मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - उलट सुलट" ११ सप्टेंबर

Submitted by संयोजक on 29 August, 2013 - 12:19

गणपती बाप्पा मोरया!
प्रत्येकाचं वेगळं रूप, जितके वेगळे तितके न्यारे
प्रत्येकाचे वेगळे गुण, ज्याला त्याला तितके प्यारे
असो बापडे आपल्याला काय
आपल्याला फक्त झब्बू द्यायचा हाय!
चला खेळूया खेळ - उलट सुलट!

नेमकं करायचय काय?

१. आधीच्या चित्रातल्या एखाद्या गोष्टीचा विरोधाभास टाकायचाय..
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
उदाहरणादाखलं हे पहा -
एखादं उदाहरण घेऊयात - समजा कोणी मिरचीचा फोटो टाकला तर पुढचा त्याला झब्बू म्हणून जिलेबीचा फोटो टाकू शकतो (तिखट-गोड) कोणी जिलेबीला झब्बू म्हणून सरळसोट रस्ता टाकू शकतं (सरळ-वेटोळं) कोणी रस्ता काळा म्हणून बगळ्याचा फोटो टाकू शकतं.... अॅण्ड सो ऑन.....

नियम -
१. सलग एकाच टाईपचा झब्बू नको. म्हणजे तिखटला गोड झब्बू दिल्यावर गोड ला परत तिखट (भले पदार्थ काहीही असो) झब्बू देऊ शकत नाही.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शागं - मी तरी बहूतेक सगळे माबोवर पूर्वी अपलोड केलेल्यापै़कीच फोटो टाकतेय लॉजिक लावून. म्हणून लगेच टाकले जातात. Happy
माझ्याकडे अजून काही गाड्यांची, मी रंगवलेल्या २-३ चित्रांची, वेरूळची आणि २-३ अशीच फुटकळ उरली असतिल चित्रं. ती वापरेपर्ञंत मी इन. नंतर मी पण पास.

sony pic 415.jpg
एक खेळणं- खेळण्यांचा ढिग. (माबोवरच्या पहिल्या हब्बुच्या वेळी अपलोड केलेला फोटो) Happy

पाण्याबाहेरचा माणुस - पाण्याच्या आतला (लहान) माणुस>>> अल्पना, भलतंच गोड लॉजिक आहे. Happy असंच लॉजिक मी या खेळात सुरुवातीला वापरलंय, पण उलट्या पद्धतीने. Happy

मध्ये मानुषींचा फोटो आलाय, त्या मुलाच्या शर्टावर अक्षरं अहेत ती धरुन नताशाचा फोटो व्हॅलिड होईल.

अल्पना , मी नताशा
नियमाप्रमाणे माझा फोटो (मुलगा मुलगी ) ग्राह्य धरावा का? :स्मित :

Lol
या झब्बुचा विषय मस्त शोधलाय संयोजकांनी. कुठूनही कसंही लॉजिक वापरुन तोच फोटो चालवता येतोय.

Pages