Submitted by संयोजक on 8 September, 2013 - 21:49

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
नमस्कार,
मायबोली गणेश उत्सवाचे हे चौदावे वर्ष! गणेशोत्सव २०१३ सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!
श्लोकासाठी झाशीची राणी यांचे विशेष आभार.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया ||
गणपती बाप्पा मोरया ||
बाप्पा मोरया!! झाशीची राणी
बाप्पा मोरया!! झाशीची राणी यांच्या श्लोकाने खुप शांत, प्रसन्न वाटले. ऐकतच रहावेसे वाटत होते, पण फारच पटकन संपला.
सुंदर बाप्पा आरास पण छान
सुंदर बाप्पा
आरास पण छान 
गजाननम् भूतगणाधि सेवितम्
गजाननम् भूतगणाधि सेवितम् कपित्थजंबूफलसार भक्षितम् |
उमासूतम् शोकविनाशकारणम् नमामि विघ्नेश्वर पादपंकजम् ||
मोरया!!!
मोरया!!!
मूषकवाहन मोदकहस्त चामरकरुण
मूषकवाहन मोदकहस्त चामरकरुण विलंबितसूत्र |
वामनरुप महेश्वरपुत्र विघ्नविनायक पादनमस्ते ||
गजानना श्री गणराया, आधी वंदू
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया !!!
बाप्पा मोरया !
तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता
तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता विघ्नविनाशक मोरया
संकटरक्षी शरण तुला मी गणपतीबाप्पा मोरया!
श्लोक ऐकायला फार छान वाटतंय.
श्लोक ऐकायला फार छान वाटतंय. छानच म्हटलाय.
100
100
जयजय सिध्दिविनायक, जय
जयजय सिध्दिविनायक, जय गौरीतनया।
जयजय मंगलमूर्ती, जय श्री गणराया।।
विघ्नहरा तव पूजन सर्वारंभाला
सुरवर सर्वही देती या सन्मानाला
गिरिजावर गिरिजेसह बघती सुखसोहळा
त्यांचा बालक, पालक विश्वाचा झाला॥१॥
बुध्दी, शक्ति, स्फूर्ति सद्गुण हे रंभा
दीनोध्दारण करण्या शिकवी तुज अंबा
आचरुनी व्रत देवा तू तोषविले सांबा
समर्थ करिते तुजला आई जगदंबा ॥२॥
आरती ही करताना विनती तव चरणी
तव बुध्दी शक्तीची दे आम्हा लेणी
असुरांच्या जाचाने भयभित हो धरणी
विघ्नेशा करी करुणा या जग उध्दरणी ॥३॥
सुखसंपत्ती कीर्तीचा भाव मनि धरिला
संकल्पित हेतू मनी जरी तुमच्या असला
मायपित्याची देवा! शपथ असे तुजला
मंगलमूर्ती मंगल करी दावुनि लीला ॥४॥
जयजय सिध्दिविनायक, जय गौरीतनया।
जयजय मंगलमूर्ती, जय श्री गणराया।।
-कै. श्री. श्रीकृष्ण शांताराम गुप्ते.
सुंदर आरती!
सुंदर आरती!
ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये
ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये वरवरद | सर्वजनम् मे वशमानय नमः ||
मस्त सजावट व श्लोक! गणपती
मस्त सजावट व श्लोक! गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
श्लोक खूप छान वाटतोय ऐकायला.
श्लोक खूप छान वाटतोय ऐकायला. डोळे मिटुन ऐकल्यावर एकदम शांत, संध्याकाळी देवासमोर दीवा लावल्यावर प्रार्थना करतोय अस वाटलं
धन्यावाद झाशीची राणी
ॐ गं गणपतयै नमः || परं धाम
ॐ गं गणपतयै नमः ||
परं धाम परं ब्रह्म परेशमं परमेश्वरम् |
विघ्ननिघ्नकरं शांतं पुष्टं कांतमनन्तकम् ||
सुरासुरेन्द्रै: सिद्धैन्द्रै: स्तुतं स्तौमि परात्परम् |
सुरपद्मदिनेशं च गणेशं मंगलायनम् ||
इदं स्तोत्रं महापुण्यं विघ्नशोकहरं परम् |
यः पठेत् प्रातरुथाय सर्वविघ्नात् प्रमुच्यते ||
नेत्री दोन हिरे, प्रकाश पसरे,
नेत्री दोन हिरे, प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे |
माथा शेंदुर पाझरे, वरी बरे दुर्वांकुरांचे तुरे |
माझे चित्त विरे, मनोरथ पुरे, देखोनि चिंता हरे |
गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ||
ॐ एकदंताय विद्महे वक्रतुंडाय
ॐ एकदंताय विद्महे
वक्रतुंडाय धीमहि
तन्नो दंती प्रचोदयात् ||
श्री गणेशाय नमः | नारद उवाच
श्री गणेशाय नमः |
नारद उवाच |
प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् |
भक्तावासं स्मरेनित्यमायु:कामार्थसिद्धये ||
प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितियकम् |
त्रुतीयं क्रुष्णपिंगाक्षमं गजवक्रं चतुर्थकम् ||
लबोंदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च |
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ||
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् |
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ||
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः |
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ||
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् |
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ||
जपेद्गणपतिस्तोत्रमं षड्भिर्मासै: फलं लभेत् |
संवस्तरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ||
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् |
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ||
इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं महागणपतिस्तोत्रं संपूर्णम् ||
प्रारंभी विनती करू गणपती
प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा |
अज्ञानत्व हरोनि बुद्धि मति दे आराध्य मोरेश्वरा |
चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी |
हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहू तोषवी ||
!!!! पुनरागमनायच !!!!
!!!! पुनरागमनायच !!!!
जाहले भजन आम्ही नमितो तव
जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
वारूनीया विघ्ने देवा रक्षावे दीना ||
दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो
प्रेमे करून देवा गुण तुझेची गातो ||
तरी द्यावी सिद्धी देवा हेची वासना
रक्षूनिया सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ||
मागणे हे देवा आता एकची आहे
तारुनिया सकळां आम्हा कृपादृष्टी पाहे ॥
जेव्हा सर्व आम्ही मिळू ऐशा या ठाया
प्रेमानंदे लागू तुझी कीर्ती गावया ॥
सदा ऐशी भक्ती राहो आमुच्या मनी
हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ||
वारुनिया संकटे आता आमुची सारी
कृपेची साऊली देवा दीनावरि धरी ||
निरंतर अमुची चिंता तुम्हा असावी
सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ||
निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी
चुकले अमुचे काही त्याची क्षमा असावी ॥
व्वा स्वाती.. सुंदर निरोपाची
व्वा स्वाती.. सुंदर निरोपाची आरती.. पुढल्या वर्षी लवकर या बाप्पा !
पुढच्या वर्षी लवकर या!!
पुढच्या वर्षी लवकर या!!
Pages