मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - इंद्रधनुष्यी सौंदर्य" १० सप्टेंबर

Submitted by संयोजक on 29 August, 2013 - 12:14

रंग! मोहकतेचं सुदरं रूप, आणि अशा मोहकतेला कमानीत बांधणारं इंद्रधनुष्य म्हणजे विधात्याने केलेली सुरेखशी आरास. हीच आरास वापरूया, चला खेळ खेळूया....
कुठला खेळ म्हणून काय विचारता.. तोच आपला तुपला लाडका झब्बूचा खेळ!

हे लक्षात ठेवा :
१. तुम्हाला अशी चित्र टाकायची आहेत ज्या मध्ये इंद्रधनुष्यातले सगळे रंग कव्हर झाले असतील.नुसत्या इंद्रधनुष्याचा फोटो किंवा फोटोतलं इंद्रधनुष्य चालणार नाही.
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

उदाहरणादाखल हे प्रचि पहा -

indradhanuyi zabboo2.jpg

प्रचि श्रेय - अतुलनिय

यामध्ये ता,ना,हि,पि,नि,पा,जा हे सातही रंग तुम्हाला दिसतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका रात्रीत ५७ इंद्रधनुष्ये>>>>:हाहा:

rmd Proud

झंपी, माझ्या कुठल्या फोटोत हवे ते रंग नाही ते सांगु शकाल का? म्हणजे मला ते काढुन टाकता येतील Happy Happy

DSC05404.JPG

जिप्सी, तुम्ही नीट वाक्या वाचले नाही.
>> वरती कित्येक फोटोत<< म्हटलेय.
वरच्या फोटोत' असे नाही म्हटलेय

झंपी, ओक्के Happy Happy
माझा "ता,ना,हि,पि,नि,पा,जा" मधल्या "पा" रंगाबाबत कन्फ्युजन होते. म्हणुन तुम्हाला विचारले. Happy

IMG_3745.JPG

अरे कसले भारी फोटो आहेत एकेक.... देवाचे लाख लाख आभार मी रंगांधळा नाहिये..

IMG_3910.JPG

0d9bcadc84bfaf13c5c33f788665362e.jpg

IMG_3933.JPG

Pages