सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदत गट

Submitted by केदार on 17 November, 2008 - 10:18

'भारतात हे नेहमी असेच असते'! 'भ्रष्टाचार खूपच झालाय!' 'काहीनाही रे, ह्यांना पैसे हवे वर प्रसिध्दीही!'. 'राजकारणी काSSSही करत नाहीत, ही सिस्टीमच बदलायला पाहीजे!' 'गोळ्या घाला साल्यांना!' 'शिका, शिका म्हणावं काही तरी प्रगत देशांकडून ...'अशी वाक्य आपण अनेक ठिकाणी ऐकली आहेत. बरेचदा ते बोलणारेही आपणच असतो, जोशात चार वाक्य फेकली की किती बरं वाटतं. भारत बदललेला सर्वांनाच हवाय, पण कृती करायची म्हटली की होतेच असे नाही. 'करणारे करोत रे, समाजात चार पाच अभय बंग, अवचट,पोद्दार, आमटे, सकपाळ निर्माण होतील आणि जातील आपल्याला काय त्याचे?', अशी आपल्या समाजाची मनोभूमिका झालेय. विचार करा यातून बाहेर पडायला हवय ना! काही करायचं तर आहेच मग आपला मार्ग आपणच शोधायला लागूयात, काय म्हणता? आपण एकत्र येऊन काही तरी नक्कीच करु शकतो. आपला देश बदलायला आपण हातभार लावणार नाहीतर कोण, युनो? नक्कीच नाही. ह्यावर विचार करायला हवा. देश बदललेला सर्वांना हवाय पण वेळ व पैसा द्यायची किती लोकांची तयारी असते? आपण चार लोकं एकत्र आल्यावर सर्व काही बदलेल, आलबेल होईल अशा भ्रमात राहून चालणार नाही, पण निदान चार गरजू लोकांच्या आयुष्यात आपण नक्कीच बदल घडवू शकतो, त्यांना त्यांचे जीवन घडविण्यासाठी आपण खारीचा वाटा नक्कीच देऊ शकतो. ती चार लोक अजून दहाजणांचे जीवन घडवू शकतील आणि ती दहा अजून वीस .. आणि हा क्रम अव्याहत चालू राहू शकेल.

आपल्यापैकी बरेच सुस्थितीत आहेत, त्यांच्या सामाजिक जाणीवा अजून जिवंत आहेत, काहीतरी करायची तळमळ आहे पण परिस्थिती, व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदार्या,परदेशातील वास्तव्यामुळे येणार्या भौगोलिक मर्यादा अशा अनेक कारणांमुळे इच्छा असूनही आपण कुठलीही मदत करु शकत नाही. भारतात रहाणार्या कित्येकांची प्रत्यक्ष तसेच आर्थिक योगदान देण्याची तर परदेशातील लोकांची आर्थिक मदत करण्याची क्षमता असते आणि इच्छाही. दरवेळी जेव्हा मदत करण्याचे आवाहन केले जाते तेव्हा हे लोक पुढे होऊन मदत देखील करतात, पण पुढे त्या पैशांचे काय होते, कुठल्या संस्थेला ते पैसे जातात त्यांचा विनियोग कशाप्रकारे केला जातो? असे बरेच प्रश्न अनुत्तरित रहातात. ह्यामुळे बरेच जण तर 'मी दुसर्यांना पैसे देणार नाही कारण पुढे त्याचे काय होते हे मला माहिती नाही, कदाचित लोक मदतीच्या नावाखाली फसवत देखील असतील, सत्पात्री दान होणार नाही म्हणून मी मदत करणार नाही' ह्या मताचे बनतात. अनेकजण सुरुवात तर जोरात करतात पण पुढे कालौघात ह्या गोष्टींचा विसर पडतो कारण आपण स्वत: अनेक गोष्टींमध्ये गुंतलेले असतो. ह्यावर उपाय शोधायला हवा. आजच्या इंटरनेटच्या काळात आपल्या सर्वांच्या ओळखी ह्या इंटरनेटच्या माध्यमातून जास्त होतात, त्यामुळे आम्हीही ह्याच माध्यमातून एका अनोख्या मदत गटाची, फंडाची रचना करु पाहतोय. ह्या संकल्पनेचे स्वरूप पुढे ठेवायचा हा प्रयत्न.

मदतगटाच्या निर्मितीचे उद्देश:
१. ज्या लहान सेवाभावी संस्था अपुर्या निधीसह तळागाळातील लोकांसाठी मदतकार्य करत आहेत परंतु पुरेश्या संसाधनांच्या अभावामुळे आपल्यापर्यन्त पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी नियमित स्वरुपाचा आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करणे.
२. सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या सुस्थितील व्यक्तींना ह्या कार्यात मदत करण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि मासिक योजनेद्वारे नियमित मदतकार्याचा ओघ निर्माण करणे.

मदतगट कसा ऒळखला जावा?
गरजूंसाठी वाहून घेतलेल्या सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करणारी आणि त्या मदतीचा सुयोग्य उपयोग होतो आहे ह्याची नियमित पणे चाचणी करणारी संस्था.

फंडाच्या स्वरुपाविषयी--
१. ह्या मदत गटाची वाटचाल पूर्णपणे एकमेकांच्या विश्वासावर आधारीत आहे. पुरेश्या आणि नियमित आर्थिक पाठबळाची खात्री होई पर्यन्त ह्या फंडाची कुठल्याही सरकारी कार्यालयात नोंदणी केली जाणार नाही. भविष्यात नोंदणी भारतात केली जाईल.
२. सर्व पैसे हे एका वैयक्तिक बचत खात्यात जमा होतील (नोंदणीकृत नाही).
३. आर्थिक मदत ही रोखस्वरुपात स्विकारली जाणार नाही. त्या खात्यात पैसे जमा करण्याकरता ई- ट्रान्सफर वा चेक द्यावा लागेल.
४. हे खाते ऑनलाईन असल्यामूळे दरमहा ECH/ACH पध्दतीने देखील मदत देता येईल.
५. संस्थेच्या मदत निधीशिवाय इतर कुठल्याही प्रकारचा खर्च ह्या खात्यामधून केला जाणार नाही. उदा. संस्थेला भेट द्यायला येणारा खर्च हा संबधित सहकारी स्वतःच करेल.
६. दर महिन्याच्या महिन्याला एका ठराविक दिवशी सर्व सहभागी मदतकर्त्यांसाठी त्या खात्याचे सगळे व्यवहार(जमा आणि खर्च) प्रकाशित केले जातील. तसेच ज्या संस्थांना देणगी देण्यात येईल त्यांच्याकडून सगळ्या देणग्यांच्या पावत्या घेऊन त्या दर महा प्रकाशित करण्यात येतील. मदतगट नोंदणीकृत झाल्यावर प्रत्येक देणगीची पावती दिली जाईल.
७. संस्थेला मदत देण्याआधी त्या संस्थेचे कार्य माहिती करुन घेणे अतिशय आवश्यक ठरेल, त्या शिवाय कुठल्याही संस्थेला मदत देण्यात येणार नाही. त्यासाठी काही निकष पुढीलप्रमाणे --
अ. अशा संस्थेची कायदेशीर नोंदणी झाली आहे का?
ब. एखाद्या मोठ्या समाज सेवकाने तिला चांगली संस्था म्हणून घोषित केले आहे काय?
क. त्या संस्थेचे लाभार्थी कॊण आहेत?
कोणत्या संस्थाना कधी, किती आणि कशी मदत करायची ह्यासाठी सभासदांची मते विचारात घेतली जातील, अंतिम निर्णय मदत गट चालवणाया विश्वस्त समितीचा असेल
८. सामाजिक शिक्षण, आरोग्यसुविधा, बालसुधार, अपंग मदत,अनाथ सेवा अशा कोणत्याही विषयात सामाजिक काम करणाया संस्थांचा विचार करण्यात येईल.
९. तळमळीने काम करणाया सामाजिक संस्थेस मदत हा मुख्य उद्देश असून प्रसंगानुरुप एखाद्या गरजू व्यक्तिचा(विद्यार्थी,आर्थिक पाठबळ नसलेले रुग्ण) मदतीसाठी विचार करण्यात येईल.
१०. मुख्यत्वे सभासदांकडून नियमित मासिक देणगी घेण्याचा ह्या योजनेचाउद्देश आहे, तरीही एक रकमी,एकावेळी देणगी स्वरुपातील रक्कमही स्विकारली जाईल. कोणताही सभासद मासिक देणगी देणे कधीही सुरु करू अथवा बंद करु शकेल.

मदतगट काय करणार नाही--
१. पुरेसा पैसा किंवा स्त्रोत असलेल्या सामाजिक संस्थांचा विचार करण्यात येणार नाही (उदा. क्राय,गीव्हइंडिया)
२. कुठल्याही धार्मिकप्रचारासाठी अथवा धार्मिक कार्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला आर्थिक मदत केली जाणार नाही.

पुढे काय?
हे जितक्या सहज लिहीले तितक्या सहज होणार नाही ह्याची जाणीव आहेच. ह्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतील आणि म्हणूनच ह्यात आम्हाला तुमचा सहभाग हवाय. ज्यांना ज्यांना ह्या मासिक योजनेत सहभागी व्हावेसे वाटते आहे त्यांनी केदार जोशी, प्रशांत उपासनी वा रश्मी ओक यांच्याशी संपर्क साधावा. ह्या गटाची नोंदणी गुगलगृप्स वर केलेली आहे. सहभागी होण्यासाठी http://groups.google.com/groups/search?q=supanth&sitesearch= वर क्लिक करा वा http://groups.google.com वर जाऊन supanth असा सर्च मारा. तिथे जॉइन अशी लिंक असेल.
ज्यांना काही करायची तळमळ आहे अशा समविचारी लोकांसाठी आम्ही हा एक विचार मांडतोय. आम्ही तिघांनी सुरुवात तर केलीये पण तुम्ही सहभागी झालात तर ही योजना अजून पुढे नेता येऊ शकते. गरज आहे ती फक्त काही पैशांची व थोड्या वेळाची. आपल्या धकाधकीच्या आयुष्यातील केवळ ह्या कामासाठी म्हणून वेगळे काढलेले १ ते २ तास प्रति महिना बरच काही घडवून आणू शकतील.

तळटीप.
आम्ही हे जे काम करत आहोत त्यात मायबोली बॅनरचा काही संबध नाही. हे आपण सगळे मिळून करणार आहोत, फक्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवात इथून करत आहोत इतकच.

धन्यवाद!

प्रशांत उपासनी (upas)
रश्मी ओक (marhatmoli)
केदार जोशी (kedarjoshi)

मायबोली प्रशासनाची हा गट स्थापण व्हायला खुप मदत झाली. त्यांनी मी विचारलेल्या प्रश्नाला माझ्यावर विश्वास टाकून "हो" असे उत्तर दिले. त्याबद्दल हा गृप त्यांचा सदैव ऋणी राहील.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरती नक्कीच. जी लोक आधीच अनेक संस्थांसाठी काम करतात वा ज्यांना पैशाने मदत करायची नाही, त्यांनी जॉइन व्हायलाच पाहीजे असे काही नाही. ते सहभागी न होताही अशा अनेक संस्था बद्दल माहीती सांगु शकतात. त्यातून आम्हालाही विवीध संस्था कळतील व गॄप त्यांचा विचार करेन.
आदिवासी - health and education अशा संस्थांच्या बाबतीत पहिल्या पसंतीने ( प्रायोरिटी) विचार केला जाईल.

शिवाय विचार करनारा मी ऐकटाच नाही तर सर्व सदस्य ह्या प्रक्रिये मध्ये सहभागी होतील. (पोलींग वैगरे रुपाने).

माझी प्रायॉरीटी निराधार आणि अनाथ लहान मुले. मला डोनेशन देण्याच्या दृष्टीने सुरूवात करायला आवडेल.

मला वाटते ह्या विषयासंबधित आपल्या सगळ्यांना माहित असलेली संस्था म्हणजे 'समतोल फाउंडेशन.'

केदार, मी समतोलला किंवा मागे कुणीतरी लिंक दिली होती ते दापोडीचे सुरवसे (जे आपल्या झोपडीत ३० अनाथ मुलांचा सांभाळ तुटपुंज्या उत्पन्नात करतात) त्यांना आपल्या ग्रूपतर्फे कशी देणगी देऊ शकते ते कृपया कळवा.

अश्वीनी, सुरवसे नाही तूळवे. ( जर आपण दोघे त्याच संस्थे बद्दल बोलत असु तर)

श्री तूळवे हे इतक्यातच वारले आणी त्यांचा पत्नी मालन ताई आता हे सर्व चालवतात. त्यांचाकडे ३१ मुल आहेत. मी गृप सुरु करायचा आधीच ह्या संस्थेबद्दल माहीती काढली होती. ( वर लिहीलेही आहे, नाव न्हवत लिहील.) त्यांना आपण नक्कीच मदत करु. भर मासीक निधीवर ठेवता येईल सरिता वा चिन्मय त्यांना भेटुन पण येतील, सध्या ते अकाऊंट सेट अप साठी विवीध बँकाना भेटुन रजिस्टर न करताही, सुपंथच्या नावावर काही वेगळ्या प्रकारे अकाउंट काढता येईल का ह्याचा शोध घेत आहेत.

तूळव्यांचा पत्ता.
Niradhar Balsangopan Anath Ashram
Gulab kate chawl, Ward No. 5,
Dapodi, Pune 411012, Maharashtra, India
फोन नं 9823096881

Administrative Office
G5, Girija, Someshwar Park,
Off. Baner Road, Pune 411007, Maharashtra, India.

पुण्यात जे सहकारी राहतात त्यांनी पण आधीच भेट देऊन यायला हरकत नाही. भेट दिल्यावर इथे वा गृप मेल वर माहीती टाकता येईल.

एकदा ह्या गोष्टी मार्गी लागल्या की मग वेगवेळ्या संस्थांबद्दल आपण गृप मध्ये मेल पाठवू व त्यातून निधी जर जास्त जमला तर दोन संस्था चूझ करु. हे सर्व सेट व्हायला कदाचीत १५-२० दिवस लागतील. मग चेक्स आपण १ जाने पासून सुरु करता येतील.

दापोडी बद्दल कुठे कोणि कधी लिहिलय? मी शोधले पण मला काही दिसले नाही.. त्याना मदत करणे चांगली कल्पना..

दापोडी अनाथालयाबद्दल http://faithinfuture.org/ इथे आणी अनिल अवचट ओर्कुट कम्युनिटीवर तुम्हाला बरीच माहिती मिळु शकेल. या ओर्कुट ग्रुपवरील बचत गटाकडुन या संस्थेला नियमीत मदत करण्यास काही दिवसापुर्वी सुरुवात केली आहे.

तुम्हाला काही माहिती लागल्यास कळवा . मी या अनाथालयात जाउन आलेल्या लोकांशी तुमची भेट घालुन देऊ शकतो.

नाही, मी म्हणत होते ते वेगळे. सकाळमध्ये त्यांच्याविषयी पहिल्यांदा वाचले होते. देविदास सुरवसे, कदाचित मग ते बोपोडीला असतील. नक्की आठवत नाही. त्यांच्याकडे पण अशीच २८ की ३० मुले आहेत आणि ते झोपडपट्टीत राहातात.

पण हे सुद्धा चालेल. एकच काम करताहेत दोघेही.

Happy गुगल वर सहज सर्च केलं तर मायबोलीवरिलच २००३ सालातली लिंक सापडली.. (पहिलीच लिंक) त्यात देविदास सुरवस्यांबद्दल माहिती आहे..

http://www.maayboli.com/hitguj/messages/34/48131.html?1050604814

दुनीया गोल आहे. Happy सुरवसे आणि तूळवे ह्यांचे डिटेल्स पण मॅच होतात जसे तिन स्वतःचे मूल, ३० दत्तक वैगरे. चाळ पण एकच (फक्त चाळीचे नाव एकदा बाइचे एकदा मालकाचे) आणि वॉर्ड पण एकच. कदाचित ह्या फेथ इन फ्यूचर वर आडनाव चूकले की काय?

सरीता तूला वेळ झाल्यावर त्या फोन वर फोन करशिल का? मी देखील ट्राय करेन.

नात्या, अरे तिच लिंक घेऊन मागच्या वेळेस मी चौकशी करत होते पण त्यात दिलेले फोन नंबर आता कार्यरत नाहीयेत. आणि नविन नंबर मिळत नव्हता. ही माहिती खर तर सहज उपलब्ध पाहिजे. म्हणजे सकाळ इ. मध्ये वाचून ज्यांना मदत कराविशी वाटते त्यांना फारसा खटाटोप न करता ती संधी प्राप्त झाली पाहीजे. विशेषतः ती मदत करण्याची उर्मी ओसरण्याच्या आत. नाहीतर contact info मिळेपर्यंत उत्साह संपून जायचा. Happy

हो ह्याच अनाथाश्रमाबद्दल मी पूर्वी समतोलच्या लिंकवर लिहिलं होतं. त्यांचं नाव नक्की काय ते मी उद्या टाकते. माझा एक मित्र तिथे नियमित जात असतो. माझं जाणंच काही ना काही कारणाने राहुन गेलंय. मी फोनही करते त्याना...

काहीतरी वेगळ करण्याची धडपड करणार्‍या सगळ्यांसाठी, एक लिंक देते आहे जरुर वाचा.

http://onlinenews.lokmat.com/php/archive/index.php?date=2008-11-14

केदार,
तुला gmail ला email केली आहे. योग्य वाटल्यास group ला fwd कर .

इट्समी,
अग त्या लिंकवर फक्त अर्काइव्ह येताहेत लोकमतचे कुठला एकच असा लेख नाही. त्यात कुठे बघायचे नक्की ते सांगशील का?

सगळ्यात शेवटी एक option आहे 'ऑन्लाईनसप१', त्याला click केल्यावर 'मुख्य१' ...

आत्ता तिथे काहीच दिसत नाहिये. Sad

शुक्रवारी मला दिसले होते, मी दिलेल्या link वर.

एकामागुन एक सगळी पानं वाचली. दरवेळी असं काही वाचलं की आपण काहिच करत नाही हे मला पुन्हा जाणवतं. नुसती इच्छा असून उपयोग नाही तर कृती करायला पाहिजे. सुपंथ च्या माध्यमातुन ती कृती करता आली तर मला खूपच बरं वाटेल.
प्राजक्ता

इट्समी,
ह्या दुव्या साठि धन्यवाद. खुपच प्रेरणादायक आहे.

आरती..... खूप खूप आभार ही लिंक देण्यासाठी परत परत प्रयत्न केल्याबद्दल. खरच worth आहे. काय वाटलं वाचून ते शब्दात सांगणं खरोखर कठिण आहे.

मी ही लिंक माझ्या काही मैत्रिणींना पाठवली. त्यातली एक जण अगदी भारावुन गेली. सध्या तरी सुपंथच्या माध्यमातुन एका मुलीचा दहावी पर्यंतचा खर्च करण्याची तयारी तिने दाखवली आहे. {ह्याविषयी मी केदार/सुपंथ गृपला वेगळा मेल करणार आहे.}

कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की, सुपंथ ने पहिली देणगी दिली आहे. ह्यावेळी 'निराधार बालसंगोपन केंद्र, दापोडी' (http://faithinfuture.org) ह्या संस्थेची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली.
सुपंथ च्या खात्याचे डिसेंबर/ जानेवारी महिन्याचे व्यवहार तसेच पहिल्या देणगीची माहिती सुपंथच्या सगळ्या सभासदांना इ-मेल द्वारे देण्यात आली आहे.

'सुपंथ' सुरु करताना हितगुजचे माध्यम उपलब्ध करुन दिल्याबद्दल मायबोलीचे पुन्हा एकदा आभार.

उपास, अभिनंदन ! माझ्याकडे गमेलचा जरा फाँट प्रॉब्लेम आहे. त्यामुळे नुसते डबे डबे दिसतात. जरा इथेच सांग ना चेक कुठल्या पत्त्यावर व कुठल्या नावाने पाठवायचा ते.

------------------------------
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | परि हरिकृपे त्याचा नाश आहे ||

सुपंथने काल पहिले डोनेशन दिले.
काही संस्था तुम्हाला माहीती असतील तर कृपया सांगा.

केदार, मी सुपंथला ईमेल पाठवली आहे. मिळाली का सांगा प्लीज.

अश्विनी_के, तुम्हाला याहू आयडी वर मेल पाठवलेय..
अश्विनी तुझ्या प्रश्नाला केदार ने रीप्लाय केलाय.

केदार ... खुप छान उपक्रम सुरु केला आहे तुम्हि ... मि मेल पाठवलि आहे ..

Pages