मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - मलमली सौंदर्य माझे" १३ सप्टेंबर

Submitted by संयोजक on 31 August, 2013 - 10:03

पांढरा शुभ्र मोगरा असो वा लाल टपोरा गुलाब, फुलांकडे ना स्वतःचच एक सौंदर्य असतं...नुसत्या दर्शनाने मन सुखावाण्याची कला कोणाकडे असेल तर ती फुलांकडे...प्रत्यक्षात पहा किंवा प्रचिंमध्ये त्यांच सौंदर्य जराही कमी होतं नाही.
तुम्हाला हेच करायचय... फुलांच्या झब्बूंचे हार ओवायचेत...

हे लक्षात ठेवा :
१.प्रचि सोबत फुलाचं बोलीभाषेतील नाव आणि वैज्ञानिक नाव ही लिहायचय. माहीत नसल्यास माहीत नाही असा उल्लेख करावा, इतर खेळाडूही अशा फुलाचे बोलीभाषेतील आणि वैज्ञानिक नाव माहीत असेल तर सांगू शकतात
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

मग घेताय ना प्रचि पुष्पहार गुंफायला आपल्या लाडक्या बाप्पासाठी?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Flower2_0.jpg

1 (27).JPG

लोकांनो, फुलांची नावं पण लिहायची आहेत. बर्‍याच जणांनी हा नियम वाचला नाही का?
>>>हे लक्षात ठेवा :
१.प्रचि सोबत फुलाचं बोलीभाषेतील नाव आणि वैज्ञानिक नाव ही लिहायचय. माहीत नसल्यास माहीत नाही असा उल्लेख करावा, इतर खेळाडूही अशा फुलाचे बोलीभाषेतील आणि वैज्ञानिक नाव माहीत असेल तर सांगू शकतात

जिप्सी!

नाव नक्की माहीत नाही कोणत्या तरी जंगली झाडांची आहेत ही फुले.. राजगडच्या वाटेत खुप दिसतात साधारण flowers.jpg

जिप्सी एकदम बरे केलेस! बकुळफुले नाहीत अशी माळ बाप्पा स्विकारेल का तरी! Happy

522208_10151018217898289_1993289210_n.jpg

लोकांनो, फुलांची नावं पण लिहायची आहेत. बर्‍याच जणांनी हा नियम वाचला नाही का?>> वाचला वाचला. जंगली फुले आहेत. पुस्तकात बघून नावे एक दोन दिवसात लिहीते.

सशल, अप्रतीम फोटो.

आरास, हार वगैरे खर्‍या फुलांचे हवेत. बोलीभाषेतील व वैज्ञानिक नाव आवश्यकच आहे असे नाही पण माहीत असेल तर उत्तम. खोटी फुलं नकोत.....
आई ने ताइ च्या गणपती साठी केलेली शेवंती (झिपरी शेवंती) आणि दुर्वांची कंठी..
kanthee.jpg

नलिनी, या फुलांच्या पानांचा फोटो पण देऊ शकाल का?

लोला, फूटभर व्यास असलेलं फूल? वॉव! सह्हीच!!

अंतरा, तुमच्या बहिणीला ___/\___ त्या सुंदर कंठीबद्द्ल! बाप्पा खूष होईल अशी कंठी बघून! Happy

Pages