मायबोली गणेशोत्सव २०१३: उपक्रम एस टी वाय : कथा १. रेवाचा निर्णय काय?

Submitted by संयोजक on 31 August, 2013 - 08:28

एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने एखादी गोष्टं थोडी थोडी पुरी करावी.
एकेक सीन देत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------

STY2.jpg

लेखकः बेफिकीर

कथा: रेवाचा निर्णय काय?

रेवाच्या डोळ्यातून उतरत असलेली चमक निमितच्या वाक्याने पुन्हा झगमगू लागली. निमित स्वतःचे आवरताना स्वतःच्या आवरण्यापेक्षा रेवाच्या आवरण्याकडे अधिक लक्षपूर्वक पाहात होता. रेवाचे जवळपास होतच आलेले होते. मात्र तिने शेवटचे आरश्यात पाहिले तेव्हा निमितही तिच्यामागे उभा होता आणि त्याने आरश्यात रेवाचे डोळे पाहिले आणि व्यावसायिक कळकळ देहबोलीत ओतून रेवाला म्हणाला...

"यू शूड बी लूकिंग चीअरफुल, अ‍ॅज इफ यू नो?... यू आर सो हॅपी टू बी इन द ग्रूप"

रेवाने आरश्यातूनच किंचित उदासपणे निमितच्या त्या आग्रही चेहर्‍याकडे पाहिले आणि पुन्हा एक हलकासा ब्रश अप करत अचानक तिने स्वतःच्याच प्रतिमेकडे उत्फुल्लपणे पाहिले.

"दॅट्स इट रेवा... देअर यू आर"

निमितचा उत्साह आता शिगेला पोचला होता. रेवा त्याला याक्षणी जशी दिसायला हवी होती तशी दिसत होती.

टेक्नोझोन ईन्डियाचे टेक्निकल डायरेक्टर सुब्बी, त्यांची पत्नी उर्मिला, टेक्नोझोनचाच सप्लाय चेन चीफ अरोरा आणि डिझाईनचा सर्वेसर्वा नातू या चौघांना डिनरचे प्रपोजल देणे हे भल्याभल्यांना जमू शकले नसते. निमितने घाबरत घाबरत खडा टाकला आणि सगळे चक्क तयार झाले. या तयार होण्यामागे निमितच्या मितवा अ‍ॅन्सिलरीजचे उत्पादन सर्व तांत्रिक निकषांवर अगदी हवे तसे उतरणे हे कारण होते. तांत्रिकदृष्ट्याच जर काही कमतरता असत्या, तर अरोराने निमितचा एस एम एस सुद्धा वाचला नसता. अरोराला डिनर मान्य झाले नसते तर सुब्बींचा सेक्रेटरीही निमितला भेटला नसता. आणि सुब्बी आणि अरोराच्या पुढे जाण्याची नातूची पोझिशनच नव्हती.

मितवा अ‍ॅन्सिलरीज! निमित मधील 'मित' आणि रेवामधील 'वा' असे ते नांव तयार झाले होते. व्यावसायिक यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करणार्‍या मितवाचा होल अ‍ॅन्ड सोल निमित हा पंचेचाळिशीचा, गोरा पान, पोट सुटलेला, बेढब आणि अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि साहस यांचा संगम असलेला माणूस होता. जे उद्दिष्ट आहे ते गाठण्यासाठी ज्या ज्या प्रकारचे प्रयत्न करणे आवश्यक आणि शक्य आहे त्यातील एकही करणे तो बाकी सोडायचा नाही. चोवीस तास व्यवसायाचे भूत मानगुटीवर बसलेला निमित एक माणूस म्हणून यांत्रिक झाला होता. यंत्रमानव, जो ठरवेल ते करतो, ते करण्यासाठी जे आवश्यक वाटेल ते करतो.

सुब्बींची मिसेस त्यांच्याबरोबर नसती तर आज निमित कोणाबरोबर डिनरला आहे हेही रेवाला माहीत झाले नसते. फक्त तो रोजच्याप्रमाणे एक ते दीड वाजता येईल आणि आपला एखादा नोकर दार उघडून त्याला आत घेईल आणि मग निमित झोपून जाईल इतकेच तिला माहीत असते. पण आज तो घरी आला तेच मुळी पावणे सातला आणि म्हणाला...

"रेवा, तुझ्याकडे पंचेचाळीस मिनिटे आहेत... रीजन्सीच्या सिक्स्थ फ्लोअरला डिनर आहे... सुपर हायक्लास ग्रूप आहे.. यू शूड लूक यूअर बेस्ट सो फार इन द लाईफ.. त्यात एकांची मिसेसही आहे.. सो यू कूड बी फ्रेंडली विथ हर... कॅरी सम फ्लॉवर्स विथ यू फॉर हर... आय अ‍ॅम टेलिंग यू... यू शूड लूक सिंपली स्टनिंग..."

एक बाहुली! जी त्याक्षणी दिवसभरच्या ड्रेसमध्ये होती. कोणत्यातरी कारणाने आज तिला नवर्‍याची साथसंगत मिळणार हेही तिच्यासाठी जरा वेगळे होते. ती इतकी काही भोळसट नव्हती की तेवढ्यावर समाधानी होईल, पण काहीच नाही तर निदान ते तरी! तिने ठरवले. हा आपल्याला सादर करणार! लोक आपल्याला बघणार! आपल्याला बघून निमितकडे असूयेने बघणार! मग आपल्याशी मैत्रीपूर्ण बोलू लागणार! आपल्याकडून अशी अपेक्षा असणार की आपण त्या लोकांना खेळवावे! त्यांना आपल्या विचारांचा तळ गाठता येऊ नये. या स्त्रीशी नेमकी किती घट्ट मैत्री होऊ शकेल याचा अंदाज बांधता येऊ नये. हे सगळे असेच होणार असेल, तर आज निमितसकट सगळ्यांनाच शॉक देऊ!

रेवा! चव्वेचाळिसाव्या मिनिटाला ती सिव्हिकमध्ये बसली तेव्हा निमित क्षणभर थांबला आणि तिच्याकडे बघत तारीफ करणार्‍या चेहर्‍याने हासत म्हणाला...

"रेवा... आय कान्ट बिलीव्ह.. तू अजूनही तितकीच सुंदर दिसतेस... आय.. आय लव्ह यू"

'आय लव्ह यू'! रेवाला ते शब्द ऐकू जरी असेच आलेले असले तरीही त्या शब्दांचा जो अर्थ तिच्या मनात पोचला तो असा होता...

'धन्यवाद तू सुंदर दिसत असल्याबद्दल! आज नक्की पब्लिक भाळणार तुझ्यावर'!

पण रेवामधील खूप जुनी झालेली कोणतीतरी एक निरागस नवयौवना मात्र त्यातही थोडीशी सुखावली, यामुळे, की ती आजही तितकीच सुंदर दिसते हे तितक्याच जुन्या झालेल्या तिच्या नवर्‍याला मान्य आहे. इतकेच नाही तर स्वीट सिक्स्टीन असलेली आपली मुलगी शीतल आणि आपण रस्त्यातून जात असताना लोक आपल्याचकडे पाहतात हेही रेवाला आठवले. सिव्हिकमध्ये रेवाच्या केसातील आणि हातातील मोगर्‍याचा गंध भरून उरला तेव्हा निमितचे मन रीजन्सीच्या सहाव्या मजल्यावर पोचलेदेखील होते.

रीजन्सीच्या पोर्चमध्ये मात्र वेगळेच समजले. सुब्बी, अरोरा आणि नातू एकाच गाडीतून उतरले. मिसेस सुब्बी दिसतच नव्हत्या. निमितने सगळ्यांशी रेवाची ओळख करून दिली. रेवाने सुब्बींना विचारले..

"मिसेस सुब्बी?"

"ओह शी हॅड सम क्लब मीटिंग अ‍ॅन्ड ऑल... लास्ट मिनिट चेंज.. सो सॉरी". सुब्बींनि दिलगीरी व्यक्त केली.

निमित म्हणाला...

"नो इश्यूज... बट शी मस्ट कम द नेक्स्ट टाईम सर"

"ओह श्योर"

"प्लीज"...

दाराकडे हात दाखवत निमितने सगळ्यांना एलेव्हेटरकडे गाईड केले. सगळ्यांच्या मागून चालताना अचानक निमित रेवाच्या कानात पुटपुटला..

"टेक्निकली वुई आर थ्रू... सो सुब्बी अ‍ॅन्ड नातू आर ऑलरेडी विथ अस रेवा.. वुई ओन्ली नीड टू टेक केअर ऑफ अरोरा... ओके?"

"हं"

रेवाला कश्यातच स्वारस्य नव्हते. मिसेस सुब्बी न आल्याने हातातील मोगर्‍याचा गजरा तिने नुसताच बाळगला.

सहाव्या मजल्यावरून शहर झगमगीत दिसत होते. एका अतिशय जाणीवपूर्वक निवडलेल्या टेबलभोवती सगळे स्थानापन्न झाले तेव्हा सुब्बी रेवाकडे बघत म्हणाले...

"आय अ‍ॅम सो सॉरी... आमच्या रुक्ष गप्पा तुम्हाला आता ऐकत बसाव्या लागणार... मी आधीच कळवायला हवे होते की विद्या येत नाही आहे म्हणून..."

रेवाने तोंडभर हासत उत्तर दिले...

"छे छे?... त्यात काय इतके? पण पुढच्यावेळी नक्की आणा त्यांना..."

"नक्की नक्की"

त्यानंतर ऑर्डर प्लेस होण्याचा कार्यक्रम झाला आणि मग रेवा ही एकटीच स्त्री असल्याने आणि तिला कंफर्टेबल वाटणे मस्ट असल्याने सुब्बींनी रेवाशी जुजबी चर्चा केली. रेवा एरवी काय करते, तिच्या हॉबीज काय, त्यांची मिसेस काय करते वगैरे चर्चा झाल्यावर आपसूकच बिझिनेसशी संबंधित गप्पा सुरू झाल्या.

तांत्रिकदृष्ट्या मितवा थ्रू असल्यामुळे सुब्बी आणि नातूला काहीच डिस्कस करायचे नव्हते. मात्र सुब्बी निमितशी आंतरराष्ट्रीय व्यापार, शेअर्स, मंदी, विकास असल्या विषयांवर बोलत असताना त्यात व्यत्यय आणून बिझिनेस डिस्कस करणे हे अरोराच्या दृष्टीने प्रोटोकॉलच्या विरुद्ध होते. काही झाले तरी सुब्बी खूपच वरिष्ठ होते. सुब्बी आणि निमितच्या गप्पा सुरू असताना अरोरा त्यांच्या गप्पात ब्रीफली सहभागी होत होता. रेवा मात्र त्या गप्पात काडीचाही इंटरेस्ट नसूनही फक्त त्यातच इंटरेस्ट असल्यासारखे आविर्भाव चेहर्‍यावर आणत होती. सुब्बींच्या दृष्टीने रेवाचे आता मीटिंगमध्ये काहीच काम नव्हते, पण ती एका बिझिनेस असोसिएटची पत्नी असल्याने तिच्याप्रती योग्य तो आदरभाव राखणे इतकेच ते आपले कर्तव्य समजत होते. अरोराला रेवामध्ये काहीही दिलचस्पी नव्हती कारण त्याच्यामते त्या बिझिनेस डिनरमध्ये ती असण्याचेच कारण नव्हते. नातू मात्र रेवाला पाहिल्यापासून किंचित गढूळला होता आणि रेवाला ते जाणवलेले होते. त्यामुळे नातूकडे ती जवळपास बघतच नव्हती. काही बोललीच तर ती अरोराशी बोलत होती.

अर्ध्या पाऊण तासाने गप्पांचा ओघ निमितने अलगदपणे मितवाच्या काँट्रॅक्टकडे वळवला तेव्हा वेटर सूप आणि कॉकटेल्सचे बोल्स आणि ग्लासेस क्लीअर करत होता. आता निघालेल्या विषयासंबंधात सुब्बींनी फक्त नातूला 'होप द प्रॉडक्ट इज क्लीअर?' असे विचारले आणि नातूने घाईघाईने 'येस सर' असे म्हणून हासत निमित आणि रेवाकडे पाहिले. रेवाने नातूची कीव केल्याप्रमाणे एक स्माईल फेकले.

आता खरी रंगत चढली गप्पांना! कारण आता सप्लाय चेनचा दादा अरोरा आणि मितवाचा ओनर निमित यांची जुंपणार होती. अरोराने इराक युद्ध, चायनातील स्टील रिक्वायरमेन्ट आणि ऑटोमोटिव्ह सेक्टरमधील जागतिक मंदी हे विषय आत्ता का काढलेले असावेत याची निमितला पूर्ण जाणीव होती. या विषयांकडून तो शेवटी प्राईस रिडक्शनवर येणार यात शंका नव्हती. एकमेकांना जोखत दोघे वरवर स्टायलिश वाटणार्‍या पण छुपे निगोसिएशन असलेल्या गप्पा मारत होते. सुब्बींना हे सगळे समजत होते, पण नातूच्या डोक्यावरून जात होते. रेवा हुषार होती. कोणत्या क्षणापर्यंत अरोराच्या बाजूने असल्यासारखे दाखवायचे आणि कोणत्यावेळी कोणाचातरी फोन आला असे दाखवून काही काळ लांब जायचे हे ती अनुभवाने शिकलेली होती. पण ती वेळ लवकर येत नव्हती. रेवा वैतागत होती. आजवरच्या अनुभवानुसार मेन कोर्स सर्व्ह होतो तेव्हा कमर्शिअल्स थ्रू झालेली असतात हे तिला माहीत होते. पण इथे तर मेन कोर्सही संपत आलेला होता.

आणि अचानक अरोरा आणि निमितच्या गप्पा चालू असताना सुब्बींनी काहीतरी लक्षात आल्याप्रमाणे रेवाकडे एकदम बघत विचारले...

"सॉरी... मगाशी तुम्ही काय म्हणालात? ... यू हॅव डन बिझिनेस अ‍ॅनलिस्ट्स डिप्लोमा फ्रॉम ओ आर?"

रेवा हबकली. तिच्या अंदाजाने गप्पांच्या सिक्वेन्समध्ये हा प्रश्न, तोही आत्ता, निघणेच शक्य नव्हते. अरोरा आणि निमित आता अक्षरशः बुद्धिमत्तेचा संपूर्ण कस लावून एकमेकांच्या अनुभवाला भिडत होते. मात्र सुब्बींनी विचारलेल्या या प्रश्नामुळे अर्थातच त्यांची ती चर्चा एकदम थांबलीच. हबकलेल्या रेवाने क्षणभर निमितकडे ओझरते पाहात आत्मविश्वासाने सुब्बींना उत्तर दिले..

"येस सर... आय हॅव डन इट"

"अरे देन व्हाय डोन्ट यू जॉईन अस इन एम आय एस? द पोझिशन इज अल्सो गूड... पॅकेज इज एक्सलंट..."

पोटात दचकून खड्डा पडलेला असताना अचानक सुखद कारंजी उडू लागावीत तसा रेवाच्या पोटातून आनंद ओसंडत तिच्या चेहर्‍यावर सांडला. डोळ्यांमधून तो उघडपणे व्यक्त होत असतानाच तोंडाने मात्र ती म्हणाली...

"आय मीन... आय मीन.. आय डोन्ट नो..."

चुटपुटत निमितकडे बघत ती पुन्हा सुब्बींकडे पाहू लागली. सुब्बींनी एका कोट्याधीशाच्या पत्नीला अ‍ॅक्रॉस द टेबल एका अतिशय रेप्यूटेड कंपनीतील उत्तम जागेवरील नोकरीची ऑफर देऊ केली होती. तीही तिच्या नवर्‍यासमोरच! क्षणाच्या एक लाखाव्या भागात निमितमधील बिझिनेसमन जागा झालस होता आणि रेवाला पुढचे काही सुचायच्या आत म्हणाला होता...

"बाय ऑल मीन्स! वुई बोथ वूड बी ऑनर्ड"

निमितचा डाव सरळ होता. ज्या कंपनीत बायकोच नोकरी करेल, तेही एम आय एस सारख्या इन्फर्मेशनच्या समुद्रात बुडून, तिथे बस्तान बसवणे त्याला अत्यंत सोपे जाणार होते. त्याने रेवाला काही चॉईसच विचारलेला नव्हता. सुब्बी फक्त म्हणाले...

"प्लीज इमेल यूअर सी व्ही अ‍ॅन्ड ऑल... अ‍ॅन्ड मे बी.. देअर आर सम फॉर्मॅलिटीज.. दॅट्स इट"

त्यांच्यासारख्या कंपनीला कोणीही उमेदवार मिळाला असता. त्यांनी ती ऑफर रेवालाच का केली होती? हा प्रश्न ते सोडून सगळ्यांच्या मनात आलेला होता. तो जाणवताच सुब्बी म्हणाले...

"कॉस्ट सेव्हिंग... यू नो मिस्टर निमित?... इफ आय हॅव टू सोर्स अ कँडिडेट फ्रॉम द जॉब मार्केट... आय हॅव टू पे... "

जोरजोरात हासत निमित म्हणाला...

"सो आय हॅव ऑलरेडी गिव्हन द डिस्काऊंट"

यावर मात्र अरोराही हासला. सुब्बी आणि अरोरांचे हासणे निर्मळ होते. नातूच्या हासण्यात 'रेवा आता रोज दिसणार' याचा आनंद झळकत होता. रेवाला कोणीच काही विचारले नव्हते.

अरोरा आणि निमितच्या पुढच्या डिस्कशनमधील वाक्ये रेवाच्या कानांवर आदळत राहिली. पण अर्थ मनापाशी पोहोचू शकला नाही.

रेवासमोर अनेक प्रश्न होते. फक्त नोकरी करावी की नाही इतकाच प्रश्न नव्हता. ही नोकरी करून किंवा न करून आपण आपल्या आयुष्यात नेमके काय काय हवे ते घडवून आणू शकतो अशी बरीच मोठी यादी होती मुद्यांची!

रेवासमोरचे प्रश्न असे होते:

- नोकरी करावी की करू नये

- केली तर आपल्यातील एक उच्चशिक्षित व्यक्ती योग्य त्या वळणावर आपले आयुष्य नेऊ शकेल का?

- केली तर शीतलला या वयात आईची अधिक गरज असताना आपले नोकरी करणे तिच्यासाठी काही प्रमाणात घातक ठरेल का?

- निमित आपल्या नोकरीमार्फत माहिती काढून स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करेल हे आपल्याला सहन होईल का?

- आपण नोकरी नाही केली तर आपण आयुष्यात नेमक्या कोण बनून राहू?

- ही नोकरी करण्यास निमित मान्यता देत आहे तर मग कोणतीही इतर चांगली नोकरी करण्यासही त्याने मान्यता का देऊ नये?

- आजवर निमितच्या मनात आपल्याबद्दल असा विचार का आला नाही?

- सुब्बींचा आणि त्यांच्या कंपनीचा माणूस शोधण्याचा खर्च वाचवण्याचा फायदा आपण का करून द्यावा?

- ही संधी समोर येईपर्यंत आपण कधीच असा विचार गांभीर्याने का केलेला नव्हता?

- निमितचे आणि आपले यापुढील नाते, नोकरी केली तर कसे असेल आणि नाही केली तर कसे असेल?

- आपण नेहमी निमितचा विचार का करायचा? त्याने आपला विचार नक्की किती वेळा केला आजवर?

- आपल्याला आर्थिक गरज नसताना आपण नोकरीत डोके का शिणवून घ्यायचे?

- आपण कधीकाळी केलेला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आज इतका महत्वाचा का ठरावा?

- ही ऑफर आहे की इतरच काही?

- अशी ऑफर मिळेल यासाठीच हे डिनर आयोजीत करावे असा निमितचा तर प्लॅन नसेल?

- ही ऑफर हा बिझिनेस डीलचा तर एक भाग नसेल? सुब्बी आणि अरोरा यांनी निमितला इंप्रेस करण्याचा?

- माझ्याबाबतीत इतरजण निर्णय घेतात हे मला का मान्य व्हावे? भले निर्णय योग्य असेल तरीही?

- एकदा बाहेरच्या जगात कर्तृत्व दाखवून निमितचा इगोच नष्ट करावा का?

विचारात गढलेल्या रेवाने शेवटी..... अत्यंत सूज्ञ निर्णय घेतला...

=========================================================
नियमावली:

१) कथेचा शेवट अतिरंजीत चालेल पण पटेल असा असावा
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परीचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

==========================================================

रेवा-निमितची भेट होते.
...अँड दे लिव हॅपिली एवर आफ्टर असा शेवट अपेक्षित आहे.

दि. १२ सप्टेंबर २०१३ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता एस टी वायची ही कथा बंद करण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला टारगटपणा करण्याचा मोह आवरत नाहिये.

तोवर नातू ला थांबणे अशक्यच झाले होते.
तो उठून रुक्साना उर्फ रेवाच्या समोर जाऊन उभा राहिला.
रेवाने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
त्याने रेवाकडे garfieldच्या नजरेने पाहिले.
रेवाने गाडीबाहेर नजर वळवली.
वर बसलेल्या टायगरने रेवाकडे confused नजरेने पाहिले.
नातूने रेवा बाहेर काय बघत होती ते बघायला नजर वळवली.
तोपर्यंत बाहेर बघण्यासारखे काहीच नाही म्हणून रेवा आत बघायला वळली होती.
रेवा बाहेर काय बघत होती ते बघायला टायगर ने आपली दुर्बीण काढली.
रेवा बाहेर काय बघत होती हे न कळल्यामूळे नातू प्रश्नार्थक नजरेने रेवाकडे बघू लागला.
नातू आपल्याकडे असा काय बघतोय ते न कळल्यामूळे रेवा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघायला लागली.
तोपर्यंत हे खालचे दोघे जण काहीच बघत नव्हते हे लक्षात येऊन टायगरने उजव्या हाताची बंद मूठ महेश कोठारे स्टाईलमधे डाव्या हातवर आपटत 'damn it' म्हणत दुर्बीण आत टाकली.
तोवर नातूचे confusion लक्षात येऊन रेवाला खुदकन हसू फुटले.

तिला असे जिवेघेणे हसताना पाहून नातूच्या कानात गाणं वाजायला लागलं, 'टेलीफोन धून मे हसनेवाली'

आत्ता नातू ला थांबणे अशक्य झाले होते.
त्याने रेवाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
रेवाने त्याच्याकडे भिजलेल्या मांजराकडे पाहतात तशा नजरेने पाहिले.
नातूने हादरून गाडीबाहेर नजर वळवली.
वर बसलेल्या टायगरने नातूकडे confused नजरेने पाहिले.
बराच वेळ नातू बाहेरच बघत राहिला.
तो एव्हढा बाहेर काय बघतोय ते बघायला रेवाने नजर बाहेर वळवली.
ते दोघे बाहेर एव्हढे बघताहेत ह्यात काहि छुपा संदेश आहे कि काय असे वाटून ते बाहेर काय बघतायेत ते बघायला टायगर ने परत आपली दुर्बीण काढली.
बाहेर बघून डोळ्यांना उन्हाने तिरिप लागून वैतागून नातू परत आत बघायला लागला.
बाहेर बघण्याचा कंटाळा आल्यामूळे रेवा पण आत बघायला लागली.
तोपर्यंत हे खालचे दोघे जण परत काहीच बघत नव्हते हे लक्षात येऊन टायगरने उजव्या हाताची बंद मूठ महेश कोठारे स्टाईलमधे डाव्या हातवर आपटत 'damn it' म्हणत दुर्बीण आत टाकली.
आत टाकतान ती निसटली खाली पडली.
त्याचा झालेला गोंधळ पाहून रेवाला हसू आवरेना.

तिचे ते कातील हसणे ऐकून नातूच्या कानात गाणं वाजायला लागलं, ' हसते हसते कट जाये रस्ते रस्ते' ...

असाम्या या पोस्टीत खरं तर 'नजर नजर ढूंढे तुम्हे मेरी नजर' किंवा 'नजर के सामने जिगर के पास' असली गाणी फारच शोभली असती. Proud केवढी नजरानजर आहे पूर्ण पोस्टभर!!

असामी, Lol एक प्रश्न..
उर्वशी उर्वशी गाण्या मध्ये पारदर्शक बस असते तसं ट्रेन्चं छप्पर आहे का? कारण ट्रेन मधुन तिला वरती बसलेला टायगर कसा दिसेल? किंवा असं आहे का की कथेच्या ह्या वळणावर गाडी पण 8 आकारात वळत असते? Happy

रमड, 'दिल जिगर नजर क्या है', 'जादू तेरी नजर', 'नजर ने नजर से क्या कहा', 'नजर लागी राजा तेरे बंगले पर' हि लिस्ट राहिली, मिटींग संपल्यामुळे हे नशिब समज . Wink

ट्रेन बाहेर बघणे दोनदा >> DJ रमड ला सांगितलेले वाच वर Wink

मॅक्स अरे तो खाली वाकून बघतो असे समज, हाय काय नि नाय काय Lol (आणि पारदर्शक असते ते छत नसते हे सांगावे लागावे तुला Lol )

तिचे ते कातील हसणे ऐकून नातूच्या कानात गाणं वाजायला लागलं, ' हसते हसते कट जाये रस्ते रस्ते' ...
तेवढ्यात ट्रेनमध्ये कॅन्टीनवाला आला. त्याच्या वडा, समोसा असल्या पदार्थांमध्ये आप्पे चटणी ची पाकीट होती. भुकेने व्याकूळ नजरेने तिने नातूला विचारले "आप्पे खाऊ या"? तिची पर्स टेबलवरच विसरली असल्याने नातूला पैसे द्यावे लागणार हे उघड होत. पण नातूचा जीव सुखावला रेवाथी, रुक्साना असली कसलीही रूपे घेतली तरी हि खरी 'रेवा' - रव्याच्या अप्प्यावर जीव टाकणारी रेवा.
"अरे वा रेवा! तुलापण आप्पे आवडतात"? नातूचा प्रश्न तसा र्हेतोरिकच म्हणायचा. नातुने हसून आप्पे घेतले पण पाकीट उघडले आणि ते कठीण कडक आप्पे त्याला खाववेना! निमितच्या घरी एकदा रेवाने सर्वाना बोलावले होते. तेव्हा तिने केलेले लुसलुशीत मलई बर्फीसारखे आप्पे त्याला आठवले. वाटल कवी असतो तर तिच्या वर नाही तर निदान तिच्या अप्प्यांवर कविता केली असती. कविता हे फार भयंकर न झेपणार प्रकरण पण म्हणून काय कधी तिच्या अप्प्यांची तिच्यासमोर स्तुती करू नये?? नातू म्हणाला "रेवा, तू केलेले लुसलुशीत आप्पे आठवले, आणि पुन्हा ते खाण्यासाठी मी माझे प्राण पोटात साठवले" रेवा चित्कारली "अय्या, तू गझल करतोस" आता मात्र नातू चिडला, आपल्या गद्याला हिने गझल म्हणावे. पण दुसर्या क्षणी विझला, विरघळला - आपल्या गद्याला हिने गझल म्हणावे!!!! ह्यापेक्षा थलैवाकडे जास्त काय मागणे मागणार होता तो. टायगरला विसरून तो 'लिटरली सिली ही मेरी लव लाईफ' गुणगुणू लागला.....

वर छतावर दोनदा आवाज अन डॅम इट! चा चिरपरिचित आवाज ऐकल्यापासून रेवाला चैन पडत नव्हते. ती दोनदा खाकरली आणि एक आप्पा बाहेर हवेत उडवला. तो वर बसलेल्या टायगर ला इशारा होता. मग चटणीचे हात धुवायला बाथरूम मधे जाण्याचे निमित्त करून ती तिथून निघाली ट्रेन मधून मागच्या मागच्या डब्यात चालत शेवटचा मालगाडीसारखा सामानाचा डबा होता त्यात शिरली. तिथे सुक्या गवताचे भारे होते बरेच, त्यावर दिलखेचक पोझ घेऊन पहुडली अन टायगरची आतूरतेने वाट पाहू लागली..
दगडू तेलीने इकडे आपला फोन काढून ट्रेनमधली इत्थंभूत हकीकत नावेद भाईला कळवली. भाई रत्नागिरीऐवजी मंगलोर ला बोटीने पोहोचणार , तिथून दगडू तेलीच्या मोटारीच्या ताफ्याने दूधसागर धबधब्याच्या जवळच्या स्टेशनात येऊन छेनै एक्सप्रेस तिथून पकडणार असे ठरले!!

नातू अजून भंजाळलेला होता. पण भानावर येऊन तोही रेवाला शोधत निघाला.
टायगर उडी मारून डब्यात उतरला अन रेवाकडे भान विसरून पहातच राहिला! रेवाही आव्हान नजरेत साठवून त्याच्याच कडे पहात होती..
"फ्रूटसॅलड"
"फ्रूटसॅलड"!!
हा त्यांचा कोडवर्ड होता...... दोघेही भुकेल्या श्वापदाप्रमाणे एकमेकाच्या दिशेने धावले. त्याच वेळी नातू जवळ जवळ तिथे पोहोचतच होता....

सायो काहीही काय? जसा शाहरुखच्या पिक्चर मध्ये रजनी लागतो तसा कुठलाही धागा चालवायचा म्हणजे मलईबर्फीचा उल्लेख लागतो. आता ती इशारा म्हणून उडवता येत नाही तो दोष पोटात घाल Wink वर उडवली तर चिकटेल छताला, उडवायला आप्पा चांगला. Happy

दोघेही भुकेल्या श्वापदाप्रमाणे एकमेकाच्या दिशेने धावले. त्याच वेळी नातू जवळ जवळ तिथे पोहोचतच होता....

त्या दोघांनी डब्यात शिरलेल्या नातूला पाहिले.
डब्यात शिरलेल्या नातूने त्या दोघांना पाहिले.
नातू दात ओठ खात टायगरला बघत होता
टायगर 'अबे तू किस खेत कि मूली' अशा नजरेत नातूला बघत होता.
नातू लाळ गळत रेवाला बघत होता.
रेवा 'कबाबमधे हड्डी' types looks नातूला देत होती.
नातू टायगरला खाउ कि गिळू अशा नजरेने बघत होता.
टायगर रेवा ला 'खाउ कि गिळू' असा बघत होता.
fruit salad च्या घाईत आप्पे खायचे मिस केल्यामुळे पोटात खवळलेल्या आगीने रेवा नातूच्या हातातल्या आप्प्यांकडे 'खाउ कि गिळू' अशा नजरेने बघत होती.

and time froze ....

त्याच वेळी नातूचा शर्ट पाठून कोणी तरी खेचला. नातूने मागे वळून पाहिले तर
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
..
.
..
.
.
.
तर एक भिकारी त्याच्या शर्टाचे टोक खेचत होता. background ला दुसर्‍याने गाणे सुरू केले "शिरडी वाले साईबाबा"

फ्रूटसॅलॅड भारी आहे!

असामी बहुतेक सगळ्या मराठी/ हिंदी सिरीयलमध्ये सगळे एकमेकांना बघत असतात ते बघतो.

'असाम्या, आ, इन पात्रोंको तुम देखो, मै बस तुम्हे देखते हुए देखूं'

असाम्या, आ, इन पात्रोंको तुम देखो, मै बस तुम्हे देखते हुए देखूं >>>> आँ? असाम्या, हे मी तुला म्हणायचं वाक्य सातीपण म्हणायला लागली? Lol

एकदाची ती ओरीजिनल गोष्ट वाचली .... उगा भलतीच मोठी झालीये. बाकीच्यांचे तोडलेले तारे आता वाचते मग माझ्याही मनातील अदृष्य उत्स्फुर्ततेला साहसाचे चाटण मिळेल आणि माझ्या हातूनही काही चार शब्द लिहून होतील अशी आशा .....

*********************************************

>>>>>> इकडे हॉटेल मधे निपचित पडलेला निमित उठून सुब्बीजवळ गेला. "सुबन्या! सुबन्या! ऊठ"
सुब्बी हा इन्डस्ट्रियलिस्ट सुब्बी नसून दुबई गँग चा भाईचा उजवा हात चिकना सुबन्या होता. अरोरा पण खरा तर असलम बौना म्हनून फेमस असलेला भाईचाच एक शार्प शूटर होता.

>>>> चिकना सुबन्या आणि असलम बौना!!!! मेले हसून हसून..... मै, अंडरवर्ल्डमध्ये नावं ठेवायला तुलाच बोलवतील आता..... Biggrin

रमड , तुमचं असं काही काँट्रॅक्ट आहे हेमला माहिती नव्हतं. Wink
मी आपलं या स्टायपुरतंच असाम्याला बघणार आहे.
मग उरलेला सग्गळा वेळ तू बघ.

Pages