"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.
ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html
हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.
वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.
जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.
हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.
करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!
"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei
पण या सगळ्याच्या शेवट ती
पण या सगळ्याच्या शेवट ती सान्सा राणी होण्यात होवू नये म्हणजे झालं.
<<
काब्रं भो?
ती ऑल्रेडी सर्सीची माजी सून आहे ना? एकेकाळची राणी?>> सान्साचं लग्न नाही झालं ना सर्सीचा मुलाशी. आयत्या वेळी ती मार्जरी आली ना मधे. हां ती सर्सीची वहिनी मात्र आहे टिरीयनशी लगीन लागल्यामुळे.
मार्जरी हे शब्दशः मांजरीचे
मार्जरी हे शब्दशः मांजरीचे संस्कृत नांव आहे. मांजर आडवी आली
(No subject)
टिरियन काल का बरं आलोकनाथ
टिरियन काल का बरं आलोकनाथ वाटला ?
काल काही केविलवाणा नव्हता तो, जेमी बरोबरचा सीन तो मंगता है , सेट्लिंग स्कोअर्स ऑफ हिज एस्केप !
जेमीने त्याला पळून जायला मदत केली होती, लॅनिस्टर ज्युनिअरने हिसाब बराबर कर दिय,, खूप दिवसांनी छान अॅक्टींग केलं टिरियननी.
बाकी सर्सीच्या मृत्युची थिअरी महंटलं तर जुळवता येते, अगदी यंगर सिबलिंगच्या हातून नाही तरी तो डॅनीला जाऊन मिळाला म्हणून इनडायरेक्ट्ली तो कारणीभूत ठरला तिच्या मरणाला.
जाउद्या, आयॅम टु मच इन लव्ह अँड लॉयल टु द शो
अगं, सारखं 'बच्चोंका तो खयाल
अगं, सारखं 'बच्चोंका तो खयाल करो, बिटिया' काय?! सर्सीला तेच, डॅनीला तेच - या बायकांना तो किती काळ ओळखतो आहे आता?! अॅन्ड आय थॉट ही वॉज द स्मार्टेस्ट पर्सन अलाइव्ह!
बरं त्यांनाच नाही, जेमीलाही - तुम बहू को लेकर पेन्टोस चले जाओ - घर बसाओ!
तो वॅरिसबद्दल तिला जाऊन सांगण्याचा सीन कशासाठी होता आणि? ब्रेकिंग द आइस?! ती ते ओळखूनच होती - नसती तरी पॉइंट काय!
काल एपिसोड बघून अगदी लहानपणी
काल एपिसोड बघून अगदी लहानपणी दूरदर्शन वर पाहिलेली कन्नगी ची गोष्ट आठवली , anyone else ??
पल्लवी जोशीनी मस्तं काम केलं होतं !
राजा आणि प्रजा कन्नगीला तिच्या मौल्यवान पायतल्या दागिन्यावरून चोर ठरवते, रिअॅलिटी मधे तिचे पायातले दिसायला राणीच्या पायातल्या सारखे असते तरी त्याहीपेक्षा जास्तं मौल्यवान असतात , न केलेल्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरवल्यामुळे कन्नगी अख्या शहराला जळण्याचा शाप देते, शहर उध्वस्त करते.
https://en.m.wikipedia.org/wiki/Kannagi
नाही आठवत ही - इन्टरेस्टिंग
नाही आठवत ही - इन्टरेस्टिंग आहे.
मला आठवतेय. मस्त होती ही
मला आठवतेय. मस्त होती ही गोष्ट.
>>तो वॅरिसबद्दल तिला जाऊन
>>तो वॅरिसबद्दल तिला जाऊन सांगण्याचा सीन कशासाठी होता<<
टिरियन इज ऑन दि क्लॉक; आणि म्हणुनच तो भंजाळला आहे. वेरसची चुगली करण्यामागे ब्राउनी पॉइंट्स स्कोअर करायचा त्याचा हेतु असावा...
मला व्हॅरीस चे ते "तिने
मला व्हॅरीस चे ते "तिने खाल्ले का?" या प्रश्नाचा अर्थ कळला नाही. मला एक कलीग म्हणाला की त्याने पॉइझन करायचा प्रयत्न केला डॅनी ला.
नंतर ते अंगठ्या का काढून ठेवल्या तेही समजले नाही.
हो, मलाही त्या छोट्या
हो, मलाही त्या छोट्या मुलीबरोबर पॉइझन पाठवायचा प्रयत्न केला असेल अशीच शंका आली. आंगठ्यांचं काय ते कळलं नाही.
>>मला एक कलीग म्हणाला की
>>मला एक कलीग म्हणाला की त्याने पॉइझन करायचा प्रयत्न केला डॅनी ला.<<
हो; पुढे त्या मुलीला तो सांगतो कि पुन्हा रात्री प्रयत्न करुया. दरवाजावर सैनिक आल्याची चाहुल लागल्यावर त्याने अंगठ्या काढल्या कारण आपला शेवट जवळ आला आहे हे त्याला कळुन चुकलं; असा अर्थ मी लावला...
हो की - पण अंगठ्या असत्या
हो की - पण अंगठ्या असत्या बोटांवर तर काय बिघडणार होतं? त्याला जाळायला मेटल डिटेक्टरमधून नेणार होते का?
अंगठ्या वाया गेल्या असत्या ना
अंगठ्या वाया गेल्या असत्या ना!
वॅरीसचे 'सील' (मोहोर) असते का
वॅरीसचे 'सील' (मोहोर) असते का त्या अंगठीत? तो पुढल्या मास्टर ऑफ व्हिस्पररसाठी काढून ठेवत असेल
प्रॉपर हँड ऑफ न होता मॅड
प्रॉपर हँड ऑफ न होता मॅड क्वीन त्याला मारणार हे त्याला समजतं. पण हा प्रॉपर प्रोसेसचा भक्त असल्याने नॉलेज ट्रान्सफर नाही तर कमित कमी इक्विपमेंट तरी पुढच्या माणसाच्या हातात पडू दे! असा उदात्त दृष्टीकोन का?
आर्या सर्सीला न मारताच हाउंडच्या इशार्यावर निघुन जाते ते अजिबात पटलं नाही. हाउंड आणि त्याचा बिग ब्रदर मारामारी करत असताना सारखं आर्याला पडताना मग हाउंडला पडताना, हिला जमिनीवर लोळताना मग त्याला तेच करताना दाखवत होते. तेव्हा मला शेप शिफ्टर करुन अदला बदली झाली असं वाटू लागलेलं. पण तिथे ही निराशा.
फेस लेस गॉड कडे इतकी वर्षे धुणी भांडी केर लादी करुन त्याचा ढिम्म काही उपयोग करू शकत नाहीये आर्या. महामूर्खमंद आहे ती. तिच्या ने काही होण्यासारखं नाही.
तिच्या एकटीकडून किती अपेक्षा
तिच्या एकटीकडून किती अपेक्षा त्या
तेव्हा मला शेप शिफ्टर करुन अदला बदली झाली असं वाटू लागलेलं >> माउंटन ला मारण्यात आर्याला काय इंटरेस्ट असणार ? तो नसतो तिच्या लिस्ट मधे. ते हाउंड चे अवतार कार्य होते.
नाही. माउंटन ला मारण्यात नाही
नाही. माउंटन ला मारण्यात नाही तर रेड कीप मध्ये राहून सर्सीला मारण्यात.
हाउंड सांगतो की मी सर्सीला मारतो आणि ही निघून जाते. जे करायला ती विंटर फेल वरून आली ते असं सोडून जाईल का?
कारण तिला पटलं की बदले की आग
कारण तिला पटलं की बदले की आग मे ती पण हाउंड सारखी सिनिकल कडवट बनणार. इट इज नॉट वर्थ इट. सर्सी तशीही मरणारच आहे.
आर्या ने थोडं जगायला शिकलं पाहिजे.
आता कमीतकमी धारातीर्थी
one who passes the sentence should swing the sword.
आता कमीतकमी धारातीर्थी पडलेल्या ड्रॅगन चं फेस काढ आणि ओक आग त्या खालीसी आणि उरलेल्या ड्रॅगन वर!
फेस लेस गॉड कडे इतकी वर्षे
फेस लेस गॉड कडे इतकी वर्षे धुणी भांडी केर लादी करुन त्याचा ढिम्म काही उपयोग करू शकत नाहीये आर्या. महामूर्खमंद आहे ती. तिच्या ने काही होण्यासारखं नाही.
<<<
What ? Sure you are watching same GOT ?
तिच्याने काही होणार नाही ? नाइटकिंगला मारून लिव्हिंग वर्सेस डेड सारखं जंबो कार्य केल्यावर सर्सीला पुन्हा तिनेच का मारवं ?
फेसलेस गॉड कडून शिकल्यावर फेस ट्रान्सफरनी ऑलरेडी किती कत्तल केली आहे तिनी, बास कि !
किंग्ज लँडींग युध्दात क्षणाक्षणाला जळून भस्मं होत होतं सगळं, कधी फेसेस सोलून चिकटवून येणार ?
आली असती तर तिकडूनही फॅन्स बोलतात बॉलिवुडी चमत्कार म्हणून
हाउंडमुळे तिला कळतं की
हाउंडमुळे तिला कळतं की सूडाच्या भरात शी इज मिसिंग द बिग पिक्चर - जसा तो भावाबद्दलच्या सूडभावनेत अडकून पडला होता तशीच.
बहुजनहिताय बहुजनसुखाय हे ब्रीद असेल तर आता सर्सी ही थ्रेट उरलेली नसून डॅनी आहे. 'कोणा'ला मारतो यापेक्षा हे सगळं कशासाठी चाललं आहे हा विचार हवा याची आठवण तिला सॅन्डॉर करून देतो. (आणि मग स्वतः भावाला मारायलाच जातो! )
अमित, डिज्जे चिडली तर तुझा
अमित, डिज्जे चिडली तर तुझा वॅरिस होईल. अंग आणि अंगठ्या जपून!
अमित उगाचच गॉट वर उखडलेला आहे
अमित उगाचच गॉट वर उखडलेला आहे हां. बिचार्याने गप्पांमध्ये सामील होता यावं म्हणून केवळ बघितली सिरियल असं आता मला वाटायला लागलय
अमितव
डिज्जेसमोर गॉटबद्दल आणि
डिज्जेसमोर गॉटबद्दल आणि एम्टीसमोर मराठी बिगबॉसबद्दल काही बोलायचं नाही. द सिस्टर्स हॅव नो मर्सी!
छे छे बिबॉ बद्दल बोललात तरी
छे छे बिबॉ बद्दल बोललात तरी काही प्रॉब्लेम नाय बॉ आपल्याला. बघणार्यांबद्दल बोललात तर आहे
अमित ला एकूण फेसलेस मेन चा पार्ट बघताना झोप लागली असावी असे दिसते आहे
>> आणि मग स्वतः भावाला
>> आणि मग स्वतः भावाला मारायलाच जातो! >>
हो हो फेसलेस मेन मध्ये झोप लागलीच. पण जाग आल्यावरही ही आपली फरशा पुसत्येय किंवा प्रेतांना आंघोळी घालत्येय. (सकाळी आंघोळी घालायची का संध्याकाळी ते विचारू नका. )
डीजे, फेसलेस कडून शिकून फ्रे कडेच फक्त कत्तल केली ना? की बाकी कुठे तो फेसलेस कन्सेंप्ट वापरुन कत्तल करताना ही मला झोप लागली? एर्या गैर्यांची फेसेस नको सोलू. पण आता ड्रॅगनचं फेस सोलून घे की मग मी खूष. अजून फार कुणाला हिच्या फेसलेस ट्रिक्स माहितच नाहीयेत. हे म्हणजे इंजिनिअरिंग पेपराला अख्ख्या पीएल मध्ये घोकून गेलेल्या चॅप्टर मधलं काही म्हण्जे काही विचारलं नाही की जसं फीलिंग येतं तसं झालं. युज झालं पाहिजे तर आधी इतकी एनर्जी घालवण्यात मतलब!
>> बिचार्याने गप्पांमध्ये सामील होता यावं म्हणून केवळ बघितली सिरियल >> शूम्पी, हो फक्त आणि फक्त फोमो च्या भितीनेच बघितली. आणि नो रिग्रेट्स. आवडली ही मला.
फेसलेस मेन फक्त जादू करत
फेसलेस मेन फक्त जादू करत नाहीत!! त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या काँबॅट चं आणि किलिंग चं प्रशिक्षण देण्यात येतं आर्या त्या वेफ बरोबर काठ्या, भाले, तलवारींनी ट्रेन करताना आणि मार खाताना दाखवली आहे की किती तरी वेळा. म्हणुन तर आर्याला वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांनी लढता येतं. ते दिसलं आहे की वेळो वेळी. विंटरफेल च्या लढाईत, ब्रिएन बरोबर प्रॅक्टिस करताना वगैरे. प्राण्यात शिरून खून करायला ते वार्ग नाहीयेत.
ह्म्म... मार्यामार्या करुन
ह्म्म... मार्यामार्या करुन जिंकणे इज सो डाउन मार्केट! ते सगळेच करतात. आय गेस आय एम फिक्सेटेड ऑन दीपमाळ ऑफ फेसेस.
लुक्स लाईक रीरन केला पाहिजे. बरेच बारकावे मिस झालेत माझे.
कारण तिला पटलं की बदले की आग
कारण तिला पटलं की बदले की आग मे ती पण हाउंड सारखी सिनिकल कडवट बनणार. इट इज नॉट वर्थ इट. सर्सी तशीही मरणारच आहे.>> एक्झाक्टली! ती पण त्या हाउंडसारखी किलींग मशीन बनण्याच्या मार्गावर जात असते आणि हाउंड तिला वेळीच थांबवतो. त्यासाठीच ते शेवटचं 'थॅक यू' येतं तिच्याकडून.
Pages