नक्कोच ही व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर असे त्या गृपातील व्यक्तींना वाटत जाते. पण अश्या वागणुकीचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होत असेल हे लक्षात घेत्ले जात नाही. - साजन ही एक अशी व्यक्तिरेखा आहे.
जसे घर बायको- मुलांमुळे इतर समाजाशी जोडले जाते तसे त्याचे होत नाही. एकटा एकटाच पडत जातो.
बेचव जीवन, बेचव जेवण सगळेच. एकट्याशी पण वाद. संवादच नाही.

ह्यामुळे तर तो अचानक डबा ट्रान्सफर झाल्याने हरखतो. संसारात मग्न माणूस वैतागेल बायकोला लगेच फोन देखील करेल पण ह्याला तितक्याशाही ह्युमन इंटरअ‍ॅक्षनची गंमत वाटते. त्याचा आतला राजा माणूस, सेन्सिटीव्ह स्वभाव, विनोद बुद्धी कुठे मेलेली नाही पण ती व्यक्तच होत नाही त्याला हे अचानक आउट्लेट भेटते.
>>

अमा, ह्याबद्दल तुझे लाखलाख धन्यवाद. मलाही साजन बद्दल हे अगदी असच वाटत राहिल पण नक्की मांडता आलं नाही. सिनेमा बघताना आपण सजग होऊन सिनेमे बघितले की हे असे चित्र्रण दिसते. मला वाटत ह्या जगात साजन सरखे एकटे पडत जाणारे अनेक अनेक असतील.

अमांचा मूळ लेख आणि प्रतिसादांत आलेले बरेच मुद्दे इतके छान आहेत की तेवढ्यासाठी हा सिनेमा पुन्हा बघावा आणि आधीच्या पाहण्यात हुकलेली स्थळे नीट निरखून घ्यावीत असे वाटू लागले आहे.

अमांचा मूळ लेख आणि प्रतिसादांत आलेले बरेच मुद्दे इतके छान आहेत की तेवढ्यासाठी हा सिनेमा पुन्हा बघावा आणि आधीच्या पाहण्यात हुकलेली स्थळे नीट निरखून घ्यावीत असे वाटू लागले आहे.

>>
+१

<<<<<<सांगायचा मुद्दा हा की अश्या चित्रपटांच्या कथा तुम्हाला पटतात की नाही हे तुमचे विचार कसे आहेत आणि तुम्ही कोणत्या वातावरणात वाढला आहात, यावरूनही ठरते.. यात प्रत्येक वेळी चूक की बरोबर असे नसते.. >>>>>>

अगदी अगदी बरोबर आहे...कारण या सगळ्या मध्ये जर आपण त्याकडे कोणतेही नातेसंबध न आणता एक माणूस म्हणून त्या व्यक्तीकडे बघायला हवे... त्यामुळे चूक बरोबर असे काहीच नसते...

जी ए कुलकर्ण्यांच्या कथेत अश्या एका गुणवान परंतु साध्या खुरटलेल्या दिस्णार्‍या मुलीचे चित्रण आहे. जी एकटी पडलेली असते. शिक्षिका म्हणून येते पण कुठेच सामावत नाही विद्यार्थ्यांना आव्डत नाही व इतर शिक्षकांच्या गटात सामवली जात नाही. एकटीच जेवते. तिची बारकी वेणी, कृश हात काळा रंग ह्यावरऊन तिची थट्टा होते . मग एक दिवस ती सोडून जाते. ती गेलीच. तर तिथे जीएंनी लिहीले आहे कि
एक इंग्रजी कविता ती जेव्हा मोठ्याने वाचून दाखवत असे तेव्हा तिचा आवाज संगमरवरात एखादी लाल रेषा उमटत जावी तसा वाटत असे. ते वाचल्यावर मला ही जाणीव झाली. प्रत्येकाचा काहीतरी प्लस पॉईंट असतो. आपल्याला दिसत नाही. म्हणून तर अन कंडिशनल प्रेम जिथून मिळेल तिथे ते घ्यायला जीव धड्पड्तो. द ह्यूमन झू नावाच्या पुस्तकात इन ग्रूप आउट ग्रूप कल्चर बद्दल वाचून काढले. ते ही मोलाची माहीती. तुमच्या कडे टनाने आत्मभान असेल पण शेव्टी जीवन अर्थपूर्ण बनवायला एक सोबत, एक साथ लागते. पण ती मिळवायला एक हिंमतही लागते. ही हिंमत हारतो माणूस. प्रेम उपलब्ध असते पण ते घ्यायला आपण कमी पड्तो. आणि एकटेपणाशी हातमिळवणी करतो.

अमा, मस्त पोष्ट!!!

. तुमच्या कडे टनाने आत्मभान असेल पण शेव्टी जीवन अर्थपूर्ण बनवायला एक सोबत, एक साथ लागते. पण ती मिळवायला एक हिंमतही लागते. ही हिंमत हारतो माणूस. प्रेम उपलब्ध असते पण ते घ्यायला आपण कमी पड्तो. आणि एकटेपणाशी हातमिळवणी करतो.>>

अगदी बरोबर. ह्यात अजून एक असे की आपले वय जसे जसे वाढत जाते तसे कुणाची साथ स्विकारायची भीती वाढत जाते. वयाचा थोडा न कळतेपणा असतो तेंव्हा ही साथ स्विकारायला सोपे जाते.

>>आपले वय जसे जसे वाढत जाते तसे कुणाची साथ स्विकारायची भीती वाढत जाते. वयाचा थोडा न कळतेपणा असतो तेंव्हा ही साथ स्विकारायला सोपे जाते>>>

सहमत

ह्यात अजून एक असे की आपले वय जसे जसे वाढत जाते तसे कुणाची साथ स्विकारायची भीती वाढत जाते. >> साजनला तीच भीती वाटते आहे व तो तिला पहिल्यावेळी भेटत नाही. जाताना तयार होतो व
बाथरूम मध्ये स्वत:ला आरश्यात बघत असतो तर त्याला शेविन्ग क्रीम हेअर क्रीम साबण वगिअरे चा असा एकत्रित एक वास येतो जो पूर्वी त्याच्या आजोबांच्या बाथरूम मध्ये त्याला येत असतो. ही स्मेल मेमरी त्याला आपले वय झाले आहे. आता ह्या वयात? अशी एक शंका स्वतःबद्दल घ्यायला लावते.
व तो मागे फिरतो.

साजनचे वय तर खूप दाखवले. तो ५५ ते ६० ह्या वयातला वाटतो. रिटायर्ड होणार असतो. त्या वयात तसा विचार मनाला स्पर्शून जाणे साहजिक वाटते. पण अगदी ४० वय असलेल्या स्त्रि पुरुषालाही इतर कुणाची साथ स्विकारायची भीती वाटते.

एक शंका मला पडली होती की, त्याचं नाव साजन कसं काय? ख्रिश्चन लोकांमध्ये साजन असे नाव असते का?

अमि, हो साजन हे ख्रिश्चन नाव आहे. साजन सॅम्युल, साजन जीयॉर्ज ही नावे मी ऐकलेली आहेत.

आपल्याकडे समीर हे नाव हिन्दु मुस्लिम दोन्ही धर्मांमधे आढळते.

पंजाबमधे बर्‍याच मुसलमान बंधुंची नावे मुस्लिम आहेत पण आडनावे मात्र हिन्दु आहेत. माझ्या एका मित्राचे नाव अमिर भट आहे तो पंजाबचा आहे.

आपल्याकडे समीर हे नाव हिन्दु मुस्लिम दोन्ही धर्मांमधे आढळते>>> हिंदू समीर. मुस्लिम समिर.

बी, कोकणी मुस्लिमांची आडनावं पाहिली नाहीस का? उपाध्ये, भट, देशमुख. देसाई अशी आडनावे असतात. <गावाचेनाव>कर या फॉर्मॅटमध्ये तर चिक्कार.

अवांतर : काल विश्वचषक सामन्या अंतर्गत यु ए इ संघाचा तौकीर पाहिला का? जाम हँडसम आहे. आणि तौकीर हे नाव पहिल्यांदाच ऐकले तौफीक माहिती आहे. पण मग मला उगीच तपकीर,तवकील असे कायकाय आठ्वत होते. समीर नाव मला भारी आव्डते. असे मित्र कोण्या भाग्यवान्यांना मिळत असतील नाही का? माझ्या एका जाम फॉरवर्ड मैत्रीणीचे प्रेम अवधूत नावाच्या मुलावर जडले होते. अब अवधूत का क्या शॉर्टफॉर्म करते?! मुलांच्या नावाचे अव्या सम्या, मंद्या करणार्‍या मुली असतात तशी होती ती. पर गाडी निकल पडी.

Pages