"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिसरा सिझन संपला. आत्ता थोडीथोडी मजा यायला लागलीय.
जेमी आणि ब्रिएनचे सीन आवडले.
ओलेंना आणि मार्जोरी आवडले.
The Bear and the Maiden Fair गाणं तर लय आवडलं Lol
प्रत्येक सिझनच्या शेवटी खालिसी काहीतरी हिरॉईक करून गुलामांना स्वतंत्र करून वगैरे सैन्य वाढवतीय...

Nobody here??
आता शो पुन्हा राजकारणाच्या मुख्य मार्गाला लागला. लेखक द्वयीची कमाल आहे पुन्हा शो खेचण्यात

सर्सीच्या तुलनेत सध्या तरी जॉन - डॅनी व इतरजन अगदीच लिंबू टिंबू वाटतायेत. व्हिसेरियन गेला, आता र्हेगार गेला. एकट्या ड्रॉगॉनच्या भरवश्यावर डॅनी काही करू शकणार नाही. सर्सीला तोंड द्यायला कसलीही विशेष तयारी केली नाही. कायबर्नच्या यंत्राबाबत माहित असूनदेखिल ड्रॅगन उडवले ह्यात काय शहाणपणा आहे काय ठाऊक.
एकूण आजच्या एपिसोडमध्ये काही खास घडले नाही. डॅनी दैवाच्या हवाल्यावर आहे अजूनही.

जेमीची मात्र कमाल आहे, सर्सीला वाचवायला किंग्ज लॅंडिंग्जला निघाला. आर्या मारायला निघाली.

जॉन इतका माजुर्ड्यासारखा का वागतोय काय माहित! घोस्टची शेवटची भेट न घेताच गेला. बिचारा कसला हिरमुसला होता तो!

दोन्ही ड्रॅगन जिवंत पाहून आनंद झाला पण काही मिनिटांत तो फार स्वस्तात खपला.... हे लोक काहीबी शॉक देतात .. आता लास्ट बॅटल खेळायला डझनभर लोक शिल्लक राहतील बहुतेक. शेवटच्या क्षणाला ग्रेजॉय आभाळात पाहून आश्चर्यचकित दिसला म्हणजे ड्रॅगन चिलखत खालून आला असेल का ?
घोस्ट ला एवढेदिवस मी मादी समजत होतो पण तो तर शेवटी नर निघाला .आधीचे एपिसोड ऐकण्यात चूक झाली असावी

हे म्हणजे दिल्ली जिंकून पेशव्यांनी परत मोगल बादशहा तख्तावर बसवला त्या चालीवर आहे. >>

कुठलही लॉजिक कुठे लावू नका ... Happy

हि काल्पनिक कथा आहे

> घोस्ट ला एवढेदिवस मी मादी समजत होतो पण तो तर शेवटी नर निघाला .आधीचे एपिसोड ऐकण्यात चूक झाली असावी > अगदी सुरवातीला जेव्हा ती डायरवूल्फची पिल्लं स्टार्क कुटुंबियाना पहिल्यांदा दिसतात तेव्हाच उल्लेख आहे कि नेडला जितके मुलगे आहेत तितके नर आणि जितक्या मुली आहेत तितक्या मादी अशीच ती पिल्लं असतात.

@ॲमी पहिला सीजन पाहून बरीच वर्ष झालीत त्यामुळे हि असेल कदाचित. मी त्यावेळी लंडन मधे होतो आणि ब्रिटिश कास्ट असल्याने सगळीकडे गॉटचीच चर्चा असायची. got बरोबर one direction बँड पण त्याच काळात लोकप्रिय झाला होता आणि युनिव्हर्सिटीत यांचीच चर्चा असायची.

डॅनी माझे शब्द खरे ठरवत आहे, डोक्यात हवा गेली आहे बाईसाहेबांच्या.. ग्रेजॉय मला आभाळात पाहताना दिसला नाही खरे तर, पण ड्रॅगनला चिलखत घालण्याची आयडिया बेस्ट राहील.. मिसंदेईला मारून सरसीने स्वतःच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब केले, आता तिला कोण मारणार हे बघायचे!

डॅनी आवडत कशी होती लोकांना तेच मला कळत नाहीय. वर पुंबा म्हणतोय तसं > डॅनी दैवाच्या हवाल्यावर आहे अजूनही. > सुरवातीपासून हेच आहे. आणि ड्रॅगन आणि भाषणबाजी...

मिसं दे ई मेली? !!! अरेरे मग बीच वर कोण जाईल?

ड्रॅगन पण मेला? सीजी ए कॅरेक्टर्स धडाधड मारत आहेत.

मस्तं एपिसोड !
अग आयेगा असली मजा , प्रत्येकजण वेगळा अजेंडा घेऊन येणार उरलेले २ एपिसोड !
डॅनी इज ऑफिशिअली अ मॅड क्वीन ,डिझर्व्ज टु गेट बिट्रेड अँड किल्ड !
सान्सा, सर्सी, व्हॅरीस एकदम मुरलेले राजकारणी , कंप्लिट्ली स्टोल द शो !
जेमी ब्रिएन फायनली गॉट सम अ‍ॅक्शन आणि नंतर मात्रं जेमी भलत्याच मार्गी रवाना , सर्सीउला स्वतःच्या हाताने मारायला कि खरच तिला वाचवायला?
आणि आर्या ???
ओएम्जी धिस गर्ल नेव्हर डिसअपॉईंट्स ! धक्क्यांवर धक्के.. आर्या नेव्हर कमिंग बॅक टु नॉर्थ ?
आर्या + हाउंड भारी ट्रॅव्हल पार्टनर्स आहेत, इंटरेस्टींग अपकमिंग जर्नी फॉर श्युअर !
आर्याही जेमी सारखीच योग्य वेळी गेंड्रीला डंप करून साउथकडे रवाना !
मच अवेटेर्‍ सान्सा-हाउंड रियुनियनही दिसलं आणि सान्साचा भारी वन लायनर “इफ आय हॅड गॉन विथ यु द वे यु वाँटेड आय वुड स्टिल बि द लिट्ल बर्ड टुडे “
टिरीयनची इक्वेशन्स बरोबर जमत नाहीयेत सिझन ७ पासून पण क्लायमॅक्सला काय करेल सांगता येत नाही.
सान्साचा टिरियनला इशारा ‘समवन बेटर‘ म्हणजे ती स्वतः वाटला मला कारण आधी ती म्हणते ऑवर मेन डोन्ट डु वेल इन साउथ !
पण ड्रॅगन्सला बघून ‘व्हाय हर ‘ म्हणते त्याचा अर्थ ड्रॅगन्स ब्लड तर जॉनही आहे असं सुध्दा वाटलं, बघु काय होतय पण सान्सा प्लेयिंग बिग !
सर्सी क्या चीज है डॅनी टोटली इग्नोअर्ड, सान्साने एकटीने हिंमत करून वॉर्निंग दिली होती त्यांची जखमी आर्मी सर्सीशी लढायला अनफिट असल्याची!
युरॉन कसला भारी आहे, एंट्रीलाच कचरा केला टिम डॅनीचा, सर्सीचा राजा बनायला एक्दम फिट आहे!
तो ड्रॅगन खरच मेला कि येणार समुद्रातून शंका आहे मला.
व्हॅरीस फार मस्तं खेळी खेळतोय अगदी त्याच्या एंट्रीपासून ते सिझन ८ पर्यन्त , पण फाय्नल गेम करून तो नक्की मरणार, रेड वुममने सांगितलच आहे, अयॅम गोइंग टु डाय इन धिस स्ट्रेंज कंट्री अँड सो डु यु आणि अर्थात डॅनीनेही सांगितलय व्हॅरीसला कि बिट्रे केल्याची शिक्षा जीवन्त जळणे !
अँड आय नेव्हर एक्पेक्ट एनिथिंग लेस फ्रॉम अ ड्रॅगन क्वीन _ इति व्हॅरीस.
या सगळ्या घोळात जॉन मात्रं नेह्मेमीप्रमाणेच नुसताच कनफ्युज्ड दिसला Proud
असो, शेवट जवळ आलाय आणि काय ट्रॅजेडीज होतायेत याची चिन्ता आता.. काही होवो, स्टार्क्स बंधुभगिनी एकमेकांविरुध्द जाऊ नये एवढीच अपेक्षा Sad

काही होवो, स्टार्क्स बंधुभगिनी एकमेकांविरुध्द जाऊ नये एवढीच अपेक्षा >> आणि त्यांचा टोनी स्टार्क होऊ नये..

आफ्टर पार्टीमधेच एकेक खेळ्या, चाली इ. पॉलिटिक्स सुरु झाले. व्हेरी इंटरेस्टिंग!!
जेमी सर्सीच्या मदतीला गेलाय असे वाटले नाही मला. "शी इज हेटफुल अँड सो अ‍ॅम आय."असे म्हणाला.
जॉन एकीकडे अ‍ॅज यूज्वल इमोशनल फूल गिरी करत बहिणींना शप्पत वगैरे घालतो आणि निघताना त्या बिचार्‍या घोस्ट ला साधे हग करण्याइतक्या पण भावना दाखवत नाही. का??
सान्साने तरी समहाऊ टिरियन ला सांगितले जॉन बद्दल ( असे मला वाटले)
सॅम पण निघून गेला?? कुठे गेला? मला वाटले तो राहील जॉन च्या सोबत.
आर्या ला पुन्हा काल चिअर केले मी Happy गेंड्रीला रीजेक्ट केले तेव्हा!! गो गर्ल!!
आर्या हाउंडसोबत निघाली. तिचा उद्देश नक्की कळलेला नाही पण इंटरेस्टिंग फॉर शुअर. आता पुन्हा नॉर्थ ला येणार नाही असे म्हटल्यावर जरा धडधड झाली आहे मनात!!
व्हॅरिस आणि टिरियन चा संवाद भारी होता!! व्हॅरीस वॉज व्हेरी क्लियर अबाउट हिज लॉयल्टीज!! टिरियन मात्र आता आतून द्विधा मनस्थितीत असावा. अर्थात जॉन सारखा इमोशनल माणूस थ्रोन वर बसावा की न बसलेलाच बरा ?
डॅनी दोघे ड्रॅगन्स आणि त्यांची नौसेना यांच्यासोबत टेचात ड्रॅगन स्टोन च्या दिशेने येत असताना युरॉन ने खतरी गेम केला बेसावध असताना!! पहिल्याच ओवर ला दोन विकेट्स घेतल्या. अजून मह्त्त्वाचे प्लेयर (जॉन), उरलेली आर्मी घरून निघून पोहोचायचेच आहेत तरी डॅनी अँड कंपनी सर्सीला सरंडर कर म्हणतायत !! कोणत्या बेसिस वर ! Lol सर्सी सध्या तरी सगळ्यांची बाप आहे!!

ड्रकारस !
डॅनि आता कोणाचे ऐकणार नाही ! पुढच्या भागात मोठे युद्ध नक्कि आहे .

हो, सांसाने टिरियनला ती बातमी देउन शपथ मोडली, आणि टिरियनने वेरसला ती बातमी दिली. जॉनला सेवन किंगडमचा राजा होण्यात काहिहि रस नाहि, त्याला डॅनी हवी आहे. या परिस्थितीत डॅनीने त्याच्यासमोर मांडलेला प्रस्ताव मेक्स सेंस. म्हणुन त्याला ती बातमी फक्त आपल्या भावंडांना द्यायची होती पण आता सांसा ने सगळा घोळ घातला आहे. ब्रॉनला बहुतेक सर्सीची हार दिसुन येतेय म्हणुन तो डबल क्रॉसिंगच्या मार्गावर. दॅट इज सो ब्रॉन...

तिकडे र्हेगाल हि अगदि स्वस्त्यात गेला. डॅनीची पुढची चाल रोचक ठरेल. ड्रोगानला चिलखत घालुन (वजनामुळे) उडता येइल का, हा प्रश्न आहे. बट हे, वी आर सिइंग ड्रॅगन्स (डोमिस्टिकेटेड टु ए सर्टन एक्स्टेंट), सो एनिथिंग कॅन हॅपन. सो सीट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय दि शो... Wink

मला आवडला कालचा एपिसोड! सुपरनॅचरल एन्केपेक्षा हे ह्यूमन पॉलिटिक्स जास्त इन्टरेस्टिंग आहे!
डॅनीचा मॅडनेस आता दिसायला लागला आहे. सॅम जॉनबरोबर रहायला हवा होता.

डॅनी नुसतीच अ‍ॅम्बिशस आहे आणि जॉन नुसताच वॉरियर. दोघेही इम्पल्सिव आहेत आणि गव्हर्निंग / स्ट्रॅटेजायझिंग दोघांचाही प्रांत वाटत नाही. सान्सा वॉरियर नाही, पण ती अ‍ॅम्बिशस आहे आणि गव्हर्न चांगलं करू शकते.
आत्ताही सैन्याला विश्रांती हवी हे फक्त तिच्याच बोलण्यात आलं.

>>> निघताना त्या बिचार्‍या घोस्ट ला साधे हग करण्याइतक्या पण भावना दाखवत नाही. का??
हो, ते काही समजलं नाही. आर्याने नायमेरियाला निरोप दिला आणि जॉनने घोस्टला सोडून दिलं हे सिम्बॉलिक आहे का? ते दोघंही आता स्टार्क कळपात नाहीत म्हणून? आर्या काहीतरी पर्सनल क्रूसेडवर आहे आता - डॅनीच्या सैन्याचा भाग नाही.

ब्रॉनला बहुतेक सर्सीची हार दिसुन येतेय म्हणुन तो डबल क्रॉसिंगच्या मार्गावर. दॅट इज सो ब्रॉन... >>> अगदी!!
हे ह्यूमन पॉलिटिक्स जास्त इन्टरेस्टिंग आहे! >> +१११
सान्साला न आवडणार्‍या दोन बाया आपापसात लढून त्यातली किमान एक तरी मरणार आहे याची ग्यारन्टी आहे!! त्यामुळे सान्सा च्या सध्याच्या हॅप्पीनेसची तुलना नाइट किंग आणि विंटरफेल च्या लढाई मजा बघत साउथ ला बसून राहणार्‍या सर्सीच्या खुषीशी करता येईल Happy

>>> सान्सा च्या सध्याच्या हॅप्पीनेसची तुलना नाइट किंग आणि विंटरफेल च्या लढाई मजा बघत साउथ ला बसून राहणार्‍या सर्सीच्या खुषीशी करता येईल Happy

अगदी! आणि सर्सीसारखीच ती स्वस्थ बसणार नाही! Happy

हो ना, सान्साने आधीही ऐन वेळेवर नाइट्स ऑफ व्हेल आणून बॅटल ऑफ बास्टर्ड्स ची बाजी पलटवून जिंकलेली होती.
आता आर्या ची मोहीम हे तिचे आणि सान्साचे प्लॅनिंग असू शकेल का? असले तर छान.
बायदवे त्या ब्रान चे लाइफ मधे काही एम आहे की असाच बघत बसून राहणार नुस्ता.

ब्रॉन सेलस्वोर्ड आहे - भाडोत्री सैनिक. त्याचा पैसे मिळवण्यापलीकडे काय aim असणार?
तो इतपत गुंतला या लॅनिस्टर भावांत हेसुद्धा त्याच्या मानाने खूपच झालं.

ड्रॅगनमात्र भलताच ईझीली मारला गेला! काही कळायच्या आत! अनसेरेमोनिअसली!

मला एकूण या सगळ्या प्रांतांमधली अंतरं कळेनाशी झाली आहेत! यूरॉन ड्रॅगनला मारून लगेच सर्सीबरोबर हजर होता, मग जॉनला पोचायला इतका वेळ का लागतोय?

ब्रॅन गं, आपला ३ आईड रेवन.
ब्रॉन नव्हे!
प्रांतांमधली अंतरं >>>> आय थिंक विंटरफेल हून बाय सी तुलनेने जवळ आहे किंग्ज लँडिंग. जॉन आणि आर्मी पायी येते आहे.
युरॉन ड्रॅगन स्टोन जवळ डॅनी आणि तिच्या नौसेनेची वाट बघत होता. तिथून किंग्ज लँडिंग जवळच आहे.
map_0.jpg

वॅरिसला युरॉन ग्रेजॉननं ड्रॅगनमार बाण तयार ठेवलेत ही बातमी लागली नाही. बरं तो काही रणनीती अवलंबणार असेल असा साधा विचारही या लोकांनी केला नाही. आणि समोर बाण दिसत असताना ड्रॅगन वळवता येत नाही का? कायपण पांचटपणा!

तहाची बोलणी करण्यासाठी असं खुलेआम मैदानात? एका खोलीत निवडक लोकांसह केवळ हॅन्डलोकं बोलणी करू शकत नाहीत का? काय तो फालतूपणा!

गेम ऑफ थ्रोन्सची 'ब्रेकिंग बॅड' होणार असं वाटत असताना 'लॉस्ट' होण्याची लक्षणं दिसू लागली आहेत.

ओह ब्रॅन! सॉरी सॉरी! Happy
तो सक्सेसरची वाट बघत म्हातारा होणार वाटतं आता! Proud

रणनीतीचा उजेड दिसलाच की आपल्या बाजूचा! बरेच डोथ्राकी आणि अनसलीड हकनाकच मेले असं वाटलं गेल्या भागातही!

>>> वॅरिसला युरॉन ग्रेजॉननं ड्रॅगनमार बाण तयार ठेवलेत ही बातमी लागली नाही
त्यालाच कशाला? डॅनीलाही माहीत होतं की! हायगार्डनलाही जखमी झाला होता की एक ड्रॅगन!

तिला वाटले असावे आधी घरी (ड्रॅगन स्टोन ला) जाऊन मग बघू काय ते. Happy पण वाटेतच युऱोन ने धुळवड सुरु केली Lol

Pages