मायबोली गणेशोत्सव २०१३: उपक्रम एस टी वाय : कथा १. रेवाचा निर्णय काय?

Submitted by संयोजक on 31 August, 2013 - 08:28

एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने एखादी गोष्टं थोडी थोडी पुरी करावी.
एकेक सीन देत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------

STY2.jpg

लेखकः बेफिकीर

कथा: रेवाचा निर्णय काय?

रेवाच्या डोळ्यातून उतरत असलेली चमक निमितच्या वाक्याने पुन्हा झगमगू लागली. निमित स्वतःचे आवरताना स्वतःच्या आवरण्यापेक्षा रेवाच्या आवरण्याकडे अधिक लक्षपूर्वक पाहात होता. रेवाचे जवळपास होतच आलेले होते. मात्र तिने शेवटचे आरश्यात पाहिले तेव्हा निमितही तिच्यामागे उभा होता आणि त्याने आरश्यात रेवाचे डोळे पाहिले आणि व्यावसायिक कळकळ देहबोलीत ओतून रेवाला म्हणाला...

"यू शूड बी लूकिंग चीअरफुल, अ‍ॅज इफ यू नो?... यू आर सो हॅपी टू बी इन द ग्रूप"

रेवाने आरश्यातूनच किंचित उदासपणे निमितच्या त्या आग्रही चेहर्‍याकडे पाहिले आणि पुन्हा एक हलकासा ब्रश अप करत अचानक तिने स्वतःच्याच प्रतिमेकडे उत्फुल्लपणे पाहिले.

"दॅट्स इट रेवा... देअर यू आर"

निमितचा उत्साह आता शिगेला पोचला होता. रेवा त्याला याक्षणी जशी दिसायला हवी होती तशी दिसत होती.

टेक्नोझोन ईन्डियाचे टेक्निकल डायरेक्टर सुब्बी, त्यांची पत्नी उर्मिला, टेक्नोझोनचाच सप्लाय चेन चीफ अरोरा आणि डिझाईनचा सर्वेसर्वा नातू या चौघांना डिनरचे प्रपोजल देणे हे भल्याभल्यांना जमू शकले नसते. निमितने घाबरत घाबरत खडा टाकला आणि सगळे चक्क तयार झाले. या तयार होण्यामागे निमितच्या मितवा अ‍ॅन्सिलरीजचे उत्पादन सर्व तांत्रिक निकषांवर अगदी हवे तसे उतरणे हे कारण होते. तांत्रिकदृष्ट्याच जर काही कमतरता असत्या, तर अरोराने निमितचा एस एम एस सुद्धा वाचला नसता. अरोराला डिनर मान्य झाले नसते तर सुब्बींचा सेक्रेटरीही निमितला भेटला नसता. आणि सुब्बी आणि अरोराच्या पुढे जाण्याची नातूची पोझिशनच नव्हती.

मितवा अ‍ॅन्सिलरीज! निमित मधील 'मित' आणि रेवामधील 'वा' असे ते नांव तयार झाले होते. व्यावसायिक यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करणार्‍या मितवाचा होल अ‍ॅन्ड सोल निमित हा पंचेचाळिशीचा, गोरा पान, पोट सुटलेला, बेढब आणि अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि साहस यांचा संगम असलेला माणूस होता. जे उद्दिष्ट आहे ते गाठण्यासाठी ज्या ज्या प्रकारचे प्रयत्न करणे आवश्यक आणि शक्य आहे त्यातील एकही करणे तो बाकी सोडायचा नाही. चोवीस तास व्यवसायाचे भूत मानगुटीवर बसलेला निमित एक माणूस म्हणून यांत्रिक झाला होता. यंत्रमानव, जो ठरवेल ते करतो, ते करण्यासाठी जे आवश्यक वाटेल ते करतो.

सुब्बींची मिसेस त्यांच्याबरोबर नसती तर आज निमित कोणाबरोबर डिनरला आहे हेही रेवाला माहीत झाले नसते. फक्त तो रोजच्याप्रमाणे एक ते दीड वाजता येईल आणि आपला एखादा नोकर दार उघडून त्याला आत घेईल आणि मग निमित झोपून जाईल इतकेच तिला माहीत असते. पण आज तो घरी आला तेच मुळी पावणे सातला आणि म्हणाला...

"रेवा, तुझ्याकडे पंचेचाळीस मिनिटे आहेत... रीजन्सीच्या सिक्स्थ फ्लोअरला डिनर आहे... सुपर हायक्लास ग्रूप आहे.. यू शूड लूक यूअर बेस्ट सो फार इन द लाईफ.. त्यात एकांची मिसेसही आहे.. सो यू कूड बी फ्रेंडली विथ हर... कॅरी सम फ्लॉवर्स विथ यू फॉर हर... आय अ‍ॅम टेलिंग यू... यू शूड लूक सिंपली स्टनिंग..."

एक बाहुली! जी त्याक्षणी दिवसभरच्या ड्रेसमध्ये होती. कोणत्यातरी कारणाने आज तिला नवर्‍याची साथसंगत मिळणार हेही तिच्यासाठी जरा वेगळे होते. ती इतकी काही भोळसट नव्हती की तेवढ्यावर समाधानी होईल, पण काहीच नाही तर निदान ते तरी! तिने ठरवले. हा आपल्याला सादर करणार! लोक आपल्याला बघणार! आपल्याला बघून निमितकडे असूयेने बघणार! मग आपल्याशी मैत्रीपूर्ण बोलू लागणार! आपल्याकडून अशी अपेक्षा असणार की आपण त्या लोकांना खेळवावे! त्यांना आपल्या विचारांचा तळ गाठता येऊ नये. या स्त्रीशी नेमकी किती घट्ट मैत्री होऊ शकेल याचा अंदाज बांधता येऊ नये. हे सगळे असेच होणार असेल, तर आज निमितसकट सगळ्यांनाच शॉक देऊ!

रेवा! चव्वेचाळिसाव्या मिनिटाला ती सिव्हिकमध्ये बसली तेव्हा निमित क्षणभर थांबला आणि तिच्याकडे बघत तारीफ करणार्‍या चेहर्‍याने हासत म्हणाला...

"रेवा... आय कान्ट बिलीव्ह.. तू अजूनही तितकीच सुंदर दिसतेस... आय.. आय लव्ह यू"

'आय लव्ह यू'! रेवाला ते शब्द ऐकू जरी असेच आलेले असले तरीही त्या शब्दांचा जो अर्थ तिच्या मनात पोचला तो असा होता...

'धन्यवाद तू सुंदर दिसत असल्याबद्दल! आज नक्की पब्लिक भाळणार तुझ्यावर'!

पण रेवामधील खूप जुनी झालेली कोणतीतरी एक निरागस नवयौवना मात्र त्यातही थोडीशी सुखावली, यामुळे, की ती आजही तितकीच सुंदर दिसते हे तितक्याच जुन्या झालेल्या तिच्या नवर्‍याला मान्य आहे. इतकेच नाही तर स्वीट सिक्स्टीन असलेली आपली मुलगी शीतल आणि आपण रस्त्यातून जात असताना लोक आपल्याचकडे पाहतात हेही रेवाला आठवले. सिव्हिकमध्ये रेवाच्या केसातील आणि हातातील मोगर्‍याचा गंध भरून उरला तेव्हा निमितचे मन रीजन्सीच्या सहाव्या मजल्यावर पोचलेदेखील होते.

रीजन्सीच्या पोर्चमध्ये मात्र वेगळेच समजले. सुब्बी, अरोरा आणि नातू एकाच गाडीतून उतरले. मिसेस सुब्बी दिसतच नव्हत्या. निमितने सगळ्यांशी रेवाची ओळख करून दिली. रेवाने सुब्बींना विचारले..

"मिसेस सुब्बी?"

"ओह शी हॅड सम क्लब मीटिंग अ‍ॅन्ड ऑल... लास्ट मिनिट चेंज.. सो सॉरी". सुब्बींनि दिलगीरी व्यक्त केली.

निमित म्हणाला...

"नो इश्यूज... बट शी मस्ट कम द नेक्स्ट टाईम सर"

"ओह श्योर"

"प्लीज"...

दाराकडे हात दाखवत निमितने सगळ्यांना एलेव्हेटरकडे गाईड केले. सगळ्यांच्या मागून चालताना अचानक निमित रेवाच्या कानात पुटपुटला..

"टेक्निकली वुई आर थ्रू... सो सुब्बी अ‍ॅन्ड नातू आर ऑलरेडी विथ अस रेवा.. वुई ओन्ली नीड टू टेक केअर ऑफ अरोरा... ओके?"

"हं"

रेवाला कश्यातच स्वारस्य नव्हते. मिसेस सुब्बी न आल्याने हातातील मोगर्‍याचा गजरा तिने नुसताच बाळगला.

सहाव्या मजल्यावरून शहर झगमगीत दिसत होते. एका अतिशय जाणीवपूर्वक निवडलेल्या टेबलभोवती सगळे स्थानापन्न झाले तेव्हा सुब्बी रेवाकडे बघत म्हणाले...

"आय अ‍ॅम सो सॉरी... आमच्या रुक्ष गप्पा तुम्हाला आता ऐकत बसाव्या लागणार... मी आधीच कळवायला हवे होते की विद्या येत नाही आहे म्हणून..."

रेवाने तोंडभर हासत उत्तर दिले...

"छे छे?... त्यात काय इतके? पण पुढच्यावेळी नक्की आणा त्यांना..."

"नक्की नक्की"

त्यानंतर ऑर्डर प्लेस होण्याचा कार्यक्रम झाला आणि मग रेवा ही एकटीच स्त्री असल्याने आणि तिला कंफर्टेबल वाटणे मस्ट असल्याने सुब्बींनी रेवाशी जुजबी चर्चा केली. रेवा एरवी काय करते, तिच्या हॉबीज काय, त्यांची मिसेस काय करते वगैरे चर्चा झाल्यावर आपसूकच बिझिनेसशी संबंधित गप्पा सुरू झाल्या.

तांत्रिकदृष्ट्या मितवा थ्रू असल्यामुळे सुब्बी आणि नातूला काहीच डिस्कस करायचे नव्हते. मात्र सुब्बी निमितशी आंतरराष्ट्रीय व्यापार, शेअर्स, मंदी, विकास असल्या विषयांवर बोलत असताना त्यात व्यत्यय आणून बिझिनेस डिस्कस करणे हे अरोराच्या दृष्टीने प्रोटोकॉलच्या विरुद्ध होते. काही झाले तरी सुब्बी खूपच वरिष्ठ होते. सुब्बी आणि निमितच्या गप्पा सुरू असताना अरोरा त्यांच्या गप्पात ब्रीफली सहभागी होत होता. रेवा मात्र त्या गप्पात काडीचाही इंटरेस्ट नसूनही फक्त त्यातच इंटरेस्ट असल्यासारखे आविर्भाव चेहर्‍यावर आणत होती. सुब्बींच्या दृष्टीने रेवाचे आता मीटिंगमध्ये काहीच काम नव्हते, पण ती एका बिझिनेस असोसिएटची पत्नी असल्याने तिच्याप्रती योग्य तो आदरभाव राखणे इतकेच ते आपले कर्तव्य समजत होते. अरोराला रेवामध्ये काहीही दिलचस्पी नव्हती कारण त्याच्यामते त्या बिझिनेस डिनरमध्ये ती असण्याचेच कारण नव्हते. नातू मात्र रेवाला पाहिल्यापासून किंचित गढूळला होता आणि रेवाला ते जाणवलेले होते. त्यामुळे नातूकडे ती जवळपास बघतच नव्हती. काही बोललीच तर ती अरोराशी बोलत होती.

अर्ध्या पाऊण तासाने गप्पांचा ओघ निमितने अलगदपणे मितवाच्या काँट्रॅक्टकडे वळवला तेव्हा वेटर सूप आणि कॉकटेल्सचे बोल्स आणि ग्लासेस क्लीअर करत होता. आता निघालेल्या विषयासंबंधात सुब्बींनी फक्त नातूला 'होप द प्रॉडक्ट इज क्लीअर?' असे विचारले आणि नातूने घाईघाईने 'येस सर' असे म्हणून हासत निमित आणि रेवाकडे पाहिले. रेवाने नातूची कीव केल्याप्रमाणे एक स्माईल फेकले.

आता खरी रंगत चढली गप्पांना! कारण आता सप्लाय चेनचा दादा अरोरा आणि मितवाचा ओनर निमित यांची जुंपणार होती. अरोराने इराक युद्ध, चायनातील स्टील रिक्वायरमेन्ट आणि ऑटोमोटिव्ह सेक्टरमधील जागतिक मंदी हे विषय आत्ता का काढलेले असावेत याची निमितला पूर्ण जाणीव होती. या विषयांकडून तो शेवटी प्राईस रिडक्शनवर येणार यात शंका नव्हती. एकमेकांना जोखत दोघे वरवर स्टायलिश वाटणार्‍या पण छुपे निगोसिएशन असलेल्या गप्पा मारत होते. सुब्बींना हे सगळे समजत होते, पण नातूच्या डोक्यावरून जात होते. रेवा हुषार होती. कोणत्या क्षणापर्यंत अरोराच्या बाजूने असल्यासारखे दाखवायचे आणि कोणत्यावेळी कोणाचातरी फोन आला असे दाखवून काही काळ लांब जायचे हे ती अनुभवाने शिकलेली होती. पण ती वेळ लवकर येत नव्हती. रेवा वैतागत होती. आजवरच्या अनुभवानुसार मेन कोर्स सर्व्ह होतो तेव्हा कमर्शिअल्स थ्रू झालेली असतात हे तिला माहीत होते. पण इथे तर मेन कोर्सही संपत आलेला होता.

आणि अचानक अरोरा आणि निमितच्या गप्पा चालू असताना सुब्बींनी काहीतरी लक्षात आल्याप्रमाणे रेवाकडे एकदम बघत विचारले...

"सॉरी... मगाशी तुम्ही काय म्हणालात? ... यू हॅव डन बिझिनेस अ‍ॅनलिस्ट्स डिप्लोमा फ्रॉम ओ आर?"

रेवा हबकली. तिच्या अंदाजाने गप्पांच्या सिक्वेन्समध्ये हा प्रश्न, तोही आत्ता, निघणेच शक्य नव्हते. अरोरा आणि निमित आता अक्षरशः बुद्धिमत्तेचा संपूर्ण कस लावून एकमेकांच्या अनुभवाला भिडत होते. मात्र सुब्बींनी विचारलेल्या या प्रश्नामुळे अर्थातच त्यांची ती चर्चा एकदम थांबलीच. हबकलेल्या रेवाने क्षणभर निमितकडे ओझरते पाहात आत्मविश्वासाने सुब्बींना उत्तर दिले..

"येस सर... आय हॅव डन इट"

"अरे देन व्हाय डोन्ट यू जॉईन अस इन एम आय एस? द पोझिशन इज अल्सो गूड... पॅकेज इज एक्सलंट..."

पोटात दचकून खड्डा पडलेला असताना अचानक सुखद कारंजी उडू लागावीत तसा रेवाच्या पोटातून आनंद ओसंडत तिच्या चेहर्‍यावर सांडला. डोळ्यांमधून तो उघडपणे व्यक्त होत असतानाच तोंडाने मात्र ती म्हणाली...

"आय मीन... आय मीन.. आय डोन्ट नो..."

चुटपुटत निमितकडे बघत ती पुन्हा सुब्बींकडे पाहू लागली. सुब्बींनी एका कोट्याधीशाच्या पत्नीला अ‍ॅक्रॉस द टेबल एका अतिशय रेप्यूटेड कंपनीतील उत्तम जागेवरील नोकरीची ऑफर देऊ केली होती. तीही तिच्या नवर्‍यासमोरच! क्षणाच्या एक लाखाव्या भागात निमितमधील बिझिनेसमन जागा झालस होता आणि रेवाला पुढचे काही सुचायच्या आत म्हणाला होता...

"बाय ऑल मीन्स! वुई बोथ वूड बी ऑनर्ड"

निमितचा डाव सरळ होता. ज्या कंपनीत बायकोच नोकरी करेल, तेही एम आय एस सारख्या इन्फर्मेशनच्या समुद्रात बुडून, तिथे बस्तान बसवणे त्याला अत्यंत सोपे जाणार होते. त्याने रेवाला काही चॉईसच विचारलेला नव्हता. सुब्बी फक्त म्हणाले...

"प्लीज इमेल यूअर सी व्ही अ‍ॅन्ड ऑल... अ‍ॅन्ड मे बी.. देअर आर सम फॉर्मॅलिटीज.. दॅट्स इट"

त्यांच्यासारख्या कंपनीला कोणीही उमेदवार मिळाला असता. त्यांनी ती ऑफर रेवालाच का केली होती? हा प्रश्न ते सोडून सगळ्यांच्या मनात आलेला होता. तो जाणवताच सुब्बी म्हणाले...

"कॉस्ट सेव्हिंग... यू नो मिस्टर निमित?... इफ आय हॅव टू सोर्स अ कँडिडेट फ्रॉम द जॉब मार्केट... आय हॅव टू पे... "

जोरजोरात हासत निमित म्हणाला...

"सो आय हॅव ऑलरेडी गिव्हन द डिस्काऊंट"

यावर मात्र अरोराही हासला. सुब्बी आणि अरोरांचे हासणे निर्मळ होते. नातूच्या हासण्यात 'रेवा आता रोज दिसणार' याचा आनंद झळकत होता. रेवाला कोणीच काही विचारले नव्हते.

अरोरा आणि निमितच्या पुढच्या डिस्कशनमधील वाक्ये रेवाच्या कानांवर आदळत राहिली. पण अर्थ मनापाशी पोहोचू शकला नाही.

रेवासमोर अनेक प्रश्न होते. फक्त नोकरी करावी की नाही इतकाच प्रश्न नव्हता. ही नोकरी करून किंवा न करून आपण आपल्या आयुष्यात नेमके काय काय हवे ते घडवून आणू शकतो अशी बरीच मोठी यादी होती मुद्यांची!

रेवासमोरचे प्रश्न असे होते:

- नोकरी करावी की करू नये

- केली तर आपल्यातील एक उच्चशिक्षित व्यक्ती योग्य त्या वळणावर आपले आयुष्य नेऊ शकेल का?

- केली तर शीतलला या वयात आईची अधिक गरज असताना आपले नोकरी करणे तिच्यासाठी काही प्रमाणात घातक ठरेल का?

- निमित आपल्या नोकरीमार्फत माहिती काढून स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करेल हे आपल्याला सहन होईल का?

- आपण नोकरी नाही केली तर आपण आयुष्यात नेमक्या कोण बनून राहू?

- ही नोकरी करण्यास निमित मान्यता देत आहे तर मग कोणतीही इतर चांगली नोकरी करण्यासही त्याने मान्यता का देऊ नये?

- आजवर निमितच्या मनात आपल्याबद्दल असा विचार का आला नाही?

- सुब्बींचा आणि त्यांच्या कंपनीचा माणूस शोधण्याचा खर्च वाचवण्याचा फायदा आपण का करून द्यावा?

- ही संधी समोर येईपर्यंत आपण कधीच असा विचार गांभीर्याने का केलेला नव्हता?

- निमितचे आणि आपले यापुढील नाते, नोकरी केली तर कसे असेल आणि नाही केली तर कसे असेल?

- आपण नेहमी निमितचा विचार का करायचा? त्याने आपला विचार नक्की किती वेळा केला आजवर?

- आपल्याला आर्थिक गरज नसताना आपण नोकरीत डोके का शिणवून घ्यायचे?

- आपण कधीकाळी केलेला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आज इतका महत्वाचा का ठरावा?

- ही ऑफर आहे की इतरच काही?

- अशी ऑफर मिळेल यासाठीच हे डिनर आयोजीत करावे असा निमितचा तर प्लॅन नसेल?

- ही ऑफर हा बिझिनेस डीलचा तर एक भाग नसेल? सुब्बी आणि अरोरा यांनी निमितला इंप्रेस करण्याचा?

- माझ्याबाबतीत इतरजण निर्णय घेतात हे मला का मान्य व्हावे? भले निर्णय योग्य असेल तरीही?

- एकदा बाहेरच्या जगात कर्तृत्व दाखवून निमितचा इगोच नष्ट करावा का?

विचारात गढलेल्या रेवाने शेवटी..... अत्यंत सूज्ञ निर्णय घेतला...

=========================================================
नियमावली:

१) कथेचा शेवट अतिरंजीत चालेल पण पटेल असा असावा
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परीचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

==========================================================

रेवा-निमितची भेट होते.
...अँड दे लिव हॅपिली एवर आफ्टर असा शेवट अपेक्षित आहे.

दि. १२ सप्टेंबर २०१३ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता एस टी वायची ही कथा बंद करण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेवा ज्याला पाहून बेहोष झाली तो दुसरा तिसरा कोणी नसून निमितच होता.
बेशुद्ध पडायला कारणही तसच होतं. शीतलला भावंड येणार होतं.
रेवाने विचार केला की बरी आहे उतरवयाची काठी.
आता हे दगदगीच आयुष्य पुरे झालं. दुधसागरच्या रम्य परिसरात एक छान घर बांधुन रहावं..
तिचा निर्णय झाला होता.
फक्त हा घोळ निस्तरून तो अमलात कसा आणणार हाच एक प्रश्न उरला होता...

आतापर्यंत झालेली कथा.
***********************************************************************
रेवाने हसून सुब्बीचे आभार मानले, नवर्याचा खांद्यावर एक क्षण डोके टेकवून त्यालाही हसून थान्क्स म्हणाली आणि मग शांतपणे सांगितले "तुमची कंपनी जॉईन करायला हजारो अर्ज येतील पण मितवा मध्ये योगदान न देता तुमच्याकडे काम करण्यासाठी मला तितकेच सबळ कारण हवे. कमी पगाराची ऑफर न देता पूर्ण पगार दिलात तर निश्चित कन्सिडर करेन."

रेवा पूर्ण पगार दिला तरच काम करेन असे म्हणाली आणि तेव्हाच हॉटेलच्या बाहेरून फटाके फुटल्यासारखे आवाज आले. एक क्षण प्रत्येकाला वाटले की बाहेर काही लग्न वगैरे कार्यक्रम सुरू असेल पण तेव्हड्यात रेस्त्राँच्या दरवाजातून घाबरलेल्या अवस्थेत, धावत पळत काही हॉटेलस्टाफ आणि गेस्ट आत आले आणि त्यांच्या मागोमाग हातात मशिनगन्स घेतलेले आणि पाठीला बॅकपॅक्स लावलेले दोन अतिरेकी!
निर्विकार चेहर्‍याने दोघांनी मशिनगन्स मधून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. ज्यांना सुचले ते लोक टेबलाखाली लपून बसले, काही किचनच्या दिशेनी पळाले. दुर्दैवानी रेवा आणि कंपनी दरवाज्याजवळ असल्याने सुब्बी आणि अरोराला टेबलाखाली वाकून जीव वाचवायची संधी देखील मिळाली नाही. निमित रेवाचा हात धरून तिला ओढणार इतक्यात एक गोळी त्याच्या कानशिलाला लागून गेली आणि तो खाली कोसळला. रेवा स्तब्ध होऊन बघत राहिली. तेव्हड्यात अतिरेक्यांपैकी एकाचे लक्ष रेवाकडे गेले. त्याने तिच्याकडे मशिनगन रोखली. भितीने रेवाच्या घशातून आवाजही निघत नव्हता. पण रेवाचा काळ आला असला तरी अजून वेळ आली नव्हती. त्याने तिच्यावर गोळ्या नं झाडता तिचा हात खसकन पकडला आणि दुसर्‍याला डोळ्यानेच ईशारा करून हिला हॉस्टेज म्हणून घेऊन जाऊ या अर्थाचे बोलला...

नातूने टेबलाखाली बसून घड्याळासारखे दिसणार्‍या उपकरणाची डायल फिरवली. तो खरा तर एक सॅटेलाइट फोन होता. वरची बटने दाबताच तिकडच्या बाजूने आधी खरखर आली आणि मग एक गंभीर, करडा पण कमालीच शांत आवाज म्हणाला " नातूंचा नातू ना तू ?" हे त्याचं सांकेतिक वाक्य होतं... " डोन्ट मिस द चान्स थलैवा! "
नातू त्याचं सांकेतिक वाक्य उद्गारला. त्याचं नाव नातू नव्हतंच मुळी. तो होता श्रीलंकेत लपलेल्या फिट्टे गँग चा शार्प शूटर आणि आत्मघातकी पथकाचा मेन्टॉर वराहमिहीर थंगबली सुरेन्द्रनाथन ! तरी अपण नातूच म्हणू त्याला.
नातू तिकडून बोलनार्‍या त्याच्या बॉस ला रिपोर्ट करत होता " २ डाउन थलैवा! टार्गेट बेशुद्ध! त्याची बायको ताब्यात घेऊन येतो आहोत - छेन्नई एक्सप्रेस ने"

मितवा च्या निमित चा वर वर दिसणारा कारोबार वेगळा असला तरी छुप्या मार्गाने फिट्टेला लागनारी स्फोटकं बनव्णे हा त्याचा मुख्य धंदा होता.दुबईच्या भाई गँग कडून कच्चा माल बोटीने आयात करून तयार स्फोटके तो फिट्टे ला पुरवत होता.
झाले होते काय, की इतक्यात पैश्याच्या कडकीमुळे दुबईहून येणारा माल परवडेना म्हणून कमी पडायला लागल्याने निमित ने सप्प्लाय मधे भेसळ सुरु केली होती. त्याचा परिणाम म्हनून परवाचेच एक फिट्टे चे मिशन टोटल फ्लॉप झाले होते! त्यामुळे निमित चा समाचार घ्यायच्या ऑर्डर्स नातूला मिळाल्या होत्या.
ऐन वेळी रेवाला पाहून प्लॅन बदलून तिला किडनॅप करण्याचे त्याने ठरवले.जेणे करून निमित ला नीट कह्यात ठेवता यावे.
इकडे रेवा घाबरलेली , तिकडे निमित हळू हळू हाल्चाल करायला लागला होता... छेन्नै एक्सप्रेस याच सुमाराला स्टेशनात येतेय...
आता नातूला झटपट हालचाल करणे भाग होते ......

छेन्नई यक्सप्रेस गाठायची होती .. रेवाला खान्द्यावर टाकुन न्ययाचं होतं !
त्या आधी तिला खान्द्यावर घेतलेला ' दिलवाले दुल्हनिया ' स्टाइल फोटू काढून घ्याय्चा होता !
पण फाइव्ह स्टार हॉटेल ची उंची पर्शिअन कार्पेट्स हलाल झालेल्या मानवी रक्तानी माखली होती, भिती वर डाग पडले होते त्यामुळे फोटुला बॅग्राउंड मिळेना !!
शेवटी फोटो न काढता त्या घसरड्या रक्तचा सडा ओलांडून आणि खान्द्यावर ६० किलोच्या रेवाला घेऊन बिचारा नातू घाम पुसत पुढे जाउ लागला .. हॉटेल बाहेर येउन साठ किलोचं रेवाचं धूड रिक्शात टाकलं आणि निघाला ठेसनाच्या दिशेने !!! ' पण त्या रिक्शेला अजुन एक रिक्शा फॉलो करत होती , रॉ एजन्ट टायगरची !!
अरे हा नातू श्रीलंकेचा नातू कधी झाला , हा तर पूर्वी दुसर्या गँग मधे होता!! त्यावेळी तो 'उद्दाम हसेन' यांचा नातू 'मुद्दाम घुसेन' होता .. टायगर पुटपुटला !!!!

दिलवाले दुल्हनिया स्टाइल फोटो काढता आला नाही तरी त्याच चित्रपटातला एक सीन नातूच्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरणार होता ह्याची त्याला सुतराम कल्पना नव्हती. रिक्षात बसल्यावर गार वार्‍याने रेवाला थोडी शुद्ध आली. परंतू शेजारी बसलेला निमित नसून नातू आहे आणि आपण सिव्हिकमध्ये नसून रिक्षात बसलो आहोत याची जाणीव तिला झाली नाही. रिक्षेवाल्याला आपला ड्रायव्हर समजून तिने फर्मान सोडलं, 'गंगाराम, एसी बढाओ'. नातू मिशनवर असलेला पाषाणहृदयी वराहमिहीर असला तरी मनाने मात्र रेवावर भाळलेला भोळा प्रेमिक होता. त्याने तत्परतेने गळ्यातल्या टायने तिला वारा घालायला सुरूवात केली. टायगरची रिक्षा आता रेवा आणि नातू होते त्या रिक्षेला समांतर जात होती. मिशनवर आलेला वराहमिहीर एका सुंदरीला टायने वारा घालत असलेला बघून टायगरला हसु आवरेना. त्याच्या गडगडाटी हास्याने रिक्षा भरून गेली. त्याच वेळी नातूचे लक्ष टायगरच्या रिक्षेकडे गेले.

'ओह क्रॅप!" त्याच्या तोंडातून उद्गार निघाला. त्याने रिक्षावाल्याच्या अंगावर खेकसत रिक्षा जोरात चालवायला सांगितले. सुदैवाने टायगरच्या रिक्षेसमोर एक गाय आडवी आल्याने ती मागे पडली आणि रेड सिग्नल ओलांडून नातू आणि रेवाची रिक्षा स्टेशनच्या आवारात शिरली. मधल्या वेळात रेवाच्या नाकाला क्लोरोफॉर्मचा रूमाल लावण्याची हुशारी नातूने दाखवली होती. रिक्षेचे पैसे न देतात तो रेवाचं पार्सल खांद्यावर वागवत शक्य तेवढ्या वेगात छेन्नई एक्स्प्रेसकडे निघाला. रिक्षावाला 'ओ साब पैसे दे दो' ओरडत त्याच्या मागे लागला परंतू रिक्षा तशीच सोडून फार दूर जाणे त्याला शक्य नव्हते. टायगरवर मात्र असे काही बंधन नव्हते. चपळाईने एकावेळी दोन तीन पायर्‍या चढत तो नातूच्या मागावर जात होता. नातू प्लॅटफॉर्मवर पोचला आणि ट्रेनने शेवटची शिट्टी दिली. नातू समोर येइल त्या डब्यात चढायला लागला आणि त्या घाईत रेवा प्लॅटफॉर्मवर पडली. आता टायगरपासून आपला जीव वाचवावा की रेवाला बरोबर घेऊन मिशन पूर्ण करावे अशा द्विधेत नातू सापडला. त्याचे नशीब जोरावर होते म्हणून की काय फार विचार करायच्या आतच प्लॅटफॉर्मवरच्या दोन जणांनी रेवाला उभी करून तिचा हात नातूच्या हातात दिला आणि नातूच्या कानात गाणे वाजायला लागले, 'तुझे देखा तो ये जाना सनम....'

इकडे हॉटेल मधे निपचित पडलेला निमित उठून सुब्बीजवळ गेला. "सुबन्या! सुबन्या! ऊठ"
सुब्बी हा इन्डस्ट्रियलिस्ट सुब्बी नसून दुबई गँग चा भाईचा उजवा हात चिकना सुबन्या होता. अरोरा पण खरा तर असलम बौना म्हनून फेमस असलेला भाईचाच एक शार्प शूटर होता. आत्त्ता हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात मरून पडले होते! इम्पॉसिबल!! फार मोठा सेटबॅक होता नावेद भाईच्या गँग ला!!
असलम आणि सुबन्याचा गेम झाल्याचे भाईला कळले तर च्यामारी भाई माझाच गेम करतील!
काय करावे??! अचानक निमित ला आयडिया सुचली!!
गळ्यातल्या लॉकेट मधे लपवलेला एक फोन वापरून निमित (?!)ने भाईला डाअय्रेक्ट दुबईला फोन लावला!
" भाई, लोफर लतिफ बोलतोय... इथे पंगा झालाय!! असलम भाईजान आणि सुबन्या दोघांचा गेम झाला! फिट्टे गँग चं काम आहे नक्की! रुक्सानाला पण उचललंय त्यांनी ! भाई! मदद! मला पण नक्की टपकवनार हे लोक! .. भाई ? भाई ? ..." आता निमित उर्फ लतिफ ला घाम फुटला होता..
भाईने तिकडून काहीच न बोलता फोन कट केला होता! छोटा तगडा ला आत बोलावत भाईंनी एकच सांगितले
"छोटे, बोटीच्या कप्तानाला ऑर्डर दे....जायची तयारी कर ताबडतोब..! "घर आजा परदेसी तेरा देस बुलाये रे..... " !! " (भाईला बॉलिवुडाचं फार वेड!!)

छोटा तगडा , भाई आणि गँग सोन्याचं पॉलिश केलेल्या बोटीतून मायदेशाकडे निघाली!
भाईला बॉलिवुड , सोनं याची फार आवड!
सोन्याची ज्वेलरी, सोन्याची सनग्लास फ्रेम, सोन्याचं घड्याळ , सोनेरी नौका , त्या नौकेत सोनेरी भिंती, सोनेरी वॉश बेसिन आणि सोनेरी कमोड !
मायदेशाच्या आठवणीन भाई गाउ लागला,
जहां डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा , वो भारत देश है मेरा'
" चान्दीकी सायकल सोनेकी सिट आओ चले डार्लिंग चले डबलसीट" , छोट्या तगड्याने साथ दिली , ( भाई आणि छोट्या तगड्याचा विशेष ' दोस्ताना' होता !
भाईने तगड्याच्या गळ्यात हात टाकून गाउ लागला "
"सोना कितना सोना है सोने जैसे तेरा मन , तू मेरा तू मेरा तू मेरा तगडा नंबर १"
इकडे रेवा उर्फ रुखसाना आणि नातू एका डब्यातल्या घामट कळकट -तोंडाला वास येणार्या जुन्या अंगाच्या लोकांच्या गर्दीत कोंबले गेले !
रेवाला पाहून स्त्री दाक्षिण्य दाखवत एका दगडु तेलीने तिला बसायला जागा करून दिली .
नातू सुध्दा तिला खेटून बसलाच!
इतक्यात नातूच्या थलायवा चा एसेमेस आला "कार्ट्या, तू जिला उचललस ती लोफर लतिफची लैला रुखसाना आहे, दुबईच्या भाईला हे कळलय आणि तो तुझ्या मागावर निघालाय ..अता तरी तुझे हे लंपट "विबासं "बन्द कर आणि त्या लैलाला टपकवून आपल्या गँग वार कडे फोकस कर!"
नातू इकडे पूर्ण मजनु झाला होता , त्याला अता फक्त " नातूभाई रुख्साना ले जायेंगे" स्टोरीत इंटरेस्ट होता ..त्याने आपला फोन छेन्नाई एक्स्प्रेस मधून फेकून दिला !
रुखसाना शुध्दीवर येऊन पळून जायच्या तयारीला लागली होती.. ते पाहून नातू गाउ लागला
रुख्सानाssssssss
रुक रुक
रुखसाना ओ जाना हमसे दो बाते
करके चली जाना ये मौसम है दिवाना , रुक रुक "
नातूला दिवाना झालेला पाहून रेवाने हळुच एक टेक्स्ट मेसेज केला ..
Agent Tigress reporting , he's totally trapped , continuing journey in Chennai express"
त्यावर उत्तर आलं " Don't let him escape , continue your journey ,मी छतावर छैय्या छैय्या करतोय- Tiger

खूप दाटीने बसावं लागलं होतं आणि नातू अगदीच पिच्छा सोडत नव्हता. रेवाला त्याला खेळवत ठेवायचं होतं पण दुरूनच. दारासमोर बसलेल्या एका बाईचं शेंबडं पोर केकाटून रडत होतं. तिला स्वतःच्या जागेवर बसण्याची खूण करून रेवा उठली आणि दारात जाऊन उभी राहिली. तिथून ती नातूवर नजर ठेऊ शकणार होती आणि टायगरने आलेले मेसेजेस त्याने वाचण्याचा धोका पण नव्हता. टायगर! खरं तर तो होता ट्रेडर. ट्रेडरचा टायगर कसा झाला हा प्रवास फारच रोमांचकारी होता. रेवा सुद्धा रेवथीची रुकसाना आणि पुन्हा रेवा कशी झाली यावर तिचा स्वतःचा सुद्धा विश्वास बसला नसता. रेवाला जुने दिवस आठवु लागले. रेवथी आणि ट्रेडर एकाच कंपनीत होते. रेवथी ऑफशोअरिंग कंपनीतर्फे फ्रंट ऑफिस अनालिस्ट म्हणून शॉर्ट टर्म असाइनमेंटवर आली होती. पहिल्याच दिवशी तिची गाठ पडली ट्रेडरशी. तिथे प्रत्येकाला एक नाव होतं, ट्रेडर मात्र ट्रेडरच होता. स्वतःचं नाव न सांगता जो पेशा आहे त्याला शोभेल असं नाव घ्यायची ही त्याची जुनी खोड होती. म्हणूनच आता तो होता टायगर. खुंखार जांबांज टायगर! टॉल, डार्क आणि हँडसम, गालांना खळ्या, हनुवटीवर खड्डा. रेवथीला जॉन अ‍ॅब्राहमचीच आठवण झाली होती त्याला बघून. त्याच्या जुन्या आठवणींमध्ये रंगलेली रेवा उर्फ रुकसाना उर्फ रेवथी गोड हसली. डोळ्याची पापणी न लवता तिच्याकडे एकटक बघणार्‍या नातूला वाटलं ती त्याच्याकडेच बघून हसतेय. नातूच्या कानात गाणं वाजायला लागलं, 'तु सामने बैठी रहे मै तुझे देखा करुं...'

रेवा विचारात पडली होती. माझ्या बाबतीतले सर्वच निर्णय इतरजण का घेतात?
आता आपला निर्णय आपणच घ्यायचा.
नातूंशी नाते जोडून नातूंच्या आईला नातू द्यायचा.
लतीफ ला भाईकडून टपकवायचे आणि त्याचा 'लेट' लतीफ करायचा.
पण कसं?
शीतलचं काय होईल? नातूबाई तिला नात म्हणून स्विकारतील का?
आपण आयुष्यात काय बनायचं रेवा की रुखसाना कि रेवती?

तोवर नातू ला थांबणे अशक्यच झाले होते.
तो उठून रुक्साना उर्फ रेवाच्या समोर जाऊन उभा राहिला.
रेवाने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
त्याने रेवाकडे garfieldच्या नजरेने पाहिले.
रेवाने गाडीबाहेर नजर वळवली.
वर बसलेल्या टायगरने रेवाकडे confused नजरेने पाहिले.
नातूने रेवा बाहेर काय बघत होती ते बघायला नजर वळवली.
तोपर्यंत बाहेर बघण्यासारखे काहीच नाही म्हणून रेवा आत बघायला वळली होती.
रेवा बाहेर काय बघत होती ते बघायला टायगर ने आपली दुर्बीण काढली.
रेवा बाहेर काय बघत होती हे न कळल्यामूळे नातू प्रश्नार्थक नजरेने रेवाकडे बघू लागला.
नातू आपल्याकडे असा काय बघतोय ते न कळल्यामूळे रेवा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघायला लागली.
तोपर्यंत हे खालचे दोघे जण काहीच बघत नव्हते हे लक्षात येऊन टायगरने उजव्या हाताची बंद मूठ महेश कोठारे स्टाईलमधे डाव्या हातवर आपटत 'damn it' म्हणत दुर्बीण आत टाकली.
तोवर नातूचे confusion लक्षात येऊन रेवाला खुदकन हसू फुटले.

तिला असे जिवेघेणे हसताना पाहून नातूच्या कानात गाणं वाजायला लागलं, 'टेलीफोन धून मे हसनेवाली'

आत्ता नातू ला थांबणे अशक्य झाले होते.
त्याने रेवाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
रेवाने त्याच्याकडे भिजलेल्या मांजराकडे पाहतात तशा नजरेने पाहिले.
नातूने हादरून गाडीबाहेर नजर वळवली.
वर बसलेल्या टायगरने नातूकडे confused नजरेने पाहिले.
बराच वेळ नातू बाहेरच बघत राहिला.
तो एव्हढा बाहेर काय बघतोय ते बघायला रेवाने नजर बाहेर वळवली.
ते दोघे बाहेर एव्हढे बघताहेत ह्यात काहि छुपा संदेश आहे कि काय असे वाटून ते बाहेर काय बघतायेत ते बघायला टायगर ने परत आपली दुर्बीण काढली.
बाहेर बघून डोळ्यांना उन्हाने तिरिप लागून वैतागून नातू परत आत बघायला लागला.
बाहेर बघण्याचा कंटाळा आल्यामूळे रेवा पण आत बघायला लागली.
तोपर्यंत हे खालचे दोघे जण परत काहीच बघत नव्हते हे लक्षात येऊन टायगरने उजव्या हाताची बंद मूठ महेश कोठारे स्टाईलमधे डाव्या हातवर आपटत 'damn it' म्हणत दुर्बीण आत टाकली.
आत टाकतान ती निसटली खाली पडली.
त्याचा झालेला गोंधळ पाहून रेवाला हसू आवरेना.

तिचे ते कातील हसणे ऐकून नातूच्या कानात गाणं वाजायला लागलं, ' हसते हसते कट जाये रस्ते रस्ते' ...

तिचे ते कातील हसणे ऐकून नातूच्या कानात गाणं वाजायला लागलं, ' हसते हसते कट जाये रस्ते रस्ते' ...
तेवढ्यात ट्रेनमध्ये कॅन्टीनवाला आला. त्याच्या वडा, समोसा असल्या पदार्थांमध्ये आप्पे चटणी ची पाकीट होती. भुकेने व्याकूळ नजरेने तिने नातूला विचारले "आप्पे खाऊ या"? तिची पर्स टेबलवरच विसरली असल्याने नातूला पैसे द्यावे लागणार हे उघड होत. पण नातूचा जीव सुखावला रेवाथी, रुक्साना असली कसलीही रूपे घेतली तरी हि खरी 'रेवा' - रव्याच्या अप्प्यावर जीव टाकणारी रेवा.
"अरे वा रेवा! तुलापण आप्पे आवडतात"? नातूचा प्रश्न तसा र्हेतोरिकच म्हणायचा. नातुने हसून आप्पे घेतले पण पाकीट उघडले आणि ते कठीण कडक आप्पे त्याला खाववेना! निमितच्या घरी एकदा रेवाने सर्वाना बोलावले होते. तेव्हा तिने केलेले लुसलुशीत मलई बर्फीसारखे आप्पे त्याला आठवले. वाटल कवी असतो तर तिच्या वर नाही तर निदान तिच्या अप्प्यांवर कविता केली असती. कविता हे फार भयंकर न झेपणार प्रकरण पण म्हणून काय कधी तिच्या अप्प्यांची तिच्यासमोर स्तुती करू नये?? नातू म्हणाला "रेवा, तू केलेले लुसलुशीत आप्पे आठवले, आणि पुन्हा ते खाण्यासाठी मी माझे प्राण पोटात साठवले" रेवा चित्कारली "अय्या, तू गझल करतोस" आता मात्र नातू चिडला, आपल्या गद्याला हिने गझल म्हणावे. पण दुसर्या क्षणी विझला, विरघळला - आपल्या गद्याला हिने गझल म्हणावे!!!! ह्यापेक्षा थलैवाकडे जास्त काय मागणे मागणार होता तो. टायगरला विसरून तो 'लिटरली सिली ही मेरी लव लाईफ' गुणगुणू लागला.....

वर छतावर दोनदा आवाज अन डॅम इट! चा चिरपरिचित आवाज ऐकल्यापासून रेवाला चैन पडत नव्हते. ती दोनदा खाकरली आणि एक आप्पा बाहेर हवेत उडवला. तो वर बसलेल्या टायगर ला इशारा होता. मग चटणीचे हात धुवायला बाथरूम मधे जाण्याचे निमित्त करून ती तिथून निघाली ट्रेन मधून मागच्या मागच्या डब्यात चालत शेवटचा मालगाडीसारखा सामानाचा डबा होता त्यात शिरली. तिथे सुक्या गवताचे भारे होते बरेच, त्यावर दिलखेचक पोझ घेऊन पहुडली अन टायगरची आतूरतेने वाट पाहू लागली..
दगडू तेलीने इकडे आपला फोन काढून ट्रेनमधली इत्थंभूत हकीकत नावेद भाईला कळवली. भाई रत्नागिरीऐवजी मंगलोर ला बोटीने पोहोचणार , तिथून दगडू तेलीच्या मोटारीच्या ताफ्याने दूधसागर धबधब्याच्या जवळच्या स्टेशनात येऊन छेनै एक्सप्रेस तिथून पकडणार असे ठरले!!

नातू अजून भंजाळलेला होता. पण भानावर येऊन तोही रेवाला शोधत निघाला.
टायगर उडी मारून डब्यात उतरला अन रेवाकडे भान विसरून पहातच राहिला! रेवाही आव्हान नजरेत साठवून त्याच्याच कडे पहात होती..
"फ्रूटसॅलड"
"फ्रूटसॅलड"!!
हा त्यांचा कोडवर्ड होता...... दोघेही भुकेल्या श्वापदाप्रमाणे एकमेकाच्या दिशेने धावले. त्याच वेळी नातू जवळ जवळ तिथे पोहोचतच होता....

दोघेही भुकेल्या श्वापदाप्रमाणे एकमेकाच्या दिशेने धावले. त्याच वेळी नातू जवळ जवळ तिथे पोहोचतच होता....

त्या दोघांनी डब्यात शिरलेल्या नातूला पाहिले.
डब्यात शिरलेल्या नातूने त्या दोघांना पाहिले.
नातू दात ओठ खात टायगरला बघत होता
टायगर 'अबे तू किस खेत कि मूली' अशा नजरेत नातूला बघत होता.
नातू लाळ गळत रेवाला बघत होता.
रेवा 'कबाबमधे हड्डी' types looks नातूला देत होती.
नातू टायगरला खाउ कि गिळू अशा नजरेने बघत होता.
टायगर रेवा ला 'खाउ कि गिळू' असा बघत होता.
fruit salad च्या घाईत आप्पे खायचे मिस केल्यामुळे पोटात खवळलेल्या आगीने रेवा नातूच्या हातातल्या आप्प्यांकडे 'खाउ कि गिळू' अशा नजरेने बघत होती.

and time froze ....

त्याच वेळी नातूचा शर्ट पाठून कोणी तरी खेचला. नातूने मागे वळून पाहिले तर
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
..
.
..
.
.
.
तर एक भिकारी त्याच्या शर्टाचे टोक खेचत होता. background ला दुसर्‍याने गाणे सुरू केले "शिरडी वाले साईबाबा"

नातूनं लगेच ते गाणं थांबवलं. गाण्याचे शब्द 'गलबला' वृत्तात बसत नसल्याने त्याला ते अजिबात आवडलं नाही. इतरांनी नजरनंच का होईना पण बरंच काही खाऊन घेतल्याने आता त्यांना झोपेची गरज आहे असं नातूला आतून वाटलं. त्यानं त्या भिकार्‍याला शिरडीवाले ऐवजी एखादी ताजी, फडकती गजलांगाई गाण्याची फर्माईश केली.

मात्र त्याच वेळी त्याला या नंबराची आठवण झाली आणि तो गझलेच्या तालावर सूर्यनमस्कार घालू लागला. शेजारच्या बाकड्यावरून एक नवसिक्सपॅक्स्कुलोत्पन्न तरूण त्याच्या सूर्यनमस्कारांकडे डोळ्यात तेल घालून बघत होता. त्या तरूणानं हातातली पॅरॅशुट ऑईलची बाटली बाजूला ठेवली आणि तो नातूच्या नमस्कारांकरता एक ते बारा आकडे म्हणायचं काम करू लागला.

रेवा ऊर्फ रुखसानाला आता शीतलची खूपच आठवण येऊ लागली. कारण तिनं आजची संध्याकाळची दोघींकरता पेडीक्युअरची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती. आपण नाही तर शीतलंनं तरी पेडीक्युअर करून घ्यावं म्हणून तिनं शीतलला फोन लावला .......

अचानक भिकार्‍याच्या झोळीतून फोन वाजू लागला. आँ? हा काय योगायोग? असं म्हणत असतानाच भिकार्‍यानं तो फोन बघितला आणि सुरू करून कानाला लावला.

"हाय आई!" शीतलच होती ती.

"शीतल??????? अगं तू भिकार्‍याच्या वेषात गाडीमध्ये गाणी का म्हणतीयेस?"

"एक्स्ट्रॉचा पॉकेटमनी मिळवायला. आता मला जास्ती पैसे मिळवायला लागणार आहेत." फोन बंद करून शीतलनं आईला सांगितलं.

"अगं कार्टे लाज नाही का वाटत तुला? आईवडील इथे काबाडकष्टानं स्मगलिंग करून पै पै जोडतायत आणि तुला हे असे भीकेचे डोहाळे???"

"अजून डोहाळे लागले नाहीयेत आई. उगाच नाही नाही ते बोलू नकोस. आत्ताशी कुठे दोन महिने पूर्ण होताहेत."

शीतलनं न.सि.पॅ.कु. तरूणाकडं लाजून एक चोरटा कटाक्ष टाकला. खरंतर ती आज त्याच्याबरोबर चैन्नईला पळून जाऊन लग्न करणार होती. कोणी ओळखू नये म्हणून तिनं भिकार्‍याचा वेष धारण केला होता. वातावरण निर्मितीकरता आणि नवीन संसारात तेवढाच तेलामीठाला आधार म्हणून ती गाणीही म्हणत होती. पण.......

शेवटी आईचा फोन आल्यावर सगळं विसरून तिनं फोनला उत्तर दिलं. भलेभले सांगून गेलेच आहेत की .... आईच्या ममतेपुढे आणि मागेही अनेक मैलांपर्यंत काही नसतं. शीतलला आज याचाच प्रत्यय आला होता.

शीतलचा फोन ठेवल्यावर रेवा उगीचच विचारात पडली.
आजवर मुलीला केलेले संस्कार कशी काय विसरू शकते? नाही... मी हे मुळीच होवु देणार नाही.

ह्या विचारातच असताना तिला आठवले की, शीतलचा जन्माबद्दलचे गुपित.
रेवा एकदम भूतकाळात गेली...
तो दिवसच तसा होता.. मुसळधार पाउस होता.. त्यावेळी आम्ही भाड्याच्या बंगलीत रहात होतो.. कामाचा जम बसला न्हवता. निमित कामानिमित्त खंड्याळ्याला गेला होता.
कामवालीनेही रोजच्यासारखीच दांडी मारली होती. वडा पाव खावून ती सुस्तावलेली होती. गुलाम अलीच्या गाण्याने एकदम वेगळाच मूड झाला होता आणि अचानक... दारावरची बेल वाजली...
पुर्ण चिंब भिजलेला,मजबूत शरीरयष्टीचा, पांढरा शर्ट घातलेला एक तरुण दारात उभा होता...
जरासे नीट न्याहाळले वर ती जवळ्जवळ किंचाळलीच... राज.. तू?
तरुणाने पण तीच प्रतिक्रिया दिली. रेवा? रेवाच ना तू?

माझी गाडी बंद पडली म्हणून मदत मिळते का बघत मी इथे आलो... इति राज.

पटकन त्याला आत घेवून रेवाने दार लावले. त्याला अंग पुसायला टॉवेल देता देता.. भिजलेल्या शर्टातून दिसणार्‍या सिक्स पॅक कडे तिचे लक्ष गेले.. ह्म्म्म.... बरा दिसतो आता. कॉलेजला असताना बराच वरण भात टाईप होता. दहा दहा वडा पाव खायचा... विचारातच ती खुदकन हसली.

थोड्याच वेळात रंगीत पाण्याबरोबर त्यांच्या कॉलेजच्या गप्पा रंगल्या. त्या दिवसाची परीणीती हि आजची शीतल होती... इतकी वर्षे निमितला ह्याचा पत्ता लागू दिला न्हवता. आणि हे सत्य कोणालाच कळले न्हवते. निदान असा तिचा समज होता. आणि इतक्यात विचारातून रेवा अचानक जागी झाली ती फोनच्या रींगने.

पलीकडून भयाण हास्याचा आवाज करत कोणीतरी म्हणाले, तुला काय वाटले हे सत्य कोणालाच कळणार नाही? मी कोण हे विचारण्याच्या आधी आजच्या आज तू कोकण रेल्वे पकडून मालवणला निघून ये...१ करोड घेवून.

रेवा घाबरली .. अहो पण तुम्ही कोण? आणि......

व्हॉट ?? रेवाला कळेचना.
मग पहिले तर टायगर तिच्याकडे बघून खो खो हसत आपला फोन बंद करत होता!!
दुष्ट ! भलत्या वेळी चेष्टा ! रेवाने हातातला फोन खिडकीबाहेर फेकला.
एव्हाना भिकारी उतरून गेले होते . नातू त्य्यांच्या मागे गुफ्तगू करायला पळाला.
"सो... व्हेर वेर वी " - टायगर त्याच्या डीप आवाजात म्हणाला ...
"ह्म, माझा पीछा सोडणार नाहीस तर तू"
" एक बार जो मैने कमिटमेन्ट कर दी तो मै अपने आप की भी नही सुनता"
" चल्ल वात्रट कुठला"
तेवढ्यात बाहेर दूधसागर धबधबा दिसू लागला होता. दोघांनाही तो माहोल पाहून खंडाळ्याची आठवण येऊ लागली.... गाडी हळू हळू स्लो डाउन झाली .....

टायगरला अशी भलत्या वेळी चेष्टा करायची सवयच होती. रेवाला आठवलं एकदा तिच्याकडून अतिशय मोठ्या क्लायंटच्या काही ट्रेड्स चुकीच्या बूक्सवर टाकल्या गेल्या होत्या. रेवा भयंकर घाबरली. ऑफिसमध्ये फार लोक नव्हते. मार्केट बंद झालेले त्यामुळे ट्रेडर्स सगळे घरी गेले होते. अचानक तिला टायगर उर्फ ट्रेडरच्या डेस्ककरून शीळ घातल्याचा आवाज आला. रेवाला धावतच टायगरच्या डेस्ककडे गेली. टायगर मात्र तिला बघून फारसा खूश दिसला नाही. तिची कहाणी ऐकल्यावर तर तो जोरात, 'ये क्या किया? You are fired' असं ओरडला. रेवा रडकुंडीस आली. खाली मान घालून ती वळली आणि त्याच त्या गडगडाटी हास्याने जोरात दचकली. टायगरने तिची मदत केली मात्र एका अटीवर. त्याने काही खास अकाउंटच्या ट्रेड्स एका विशिष्ठ बुकला ट्रान्सफर करण्यास रेवाला सांगितले. रेवा आपल्या कामात हुशार असली तरी ह्या खेळात मुरलेली नव्हती. टायगरने नेमके हेच हेरले. रेवा त्याच्या रुपावर, हुशारीवर आणि गडगडाटी हास्यावर भाळली होतीच. तिने मागचा पुढचा विचार न करता टायगर म्हणेल त्या ट्रेड्स त्याला हव्या तशा बुक्सवर ट्रान्सफर करून द्यायला सुरूवात केली. हा सगळा उद्योग टायगर कुणासाठी करत होता ह्याची भोळ्या रेवाला सुतराम कल्पना नव्हती. भाई आणि गँग टायगरला भरभक्कम मोबदला देत होती. त्याने रेवाला प्रेम आणि फसवणूकीच्या अनोख्या दुनियेत ओढले आणि रेवा खेचली गेली. आता टायगरला त्याच्या उद्योगांत मनपसंद साथी मिळाला होता. पण म्हणतात ना मांजर डोळे मिटून दूध प्यायले तरी इतरांना ते दिसतेच. फ्रॉड केल्या कारणावरून रेवा आणि टायगरची कंपनीतून हकालपट्टी झाली आणि मग सुरू झाला कधी न संपणारा पाठशिवणीचा खेळ.....

रेवथी आणि ट्रेडरची कंपनीतून हकालपट्टी झाली तरी भाई त्यांच्या हुशारीवर भयंकर खूश होता. त्याने रेवा आणि टायगरला आपल्या पंखांखाली घेतले. रेवा आणि ट्रेडर झाले रुखसाना आणि टायगर. रुखसानाने पुढे रुपं बदलली तरी टायगर आणि त्याचे गडगडाटी हास्य बदलले नाहीत. भाईच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक मिशन्स यशस्वी केली. प्रत्येकवेळी नवे ठिकाण, नवे फ्रॉड्स आणि नवे पोलिस. एक अपवाद वगळता त्यांना तुरुंगाची हवा लागण्याची वेळ आली नव्हती. त्याला कारण सुद्धा तसेच होते. तुरुंगातली ती एक रात्र त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी रात्र ठरली. देशद्रोहाच्या मार्गावरून देशसेवेच्या मार्गावर आणणारी ती रात्र. 'रॉ' संघटनेचे तेव्हाच्या चीफ सेक्रेटरी सिमरन वेदी त्या रात्री त्यांना येऊन भेटल्या. वाममार्गाला लागलेले तरुण रक्त योग्य वळणावर आणण्यासाठी एक प्रोजेक्ट त्यांनी सुरू केला होता. अनेक तासांच्या कौन्सिलिंगनंतर रेवा आणि टायगर रॉ तर्फे एजंट म्हणून काम करायला तयार झाले. मात्र हे काम त्यांना हुशारीने पडद्याआड राहून करायचे होते. भाई आणि गँगची पाळंमुळं खणून काढायचे काम प्रचंड खबरदारी घेऊन करायचे शिवधनुष्य त्यांनी पेलले होते. बदल्यात 'रॉ''ने त्यांची तुरुंगात 'न' जाण्याची सोय केली होती.

"सल्लाम वालेकुम रुखसाना भैन" भाईचा आवाज आणि रुखसाना नाव ऐकून भर दिवसा रेवा आणि टायगरच्या डोळ्यांसमोर तारे चमकले. एक क्षण आपण छेनै एक्प्रेसमध्ये आहोत की भाईच्या दुबईमधल्या आलीशान महालात हेच त्यांना कळेना. भाईसोबत सगळी गँग बघून त्यांना आनंद, आश्चर्य आणि भिती अशा संमिश्र भावनांनी घेरले आणि कानात गाणे वाजू लागले, 'ये कहां आ गये हम....'

गाडी हळू हळू स्लो डाउन होऊन थांबलीच .....
सतरा अँबेसिडर गाड्यांचा ताफा घेऊन नावेद भाई आणि गँग येऊन पोहोचली आणि गाडेत चढली पण होती!
पण गाडी थांबली त्याला कारणही तसेच होते !
गाडीच्या समोर रुळसमोर एक मोठा जनसमुदाय पांढर्‍या स्वच्छ सदरा- लुंगी अशा वेषात तलवारी , बंदुका इ. घेऊन उभा होता. त्यांच्या सगळ्यात पुढे स्वतः थलैवा हात वर करून ट्रेन ला थांब! असा इशारा देत उभे होते !! कपाळाला गंध , अंगात पांढरा सदरा, गळ्यात चेन,पांढरी लुंगी , कमरेला जाड चामड्याचा बेल्ट, डोळ्याला ङॉगल्स, हातात अंगठ्या असा थाट आहे थलैवाचा!! चेहरा कमालीचा सात्विक अन शांत ! गॉगल्स्च्या आडचे डोळे मात्र भयंकर भेदक! त्यामुळे तशीच वेळ आल्याशिवाय ते गॉगल्स काढत नाहीत!
रेवा आणि टायगर ने ते पाहून आपाप्सात नेत्रपल्लवी केली अन ते दोघे दोन फोनवर पलिकडे भराभर सूचना देऊ लागले. दिलीहून स्पेशल टास्क फोर्स तातडीने मागवावा लागणार होता.
इकडे भाईने त्याचे खास पंटर्स अन शार्प शूटर्स - शाणा सुलेमान अन छप्पन टिकली - दोघाना इशारा केला - दोघेही समजले की त्यांना काय करयाचेय ...!

रेवा आणि टायगर ने ते पाहून आपाप्सात नेत्रपल्लवी केली अन ते दोघे दोन फोनवर पलिकडे भराभर सूचना देऊ लागले. दिलीहून स्पेशल टास्क फोर्स तातडीने मागवावा लागणार होता.

दिल्लीच्या फोनवर केलेला कॉल reroute होऊन विक्रम सिंगपर्यंत आला. त्याने चढवलेल्या गॉगल्स मधे त्याला रेवाचा फोन नंबर दिसला. google glasses च्या हुशारीचे कौतुक करत त्याने तो कॉल घेतला. throat mike मूळे तो काय बोलतोय हे बाजूला उभ्या राहणार्‍याला सुद्धा ऐकायला येत नव्हते. RAW ने सुरू केलेल्या technology drive चा कमाल होता. विक्रम सिंघला आपले लंकेचमधले जुने दिवस आठवले. तिथे साधा सेल फोन पण नसल्यामूळे दर वेळी कोणालाहि फोन करायला public फोन पर्यंत धावयला लागायचे. अशा धामधुमीत माजी पंतप्रधानांपर्यंत वेळेत पोहोचू न शकल्यामूळे त्यांचा बॉम्ब्स्फोटांमधे हत्या झाली होती. तो सल विक्रमसिंगला अजून छळत होता. "अपने साफ दामन पे लगा हुआ बद्दा दाग" पुसून टाकायचा त्याचा हा शेवटचा प्रयत्न होता. दुबईच्या भाईला रंगे हाथ पकडून 'अपने खानदान का नाम उंचा" करण्याची त्याच्या आईची आखरी ख्वाईश त्याला पुरी करायची होती. ते काम होईतो मद्रास कॅफे मधे बसून आपल्या हातावर गोंदलेले 'मेरे बापने एक नमकूल को जना था' हे गोंदण काढायची त्याची तयारी नव्हती. मद्रास कॅफेमधे ते गोंदण बघून कळवळलेल्या रेवाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर चमकला. आपल्या नव्या रुपात रेवा आपल्याला ओळखणे शक्य नाही ह्या विचाराने डोळ्यात पाणी आले. ते अश्रू पुसून काढायला त्याने डोळ्यांवरचा गॉगल काढला.

चेन्नई express मधून खाली उतरलेले रेवा नि टायगर समोर कोण आहे ते बघत होते. तेव्हढ्यात थलैवा ने आपला गॉगल काढला नि गॉगलच्या पाठी लपलेला चेहरा बघून रेवा बेशुद्ध झाली.

टायगर मात्र पुटपुटत होता "गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा"

रेवा बेशुद्ध झाली आणि टायगर ने लगेच पायातील चप्पल तिच्या नाकाजवळ धरली. शाना सुलेमानला मात्र मनापासून वाटले की तिला अप्पा हुंगायला द्यायला हवा. थलैवा रेवाला अनिमिया झालाय का काय ह्या विचारात पडला. भाईगिरीच्या धंद्यातही वैद्यकीय विमा द्यायला हवा असे हल्ली त्याला वारंवार वाटू लागले होते. रेवाच्या गालावर थपडा मारूनही ती शुद्धीत येत नाही हे पाहून टायगर आधी ओरडला "फ्रुटसलाड" मग तिच्या कानात पुटपुटला "फ्रुटसलाड" आणि मग मात्र धाय मोकलून रडू लागला "फ्रुट...फ्रुट..." त्याचा आक्रोश नातू पर्यंत पोहोचला.

टायगर नातूच्या गळ्यात "फ्रुटसलाड" "फ्रुटसलाड" म्हणत पडतोय हे बघून थलैवा उर्फ विक्रम सिंघ, शाना सुलेमान, भाई चे डोळे पांढरे व्हायची वेळ आली.
भाई नकळत बोलून गेला "भगवान येह क्या हो रहा है ? भगवान उठाले रे, मुझको नही, इनको "
त्याचे शब्द ऐकून रेवा खाडकन जागी झाली नि तिच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले "मै कहां हू ?"
तेव्हढ्यात तिचे लक्ष समोर नातूच्या गळ्यात पडलेल्या टायगरकडे गेले नि "क्या अब यही दिन देखना बाकी था" म्हणत परत बेशुद्ध झाली.

विक्रम सिंघने मात्र माबोच्या अ‍ॅडमिनला पण मात देईल एव्हढ्या स्थितप्रज्ञपणे आपल्या google glass मधल्या music player वर "मा का लाडला बिगड गया" सुरू केले.

रेवा ज्याला पाहून बेहोष झाली तो दुसरा तिसरा कोणी नसून निमितच होता.
बेशुद्ध पडायला कारणही तसच होतं. शीतलला भावंड येणार होतं.
रेवाने विचार केला की बरी आहे उतरवयाची काठी.
आता हे दगदगीच आयुष्य पुरे झालं. दुधसागरच्या रम्य परिसरात एक छान घर बांधुन रहावं..
तिचा निर्णय झाला होता.
फक्त हा घोळ निस्तरून तो अमलात कसा आणणार हाच एक प्रश्न उरला होता...

LOL!

ह्या रेवाला काय करून टाकलंय कथेत .. Lol

कोण नक्की कोण आहे हे काही मला लक्षातच येत नाहीये ..

निमित = थलैवा = विक्रमसिंघ?

ट्रेडर = टायगर

(कोणीतरी) = नातू

सिक्स् पॅक = शीतल चा बॉयफ्रेण्ड

शीतल = भिकारी

रेवा = रुख्साना = सबकी गर्लफ्रेण्ड Biggrin

निमित = थलैवा = विक्रमसिंघ?
>>>> हे चूक आहे Happy
शेवट कुठे आहे?!

नमस्कार संयोजक व इतर सर्व प्रतिसादक! सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy

मला संयोजकांनी कथा लिहिण्यास सांगितले व सूतकताईच्या यापूर्वीच्या काही धाग्यांच्या लिंक्स माहितीसाठी म्हणून विरोपातून पाठवल्या. माझ्याकडून त्या लिंक्स घाईघाईत तपासल्या गेल्या, किंबहुना नीटश्या तपासल्या गेल्या नाहीत. माझा असा समज झाला की साधारण पन्नास टक्के कथा मी लिहायची व समर्पक शेवट रंगवत रंगवत इतर प्रतिसादकांनी लिहायचा. असा समज होण्यामागचे कारण होते गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवात मामींनी मला एक कथा लिहिण्यास सांगितले असताना मी लिहिलेली कथा व त्यावर इतरांनी लिहिलेले कथेचे उर्वरीत भाग!

मात्र हा धागा काल नीट वाचला तेव्हा मुद्दा लक्षात आला. मुळात अशी कथा लिहिण्यामागे पुढील भाग लिहिणार्‍यांना मजा करता यावी असा उद्देश अभिप्रेत आहे हे माहीत नव्हते. किंवा, नीरस कथा असल्यास निदान लोकांना पुढे तरी मजा करता यावी असा उद्देश असेल याची कल्पना नव्हती. त्यामुळे मी प्रथम चकीत झालो होतो. नंतर काही प्रतिसादांमधून लक्षात आले की सार्वत्रिक समज हा असा असा आहे.

हे समजल्यानंतर मी सर्वांचे प्रतिसाद अतिशय एन्जॉय केले. माझी स्वयंघोषित मैत्रीण हह यांची कोणतीही कमेंट मी नेहमीच एन्जॉय करतो, पण इतरांनीही एकुणच धमाल केलेली आहे. Happy

जरा आधी लक्षात आले असते तर मीही माझ्यापरीने बरेच पोटेन्शिअल असलेले नाट्य रंगवले असते. Happy

सिंडरेलांनी लिहिलेला गोषवारा अजून वाचायचा राहिलेला आहे. पण धमाल येत आहे. बाकी कथा सुरू ठेवणे, बंद करणे या नियमांची काही माहिती नसल्याने त्याबाबत माझे स्वतःचे असे काहीच मत नाही.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

रेवाला पुन्हा चक्कर येते.. चक्कर आलेली रेवा कुणाच्या तरी पाया(वर) पडते.
पहाते तो काय! चक्क गणपती! तो म्हणतो, बाई काय झालं ? सगली ईष्टोरी ऐकल्यावर तो म्हणतो, " बाई, यु डिजर्व अ ब्रेक आणि धिस स्टोरी डिजर्वज एन्ड "

आता देवाजीच्या मनात आल्यावर काय! कायबी घडू शकतं.

आता गणपती तिथं कसा येतो? कसा काय - तसाही तो सगळीकडे असतो... आणि त्यात वर उत्सव चाललाय...
गणपती तिलाच का दिसतो? ईष्टोरी संपावी असं त्यालाबी वाटतं !

मग काय ही साठा उत्तराची कहाणी एक शे वीस उत्तरी सफळ संपूर्ण होते... :p

नानबा,
शेवट आवडला.
डिझर्व अ ब्रेक म्हटल्यामुळे 'आर एन के - सिझन २' येण्यास स्कोपही आहे.
फक्त यात निमित्त आला नाही.
म्हणून अजून थोडासा बदलला तर बरे होईल.

मला संयोजकांनी कथा लिहिण्यास सांगितले व सूतकताईच्या यापूर्वीच्या काही धाग्यांच्या लिंक्स माहितीसाठी म्हणून विरोपातून पाठवल्या. माझ्याकडून त्या लिंक्स घाईघाईत तपासल्या गेल्या, किंबहुना नीटश्या तपासल्या गेल्या नाहीत. माझा असा समज झाला की साधारण पन्नास टक्के कथा मी लिहायची व समर्पक शेवट रंगवत रंगवत इतर प्रतिसादकांनी लिहायचा. असा समज होण्यामागचे कारण होते गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवात मामींनी मला एक कथा लिहिण्यास सांगितले असताना मी लिहिलेली कथा व त्यावर इतरांनी लिहिलेले कथेचे उर्वरीत भाग!

>>> बेफीकीर, त्यावेळची कथा ही 'शेवट सुचवा' करता होती. त्यामुळे ऑलमोस्ट सगळी कथा लिहिण्याची गरज होती. इथे फक्त सुरवात करून मग सोडून देण्याची गरज होती.

आणि गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवात नव्हे तर २०११ च्या गणेशोत्सवात. Happy

जो भी हो, सुमारे दीड दिवस इथे जाम धमाल आली - बेफींना धन्यवाद द्यायला हरकत नाही मूळ कथेबद्दल! Happy
कालचा गोंधळ झाला नसता तर अजून मज्जा आली असती. या कथेचे काय काय सॉल्लिड झाले असते पुढे. आत्ता कुठे पात्रे एस्टॅब्लिश झाली होती तेवढ्यात दी एन्ड झाला !

>>इथे फक्त सुरवात करून मग सोडून देण्याची गरज होती
मग बेफिंची समजण्यात चूक झाली तरी संयोजकांना ती गोष्ट वाचल्यावर लक्षात यायला नको का? मग बदलून घ्यायची.

मग बेफिंची समजण्यात चूक झाली तरी संयोजकांना ती गोष्ट वाचल्यावर लक्षात यायला नको का? >>> अर्थात. यात बेफींची काही चुक नाही. संयोजक मंडळानं योग्य सुचना आणि नंतरही योग्य तिथे एडिटिंग करून टाकली असती तरी चाललं असतं.

बेफी तुम्ही मनाला लावून घेऊ नका हो! Happy

आता बेफिंनी परवानगी दिलीच आहे तर मी पण हात टायपुन घेते.
_______________________________________
रेवाने विचार केला की बरी आहे उतरवयाची काठी.
आता हे दगदगीच आयुष्य पुरे झालं. दुधसागरच्या रम्य परिसरात एक छान घर बांधुन रहावं..
तिचा निर्णय झाला होता.
फक्त हा घोळ निस्तरून तो अमलात कसा आणणार हाच एक प्रश्न उरला होता...
>>>>>

इतक्यात एक झकास कल्पना रेवाला सुचली..
तिने टायगरला टायगर बाम आणायला पटकन बाहेर पाठवले.
निमित लगेच म्हणाला "अरे रेवा वारेवा! बाम लावायला टायगर कशाला हवा?"
"निमित ते फक्त निमित्त होते टायगरला इथुन दुर करायचे"रेवा धुर्तपणे म्हणाली.
नातु ना तु जाने न मै च्या धुनवर अजुन थलैवा डान्स करत होते.
इथुन पळुन जाउन दुधसागरला स्थाइक होण्याचा प्लॅन तिने शीतल आणि थलैवाच्या कानावर घातला.
इतके दिवस आपण ज्याला निमित समजत होतो तो रजनीकांत आहे हा धक्का तिला पचवायला कठीणच होता पण हा धक्का तिने पचविला हे पचवायला रजनीकांतला पण कठीणच गेले.
शीतल मात्र हा धक्का पचवु शकली नाही . तिकडच्या चहावाल्या पोर्याला तिने नाव विचारले. तो म्हणाला "धनुष!" यावर शीतल म्हणाली "आता मी आई बाबांबरोबर राहु शकत नाही. हिंमत असेल तर इथेच माझ्या डोक्यात दो चुटकी सिंदुर भर"
"व्हाय धिस कोलावरी कोलावरी डी " धनुष आनंदाने ओरडला!
नातु म्हणाला "थांब धनुष शुर लोक आपल्या पत्नीची मांग कुंकवाने नाही तर रक्ताने भरतात." याबरोबर लोलाने चाकु धनुषकडे सरकावला आणि "गेम ऑफ थ्रोन्स - रेड वेडिंग" पाहुन प्रॅक्टिस केलेल्या धनुषने नातुचे डोके नारळासार्खे उडवले आणि त्या रक्तानेच शीतलची मांग भरुन तो चाकु बेशुद्ध भाइच्या हातात ठेवला.
इथे टायगर (सल्लु) परत आला, शीतल आणि रेवा दोघी हातच्या गेलेल्या पाहुन तो एकदम निराश झाला आणि निराशेच्या गर्तेत त्याने विदाउट लायसन्स चाकु बाळगल्याबद्दल (संजय) भाईला टाडाखाली अटक करुन टाकली.

रजनीकांत इथे रेवाला म्हणाला "कौनो दुधसागर जानेकी जरुरत नही है. रजनीकांतने विश केले तर चेन्नै एक्स्प्रेस दुधसागरलाच संपते. सुबे सुबे सुबु आयेगा तो उसे बता देना की ये घर आजसे निमित और रेवा का हो गया"
अशा रितीने धनुश आणि शीतल (आता ऐश्वर्या) यांना सुखी संसाराचा आशिर्वाद देउन रेवा आणि रजनीकांत कायमचे दुधसागरला स्थाइक झाले.
रजनीकांतने पण रेवाची माफी मागितली चक्क मराठीत तो म्हणाला "मला माहित आहे रेवा माझी मते मी तुझ्यावर लादतो म्हणुन हे सर्व झाले. काय करु स्वभावच पडला माझा, कोणताही उदात्त हेतु न बाळगता मी विक्रमसिंघ बनुन "लंकेतल्या सोन्याच्य वीटांची तस्करी" पकडुन दिली तेंव्हा काहीजण असेच निराश झाले होते. पण चिन आणि बंगालहुन काहीजणांनी कोणत्याही गोष्टीमागे उदात्त हेतु असलाच पाहिजे असे नाही असे सांगितल्याने थोडा धीर पण आला. आपलीच गोष्ट बघ इथे आहे काही उदात्त हेतु? वर वर गोड वाटणारी मायबोली अशीच पायाखाली जळते ग!
असो सिमांतीनी, मैत्रेयी, ओबामा, पुटीन, असाद या सर्वांनी माझी कालच कानउघाडणी केली.
'रजनीकांत कॅन नॉट थिंक ही इझ एक्सेपशनल ओनली अमेरिकन्स आणि झक्की कॅन' पुटीन पुटपुटला. आता गणेशन कृपेने शिवाजीच्या हातुन ही चुक पुन्हा होणे नाही."
(समाप्त)

>>"व्हाय धिस कोलावरी कोलावरी डी "

नशीब... संपलं..!
[बेफिकीर, पुढच्या वर्षी कुठली कथा पाठवताय यांच्या तावडीत...?];)

Pages