मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - मलमली सौंदर्य माझे" १३ सप्टेंबर

Submitted by संयोजक on 31 August, 2013 - 10:03

पांढरा शुभ्र मोगरा असो वा लाल टपोरा गुलाब, फुलांकडे ना स्वतःचच एक सौंदर्य असतं...नुसत्या दर्शनाने मन सुखावाण्याची कला कोणाकडे असेल तर ती फुलांकडे...प्रत्यक्षात पहा किंवा प्रचिंमध्ये त्यांच सौंदर्य जराही कमी होतं नाही.
तुम्हाला हेच करायचय... फुलांच्या झब्बूंचे हार ओवायचेत...

हे लक्षात ठेवा :
१.प्रचि सोबत फुलाचं बोलीभाषेतील नाव आणि वैज्ञानिक नाव ही लिहायचय. माहीत नसल्यास माहीत नाही असा उल्लेख करावा, इतर खेळाडूही अशा फुलाचे बोलीभाषेतील आणि वैज्ञानिक नाव माहीत असेल तर सांगू शकतात
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

मग घेताय ना प्रचि पुष्पहार गुंफायला आपल्या लाडक्या बाप्पासाठी?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

घ्या केली सुरुवात. फड्या निवडुंगाचे (बोलीभाषेतील ब्रम्हकमळ) जपानी सौंदर्य. शक्यतो हे फुल अनेकांनी शुभ्र पांढर्‍या रंगातच बघीतले असेल पण जपानमधे याचा वेगळा रंग बघायला मिळाला होता. bramhakamal.jpg

Happy

मामी Happy

संयोजक, झाडावरचीच फुलं हवेत की आराशीत, रांगोळीत, फुलदाणीत रचलेली, जमिनीवर पडलेली, हारात गुंफलेली चालतील?

मामी, चालेल. पण आरास, हार वगैरे खर्‍या फुलांचे हवेत. बोलीभाषेतील व वैज्ञानिक नाव आवश्यकच आहे असे नाही पण माहीत असेल तर उत्तम. खोटी फुलं नकोत.

ही आहेत ट्युलिपं (जर कुलुपचं अनेकवचन कुलुपं तर ट्युलिपचं अनेकवचन ट्युलिपं). यांचं शास्त्रीय नाव Tulipa suaveolens आहे हे मलाही आत्ताच गुगलवहिनींनी सांगितलं.

DSC00680.JPG

DSC00700.JPG

DSC00760.JPG

DSC00778.JPG

साती, सोनकी म्हणा की सोनाली, ही फुले म्हणजे सह्याद्रीवरचे शंभर नंबरी सोन्याचे झळाळते दागिनेच आहेत जणू, एरवीचा राकट सह्याद्री काय दिसतो, ही फुले फुलल्यावर!
काळ्या कातळावर ही सोनेरी फुले, आणि त्यावर पडलेले मावळते / उगवते ऊन, आहाहा.आवडले

केपी, इंद्रा, मामी, मवा, फोटो आवडले Happy अजून येऊद्या

DSC02850.JPG

....

मस्त आहेत सगळे प्रचि Happy
हा माझा झब्बु.. नाव माहित नाही .. उसगावात रीगल म्युझियम मधे प्रचि काढला होता

pic.jpg

Pages